ऐतिहासिक अभिमानास्पद गौरवशाली क्षण छत्रपती शिवाजी महाराज चे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आनंदाची बातमी दिली वेळेस युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि जगभरातल्या शिवप्रेमी साठी ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आल्यामुळे आता या किल्ल्यांचा आणि शिवरायांच्या स्वराज्याचा वैभवशाली इतिहास जागतिक स्तरावरती पोहोचणार आहे शिवप्रेमींनी दिलेल्या माहितीनुसार याआधी ही महाराष्ट्रातल्या काही वास्तूंना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. यावेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश झालाय त्यामुळे शिवप्रेमी कडून याबाबत आनंद व्यक्त केला जातोय.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये स्थान मिळालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातले ते बारा किल्ले आहेत कोणते, याच किल्ल्यांची यादीसाठी निवड का करण्यात आली, जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाल्याचा काय फायदा होणार, ते आपण बघणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे स्वराज्य निर्मिती आणि ते टिकवण्यासाठी महाराजांनी हे किल्ले उभारले शत्रूला न दिसणारे दरवाजे आणि किल्ल्यांचे माची स्थापत्य हे मराठा स्थापत्य शास्त्रातील महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे हे माची स्थापत्य जगातील कोणत्याही कील्ह्यांमध्ये दिसून येत नाहीत. माची स्थापत्य म्हणजे गडाच्या सुरक्षितेचा आणि युद्ध कौशल्याचा मुझ्सदिनीने रचलेला भाग आहे, हेच अद्वितीय वैश्विक मूल्य असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जागतिक वारसा यादीमध्ये सध्या भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश आहे:
पॅरिस मध्ये झालेल्या डब्ल्यूएससी म्हणजेच जागतिक वारसा समितीच्या 47 व्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्यात आला जागतिक वारसा यादीमध्ये सध्या भारतातील 43 वारसा स्थळांचा समावेश आहे त्यापैकी अजिंठा, वेरूळची लेणी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, व्हिक्टोरिया अँड आर्ट डेको, एनसेबल आणि एलिफंटा क्युज या पाच स्थळांचा या आधीच समावेश होता.
त्यामध्ये आता मराठा लष्करी भूप्रदेश म्हणून शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी असे अकरा आणि तमिळनाडूतील जिंजीच्या किल्ल्याचा समावेश आहे शिवकालीन दुर्गांचे सामाजिक स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्त्व आणि गनिमी काव्याच्या युद्धतंत्र लष्करी या सर्व गोष्टी सांगितले जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादी मध्ये स्थान देण्यासाठी 2016 ते 17 पासूनच प्रयत्न केले जात होते संभाजी राजे छत्रपती यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 आणि 2017 साली युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय तज्ञ समिती महाराष्ट्रात आमंत्रित करून राज्यातील गडकोटांची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली होती, तेव्हापासूनच युनेस्कोच्या आवश्यक निकषांची पूर्तता करण्याचा पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी राजस्थान मधील किल्ल्यांना जागतिक वारसाचे नामांक मिळून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडली. त्या डॉक्टर शिका जैन यांचं यामध्ये मोलाचं योगदान आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी जैन यांची मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यांनी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या किल्ल्यांना स्थान मिळवून देण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांचे ही शिवप्रेमींकडून आभार मानले जात आहे.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता:
महाराष्ट्र शासनाने मराठा लष्करी भूप्रदेश म्हणजेच मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या संकल्पने अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता केंद्र सरकारच्या भारतीय पुरतत्व सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयाने जानेवारी 2024 मध्ये 2024-25 या वर्षासाठी निवडलेल्या पाच प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यासाठी निवडला होता यानंतर युनेस्को द्वारे नियुक्त आयसीओ एमओएस म्हणजेच इंटरनॅशनल कौन्सिलर ऑन मोनुमेंट्स अँड साईटस या सल्लागार संस्थेच्या तज्ञांनी या 12 किल्ल्यांना भेट देऊन पाहणी केली होती.
ऑक्टोबर 2024 मध्ये आयसीओएमओएस तज्ञ यांनी 12 किल्ह्यांना भेट दिली होती महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार नेतृत्वाखाली 22 ते 26 फेब्रुवारी 2025 ला एक शिष्ट मंडळ पॅरिसला गेलो होतो या किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक तांत्रिक माहिती व शिष्ट मंडळ सादर केली होती त्यानंतर शुक्रवारी पॅरिस इथे झालेल्या अधिवेशनामध्ये सदस्य असलेल्या सगळ्या देशांनी किल्ल्यांचे महत्त्व मान्य केलं आणि त्याला समर्थन दिले या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 20 वेगवेगळ्या देशांना मतदान करायचं होतं या सगळ्या 20 देशांनी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मतदान केलं हे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते मृत्यू यादरम्यान महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत स्वराज्य निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान असलेले हे किल्ले आहेत आता त्या प्रत्येक किल्ह्याचे महत्त्व काय त्याच किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश का करण्यात आला त्याची माहिती घेऊ.
कोणकोणत्या किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आणि का?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, दुसरी राजधानी रायगड, शिवछत्रपतींचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला, शत्रूच्या छातीत धडेकी भरविणारे साल्हेर, लोहगड, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदूर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शुक्रवारी ही आनंदाची बातमी दिली.

रायगड:
म्हणजे रायगड देशभरातल्या प्रत्येकासाठी एक प्रेरणास्थान म्हणून रायगड कडे बघितला जाते.तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगाचा रायगड किल्ला साक्षीदार आहे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला होता महाराजांची समाधी सुद्धा आहे स्वराज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रदीर्घकाळ एक किल्ल्यावरून स्वराज्याचा कारभार बघितला होता त्यामुळे रायगड हा फक्त किल्ला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिर म्हणून ओळखलं जातं मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा किल्ला म्हणून रायगडचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
राजगड:
त्यानंतरचा किल्ला म्हणजे राजगड स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून त्या किल्ल्याचा मान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यावरती भरपूर काळ घालवला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच किल्ल्यांमध्ये या किल्ल्याचा तिसरा क्रमांक लागतो या किल्ल्यावरच्या तीन माच्यांवरतीच या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे. राजगडाचा ऐतिहासिक महत्त्व त्याचं महाराजांच्या जीवनात असलेल्या मोलाचे स्थान त्यामुळे राजगड जागतिक वारसा यांनी मध्ये समाविष्ट करण्यात आलाय.
साल्हेर:
पुढचा किल्ला आहे साल्हेर हा महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्या किल्ल्यावरती दोन युद्ध झाली यापैकी एका युद्धामध्ये भारताचे सरदार आणि त्यांचे लहानपणीचे मित्र सूर्याची काकडे यांचे निधन झालं या किल्ल्यावरती त्यांची समाधी आहे एक किल्ल्याच बरंचसं बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालेला आहे त्यामुळे त्या किल्ल्याचं स्वराज्याच्या दृष्टीने मोठा महत्व आहे त्यानंतरचा किल्ला आहे.
प्रतापगड:
तो प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम युगांना युगे स्मरणात ठेवला जाईल स्वराज्यावरती चाल करून आलेला आदिलशाही सरदार अफजलखानाचा वध महाराजांनी याच किल्ल्यावर केला त्या किल्ल्यावरती बांधलेली प्रत्येक वास्तू की महाराजांच्या काळात निर्माण झाली आहे लष्करी दृष्ट्या प्रतापगड आहे. हा किल्ला बांधण्यात आल्यामुळे संपूर्ण व्यापारी मार्गावरती नियंत्रण ठेवण्यासाठी स्वराज्यामध्ये हा किल्ला महत्त्वाचा होता.
शिवनेरी:
या पुढचा किल्ला आहे तो शिवनेरी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये स्वराज्यात नसला तरी महाराजांचा जन्म त्या किल्ल्यावर झालाय त्यामुळे अर्थातच एक किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व हे खूप मोठे आहे. इथे एका मागे एक साथ दरवाज्यांची असलेली रांग या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य आहे त्यामुळे या किल्ल्याला वैशिष्ट्यपूर्ण लष्करी सामान्य प्राप्त झालाय त्यामुळे मराठा लष्करी भूप्रदेश संकल्पने अंतर्गत या किल्ल्याची जागतिक वारसा स्थळ म्हणून निवड झाली आहे.
लोहगड:
पुढचा किल्ला हे लोहगड छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी सुरतेवर पहिली स्वारी करून आले होते तेव्हा या किल्ल्यावर सुरतेच्या पहिल्या स्वारीतून मिळवलेल्या खजिना महाराजांनी काही काळ ठेवला होता त्याच किल्ल्यावरती त्यांना शहाजी महाराजांच्या निधनाची बातमी मिळाली होती महाराजांच्या कोकणातल्या जवळपास सगळ्यात लोहगड किल्ल्यावरून कोकणात उतरणाऱ्या घाट मार्गानेच केला जायचा या गाठ मार्गांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक किल्ल्याची उभारणी स्वराज्यात करण्यात आली होती.
पन्हाळा:
त्यानंतरचा किल्ला आहे पन्हाळा हा किल्ला बराच काळ आदिलशहाच्या ताब्यात होता पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय लाडका किल्ला म्हणून एक किल्ल्याची ओळख सांगितली जाते महाराजांनी आपला बराच काळ घालवलाय सिद्धी जोहरने किल्ल्याला वेडा घातला होता आणि महाराज या किल्ल्यावरती अडकून पडले होते पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला स्वराज्यात राहिला अतिशय मजबूत किल्ला आणि महाराजांचं या किल्ल्यावर असलेले प्रेम हे खूप मोठं आहे.
सिंधुदुर्ग:
यानंतर महाराष्ट्रातले पुढचे पाचही किल्ले हे समुद्री किल्ले आहेत पाचही किल्ल्यांचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झालं होतं त्यातला पहिला किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग संपूर्ण बांधकाम महाराजांच्या काळात झालं होतं सागरी किल्ल्यांचा एक उत्तम नमुना म्हणून सिंधुदुर्गच्या रचनेकडे बघितल.
खांदेरी:
त्यानंतर खांदेरीच्या किल्ल्याचे ही खास वैशिष्ट्ये आहे जंजिराच्या सिद्धी ना उंदेरी किल्ला बांधला होता त्या किल्ल्यावरती त्यांचं वर्चस्व असल्यामुळे त्याला संपूर्ण मुंबई प्रांतावरती ताबा मिळवला होता त्यामुळे सिद्धी वरती मात करण्यासाठी महाराजांनी खांदेरीचा किल्ला बांधला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत बांधलेला सगळ्यात शेवटचा किल्ला म्हणून खांदेरी किल्ल्याची ओळख सांगितली जाते.
विजयदुर्ग:
त्यानंतर विजयदुर्ग किल्ला या ठिकाणी आधी घेरिया नावाचा किल्ला होता तो किल्ला पाडून महाराजांनी नवीन किल्ला बांधला तिथं महाराजांच्या आरमाराचे पहिलं केंद्र होतं.
सुवर्णदुर्ग:
त्यानंतर सुवर्णदुर्ग किल्ल्याची डागडुजी महाराजांनी केली भक्कम तट उभारली स्वराज्याचे नाविक तळ म्हणून सुवर्णदुर्ग किल्ल्याचे महत्व आहे मराठ्यांच्या आरमाराची राजधानी अशी ही सुवर्णदुर्गची ओळख आहे.
जिंजीचा किल्ला:
त्यानंतर सगळ्यात शेवटचा महाराष्ट्र बाहेर असलेला तमिळनाडूची जिंजीचा किल्ला शिवरायांनी राज्याभिषेक आणि तर दक्षिण दिग्विजय स्वारी मध्ये हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला होता त्या किल्ल्यावरती एकूण सहा ते सात उपदुर्ग आहेत त्या सगळ्या किल्ल्याला तटबंदी बांधून जातं छत्रपती राजाराम महाराजांच्या काळामध्ये सात ते आठ वर्ष जिंजीचा किल्ला स्वराज्याची राजधानी म्हणून राहिलाय राजगड रायगड नंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून हा किल्ला ओळखला जातो. त्या सगळ्या वैशिष्ट्यांवर 12 किल्ल्यांची निवड युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये करण्यात आली.
काय फायदा होणार?
जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये आणखी काय फायदा होणार ते बघूया युनोस्कोच्या वस्तू स्थळांच्या यादीमध्ये आल्यानंतर किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कोणताही थेट निधी दिला जात नाही पण जेव्हा एखाद्या ऐतिहासिक वास्तूला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळतो तेव्हा त्या वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जागतिक स्तरावर ती प्रयत्न होतात. युनोस्कोच्या यादीमध्ये आल्यामुळे जगभराच्या मोठमोठ्या कंपन्यांकडून वास्तुच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला जाऊ शकतो. त्यासाठी निधी उभारण्याची मदत ही केली जाते, तसेच युनोस्को च्या यादीमध्ये आल्यामुळे वर्ड हेरिटेज साइट्स ऑफ इंडिया आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे बारा किल्ल्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटक या किल्ल्यांना भेट देतील त्यामुळे किल्ले पर्यटनाला ही मोठी चालना मिळेल.
जागतिक वारसा असल्यामुळे जागतिक स्तरावरती हे किल्ले सर्वश्रेष्ठ मूल्य असलेले ठरणार आहे 1972 च्या जागतिक वारसा कराराच्या संरक्षणाखाली हे किल्ले येणार आहेत पण आता संभाजी राजे छत्रपती यांनीही यावरून सरकारला आवाहन केलंय या गडकोटांच्या संवर्धनासाठी योग्य निधीचा तरफूट करून जतन आणि संवर्धन व विकासाची दिशा ठरवणे आवश्यक आहे या 12 किल्ल्यांच्या संवर्धनावरती अधिक वर देऊन इतरही किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य राज्य सरकारने अधिक यावर अशी विनंती संभाजी राजे छत्रपती यांच्याकडून करण्यात आली आहे हे कोणाच काय या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरव होणं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्याच किल्ल्यांना जतन आणि संवर्धन करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे.