12 हजार तिकीट, 10 मिनिटं थांबला कोलकात्यात राडा, मोदींना भेटणार मेस्सीचं भारतातले शेड्युल?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

तो भारतात आला तो शाहरुख खान सोबत दिसला सौरव गांगुली, ममता बॅनर्जी यांनाही भेटणार तो तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या सोबत मॅच खेळणार राहुल गांधी ती मॅच बघणार तो सचिन तेंडुलकरला भेटणार फॅशन शोला सुद्धा जाणार जायच्या आधी दिल्ली घाटणार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार मग त्याच्या देशात जाणार हे सगळं तो 72 तासात करणार पण त्याची एक झलक पाहायला प्रचंड गर्दी उसळणार तो कोण तर अर्थात लिओनेल मेसी कोलकात्याच्या सॉल्टलेक स्टेडियम जवळ मेसीचा पूर्णाकृती पुतळा उभा राहण्यात आलाय त्याच व्हर्चुअल उद्घाटन स्वतः मेसी ने केलं.

त्यानंतर तो शाहरुख खान सोबतही दिसला त्याच्या निघून जाण्यामुळे कोलकत्त्यात जोरदार सुद्धा झाला पण मेसी भारतात आलाय कशासाठी मेस्सी कुठे कुठे जाणार आहे? मेस्सी कुणा कुणाला भेटणार आहे? सुनील क्षत्री खरंच मेस्सीला भेटणार नाही का? सगळी स्टोरी जाणून घेऊयात…

सर्वप्रथम मेस्सी कोलकाता एअरपोर्टवर पोहचला…

शनिवारी पहाटे अडीच वाजता कोलकाता एअरपोर्टवर पोहोचला. यानंतर शनिवारी सकाळी 11:30 वाजता त्यान लेकटाऊन मधल्या आपल्या पुतळ्याच व्हर्चुअल अनावरण केलं. त्रिभूमी स्पोर्टिंग क्लबच्या फॅन्सने मेस्सीचा हा ब्रॉजचा 70 फुटी पुतळा बनवलाय ज्यामध्ये मेस्सीच्या हातात वर्ल्ड कप ट्रॉफी दाखवली आहे. विशेष म्हणजे हा पुतळा फॅन्सने स्वतःहून बनवलाय. आणखी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पश्चिम बंगालचे मंत्री आणि श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष सुजित बोस यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की आम्ही मेसीच्या टीमला शनिवारी हा पुतळा दाखवला.

स्वतः मेस्सी आणि त्याच्या मॅनेजरला हा पुतळा आवडला असून त्यांनी या पुतळ्यासाठीची परवानगी सुद्धा दिली आहे. म्हणजेच पुतळा उभारल्यानंतर उद्घाटनाच्या आधी मेस्सीला विचारण्यात आलं का? असा प्रश्न विचारला जातोय. पण अर्थात हा फॅन्सने प्रेमापोटी उभारलेला पुतळा आहे. मेस्सीने शनिवारी सकाळी या पुतळ्याच अनावरण केल्यानंतर तो सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये गेला तिथे तो शाहरुख खान त्याचा मुलगा अब्राहम खान यांना भेटला.

लखनऊ सुपर जायंट्स आणि मोहन बागान क्लबचे मालक असलेल्या संजीव गोयंका यांची सुद्धा मेस्सी सोबत भेट झाली सॉल्टलेक स्टेडियममध्ये मेस्सीने लॅप मारली आणि चहात्यांना अभिवादन केलं याच स्टेडियम मध्ये त्याची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारतीय क्रिकेट संघाचा फॉर्मर कॅप्टन सौरव गांगोली यांच्या सोबतही भेट नियोजित होती.

विशेष म्हणजे 2011 मध्ये मेस्सी जेव्हा भारतात आला होता तेव्हा तो कोलकात्याच्या याच सॉल्टलेक स्टेडियम मध्ये वेनेजुएला सोबत फिफा च फ्रेंडली मॅच खेळला होता. त्यावेळी सॉल्टलेक स्टेडियम मध्ये प्रचंड गर्दी झालेली फॅन्सने अगदी ग्राउंडच्या टेरेसवर चढून मॅच पाहिलेली एवढी खतरनाक क्रेज मेस्सीची कोलकात्यामध्ये आहे.

मेसी सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये 10 मिनिटच थांबला; चहात्यांनी घातला दंगा:

त्याची झलक आता पुन्हा एकदा दिसून आली. मेस्सीशी बोलण्यासाठी त्याची सही घेण्यासाठी फुटबॉल प्लेयर्सने सुद्धा गर्दी केलेली पण मेसी सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये 10 मिनिटच थांबल्यानंतर निघाला त्यामुळे चहात्यांनी सीट्स तोडल्या स्टेडियममध्ये बाटल्या फेकल्या काही चहाते थेट मैदानात घुसले आणि त्यांनी मैदानातले टेंट्स उलटून टाकले मेस्सी लवकर गेला कार्यक्रमाच आयोजन नीट झालेल नाही साडे हजार पासून सुरुवात असलेली तिकीट्स काढून आलेल्या लोकांना मेस्सीची झलक सुद्धा मिळाली नाही. त्याच्याभोवती राजकीय नेते आणि अभिनेते यांचाच गराडा होता असं म्हणत मेस्सीच्या चाहत्यांनी कोलकात्यामध्ये दंगा घातला.

कोलकत्त्यामधले इव्हेंट झाल्यावर तो हैदराबादच्या दिशेने निघेल:

कोलकत्त्यामधले इव्हेंट झाल्यावर दोन वाजण्याच्या सुमारास मेस्सी हैदराबादच्या दिशेने निघेल. त्यानंतर चार वाजता तो हैदराबाद एअरपोर्टला पोहोचेल. संध्याकाळी 7त वाजता मेस्सी राजीव गांधी स्टेडियमवर होणाऱ्या इव्हेंटमध्ये सहभागी होईल. इथे म्युझिक कॉन्सर्ट होईल. सोबतच एक सेवन साईड मॅच सुद्धा होईल. पण मेस्सी त्यात खेळणार नाही. त्यानंतर एका फ्रेंडली एक्झिबिशन मॅचमध्ये मेस्सी सहभागी होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेस नेते मेस्टी सोबतच्या मॅचमध्ये खेळतील. ही मॅच बघण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत असं सूत्रांकडून सांगण्यात येतय. हैदराबाद मध्येच मेस्सीचा आजचा दिवस संपेल.

रविवारी 14 डिसेंबरला मेस्सी मुंबईला जाईल;

त्यानंतर रविवारी 14 डिसेंबरला मेस्सी मुंबईला जाईल. दुपारी 3:30 वाजता मेस्सी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया मध्ये होणाऱ्या पॅडल कपच्या इव्हेंटसाठी उपस्थित असेल. बरेच सेलिब्रिटी या इव्हेंटला असतील. भारतात स्पोर्ट्स कल्चर रुजाव म्हणून या इव्हेंटच आयोजन करण्यात आलय. त्यानंतर मेसी वानखेडेमध्ये जाईल. इथं तो सचिन तेंडुलकरला भेटेल.

थोडक्यात दोन खेळांमधले दोन गोट्स भारतीय क्रिकेटच्या सगळ्यात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी भेटतील. इथंच मिस्सी सुनील छत्रीला भेटणार असल्याचं सांगण्यात येतय. पण ही भेट अजूनही नक्की झालेली नाही असा दावा काही बातम्यांमधून करण्यात येतोय. वानखेडेमध्येच मिस्सी सुरेज आणि डीपॉल सोबत एका फॅशन शो मध्ये सहभागी होणार आहे असेही बातम्यांमधून सांगण्यात येतय.

15 डिसेंबरला म्हणजेच सोमवारी मेस्सी दिल्लीला जाईल:

त्यानंतर 15 डिसेंबरला म्हणजेच सोमवारी मेसी दिल्लीला जाईल. तिथे तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर मिनरवा अकॅडमीच्या ट्रॉफी विनिंग टीमचा सत्कार मेसी करेल. त्यानंतर एक नाईनासाईड फुटबॉल मॅचला सुद्धा मेस्सी उपस्थित असेल. त्यानंतर मेस्सीचा भारतातला दौरा संपेल.

मेस्सी भारतात आलाय कशासाठी?

पण एक बेसिक प्रश्न म्हणजे मेस्सी भारतात आलाय कशासाठी तर मेसी भारतात आलाय गोट इंडिया टूर साठी पण या इव्हेंटला मेन बॅकिंग आहे ते युनिसेफ च मेसी युनायटेड नेशन्स चाइल्ड ऑर्गनायझेशन असलेल्या युनिसेफचा ब्राँड अम्बेसडर आहे त्या अंतर्गतच त्याने ही गोट इंडिया टूर केली आहे ज्यात तो तीन दिवसात चार मोठ्या शहरांना भेट देणार आहे. तो जिथे जाईल त्या शहरांमध्ये फुटबॉल प्रमोट करणार आहे. यंग फुटबॉल प्लेयर्सला सुद्धा भेटणार आहे पण मेस्सी एकही स्पर्धात्मक मॅच खेळणार नाही त्यामुळे त्याचा खेळ बघण्याची संधी भारतीय चाहत्यांना मिळणार नाहीये.

मुंबईमध्ये मेस्सी भारताचा माजी कॅप्टन आणि फुटबॉल सुपरस्टार सुनील छत्रीला भेटणार असल्याच्याही बातम्यात पण इंडिया टुडे ने दिलेल्या बातमीनुसार सुनील छेत्रीने मेस्सी सोबतची ही भेट नाकारली आहे. आपली आणि मेस्सीची भेट होऊन काहीच साध्य होणार नाही. खास करून भारतीय फुटबॉल आधीच अडचणीत असताना या भेटीमधून भारतीय फुटबॉलला काहीही मिळणार नाही म्हणून छेत्रीने भेट नाकारल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे आता या दोन लेजेंडरी प्लेयरशी भेट होणार की नाही याकडे सगळ्यांच लक्ष असेल मेसी शनिवारी संध्याकाळी हैदराबाद मध्ये जाणार असला तरी त्याआधी कोलकात्यामध्ये झालेला चर्चेत आलाय मेसी सॉल्ट लेक स्टेडियम मध्ये 45 मिनिट थांबणार होता यासाठी 7000 ही तिकिटांची बेसिक प्राईज होती एकूण 78000 सीटची अरेंजमेंट करण्यात आली होती पण मेसी फक्त 10 मिनिट थांबून निघून गेल्यान चाहते संतापले आणि फेकाफेक तोडफोड पाहायला मिळाली.

कोलकात्यान याआधी पेले मॅराडोना रोनाल्डिनो अशा प्लेयर्सला होस्ट केले. स्वतः मेसी सुद्धा कोलकात्यामध्ये येऊन गेलाय पण यावेळी कोलकत्त्यात मेस्सीचा पुतळा उभारला गेला असून सुद्धा 45 मिनिटांची वेळ नक्की असताना सुद्धा मेस्ी लवकर निघून गेला असं म्हणत चाहत्यांनी संताप व्यक्त केला.

हैदराबाद मध्ये मेस्सीला झेड सुरक्षा देण्यात आली आहे तर मुंबईत तिकीटच 8डे हजारापासून सुरू होतय. त्यामुळे मेस्ती आणि छत्रीच्या भेटीकडे आणि मेस्सी मुंबईत किती वेळ देतो याकडे सगळ्यांच लक्ष आहे. मुळात मेस्सी आधी केरळमध्ये येणार होता. तिथे मॅच सुद्धा खेळणार होता पण ते सगळंच शेडुल पोस्टपोन झालं. मेस्सी सध्या भारतात आला तो फक्त इव्हेंटसाठीच त्यामुळे आता मेस्सीच्या भारत दौऱ्यात नेमकं काय काय घडतं? सेलिब्रिटी नेते यांच्यासोबतचे फोटो सोडून मेस्ी काय करतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *