400 पेक्षा जास्त फ्लाईट्स कॅन्सल एअरपोर्टवर रांगा इंडिगोचा घोळ काय झालाय?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

दिल्ली, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, पुणे देशातल्या सर्व मोठ्या एअरपोर्ट्स वरती सध्या एकच चित्र दिसतय प्रत्येक एअरपोर्ट वरती शेकडो प्रवासी तात्काळ उभे आहेत अनेकांच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत अनेकांच्या डिले होतय अनेक प्रवाशांना तासंतास कोणतही अपडेट मिळत नाहीये कित्तेकांनी तर विमानाच्या प्रतीक्षेत संपूर्ण रात्र विमानतळावरच घालवली आहे हे सगळं घडतय देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगो एअरलाई्स सोबत गुरुवारी 4 डिसेंबरला इंडिगोच्या च्या 250 हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्या.

त्याआधी मंगळवारी आणि बुधवारी 200 हून अधिक फ्लाईट्स कॅन्सल झाल्या. सध्या देशाच्या प्रत्येक एअरपोर्टवरती इंडिगोच्या फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये संताप आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर डीजीसीएन इंडिगोच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. इंडिगोन लवकरात लवकर परिस्थिती सामान्य करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पण हे सगळं का घडतय? देशभरात इंडिगोच्या फ्लाईट्स एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅन्सल का होतायत? ही परिस्थिती कधीपर्यंत राहू शकते? सगळी माहिती जाणून घेऊया…

सगळ्यात आधी नेमकं घडलं काय ते बघू. मंगळवारपासून देशभरातल्या विमानतळांवरती इंडिगोच्या फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत. गुरुवारी दिल्लीत इंडिगोच्या 95 हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्या. मुंबईत 86 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. हैदराबाद मध्ये 33 तर जयपूर विमानतळावर चार फ्लाईट्स रद्द झाल्या. बेंगलोरच्या कॅम्पेगोडा विमानतळावरती सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या. बुधवारी बेंगलोरच्या 62 तर मंगळवारी एकूण 20 फ्लाईट्स कॅन्सल झाल्या यामुळे बँगलोर विमानतळावरती मोठा गोंधळ उडाला होता अनेक प्रवाशांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला यावेळेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत गुरुवारी एकट्या मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू विमानतळांवर इंडिगोच्या 200 हून अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या.

याशिवाय नागपूर, कोचीन, कोलकत्ता, पुणे, वडोदरा, अहमदाबाद, इंदोर प्रत्येक शहरात ही स्थिती पाहायला मिळाली. फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळे विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सरकारी आकडेवारीनुसार मंगळवारी इंडिगोची फक्त 35% उड्डाण वेळेवर होते. तर सोमवारी फक्त 49.5% विमान वेळेत उडाली.

इंडिगोनच्या म्हटल्यानुसार काही कारणांमुळे वेळापत्रकात बदल करतोय..

महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी दररोज 2200 हून अधिक फ्लाईट्स ऑपरेट करते. बुधवारी परिस्थिती याहून गंभीर होती. गुरुवारी सुद्धा यात बदल झाला नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिगोन बुधवारी रात्री एक निवेदन जारी करून प्रवाशांच्या गैरसोईबद्दल माफी मागितली. कंपनीन गेल्या दोन दिवसात त्यांच्या नेटवर्कमध्ये बिघाड झाल्याचं मान्य केलं. इंडिगोन म्हटलं की गेल्या दोन दिवसांपासून आमच कामकाज विस्कळित झालाय. यामुळे आम्ही आमच्या वेळापत्रकात बदल करतोय. हे काम शुक्रवार संध्याकाळपर्यंत सुरू राहील. या काळात प्रवाशांना काही गैरसोय होऊ शकते यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना पर्यायी फ्लाईट्स किंवा पूर्ण रिफंड दिलं जातय.

या सगळ्या गोंधळानंतर डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल अविएशन अर्थातच डीजीसीएनी तातडीने इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. डीजीसीएन इंडिगो कडून सध्याचे प्रॉब्लेम्स आणि ते सोडवण्यासाठी इंडिगो काय करते याची माहिती मागितली. डीजीसीएन सांगितलं की ते घडलेल्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत. डीजीसीएन आपल्या निवेदनात म्हटलय की प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी डीजीसीए इंडिगो एअरलाई्स सोबत मिळून उपाय योजना करतेय. तसं पाहिलं तर इंडिगो ही देशातली सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो कडे भारतात सर्वाधिक 434 विमान आहेत देशातला 60 टक्के डोमेस्टिक फ्लाईट्स इंडिगोच्या असतात असं असलं तरी गेल्या महिन्याभरात इंडिगोची तब्बल 1232 उड्डान रद्द करण्यात आली आहेत.

देशभरात इंडिगोच्या फ्लाईट्स कॅन्सल का होतायत?

ऑक्टोबर महिन्यात इंडिगोची 84% विमान वेळेत होती पण नोव्हेंबर मध्ये हा आकडा घसरून 67 टक्क्यांवरती आला. आता डिसेंबर मध्येही इंडिगोतला हा गोंधळ सुरूच आहे त्यामुळे आता हे वारंवार का घडतय देशभरात इंडिगोच्या फ्लाईट्स कॅन्सल का होतायत ते पाहू. इंडिगोच्या या अवस्थेच सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता. गेल्या महिन्यात यामुळे 700 हून अधिक फ्लाईट्स रद्द झाल्याचं इंडिगोच म्हणणं आहे.

यामागचं कारण डीजीसीएन एक नोव्हेंबर पासून लागू केलेले नवे नियम असल्याचं सांगितलं जातय. मागच्या महिन्यापासून विमान कंपन्यांसाठी फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन्स चे नवे नियम जारी झाले आहेत. नव्या नियमानुसार पायलट्स आणि क्रू मेंबर्सच्या ड्युटी टाईम मध्ये काही बदल करण्यात आलेत. डीजीसीएला वाटत होतं की अनेक विमान कंपन्या पायलट्स आणि कर्मचाऱ्यांकडून जास्तीच काम करून घेतायत.

असं केल्याने धोका वाढतो कारण पायलट्सना उड्डाणा आधी पुरेशी विश्रांती मिळणं आवश्यक असतं. नव्या नियमानुसार क्रू मेंबर्स दिवसाला आठ तासांपेक्षा जास्त वेळ उड्डाण करणार नाहीत. त्यांचा एका आठवड्याचा फ्लाईंग टाईम 35 तास एका महिन्याचा 125 तास आणि वर्षभराचा फ्लाईंग टाईम 1000 तास एवढा निश्चित करण्यात आलाय यासोबतच पायलटसाठी जारी केलेल्या नव्या नियमानुसार प्रत्येक पायलटला एका आठवड्यात सलग 48 तास विश्रांती मिळायलाच हवी यामुळे त्यांना थकवा जाणवणार नाही आधी हा वेळ 36 तासांचा होता यासोबतच एक पायलट रात्री 12 ते सकाळी सहा च्या दरम्यान दोन पेक्षा जास्त वेळा लँडिंग करणार नाही हा नियमही लागू करण्यात आला.

पायलट्सने वेळेपेक्षा जास्त काम करण्यास नकार दिला:

सध्या इंडिगोचे 5456 पायलट्स 102 केबिन क्रू मेंबर्स आणि 41000 हून अधिक परमनंट कर्मचारी आहेत पण नव्या नियमांमुळे होतय काय तर विमान कंपन्यांना पायलटची कमतरता जाणवतीय पायलटच्या विश्रांतीच्या वेळा वाढल्यामुळे विमान कंपन्यांच्या वेळापत्रकावरती परिणाम झालाय. विमान कंपन्या पायलट्सना त्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याची विनंती करते पण पायलट सहकार्य करण्यास तयार नाहीयेत. पायलटच म्हणण आहे की ते दिलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करणार नाहीत. पायलट्स म्हणतायत की त्यांनी वर्षानुवर्ष डीजीसीएन घालून दिलेल्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त काम केलय. या काळात कंपनीला सा हज कोटी रुपयांचा नफा झालेला आहे पण तरीही त्यांना वेतनवाढ मिळत नाहीये आता पायलट्स वेळेपेक्षा जास्त काम करण्याच्या मूडमध्ये नाहीये त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

आता यासोबतच काही ठिकाणी एअरपोर्टशी संबंधित समस्याही आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर दिल्ली एअरपोर्टवर बुधवारी इंडिगोच बॅगेज मेसेजिंग सिस्टीम काम करत नव्हतं त्यामुळे विमानतळाच्या टर्मिनल एक वर प्रवाशांना त्यांचे सामान मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या टर्मिनल तीन वरतीसुद्धा अशा प्रकारच्या च्या समस्या पाहायला मिळाल्या. काही प्रवाशांनी इंडिगो वरती वेळेवर एसएमएस अलर्ट किंवा घोषणा न दिल्याचा आरोप केला.

प्रवाशांनी सांगितलं की सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी फ्लाईट रद्द झाल्याची घोषणा केली होती. नंतर कंपनीन तीच फ्लाईट उशिरा असल्याचं दाखवलं. प्रवाशांचा आरोप आहे की इंडिगोचे अधिकारी विमानांबद्दल कोणतीही माहिती देत नाहीये. याबाबत प्रश्न विचारल्यानंतर ते टाळाटाळ करतात. या सगळ्यांमुळे गेल्या तीन दिवसांपासून देशभरातल्या एअरपोर्ट्स वरती गोंधळाची स्थिती पाहायला मिळतेय. सध्या इंडिगो या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतेय यासाठी डीजीसीए कडून मदत घेतली जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार परिस्थिती सामान्य होण्यासाठी 5 डिसेंबर पर्यंतचा वेळ लागेल. मात्र यामुळे गेल्या तीन दिवसात प्रवाशांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागलाय. आता इंडिगोचे ऑपरेशन्स कधीपर्यंत नॉर्मल होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *