गुरुपौर्णिमा ( व्यास पौर्णिमा ) च्या हार्दिक शुभेच्छा..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा,

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः

या श्लोकात तर गुरुला वंदन करून गुरुला देवतुल्य दर्जा दिलेला आहे हिंदू संस्कृतीत तर अनेक थोर संतांनी ग्रंथ लिहून समाजाला वाट दाखवली गुरुपौर्णिमा हा सन भारतातील महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे हा सन आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा हा सन भारतातील संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंना त्यांच्या शिष्यांनी सन्मानित करण्याचा असतो ज्यांनी त्यांना ज्ञान मार्गदर्शन आणि आत्मविकासाच्या मार्गावर नेले आहे.

गुरुपौर्णिमेचे समाजातील योगदान म्हणून गुरुपौर्णिमा केवळ धार्मिक सण नसून याचा सामाजिक दृष्टिकोनातूनही विशेष महत्त्व आहे, या सणामुळे गुरु शिष्य संबंध अधिक बळकट होतात गुरूंनी दिलेल्या शिक्षणाने शिष्यांना आपले जीवन सुसंस्कृत सुशिक्षित आणि संस्कारित करण्याची संधी मिळते, तसेच या सणामुळे समाजात शिक्षणाचे महत्त्व अधुरेखित होते. गुरुपौर्णिमा हा समाजातील सर्व वर्गांच्या लोकांनी साजरा करावा. शिष्यांनी आपल्या गुरूंना सन्मानित करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात प्रगती करावी. तसेच या सणामुळे शिक्षण संस्थामध्ये शिक्षणाचे महत्त्व आणि गुरुच्या भूमिकांची जाणीव होते. 

गुरुपौर्णिमेचे आधुनिक काळाचे स्वरूप आधुनिक काळात गुरुपौर्णिमेच्या सणाचे स्वरूप काहीसे बदलले आहे आता विद्यार्थी केवळ गुरुच्या पायावर तुळशीपत्र ठेवत नाही तर त्यांच्या गुरूंना विविध उपहार कार्ड आणि आभार पत्र देऊन सन्मानित करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सन अधिक प्रसिद्ध झाला आहे. विद्यार्थी आपल्या गुरूंना ऑनलाईन सन्मानित करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानतात. यासोबतच काही संस्थांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शैक्षणिक कार्यशाळा वेबिनार आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यामुळे या सणामुळे शिक्षणाचे महत्त्व आणि गुरूंच्या भूमिकेची जाणीव अधिक वाढली आहे. निष्कर्ष गुरुपौर्णिमा हा सन भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सन आहे. हा सन गुरु शिष्य परंपरेचा सन्मान करणारा आहे. शिष्यांनी आपल्या गुरूंना सन्मानित करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात यशस्वी होण्याची शपथ घ्यावी.

गुरुपौर्णिमेची कथा:

गुरुपौर्णिमेची कथा बघूया गुरुपौर्णिमेशी संबंधित अनेक कथा आहेत पण सर्वात प्रसिद्ध कथा भगवान वेदव्यास आणि त्यांच्या शिष्याची आहे भगवान वेदव्यास हे महर्षी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र होते त्यांनी महाभारत वेद पुराणे आणि अनेक इतर धार्मिक ग्रंथ लिहिले एकदा भगवान वेदव्यास जंगलात ध्यान करत असताना त्यांना एका शिकारीने त्रास दिला शिकारीने भगवान वेदव्यासांना एका क्रूर सिंहाला मारण्यासाठी पाठवले.

सिंहाला मारल्यानंतर तर भगवान वेदव्यास शिकारीकडे परत आले तेव्हा त्यांना समजले की शिकारी हा खरंतर एक ऋषिपुत्र होता ज्याने आपल्या गुरुचा अपमान केला होता भगवान वेदव्यासांना ऋषिपुत्रावर राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला की तो 700 वर्ष असुर बनेल ऋषिपुत्रांनी आपली चूक लक्षात घेतली आणि भगवान वेदव्यासांची क्षमा मागितली. भगवान वेदव्यासांनी त्याला क्षमा केली आणि त्याला शाबापासून मुक्ती दिली. या घटनेनंतर ऋषिपुत्राने भगवान वेदव्यासांना आपला गुरु मानले आणि त्याच्याकडून ज्ञान प्राप्त केले. ऋषिपुत्राला व्यास नावाने ओळखले जाऊ लागले आणि ते भगवान वेदव्यासाचे सर्वात प्रसिद्ध शिष्य बनले.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व:

आता आपण बघूया गुरुपौर्णिमेचे महत्त्व. ज्ञान आणि शिक्षणाचा आदर. गुरुपौर्णिमा हा ज्ञान आणि शिक्षणाचा आदर करण्याचा दिवस आहे गुरु हे ज्ञानाचे दिव्य प्रकाश आहेत आणि ते आपल्याला अंधकारातून मार्गदर्शन करतात या दिवशी आपण आपल्या गुरूंचे आभार मानतो आणि त्यांच्या शिकवणीचे स्मरण करतो गुरु शिष्य परंपरेचा आदर गुरुपौर्णिमा हा गुरु शिष्य परंपरेचा आदर करण्याचा दिवस आहे. ही परंपरा अनेक शतकांपासून टिकून आहे, आणि ती भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंचे ऋण मानतो, आणि त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचे वचन देतो. आत्मा सुधारण्याचा प्रयत्न गुरुपौर्णिमा हा आत्म सुधारण्याचा प्रयत्न करण्याचा दिवस आहे. आपण आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनात सुधारणा करण्याचा आणि चांगले व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो. समाजसेवेचा संदेश गुरुपौर्णिमा हा समाजसेवेचा संदेश देणारा दिवस आहे. आपण आपल्या गुरूंच्या शिकवणीचे अनुसरण करून समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतो. 

गुरुपौर्णिमा ही आपल्या जीवनातील शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची कबुली आणि कौतुक करण्याची आठवण आहे तणाम आणि भौतिकवादाने चिन्हांकित केलेल्या युगात आंतरिक शांती आणि संतुलन राखण्यासाठी आध्यात्मिक शिक्षकांचे मार्गदर्शन आवश्यक आहे आध्यात्मिक गुरु अंतर्दृष्टी आणि सराव प्रदान करतात जे व्यक्तींना जीवनातील आव्हाने शहानपणाने आणि समंजसपणाने हाताळण्यास मदत करतात खुद्द देवाधिदेव महादेवांनीही “गुरुर्देवो, गुरुर्धर्मो, गुरुनिष्ठा परतप.. गुरु परतर नास्ती त्रिवार कथेमिते” म्हणजे गुरु हेच सर्वस्व आहे गुरुवरची निष्ठा हाच परमधर्म आहे म्हणजे व्यक्ती सोबतच देवतांनाही गुरुची गरज असते 

गुरुपौर्णिमा का साजरी करतात?

महर्षी व्यास यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ज्यांना वेदांचे लेखक मानले जाते. आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशर आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला. वेदव्यास यांनी घंदाट अरण्यात घोर तपश्चर्या केली त्यांच्या या घोर तपश्चर्येमुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले यानंतरच त्यांनी चार वेदांचा विस्तार केला तसेच महाभारतासह ब्रह्मसूत्र आणि 18 महापुराणांची रचना केली महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते.

त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुष्टके चालत आलेली आहे. महर्षी वेदव्यास यांनी आपल्या शिष्यांना आणि ऋषिमुनींना श्रीमद् भागवत पुराणाचे ज्ञान दिले होते असे म्हणतात. तेव्हापासून महर्षी व्यासांच्या शिष्यांनी हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू केली जी आजही पाळली जाते. 

भारतीय संस्कृतीमध्ये देवदेवतांना जितके महत्त्व दिले जाते तेवढेच महत्त्व गुरुजनांना सुद्धा आहे गुरु आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडणघडणीमध्ये गुरूंचे स्थान हे अनन्य साधारण आहे ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त जन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. त्या सद्गुरूंचे महत्त्व तरी किती सांगावे वर्षभरात ज्या काही बारा किंवा तेरा पौर्णिमा येतात, त्यापैकी आषाढात येणारी पौर्णिमा गुरूंच्या स्मृतीत समर्पित केली जाते आणि याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आषाढ पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा गुरुजनांचा दिवस असतो.

गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात:

निवृत्तीनाथ यांच्या गुरुकृपेतूनच ज्ञानदेवांच्या हातून घडलेलं ज्ञानेश्वरी लेखनाचे कार्य हिंदू धर्मात महर्षी व्यास आद्य गुरु समजले जातात, या दिवशी व्यासमुनींनी ब्रह्मसूत्राचे लिखाण पूर्ण केले होते असे मानले जाते. याच दिवशी व्यासांचा जन्म झाल्याचेही मानले जाते, त्यामुळे काही जण या गुरु पौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. महर्षी व्यास यांनी हिंदू संस्कृतीला अनेक धर्मग्रंथ दिले म्हणूनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो, हा दिवस शिष्याने गुरुस्मृतीत अर्पण करून आगामी वर्षातील नवनवे संकल्प करायचे असतात गुरूंच्या मार्गदर्शनाखाली मार्गात येणारे अडथळे दूर करून आपल्या ध्येयावर केंद्रित होण्याचा निश्चय करायचा असतो गुरु या शब्दाचा अर्थ खूपच व्यापक आहे.

गुरुपौर्णिमेची पूजा:

गुरुपौर्णिमेची पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्यांनी आपल्या गुरूंची पूजा करावी. त्यांच्या पायावर तुळशीपत्र ठेवावे आणि त्यांना गोडचे पदार्थ अर्पण करावे. गुरूंना वस्त्रे, फळे, फुलं आणि दक्षिणा अर्पण करून त्यांचा सन्मान करावा. या दिवशी शिष्यांनी गुरूंच्या चरणी वंदन करून त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्याची प्रार्थना करावी. गुरुपौर्णिमेचे उत्सव गुरुपौर्णिमेच्या दिवशी विविध शैक्षणिक संस्था गुरुकुल आणि आश्रमामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या दिवशी शिष्यांनी आपल्या गुरूंना सन्मानित करून त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या जीवनात यशस्वी होण्याची शपथ घ्यावी.

या दिवशी शाळेत, मठात, मंदिरात, अभ्यास मंडळात, आश्रमात व गुरुकुलांमध्ये गुरुजनांचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देणारे गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस नवजात जन्मलेल्या बालकांची प्रथम गुरु असते ती माता चाला बोलायला लागला की त्या जीवावर संस्कार घडवितो तो पिता शालेय जीवनात ज्ञान कला विज्ञान यांचे जे आपल्याला धडे देतात ते शिक्षक, शिक्षिका आपण कोण आहोत आपल्या जन्माचं कारण काय प्राप्त जन्माची खरी सार्थकता मिळेल, याचं मार्गदर्शन करणारे सद्गुरू अशा अनेक व्यक्तिमत्त्वांमधून ते गुरुतत्व आपण अनुभवत असतो 

खरं पूजन खरी गुरुपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलेला आहे जो बोध केला आहे जी शिकवण दिलेली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे त्यांचा शब्द चालविणे म्हणजेच गुरुपूजन आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याच्या नात्याला एक अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्याकडे जसे सद्गुरू आहेत तसेच सदशिष्य सुद्धा आहेत.

विविध शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक संघटनामध्ये प्रवचने, कीर्तन, भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.  गुरुपौर्णिमा हा सन समाजात शिक्षणाचे महत्त्व अधुरेखित करणार आहे. त्यामुळे या सणाचा योग्य सन्मान करून आपण आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने प्रगती करूया. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *