राज-उद्धव 20 वर्षानंतर एकत्र..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन बंधू तब्बल २० वर्षांनंतर वरळी डोममधील मराठी विजय मेळाव्यात शनिवारी एकत्र आले. एकमेकांना त्यांनी प्रेमादराने जवळ घेतले तेव्हा सभागृहात अभूतपूर्व जल्लोष झाला. ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटाची दाद मिळाली. बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मराठी माणसाची एकजूट ठेवा, असे राज ठाकरे म्हणाले, तेव्हाही सभागृह दणाणून गेले, कायमचे एकत्र येण्यासाठीचे स्पष्ट संकेत मिळाले; पण तशी घोषणा करण्यात आली नाही. मात्र, एकत्र येण्यासाठीचा कार्यकर्त्यांचा दबाव किती जबरदस्त आहे हे कार्यक्रमभर जाणवत राहिले. हिंदी सक्तीचे जीआर राज्य सरकारने रद्द केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी उद्धवसेना आणि मनसे यांच्यातर्फे आयोजित या मेळाव्यात दोन्ही भाऊ व्यासपीठावर आले तेव्हा अंधार केला गेला आणि हजारोंच्या मोबाइल फ्लॅशने सभागृह उजळून निघाले. दोघांनी एकमेकांना जवळ घेतले तेव्हा टाळ्या, जल्लोष, घोषणा थांबता थांबत नव्हत्या.

उद्धव आणि मी तब्बल २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे बाळासाहेबांना जमले नाही, अनेकांना जमले नाही आम्हाला एकत्र आणायला, ते देवेंद्र फडणविसांनी करून दाखविले, अशी बोचरी टिप्पणी करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी माणसाची एकजूट तुटू देऊ नका, कोणतीही तडजोड न करता भावनिक आवाहन विजय मेळाव्यात केले. राज यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले, तेव्हाच दोघांमधील दुरवा मिटल्याचे दिसून आले.

खरे तर आज मोर्चा निघायला हवा होता. मराठी माणूस सर्व बाजूनी कसा एकवटतो, हे चित्र त्यांना दिसले असते. पार, फक्त मोर्चाच्या घोषणेनेच यांनी (सरकारने) माघार घेतली, असे राज यांनी म्हणताच सिकुचा व टाळ्यांनी सभागृह दणाणून गेले, राज म्हणाले की, राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला? आमची सत्ता आहे, बहुमत आहे. आम्ही निर्नय लादणार असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची सता विधानभवनात. सप्ता रस्त्यावरची आहे.

ठाकरे बंधूच्या मुलांनी कॉन्हेन्ट शिक्षण घेतल्याच्या भाजपच्चा टीकेन्या राज यांनी समाचार घेतला. परदेशात शिक्षण घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांच्या मुलांची यादी आपल्याकडे आहे. माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, त्यांच्या मराठी निष्ठेवर शंका घेणार का?

आमच्याकडे सत्ता रस्त्यावरची आहे:

राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय सरकारने कोणासाठी घेतला? आमची सत्ता आहे. बहुमत आहे, आम्ही निर्णय लादणार असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची सत्ता विधानभवनात. आमच्याकडे सत्ता रस्त्यावरची आहे. राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

देशभरात हिंदी भाषा आर्थिकदृष्ट्या मागास:

देशभरात हिंदी भाषा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. जी राज्ये हिंदी बोलत नाहीत, ती राज्ये प्रगत आहेत. कोणतीही भाषा तयार करायला ताकद लागते. मराठी भाषेने तर देशभरात सव्वाशे वर्ष राज्य केले, परंतु, कधीही मराठीची सक्ती केली नाही. त्यामुळे हिंदीचा बागुलबुवा करू नका, शा शब्दात राज यांनी सत्ताधाऱ्यांना खडसावले.

राज यांचे आभार, त्यांनी मला श्रेय दिले; बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील : देवेंद्र फडणवीस

“मी राज ठाकरे यांचे आभार मानतो की दोन बंधू एकत्र येण्याचे श्रेय त्यांनी मला दिले. सध्या बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. विजयी मेळावा होणार आहे, असे मला सांगण्यात आले होते. मात्र, मराठीबद्दल एकही अब्द न बोलता आमचे सरकार गेले, आमचे सरकार पाडले.आम्हाला सरकारमध्ये घ्या, आम्हाला निवडून द्या, अशी ओरड दिसली. हा मराठीचा विजयोत्सव नव्हता, ही रुदाली होती. त्या रुदालीचे दर्शन झाले, असेही फडणवीस हसत, हसत म्हणाले.

२५ वर्षे महापालिका त्यांच्याकडे असताना ते मुंबईसाठी दाखवता येईल असे काहीही करू शकले नाहीत. ठाकरेंच्या काळात मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरामोहरा बदलवला, आम्ही बीडीडी चाळ, पत्राचाळ, अभ्युदयनगर येथील मराठी माणसाला हक्काचे मोठे घर त्याच ठिकाणी दिले. त्याची असुया त्यांच्या मनात आहे. मुंबईतला मराठी असो की अमराठी, सगळेच आमच्यासोबत आहेत. आम्ही मराठी आहोत, आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे. मराठी भाषेचा अभिमान आहे, पण त्याचवेळी आम्ही हिंदूही आहोत. आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन बाक्षागारे हिंदुत्व आहे, असंही फडणवीरा म्हणाले.

भाषणापेक्षा एकत्र दिसणे महत्त्वाचे; दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार : उद्धव ठाकरे

दोघांमध्ये असलेला अंतरपाट दूर होऊन आता एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, या शब्दांत उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी विजय मेळाव्यात राज ठाकरेंना भविष्यातील एकीसाठीही टाळी दिली, तेव्हा सभागृहात हजारो कार्यकत्यांनी टाळ्यांचा प्रचंड कड़कडाट केला. राज यांचा सन्माननीय असा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी भाषेचा विषय हा वरवरचा विषय नाही आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे. दोघांना भांडवले जात होते आम्ही एकत्र येणार समजल्यावर काहीजनांनी यांचा ‘म’ महापालिकेसाठी आहे, अशी टीका केली. हा ‘म’ फक्त महापालिकेचा नाही, तर महाराष्ट्राचाही आहे. सत्ता येते-जाते, पण आपल्यामध्ये एकजुटीची ताकद हवी. आम्ही महाराष्ट्रसुद्धा काबीज करू महाराष्ट्रात मराठीच राहणार, हिंदीची शक्ती केल्यास अशी शक्ती दाखवू की, पुन्हा डोके वर काढता येणार नाही.

आमच्या दोघांतला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला, असा टोलाही त्यांनी लगावला, आता अक्षता टाकण्याची काही अपेक्षा नाही, असे सांगत त्यांनी शिंदे गदावरही टीका केली. अनेक बूज, महाराज बहसले है आज असतील. कोणी लिंबूला टाचण्या टोचत असतील. कुणी अंगारे धुपारे करत असतील, कुणी रेडे कापत असतील, अशी खिल्ली उडवत आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांने वारसदार म्हणून आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत, असेही ते म्हणाले.

मधल्या काळात आम्ही दोघांनी नतद्रष्टांचा अनुभव घेतला. वापरायचे व फेकून द्यायचे, आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. भाजप ही अफवांची फैक्टरी आहे. भाजपच्या सात पिढ्या उत्तरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, असेही ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेचा समाचार घेताना ठाकरे म्हणाले की, तो जय गुजरात बोलला.. किती लाचारी करायची? त्या पुष्पा चित्रपटातील नायक दाढीवर हात फिरवून झुकेगा नहीं साला म्हणतो, तसे हे ‘उठेगा नहीं साला ‘च्या भूमिकेत आहेत.

हिंदीची सक्ती केल्यास अशी शक्ती दाखवू की

भाजपच्या सात पिढ्या उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही, महाराष्ट्रात मराठीच राहणार हिंदीची सक्ती केल्यास अशी शक्ती दाखवू की पुन्हा डोके वर काढता येणार नाही. उद्धव ठाकरे,पक्षप्रमुख उद्धव सेना

ठाकरे ‘ब्रँड’ ची ‘ग्रँड’ एन्ट्री:

खचाखच भरलेल्या डोम मध्ये महाराष्ट्र गीतानंतर अखेर तो क्षण आला संपूर्ण डोम मध्ये अंधार झाला आणि एकच आवाज घुमला सगळ्यांनी आपल्या मोबाईलचे फ्लॅश लाईट उंचावले आणि व्यासपीठाच्या दोन्ही बाजूचे येणाऱ्या स्पॉटलाईटने या सोहळ्याचे प्रमुख केंद्रबिंदू असणारे ठाकरे बंधू प्रकाश झोतात आले टाळ्या शिट्ट्या घोषणांनी संपूर्ण कार्यक्रम स्थळ दुमदुमून गेले.

अबोला संपला.. दुरावा गेला.. दोघे एकमेकांना म्हणाले-सन्माननीय,

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यात असताना उद्धव ठाकरे एकमेकांपासून केवळ राजकीय दृष्ट्याच नाहीतर कुटुंबिक पातळीवरही खूप दूर गेले शनिवारी त्यांच्यातील अबोला संपला दुरावा दूर पळून गेला आणि दोघांनी एकमेकांना सन्माननीय संबोधले त्यावेळी दोघांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला राज ठाकरे भाषणाच्या सुरुवातीला सन्माननीय उद्धव ठाकरे असे म्हणाले त्यावेळी टाळ्यांच्या आबूतपूर्वक कडकडाट्याची सभागृह साक्षीदार बनले जे एकमेकांना जमले नाही ते (दोघांना एकत्र येणे) ते फडणवीस आणि करून दाखवले या त्यांच्या वाक्यालाही अशीच दाद मिळाली उद्धव ठाकरे हे राज ठाकरे पेक्षा आठ वर्षांनी मोठे आहेत आपल्या भावाला ते भाषणात काय संबोधतील याबाबत उत्सुकता होतीच उद्धव ठाकरे म्हणाले बऱ्याच वर्षानंतर मी राज मी आणि राज एका व्यासपीठावर आलो आहोत राजने मला सन्माननीय उद्धव ठाकरे म्हणले सहाजिकच आहे की त्यांचे कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिले आहे म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात मी सन्माननीय राज ठाकरे अशी करतो उद्धव यांच्या या वाक्यावर सभागृह टाळ्या आणि घोषणांनी दनादून गेले उद्धव केवळ तेवढ्यावरच थांबले नाहीत राज यांच्या भाषणाचे त्यांनी खूप कौतुक केले राजने अप्रतिम मान्य केली आहे खरे तर आता माझ्या भाषणाची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही असे ते म्हणाले तात्पुरती भाषा संपवून राज आपल्या खुर्चीवर बसत असताना उद्धव यांनी त्यांच्या हात मिळवला आणि भाषण खूप छान झाल्याची कौतुक हातभावा मधूनच केले.

पाठीराख्या एक समोर, एक मागे: उद्धव ठाकरेच्या पत्नी रश्मी ठाकरे पहिल्या रांगेत बसून कार्यक्रमाचे क्षण डोळ्यांत साठवत होत्या. तर राज ठाकरेंच्या पत्नी मात्र व्यासपीठाच्या मागे प्रचंड भावुक झालेल्या पाहायला मिळाल्या त्या संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत त्या व्यासपीठाच्या मागेच होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर डोळ्यातील अश्रू पुसत त्या आनंदाने सगळ्यांना आवर्जुन भेटल्या. रश्मी ठाकरेंचीही विचारपूस करताना दिसल्या. आपल्या लोकांना (आदित्य-अमित) एकत्र पाहून खूप आनंद झाल्याचं दोघिंनच्याही डोळ्यांत दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *