गुजरात मध्ये भीषण दुर्घटना, 45 वर्षांपूर्वीचा पूल कोसळला..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

बुधवार 9 जुलै च सकाळ गुजरातच्या वडोदरा मधून एक धक्कादायक बातमी समोर आली. मही नदीवर असलेल्या पुलावरून सकाळी आठ च्या सुमारच ट्रक टँकर रिक्षा आणि दूधचाकी चालल्या होत्या पण अचानक या पुलाचा मधला भाग कोसळला पूल दोन तुकड्यात विभागला गेला काही गाड्या रिक्षा ट्रक पाण्यात पडले तर एक टँकर या पुलाच्या तुटलेल्या भागाच्या अगदी कडेला थांबला या तुटलेल्या पुलाचा आणि मृत्यूपासून काही इंच लांब असलेल्या त्या टँकरचा चा फोटो थरकाप उडवणारा होता. अपघात झाल्यानंतर लगेचच स्थानिक नागरिकांकडून बचाव कार्याला सुरुवात झाली.

 एनडीआरएफ च्या टीम्स ही तात्काळ तिथे दाखल झाल्या. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलय. तर जवळपास आठ जणांना वाचवण्यात रेस्क्यू टीमला यश आलेत. पण ही घटना नेमकी घडली कशी? हा पूल कोसळला कशामुळे? प्रत्यक्ष दर्शनी या घटनेबद्दल काय माहिती दिली आहे? वडोदऱ्यामध्ये मही नदीवर असलेला हा गंभीर पूल वडोदरा आणि आनंद या दोन जिल्ह्यांना जोडतो गुजरात मधून सौराष्ट्रात जाण्याचा हा मार्ग असल्यानं या रस्त्याला कायम गर्दी असते. अशीच गर्दी बुधवारी सकाळी सुद्धा होती पण अचानक पुलाचा एक भाग कोसळला आणि पुलावरच्या गाड्या थेट पाण्यात कोसळल्या तर एक ट्रक अगदी टोकावर अडकला ही घटना घडल्यानंतर अपघातग्रस्त लोक आणि आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली.

त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर जमाव सुद्धा गोळा झाला त्यावेळी लोकांना दिसलेल दृश्य भयानक होतं नदीत कोसळलेली काही लोक वाहून चालली होती पाण्याच्या प्रवाहात अडकलेली काही लोक मदतीसाठी किंचाळत होती तर एक आई आपल्या मुलाला वाचवण्याची विनवणी करत होती. स्थानिकांनी लगेचच मदतीला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात बचाव कार्यासाठी अग्निशमक दलाची तीन पथक एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या. लागलीच काही जखमींना बाहेर काढण्यात यश आलं तर मृत्यू झालेल्यांच शव बाहेर काढण्याची प्रक्रिया सुद्धा तातडीन सुरू झाली.

अपघात घडला कशामुळे?

पण मुख्य प्रश्न होता तो म्हणजे हा अपघात घडला कशामुळे? तर मही नदीवरचा हा गंभीरा पूल 1981 बांधण्यात आला पण त्याचा वापर सुरू झाला 1985 मध्ये म्हणजे जवळपास 40 वर्षापासून या पुलाचा वापर केला जातोय. रोज मोठ्या प्रमाणावर इथून वाहतूक व्हायची ज्या ट्रक, टँकर अशा अवजड वाहनांची संख्या ही मोठी होती. 2022 मध्ये या पुलाच्या किरकोळ

दुरुस्तीच काम झालं होतं. मात्र त्यानंतरही हा पूल जीर्ण अवस्थेतच होता. पण बुधवारी ज्यावेळी हा पूल कोसळला तेव्हा पाऊस नव्हता, वादळ नव्हतं किंवा पुलावर नेहमीपेक्षा जास्त गर्दीही नव्हती. पण तरीसुद्धा अचानक हा पूल कोसळल्याने शंका विचारल्या गेल्या पण मागच्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मही नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे आणि जीर्ण अवस्थेमुळे पूल कोसळला असावा असा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पूल कोसळण्यावरून आरोप सुद्धा होताना दिसतायत.

पुलाबद्दल सरकारला केलेला लेखी अर्ज:

पूल कोसळण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा पंचायत सदस्य हर्षद सिंग परमार यांनी या ऑगस्ट 2022 मध्ये या पुलाबद्दल सरकारला केलेला लेखी अर्ज चर्चेत आहे. स्वतः परमार यांनी माध्यमांना याबद्दल माहिती दिली ते म्हणाले ज्या ठिकाणी हा पूल तुटला आहे ते माझं गाव आहे. माझं घर या पुलापासून फक्त 500 मीटर अंतरावर आहे मी इथल्या जिल्हा पंचायतीचा सदस्य आहे ऑगस्ट 2022 मध्ये आम्ही या पुलाच्या जीर्ण अवस्थेबाबत सरकारला एक लेखी निवेदन दिलं होतं आम्ही विनंती केली होती की जर या पुलाचे ब्लॉक इतके हलत असतील तर काहीतरी अनुचित घडू शकतं त्यामुळे हा पूल बंद करून नवीन पूल

 बांधण्यात यावा आमच्या अर्जानंतर गांधीनगरचे आर अँड बी विभागाचे अधिकारी इथे आले त्यांनी त्या जागेची पाहणी केली त्यांनी असही सांगितलं की या पुलावरच कंपन सामान्य कंपनांपेक्षा थोड जास्त असत तेव्हा आम्ही मागणी केली होती की पुलाची दुरुस्ती करा किंवा जनहितार्थ चाचणी अहवाल प्रकाशित करा जर असा दोष असेल तर तुम्ही पूल कसा चालवू शकता तरी सुद्धा किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली दिशाभूल करत या लोकांनी पूल सुरूच ठेवला. सरकार जाणूनबुजून लोकांचा जीव घेतय. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा. थोडक्यात तीन वर्ष

आधीच हा पूल बंद करावा याची अवस्था खराब आहे याबद्दल सरकारकडे मागणी करण्यात आली होती. प्रशासनाकडून याची तपासणी सुद्धा करण्यात आली पण तरीही स उपाय योजना न केल्याने ही घटना घडल्याचा आरोप आता केला जातोय. या आरोपांची तीव्रता वाढण्या मागच कारण म्हणजे या ठिकाणी नवीन पूल बांधण्यासाठी 212 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. पुलाच्या बांधकामासाठी जागेच सर्वेक्षण सुद्धा झालं होतं पण हे काम पुढे का सरकला नाही नव्या पुलाच बांधकाम सुरू झालं नव्हतं जुना पूल धोकादायक होता तरी हा पूल सुरू का ठेवण्यात आला असा प्रश्नही विचारला जातोय.

नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली:

या घटनेच गांभीर्य पाहून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तज्ञांच पथक घटनास्थळी पाठवलय. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिलेत. सोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केल. या घटनेत जीव गमावलेल्यांना दोन लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये नुकसान भरपाई देखील जाहीर करण्यात आले. पण मदत जाहीर झाली असली चौकशी करण्याचे आदेश दिले गेले असले तरी ही तत्परता आधी का दाखवली नाही वाहतूक बंद करून दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न का केला गेला नाही असा प्रश्न सुद्धा आता विचारला जातोय गंभीरा पुलावरचा अपघात इतका भीषण होता की काही क्षणात गाड्या 30 ते 35 फुटांवरून खाली कोसळल्या.

अपघातात किती जणांना वाचवण्यात यश आले:

या अपघातात जखमी झालेल्या राजूबाई अठिया यांनी दिलेल्या माहितीनुसार ते आणि त्यांचा मित्र बाईक वरून हा पूल पार करत होते तेव्हा अचानक या पुलाचा भाग ढासळला आणि ते गाडी सकट खाली पडले त्यानंतर ते बराच वेळ पाण्यात होते पण पाण्यातच पडलेल्या एका गाडीवरती चढून बसत त्यांनी आपला जीव वाचवला त्यानंतर त्यांना पाण्यातून बाहेर पडण्यासाठी बचाव पथकाच्या नावेची मदत झाली. एक ट्रक अगदी टोकावर अडकला.

तर या अपघातातून काही जण काही सेकंदाच्या फरकाने वाचले महेश परमार आणि त्यांचे मित्र सुद्धा गाडीवरून जात होते पण पुलाच्या अलीकडेच त्यांची गाडी पंक्चर झाली. गाडी नीट करण्यासाठी ते थांबले आणि गाडी नीट करून ते पुलाजवळ पोहोचलेच होते आणि तेवढ्यात हा अपघात झाला. फक्त काही सेकंदाच्या उशिरामुळे त्यांचा मृत्यू टळला. मदतीसाठी धावून जाणाऱ्या स्थानिकांनीही या घटनेची माहिती दिली आहे. अतुल पडियार ही घटना घडल्यानंतर आपली रिक्षा घेऊन तातडीने घटनास्थळी गेले तेव्हा त्यांनी एका बुडणाऱ्या महिलेला वाचवलं जमलेल्या स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू टीमशी मदत घेत जवळपास आठ जणांना पाण्यातून बाहेर काढलं.

एका लहान मुलाला वाचवण्यात सुद्धा यश आलं पण दुर्दैवान एका लहान मुलाचा मृत्यू झाला. जखमींपैकी सहा जणांना वडोदरा इथल्या पदरा हॉस्पिटलमध्ये आणि दोन जणांना सयाजी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. गुजरातमध्ये मागच्या काही वर्षात पूल कोसळण्याची ही दुसरी भीषण घटना आहे. 30 ऑक्टोबर 2022 ला मोरबी इथे असलेल्या ऐतिहासिक झुलता पूल कोसळला होता. ज्यात तब्बल 141 जणांचा मृत्यू झाला होता. तर 180 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. पुलावर एकाच वेळी झालेल्या प्रचंड गर्दीमुळे हा पूल कोसळला होता पण गंभीरा पुलावर मात्र जास्त गर्दी नव्हती. रोजच्या सारखीच वर्दळ असतानाही हा पूल कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.

यात मृतांचा आकडा मोरबी दुर्घटनेपेक्षा कमी असला तरी पुलाचा एकच भाग कोसळल्यान आणि काही गाड्या पुलाच्या त्या भागाच्या अलीकडे थांबल्यामुळे मोठी जीवितहाने टळले आता या प्रकरणात पुलाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणे ठेकेदार आणि संबंधित व्यक्तींवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होऊ शकतो पण चौकशीमध्ये नेमकं काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण सध्या तरी तीन वर्ष आधी गेलेल्या तक्रारीकडे केलेल दुर्लक्ष 212 कोटींच्या निधीला मंजुरी मिळूनही न केलेला वापर 10 लोकांच्या जीवावर भेतलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *