२९ ऑगस्ट “संघर्षयोधा मनोज जरांगे पाटील” यांचा मुंबई येथे जाहीर मोर्चा..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

नजर जाईल तिथवर लोकांची गर्दी रस्त्यावरती गाड्यांच्या लांबपर्यंत रांगा बाजूला उभे असलेले काही जेसीबी त्या जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्येही उभी असलेली माणसं आणि उपस्थित असणाऱ्या सगळ्या लोकांच्या तोंडात एकच घोषणा “एक मराठा लाख मराठा” हे दृश्य होतं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा ताफा नारायणगावच्या पुढे निघाल्यानंतरच बुधवारी 27 ऑगस्टला सकाळी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते.

त्यानंतर गुरुवारी 28 ऑगस्टला सकाळी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळी म्हणजे शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. तिथून ते हजारो मराठा बांधवांच्या सोबतीने मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना 29 ऑगस्टला फक्त एकच दिवस आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावरती सकाळी 9:00 ते संध्याकाळी सहा या वेळेतच आंदोलन करता येणार आहे. पण ज्या वेगाने सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईच्या दिशेने कुच करतोय ते पाहता त्यांना काही किलोमीटर च अंतर पार करण्यासाठी अनेक तासांचा वेळ लागतोय त्यामुळं गुरुवारी रात्रीपर्यंत मनोज जरांगे पाटील वाशीला पोहोचू शकणार का? हा प्रश्न वारंवार विचारला जातोय. हजिकच मनोज जरांगे पाटील यांचा ताफा मुंबईमध्ये नक्की कधी पोहोचणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलय.

शिवनेरी दर्शन:

पण पुण्याच्या नारायणगाव मधून निघाल्यानंतर मनोज जरांग यांच्या आंदोलनामध्ये नक्की काय काय घडलं मुंबईमध्ये आझाद मैदानावरती मनोज जरांगेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती नक्की कशी तयारी करण्यात आली आहे पार्किंगच्या सोयीचा नेमका अर्थ काय निघतोय मुंबई नवी मुंबईमध्ये काय काय घडतय सगळी माहिती जाणून घेऊयात गुरुवारी 28 ऑगस्टला दुपारी तीन सव्वातीन वाजताच्या आसपास मनोज जरांगे यांचा ताफा नारायणगाव मध्ये पोहोचला होता तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी जमली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मराठा समाजाचे हजारो बांधव सज्ज होते. नारायणगाव मध्ये मराठा समाजाकडून स्वागत स्वीकारल्यावरती जरांगे पाटलांचा ताफा मुंबईच्या दिशेने पुढे सरकला. दुपारी 3:30 तीन वाजताच्या आसपास जरांगेचा ताफा पुणे नाशिक महामार्गावरती दाखल झाला. पुणे नाशिक हायवेवरती आल्यानंतर तिथून पुढे मणसर राजगुरुनगर चाकण मार्गे तळेगाव असा त्यांचा पुढचा प्रवास होता.

नारायणगावला पोहोचण्या आधी मनोज जरांगे यांच्या ताफ्याला 22 किलोमीटर चा प्रवास करण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागला होता पण पुणे नाशिक हायवेवरती आल्यावरती जरांगेचा ताफा वेगाने पुढे जाताना दिसला. दुपारी सव्वा चार वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या गाडीचा ताफा जुन्या मुंबई हायवेवरती तळेगावला पोहोचला. दरम्यान राज्य सरकारकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना स्वतः फोन करून चर्चा केली अस स्वतः मनोज जरांगे पाटील यांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलं एकीकडे मनोज जरांगेचा ताफा मुंबईच्या जवळ येत असतानाच रामदास आठवले यांच्या आरपीआय गटाने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलाय महाबळेश्वर मधल्या राज्यस्तरीय विचार मंथन शिबिरामध्ये रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये एक मताने हा ठराव मंजूर करण्यात आलाय मनोज दरंगे पाटील अजून वाटेतच असतानाच नवी मुंबईच्या वाशी टोल नाक्यावरती मराठा समाजाच्या अनेक बांधवांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती.

गुरुवारी संध्याकाळी पाच वाजताच्या आसपास मराठा समाजाच्या नेत्यांनी वाशी टोल नाक्यावर गर्दी केली. यावेळी या सगळ्यांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. मराठा कार्यकर्त्यांकडून छगन भुजबळ यांच्या विरोधामध्येही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वकील गुणरत्न सदावर्तेच करायचं काय? अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. मनोज जरंगे मुंबईत येण्याआधीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

गुरुवारी दुपार पासूनच झाली गर्दी:

गुरुवारी दुपार पासूनच नवी मुंबई पोलिसांचा बंदोबस्त कोणगाव पनवेल इथे सज्ज झालाय. पनवेल कोणगाव येथून मनोज जरांगेचे समर्थक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने जात आहेत. गुरुवारपासूनच नवी मुंबईच्या कोणगाव इथून उलवे पांबीच या मार्गावरून वाशी कडून आझाद मैदानाच्या दिशेने कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती निघायला सुरुवात झाली होती. आता लाखोंच्या संख्येने मराठा बांधवांना सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले असले तरी मुंबई पोलिसांकडून मात्र आझाद मैदानावरती फक्त 5000 आंदोलकांनाच येता येईल अशी अट घालण्यात आली आहे.

शिवाय अनेक मराठा बांधव एक महिनाभर पुरेल एवढा सामान आणि किराणा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. इतर ठिकाणावरून निघालेले काही मराठा बांधव तर किराणा घेऊन गुरुवारी दुपारीच आझाद मैदानावरती दाखल झाले होते. पण पोलिसांनी आझाद मैदानामध्ये जेवण बनवता येणार नाही अशी अड घातली आहे पण मराठा समाजाच्या बांधवांना त्यांच्या जेवणाची सोय नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये करण्यात आली आहे.

पोलिसांकडून 29 ऑगस्टला सकाळी 9:00 ते संध्याकाळी ६:00 वाजेपर्यंतच आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांच्या या अटीवरती मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया सुद्धा समोर आली आहे. आम्ही 4000 आंदोलक आझाद मैदानामध्ये बसतो. बाकीचे इतर मैदानामध्ये बसतील पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागार नाही अशी भूमिका मनोज जरांगनी घेतली आहे मनोज जरांगे यांच्या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवरती १५00 च्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत गरज भासल्यास अतिरिक्त पोलीस फोर्सही मागवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. आझाद मैदानाच्या परिसरामध्ये 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. आझाद मैदानाच्या परिसरामध्ये पाच डीसीपी आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाचे अधिकारी तैनात असतील. सोबतच दंगल नियंत्रण पथक अग्निशमन पथक सुद्धा तैनात असणार आहे.

पार्किंगच्या ठिकाणांची एक यादी जाहीर करण्यात आली:

मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव मुंबईमध्ये येणार असल्याने मुंबईच्या वडा वाहतूक विभागाने पार्किंगच्या ठिकाणांची एक यादी जाहीर केली आहे. बेवलॉन मागच्या बाजूची पार्किंग बेवी लॉन कडे जाणारा रस्ता दोन्ही बाजूला पार्किंग एम टू एम स्कॅटिंग ग्राऊंड ई रोड प्लॉट पार्किंग तालमार्ग ई शेड ते फ्री वे ब्रिज खाली एमबीपीटी रोडवरती कैनास पार्किंग ग्राउंड एक फायर ब्रिगेडच्या डाव्या बाजूला कैनास पार्किंग ग्राउंड दोन फायर ब्रिगेडच्या उजव्या बाजूला अंधशाळेच्या बाजूचे ग्राऊंड आणि बीपीटी कॉटन ग्राऊंड स्ट्रीट एरिया या नऊ जागांवरती वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे या नऊ जागांवरती एकूण 2950 वाहनांची पार्क करता येणार आहे पण मनोज जरांगे पाटील ज्या जिल्ह्यातून जाता आहेत तो जिल्हा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून हजारो गाड्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे संपूर्ण तागदीसह मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले.

तर नेमून दिलेल पार्किंग पुरेस ठरणार का हे पाहणही महत्त्वाचं ठरणार आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबई पोलिसांनी ही वाहतुकीमध्ये काही बदल केलेत मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी पळस्पे गवाण फाटा पांबीच मार्गे वाशी हा मार्ग आंदोलकांच्या वाहनांसाठी राखीव ठेवलाय त्या काळामध्ये इतर वाहनांना मुंबई पुणे रोड जेएनपीटी रोड पळसपे डी पॉईंट नवान फाटा परिसर तसच वाशी प्लाझा आणि वाशी रेल्वे स्टेशन जवळून प्रवेशबंदी असणारे इमर्जन्सी वाहनांना या बंदीमधून सूट देण्यात आली आहे गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी सांगितलेले पर्यायी मार्ग वापरावे अस आव्हान वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलय मनोजरांगे पाटलांचा ताफा पुण्याच्या मंचर पर्यंतच पोहोचलाय इथून पुढे ते मुंबईच्या दिशेने रवाणा होणार आहेत.

गुरुवारी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंचर पर्यंत ताफा असल्याने आणि ठीक ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मनोज जरांगे पाटलांचा सत्कार होत असल्याने गुरुवारी रात्री मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईपर्यंत पोहोचणार नाही असाच अंदाज मानला जातोय. शुक्रवारी पहाटे मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल होतील. असा कार्यकर्त्यांचा अंदाज आहे. पण मनोज जरांगे मुंबईत पोहोचण्या आधीच देवेंद्र फडनविसांच्या फोटोसह लागलेले बॅनरही चर्चेचा विषय ठरलेत. इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तुत्वाला लक्षात ठेवतो अस लिहिलेले बॅनर आझाद मैदानावरती लागले आहेत त्यामुळे आता मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईमध्ये कधी दाखल होणार त्यांच्या आंदोलनाची दिशा मुंबईमध्ये आल्यावरती कशी राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *