शिवसेना पक्ष आणि “धनुष्यबाण” कोणाचा?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली आणि आता नियमित सुनावणी ऑगस्ट मध्ये होणार आहे. दोन वर्ष हे प्रकरण प्रलंबित राहिलं पण आता निकाली काढायचय असं सुप्रीम कोर्टानेच म्हटलय म्हणजे ऑक्टोबर पर्यंत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होईल असा अंदाज वर्तवला जातोय.  शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद फार काळ झाला नसला तरी सुप्रीम कोर्टान महत्त्वपूर्ण ठिप्पणी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला अपात्रतेचा निकाल आणि शिवसेना पक्ष चिन्ह या दोन्ही प्रकरणाची एकत्र सुनावणी ऑगस्ट मध्ये होणार.

असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला त्याची सुनावणी त्वरीत झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्ेंशन अप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केला आज की मूळ पिटिशन जी आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतही म्हणण ऐकून न घेता ऑगस्ट मध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेल आहे. म्हणजेच ऑगस्ट मध्ये सुनावणी सुरू झाल्यास ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निकाल अपेक्षित आहे. बघा राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून जो निर्णय अपात्रते संदर्भातला दिलेला आहे तो निर्णयच मूलभूत रित्या चुकीचा असंविधानिक बेकायदेशीर आणि घटनेच्या नियमांची पायमल्ली करणार आहे त्यामुळे त्या अपीलासोबतच सिम्बॉलच्या संदर्भातलं पिटिशन सुद्धा ऐकलं जाईल हे जे सर्वोच्च न्यायालयानी सांगितलं.

अत्यंत चांगली भूमिका असं मला वाटते कारण की संपूर्ण विषय एकदाचा निकालात लागेल ऑगस्ट मध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. आणि शेवटची एक आशा आमची सर्वोच्च न्यायालयाचे आहे जिथे या चोरीच्या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईल कारण आज जे आमच चिन्ह चोरले गेले मी नेहमी सांगतो की कदाचित किंवा आहे निवडणूक आयोगाला निवडणुकीचे चिन्ह देण्याचा अधिकार आहे मात्र पक्षाच नाव बदलण्याचा अधिकार नाही तो निवडणूक अधिकार निवडणुकी आयोगाचा अधिकार नक्कीच नाहीये कोणाचं नाव उचलून दुसऱ्याला द्यायचं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीच आहे असूच शकत नाही आणि तो आम्ही मान्य करत नाही. ऊddhav सुप्रीम कोर्टाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केलाय की आता हे प्रकरण फार काळ लांबणार नाही.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय की..

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलंय की हे प्रकरण दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. आता नवीन अर्ज दाखल करू नका. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल म्हणाले की राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या प्रकरणाचा निकाल लवकर लावावा. त्यावर शिंदेच्या शिवसेनेचे वकील डवोकेट नीरज कौल यांनी युक्तिवाद करताना म्हटलय की कोर्टाने या मुद्द्यावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. पुन्हा सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलय 2023 मधला विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा विधानसभेतील आमदारांच्या संख्येच्या आधारे दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या विरुद्ध आहे.

न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलय आपण ऑगस्ट मध्ये प्रकरण सुनावणीसाठी घेऊन लवकरच तारीख सांगण्यात येईल. ऑगस्ट मध्ये याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्वह होईल जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये लागू शकतो पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितल आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरच सोक्ष मोक्ष लावायचा आहे आता ऑगस्ट मध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे बरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेना दिलं जाईल.

 विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रतेचा निकाल देताना मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदेच्या शिवसेनेलाच मान्यता दिली. त्याचवेळी ठाकरे आणि शिंदे अशा दोघांच्या आमदारांना अपात्र केलं नाही. तर निवडणूक आयोगाने देखील शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेना देताना आमदारांच्या बहुमताचाच आधार घेतला. 21 जून 2022 ला म्हणजे बंडाच्या दिवशी 55 पैकी 34 आमदार शिंदे सोबत होते आणि त्यांनी गट नेता निवडला. आता पुढची सुनावणी 20 ऑगस्टला होणार आहे त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल. 

कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि ठाकरेंचे वकील असीम सरोदेच्या प्रतिक्रिया:

 हे प्रकरण निकाली काढायचं असल्याचं खंडपीठाने म्हटल ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे लवकर तारीख द्यावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केली त्यानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या प्रकरणाचा निकाल लागू शकतो. आज सुप्रीम कोर्टाने केलेल्या विधानामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला दिलासा मिळाल्याचं बोललं जातय. 

तर ज्येष्ठ कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि ठाकरेंचे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिल्यात. ऑगस्ट मध्ये याची सुनावणी होईल. त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल. जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो. आता ऑगस्ट मध्ये ते बोर्डावर येईल परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर सुनावणी होणार पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितल आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरच सोक्षमोक्ष लावायचा आहे.

ॲडवोकेट सिद्धार्थ शिंदे यांचे मत..

ॲडवोकेट सिद्धार्थ शिंदे त्याविषयी अधिक बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ आज सुप्रीम कोर्टानी शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेल आहे ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा आपण हे जे प्रकरण जे दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्ट मध्ये घेऊ तर कपिल सिब्बलांच म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या जस्टीस सूर्यकांत म्हणले मी माझं रोस्टर बघतो, आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला एक ते दोन दिवसात कळवण्यात येईल ऑगस्टमध्ये याची सुनावणी होईल त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व जर होईल जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये लागू शकतो. आता ऑगस्ट मध्ये ते बोर्डावर येईल परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे त्याच्यावर सुनावणी होणार पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितला आहे की आता दोन वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरच सोक्षमोक्ष लावायचा आहे.

आता ऑगस्ट मध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदे बरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल त्यामुळे आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेला आहे जस्टिस जॉयमला बागची आणि जस्टीस सूर्यकांत हे खंडपीठ हेड करत होते. मुकुल रोहदगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेच्या वतीने अपिअर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सीनियर एडवोकेट हे उद्धव ठाकरेंच्या वतीने अपियर झालेले आहेत. तर उद्धव ठाकरे यांना हा मोठा दिलासाच म्हणावं लागेल कारण जी अनिश्चितता होती दोन वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ. ऑगस्ट मध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे त्या त्यावेळेस तारीख मिळेल त्याच्यात सुनावणी होईल एक दोन दिवस त्याच्यात अजमेंट होऊ शकते पण जर ऑगस्ट मध्ये सुनावणी सुरू झाली तर या वर्षा अखेरीस वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल.

निकाल लागन्याअगोदर जर निवडणूक असेल तर…

इलेक्शन जर आले तर आत्ताची जी परिस्थिती आहे तीच राहील ऑगस्ट मध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्ट मध्ये पण मग साहजिक आहे, त्या त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्टमध्ये याची सुनावणी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर हा निकाल लगेचच यावा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी त्यांचा प्रयत्न तर असणारच आहे शिंदे गटाच्या वतीन काय शिंदे गटाच्या वतीने म्हणणं होतं की हे दोन वर्ष झोपा काढत होते त्यांनी काहीच केलं नाही सुप्रीम कोर्ट म्हणलं तरी जे काय सगळं असेल दोन वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला याचा सोक्षमोक्ष करावा लागेल.

कधी ना कधी तर ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला दोन ते तीन दिवसात कळू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल आता मॅटर ऐकलं गेल्यावर एक ते दोन दिवस याच्यावर आर्ग्युमेंट होतील त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व होईल आणि मग निकाल येईल तर जर ऑगस्ट मध्ये सुनावणी झाली मुख्य मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितल आहे, तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा फार फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येण अपेक्षित आहे. जर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी झालं नोटिफिकेशनच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी तर उद्धव ठाकरेना त्याचा फायदा होऊ शकतो पण एक हे आहे की निकाल आता नक्की येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *