भारतीय मुलांना लहान वयातच मोबाइल स्क्रीनचे व्यसन.. वाढताहेत मानसिक आणि शारीरिक समस्या..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

अलीकडील एका अभ्यासानुसार, भारतातील पाच वर्षांखालील बालकांचा दररोजचा स्क्रीन टाईम सरासरी २.२ तास असल्याचे आढळून आले आहे. हा स्क्रीन टाईम सुरक्षित मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. यामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ‘क्युरस’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात एम्स, रायपूर येथील डॉ. आशिष खोब्रागडे आणि डॉ. एम. स्वाथी शेनॉय यांनी २,८५७ मुलांचा समावेश असलेल्या १० अभ्यासांच्या मेटा विश्लेषणानंतर हे निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. या अभ्यासानुसार, दोन वर्षांखालील मुलांचा स्क्रीन टाईम सरासरी १.२ तास आहे. दोन वर्षापर्यतच्या मुलांनी पूर्णपणे स्क्रीन टाळावी, असे मार्गदर्शक तत्त्वात सांगितले आहे.

मोबाईलचा वापर अधिक वाढल्याने पालकांची चिंता वाढली पण केवळ पालकांची चिंताच नाही तर स्क्रीन टाईम वाढलं ना मुलांच्या डोळ्यांसोबतच त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो मोबाईलचा अतिवापर करतोय मोबाईलच्या अतिवापराचे गंभीर परिणाम लहान वयातच प्रकृतीवर दुष्परिणाम कोरोना महामारीत शाळा बंद असल्याने सगळीकडे ऑनलाइन शिक्षण सुरू होतात आता प्रत्यक्ष शाळा सुरू झाली आहे मात्र अजूनही मुलं मोबाईल लॅपटॉप टीव्ही तासन्तास पाहतायत त्यामुळे मुलांच्या डोळ्यांवरच नाही तर संपूर्ण आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होतो आहे.

जास्त आपण स्क्रीन एक्सपोजर देत जाऊ तितकं जास्त आपल्या वर्तनांच्या समस्या निर्माण व्हायला लागतात इथे मी पहिली गोष्ट एकच सांगेल पालकांना कृपया मुलांना मोबाईल देऊ नका तुम्ही मोबाईल देऊन जर मुलांना जेऊ घालता, मोबाईल घेऊन मुलांना गुंतवून ठेवता तर तुम्ही मुलाला एक प्रकारचे व्यसन तुम्ही त्यांना लावता आहेत, असंच समजायचं इतका परिणाम मोबाईलचा लहान मुलांवर होतो.

मूल रडले म्हणून मोबाइल देणे टाळा:

१ फेलिक्स हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. डी. के. गुप्ता यांनी सांगितले की, “सुमारे ६०-७०% मुले सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर घालवत आहेत. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक व वागणुकीसंबंधी समस्या दिसून येत आहेत.”

२ त्यांनी पालकांनी जेवताना किंवा मुलं रडत असताना त्यांना मोबाइल देणे टाळावे असे आवाहन केले. नाही तर ही सवय हळूहळू व्यसनात बदलते. पालकांनी स्वतःचा स्क्रीन वापर कमी करावा.

3 मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाईममुळे भाषिक विकास, बौद्धिक क्षमता आणि सामाजिक कौशल्यांवर परिणाम होतो. तसेच स्थूलता, झोपेचे विकार आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतात, असे आढळून आले आहे.

उपाय काय?

यावर उपाय काय आहेत तर स्क्रीन टाईम साठी दिवसातला एक विशिष्ट वेळ ठरवून ठेवायचा आणि तेवढ्या वेळातच मुलांना हातात मोबाईल द्यायचा इतर वेळेस नाही दुसरा म्हणजे कुटुंबासाठीचे काही नियम तयार करायचे जसं की जेवणाच्या वेळी कोणीही फोन वापरणार नाही टीव्ही पाहणार नाही जितकं शक्य होईल तितकं पालकांनी टीव्ही किंवा youtube मुलांसोबत बघावं जेणेकरून मुलं काय पाहतात यावरही पालकांचं लक्ष नाही जसं स्क्रीन टाईम चा वेळ असतो तसाच रोज काही वेळ मैदानी खेळांसाठी सुद्धा मुलांना ठरवून द्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी स्वतःचा स्क्रीन टाईम सुद्धा म ॉनिटर करायला हवा जे नियम आपण मुलांसाठी तयार करतो ते घरातल्या सगळ्याच मेंबर साठी असायला हवे जेणेकरून मुलांना ते नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि मुलांना त्यांच्या आई-वडिलांचा ही वेळ मिळेल.

  • घरात टेक-फ्री झोन तयार करणे.
  • स्क्रीन टाइमसाठी ठरावीक वयोमर्यादेनुसार नियम बनवणे.
  • मुलांना बाह्य खेळ आणि प्रत्यक्ष सामाजिक संवादात सहभागी करणे.
  • पालकांनी स्वतःच्या सवयी बदलणे, म्हणजेच स्क्रीनसंदर्भातील सकारात्मक उदाहरण देणे.

शारीरिक समस्या..

मोबाइल मुळे डोळ्यांवर होणारे परिणाम:

मोबाईल मुलांच्या हातात देताय सावधान मोबाईलच्या मुळे मुलांचे डोळे होतात वाकडे डोळ्यांना स्ट्रोक येऊन दृष्टी ही होते. कमी मुलांच्या हातात मोबाईल देताय तर वेळी सावध व्हा मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होऊ शकतात इतकंच नव्हे तर दृष्टी ही जाऊ शकते. मुलं रडायला लागली की आपण मुलांच्या हातात मोबाईल देतो मात्र मुलांना मोबाईल देणं महागात पडेल एका रिसर्च मध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे 2001 मुलांना कमी दिसण्याची समस्या सात टक्के होती 2011 मुलांना कमी दिसण्याची समस्या 135 टक्क्यांवर गेली 2021 मध्ये 20 ते 22% एवढी ही समस्या वाढली आहे गेल्या 20 वर्षात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी दिसण्याची समस्या तीन पट वाढली आहे स्क्रीन टाईम म्हणजेच मोबाईलचा बघण्याचा वेळ हा वाढतोय त्यामुळे दृष्टी कमी होते रात्री अंधारात मोबाईल पाहिल्यामुळे डोळे सुकतात आणि थेट याचा नजरेवर परिणाम होतो.

अनेक मुलांना चश्मा लागलाय 3000 शाळांमध्ये ही स्टडी केल्यानंतर मुलांची नजर कमी होत असल्याचं निष्पन्न झालंय आपण बघतोय की सध्या मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये किंवा अडल्ट्स मध्ये किंवा सगळ्या पॉप्युलेशन मध्ये खूप जास्त वाढलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्यांवरच होतात पण मुलांना जास्त होतात कारण लहान मुलांची डोळ्याची वाढ होत असते आणि जर ते बरोबर झाली तरच त्यांचे डोळे बरोबर वाढतील मोबाईलचा जवळून वापर आणि खूप तास वापर केल्यामुळे डोळे खराब होऊ शकतात मुलांची नजर का कमी होते आणि मोबाईलमुळे मुलांचे डोळे का वाकडे होत आहेत हे सध्या मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये जास्त वाढलाय मुलांच्या

डोळ्यांची वाढ होत असल्यामुळे मोबाईलमुळे गंभीर परिणाम होतात मोबाईलचा खूप वापर केल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होतात. सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांना स्ट्रोकही येऊ शकतो मोबाईलचा वापर जेवढा चांगला तेवढाच तो वाईट आहे, त्यामुळे मुलांना जास्त मोबाईलची सवय लावू नका त्यांना मैदानी खेळ शिकवा त्यांना वेळ द्या नाहीतर मोबाईलचा अतिवापर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. 

मानसीक समस्या:

वाढत्या स्क्रीन टाईम मुळे आणि त्यावर पटापट सरकणाऱ्या चित्रांमुळे मुलांचा अटेंशन त्यानंतर कमी होतच आहे त्यातून एका जागी स्थिर बसताना येणं, एखाद्या गोष्टीवर फार काळ लक्ष केंद्रित करता न येणं, इरिटेबिलिटी वाढणं, मुलांच्या झोपेच्या सायकलमध्ये गडबड होणं अशा सारखे परिणाम सुद्धा लहान मुलांमध्ये दिसून येतात. पण या परिणामांच्या पलीकडे सुद्धा काही दुरोगामी परिणाम सुद्धा आहे. क्लिनिकल कौन्सिलर सायकॉलॉजी सुरभी पवार त्यांनी असं सांगितलं की, मुलांनी जास्त वेळ फोनवर घालवणं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही हे माहिती आहे पण कधी कधी फोन दिला की मुलं शांत बसतात, या कारणाने आपणच मुलांच्या हातात फोन देतो असं काहीसं निरीक्षण पालक स्वतः विषय सांगत असतात.

पण यामुळे होतं काय तर फार वेळ स्क्रीनवर घालवल्याने इतरांशी संभाषण होत. नाही पर्यायाने मुलं सोशल स्किल्स शिकण्यात मागे राहतात एकलकोंडी राहिल्याने न्यूनगंड एनसायटी आणि डिप्रेशन यासारख्या मानसिक समस्यांची रिस्क वाढते. क्रिएटिव्हिटी सुद्धा कॉम्प्रोमाइज होते. स्क्रीन टाईमच व्यसन लागतं शारीरिक हालचाली नसल्यानेही मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होतात मुलं निरीक्षणातून शिकत असल्याने ते दैनंदिन आयुष्यात काय बघतायत हे फार महत्त्वाचं ठरतं त्यामुळे फक्त स्क्रीन टाईम हा एकमेव मुद्दा न होता त्या जोडीला स्क्रीनवर काय पाहिलं जातय हे सुद्धा महत्त्वाचं ठरतं.

पालकत्व:

आणि सध्याचं पालक म्हणतात की आम्हाला आजूबाजूला मूल सांभाळायला कोणी नाहीये, तर हा पूर्णपणे पालकांचा पण दोष नाहीये की ज्या काही म्हणजे एक मूल हे केवळ त्या पालकांचं नसतं पण ते समाजाचं पण असतं असं म्हणतात, मग ती जर आपल्याकडे स्थिती नाहीये तर अनेक वेळा समुपदेशन म्हणजे चाइल्ड काउंसिलर विशेष असतात. म्हणजे जे फक्त चाइल्ड डेव्हलपमेंट वर काम करतात किंवा चाइल्ड सायकॅट्रिस्ट असतात, तर ह्याच्याकडे जर तुमच्या मुलामध्ये तुम्हाला काही बदल जाणवत असतील, किंवा चिडचिड असेल किंवा झोपेचे काही समस्या असतील किंवा बाकी काही वर्तवणुकीच्या संबंधित समस्या असतील तर हा बऱ्याच गोष्टी असतात किंवा अभ्यासातला मुख्य प्रकार असतो की एक लर्निंगचा जो फेज असतो ना त्यात आपण फास्ट शिकतो पहिल्या पाच वर्षांमध्ये त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटलचे काही इशूज असतील तर ते जरूर ताबडतोप चाइल्ड सायकॉलॉजीचा सल्ला घ्या.

पण लहान मुलांच्या मानसीक आरोग्य वरती कोणीच बोलत नाही म्हणजे पालकांनाही तेवढी काही कल्पना नसते की आपल्या मुलाचं मानसीक आरोग्य आहे का व्यवस्थित किंवा आणि त्यांनाही सांगता येत नाही, की आई-बाबा मला हा त्रास होतोय किंवा मी डिप्रेशन तर त्यांना शब्द इतका काही म्हणजे स्ट्रेस डिप्रेशन हा शब्द माहितीच नसतो, पण त्यांचं वागणं किंवा त्यांचं बिघडल आहे. हे ओळखणं कसं म्हणजे ते कसं ओळखायला पाहिजे खरं पालक त्याच्यामधला महत्त्वाचा फॅक्ट आहे.

पालकांच्या वाढत्या अपेक्षा:

पालकांच्या अपेक्षा मुलांकडून खूप वाढल्यात त्यामुळे पण मुलांच्या मानसीक आरोग्य वरती परिणाम होतो. पैकीच्या पैकीच मार्क आहे पहिलाच नंबर हवा तिला सगळ्या स्पोर्ट्स मध्ये ठेवायचं तिला डान्स पण यायला पाहिजे तिला गाणं गायला पण यायला पाहिजे तिला सगळंच यायला पाहिजे ही जी अपेक्षा आहे ना तर त्यावर लहान मुलांच्या मानसीक आरोग्य वरती किती परिणाम होतो किंवा त्यांचं कसं बॅलन्स जातो. आपल्याकडे पालकत्व हा इतका म्हणजे काय म्हणता येईल अंडर रेटेड आहे ना की लोकांना म्हणजे कळत नाही अजूनही पालकत्व कसं म्हणजे करायला पाहिजे. त्याचं आपल्याकडे काही असे गाईडलाईन्स पण नाहीयेत. आधी आई-वडील तेच पुढे नेतात तर ह्याच्यावर मी तेच म्हणेल की पालकांनी थोडसं वाचन करावं किंवा पालक होण्याच्या अगोदर थोडी तयारी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *