Pikpera on E-Pik Pahni App : विमा, नुकसानभरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी !

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

विमा, नुकसान भरपाई हवी तर करा पीक पेरा नोंदणी !

ई-पीक पाहणी ॲपवर पीक पेरणीची नोंदणी सुरु : नुकसान भरपाई मिळण्यासाठी महत्वाचे

     राज्यात गेल्या तीन वर्षांपासून मोबाइलवरील e-pik pahni app : ई-पीक पाहणी ॲपवर पीक पेरणीची नोंदणी केली जात आहे. यंदाही १ ऑगस्टपासून ही नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी या नोंदलेल्या ई-पीक पाहणीच्या आधारे पीकविमा दावे निकाली काढण्यासाठी, पीक कर्जवाटप, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येणार आहे.

१ ऑगस्टपासून करा पीक पेरा नोंदणी

राज्य सरकारच्या भूमिअभिलेख व जमाबंदी आयुक्तालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये शेतकरी पातळीवर पीक नोंदणीसाठी ई-पीक पाहणी ॲप उपलब्ध करून दिले. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी तलाठ्याकडे न जात घरबसल्या पिकांची नोंद करता येते. यासाठी २ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर अशी मुदत आहे.

कोठे कराल नोंदणी..?

भूमी अभिलेख विभागाने आता ई-पीक पाहणीचे नवीन सोपे व्हर्जन आणले असून, या ॲपमुळे शेतकयांना ई-पीक पाहणीत ४८ तासात दुरुस्ती करता येणार आहे. तसेच जियो फेन्सिंग या सुविधेमुळे पिकांचे अचूक छायाचित्र घेतले किया नाही हे ठरविता येणार आहे.

ॲपवर कशी कराल नोंदणी?

हे ॲप डाउनलोड केल्यावर शेतकऱ्याला आपल्या शेतीची आवश्यक माहिती भरल्यानंतर पिकांची नोंदणी करता येते. या नोंदणीमुळे राज्यात कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, गावात कोणते प्रमुख पीक आहे. याची माहिती मिळणे सुलभ झाले आहे.

विमा, भरपाई हवी असेल तर करा नोंदणी…!

• यातील नोंद ही सातबारा उताऱ्यावर केली जाते. तीच अधिकृत असते.
• राज्य सरकारही याच माहितीचा उपयोग करून नैसर्गिक आपत्तीतील मदत, पीकविमा आदी कामांसाठी केला जाणार आहे.
• साखर आयुक्तालय देखील याच माहितीचा उपयोग करू शकेल. हीच माहिती अंतिम असेल. सहकार विभाग, पणन विभाग तसेच बँकांनाही कर्ज वितरणात याच माहितीचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *