खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एक रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा आहे.
2024 च्या खरीप आणि रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस पॉलिसी निर्माण करणं ही एक बाब निदर्शनास आलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती चौकशी लागलेली होती मोठ्या प्रमाणात पॉलिसी याच्यामुळे बाद करण्यात आल्या आणि मित्रांनो याच पार्श्वभवती खरीप हंगाम 2025 मध्ये अशा बाबी घडू नयेत म्हणून शासनाच्या माध्यमातून काही खबरदारी घ्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे. याचबरोबर अशा जर काही बाबी निदर्शनास आल्या तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याची सुद्धा तरतूद आता शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. पीक विमा योजनेचा सुधारित जीआर निर्गमित करण्यात आल्यानंतर या पीक विमा योजनेच्या अंतर्गत जे काही नियमावली देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जर समजा ई पीक पाहणीच्या पिकामध्ये आणि प्रत्यक्षात जे काही पीक विमा भरलेल पीक आहे याच्यामध्ये जर तफावत आढळली तर त्या शेतकऱ्याचा पीक विम्याची जी काही पॉलिसी असेल ती रिजेक्ट करण्याची तरतूद आहे.
अर्थात ती पॉलिसी बोगस पॉलिसी आहे असे ग्रहीत धरून ती पॉलिसी तात्काळ बाद केली जाणार आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून आता फार्मर आयडीच्या माध्यमातूनच हा पिकवीमा भरला जात आहे.
बोगस पिक विमा भरल्यास पॉलिसी होणार रद्द:
आता याच्यामध्ये क्षेत्राची तपावत इत्यादी बाबी दिसून येणार नाहीत. किंवा त्या करणं थोडं शक्य होणार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी आता याच्यामध्ये देखील काही पर्याय शोधल्या जात आहेत आणि जर एखाद्या जी काही देवस्थानची जमीन असेल किंवा इतर काही सामायक जमिनी असतील किंवा इतर काही गैर प्रकारान याच्यामध्ये जर पीक विमा भरण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशा जर बाबी निदर्शनास आल्या तर अशा शेतकऱ्यांना ब्लॅकलिस्टेड करण्याची तरतूद सुद्धा आता नव्यान करण्यात आलेली आहे.
अशा प्रकारे जर एखादे बोगस पॉलिसी क्रिएट करणारा किंवा अशा प्रकारे बोगस पिकविमाच प्रकरण करणारा शेतकरी जर निदर्शनास आला तर अशा शेतकऱ्याचा फार्मर आयडी अशा शेतकऱ्याचा आधार कार्ड हे पुढील पाच वर्षासाठी ब्लॅकलिस्टेड केल जाणार आहे. कुठल्याही प्रकारच्या कृषी योजनांचा लाभ असेल पिकवि्याचा लाभ असेल अतिवृष्टी सारखे अनुदान असतील अशा प्रकारचे लाभ त्या शेतकऱ्याला पुढील काळामध्ये दिले जाणार नाहीत याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही कारवाई करण्याची तरतूद शासनाच्या माध्यमातून विचाराधीन आहे त्याच्यामुळे पीक विमा जर भरत असाल तर आपल्या शेतामध्ये लागवड केलेल्या पिकाचा पीक विमा भरा 31 जुलै पर्यंत याचे पीक विमा भरण्याची तारीख आहे घाई गडबड करू नका जे पीक आपल्या प्रत्यक्षात शेतामध्ये लागवड केलेल आहे.
तेवढ्याच क्षेत्राचा आणि त्याच पिकाचा पीक विमा भरण्याचा प्रयत्न करा आपल्या पीक पेराला तेच पीक जोडा आणि ई पीक पाहणी ही ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या त्याच पिकाची नोंद करून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आता ई पक पाहणीचा डाटा हा फार्मर आयडीला जाणार आहे आणि फार्मर आयडीसी लिंक असलेला डाटा हा आता सर्व योजनांसाठी सर्व पोर्टलला वापरला जाणार आहे तर अशा प्रकारे पीक विमा 2025 च्या संदर्भातील हे एक अतिशय महत्त्वाचा आणि आवश्यक असलेला अपडेट होत ते आपणास नक्की उपयोग पडेल.
आवश्यक कागदपत्रे:
खरीप हंगाम 2025 पीक विमा शासनाच्या नवीन दिनांक 24 जून 2025 च्या जीआर नुसार भरण्याची प्रक्रिया 1 जुलै 2025 पासून सुरू झालेली आहे. आपण पीक विमा 2025 हा ऑनलाईन कशा प्रकारे भरायचा याबाबत माहिती पाहणार पीक विमा ऑनलाईन भरण्यापूर्वी तुम्हाला तीन कागदपत्र तयार ठेवायचे आहे. यामध्ये बँक पासबुक त्यानंतर एकूण जमिनीचा दाखला आणि सातबारा उतारा एकत्र असलेली एक फाईल आणि त्यानंतर पीक पेरा म्हणजेच पीक स्वय घोषणा पत्र तीनही फाईल तुम्हाला पीडीएफ फॉरमॅट मध्ये बनवायच्या आहे आणि 500 KB पेक्षा कमी साईज असलेल्या त्या असायला हव्यात यामध्ये बँक पासबुकची जी पीडीएफ फाईल तुम्ही बनविणार आहात त्याची लिमिट जरी 500 केबी ची असली तरी जवळपास 100 केबी पर्यंत अपलोड होते नाहीतर कधी कधी अपलोड करण्यास अडचण येते.

पीक विमा ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे भरायचा…
ऑनलाईन खरीप हंगाम 2025 पीक विमा ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे भरायचा याबाबत सविस्तर माहिती. पीक विमा अर्ज सादर करण्याकरिता…
- https://PMFBY.GOV.IN
- पोर्टलला तुम्हाला ओपन करायचे आहे हे पोर्टल ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी
- एनरोलमेंट पार्टनर्स हा पर्याय दिसेल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली सीएससी म्हणून पर्याय आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी तुमचा सीएससी आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे
- कॅप्चा रकाण्यामध्ये टाकून साईन इन या बटन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर एक पेज ओपन होईल तर सर्वप्रथम या ठिकाणी स्टेट्स या ठिकाणी क्लिक करून या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य हा पर्याय या ठिकाणी निवडूया.
- मित्रांनो त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र 2025 खरीप प्रधानमंत्री फसल बीमा योजना हा जो पहिला पर्याय या ठिकाणी दिलेला आहे या पहिल्या पर्यायासमोरील या छोट्याशा सर्कल वरती तुम्हाला टिक करायचे आहे त्यानंतर खाली सबमिट हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल तर वरती या ठिकाणी तुम्हाला अॅप्लकेेशन हा पर्याय या ठिकाणी दिलेला दिसेल तर या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी प्लिकेशन फॉर्म हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करा.
- त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक खात्याची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे.
- तर याकरिता दोन पर्याय दिलेले आहे एक तर तुम्ही या ठिकाणी जिल्हा, बँकेचं नाव, ब्रांच नेम अशाप्रकारे तुम्ही निवडून या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याचा अकाउंट नंबर जो आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे.
- त्यानंतर या पुढच्या रकाण्यामध्ये टाकून परत कन्फर्म करायचा आहे.
- या ठिकाणी तुम्ही एस या पर्यायावरती जर क्लिक केलं अशावेळी फक्त शेतकऱ्याच बँक खातं ज्या बँकेमध्ये आहे त्या शाखेचा आयएफएससी कोड या ठिकाणी टाकायचा आहे.
- आणि व्हेरिफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे.
- या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक पुढे जिल्हा तसेच ब्रांच नेम या ठिकाणी आलेल दिसून येईल.
- त्यानंतर फक्त तुम्हाला या ठिकाणी शेतकऱ्याचा जो अकाउंट नंबर आहे तो रकाण्यात टाकायचा आहे आणि तोच अकाउंट नंबर परत एकदा या पुढच्या रकाण्यामध्ये टाकायचा आहे.
- त्यानंतर या ठिकाणी चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यू हा पर्याय आहे यावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर खाली तुम्हाला ऑटोमॅटिक माहिती आलेली दिसेल. तर या पेजला आपण खालच्या बाजूला स्क्रॉल करूयात.
- स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक माहिती आलेली आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर दिलेला दिसून येईल आणि समोर तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफाय च बटन दिलेला आहे यावरती क्लिक करून तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचे आहे.
- बँकेच्या पासबुक वरती तुमचं जे नाव आहे ते नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तसेच तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. हे दोनही नावे सारखीच असायला हवी.
- त्याच वेळी या ठिकाणी व्हेरिफाय या बटन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर हा व्हेरिफाय होणार आहे.
- व्हेरिफाय झाल्यानंतर एक प्रकारच राईटच चिन्ह तुम्हाला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर खाली तुमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. तर त्यासमोर सुद्धा या ठिकाणी व्हेरिफाय हे बटन दिलेला आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड तुम्हाला दिसेल हा कॅप्चा कोड या खालच्या रकाण्यामध्ये टाकून व्हेरिफाय या बटन वरती क्लिक करायचा आहे.
- तुमच्या मोबाईलवरती ओटीपी पाठविण्यात येईल तो ओटीपी खालच्या रकाण्यामध्ये टाकून सबमिट या बटन वरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक सुद्धा अशाप्रकारे व्हेरिफाय या ठिकाणी होईल.
- त्यानंतर खाली या पेजला स्क्रॉल करायचे आहे स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही नॉमिनीची डिटेल सुद्धा भरू शकता
- नॉमिनीची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायची नसेल तर या ठिकाणी डिक्लेअर नॉमिनी लेटर हा पर्याय दिलेला आहे, या पर्यायावरती तुम्ही टिक करू शकता त्यानंतर तुम्हाला नॉमिनीची डिटेल्स भरण्याची आवश्यकता नाही
- त्यानंतर खाली सेव्ह अँड कंटिन्यू हा पर्याय दिलेला आहे यावरती क्लिक करायचे आहे.
पिक माहिती कशी भराल..
त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्रॉप डिटेल्स भरण्याकरिता या ठिकाणी विचारले जाईल तर या ठिकाणी
- क्रॉप डिटेल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे रेव्हेन्यू सर्कल तुम्हाला तुमचा निवडायचा आहे.
- ग्रामपंचायत निवडायचे आहे आणि या ठिकाणी तुमचं गाव या ठिकाणी निवडायचं आहे.
- खालच्या बाजूला स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी आता आपलं पीक निवडायचा आहे.
- तर या ठिकाणी क्रॉप हा पर्याय दिलेला आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ज्या पिकाचा आपल्याला पीक विमा उतरवायचा आहे ते पीक या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी शोविंग डेट विचारलेली आहे तर या ठिकाणी क्लिक करून कोणत्या तारखेला लागवड केलेली आहे ती तारीख या ठिकाणी क्लिक करून निवडायची आहे.
- त्यानंतर या ठिकाणी सर्वे क्रमांक म्हणजेच जमिनीचा गट क्रमांक तुम्हाला रकाण्यामध्ये टाकायचा आहे.
- आणि त्या संबंधित शेतकऱ्याचा जो खाते क्रमांक आहे एकूण जमिनीच्या दाखल्यावरती म्हणजेच आठ अ प्रमाणपत्रावरती जो दिलेला असतो तो खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे.
- सातबारा उताऱ्यावरती शेतकऱ्याच्या नावाच्या डाव्या बाजूला तुम्हाला खाते क्रमांक दिलेला हा दिसून येईल. हा खाते क्रमांक याठिकाणी टाकल्यानंतर व्हेरिफाय या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच नाव तुम्हाला या ठिकाणी आलेलं दिसून येईल आणि त्याच्या नावावरची एकूण जमीन तुम्हाला या ठिकाणी आलेली दिसून येईल. माहिती या ठिकाणी बरोबर असेल अशावेळी तुम्हाला या ठिकाणी छोट्याशा गोल सर्कल वरती टिक करायचे आहे.
- त्यानंतर खाली या ठिकाणी सबमिट बटन दिलेला आहे या बटन वरती या ठिकाणी क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी ऍड क्रॉप ऑर सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स हा पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर अशाप्रकारे तुमचं पीक आणि गट क्रमांक या ठिकाणी इन्शुरन्स करता या ठिकाणी ऍड झालेलं तुम्हाला दिसून येईल.
कागदपत्र कसे अपलोड करायचे..
त्यानंतर खाली या ठिकाणी कागदपत्र अपलोड करायचे आहेत. कागदपत्र अपलोड करतानी शक्यतो पीडीएफ फॉर्मॅट मध्येच या ठिकाणी तुम्ही कागदपत्र अपलोड करा तसेच 500 केबी पेक्षा कमी साईजची फाईल अपलोड करायची जरी असली तरी बँक पासबुक फाईल या ठिकाणी अपलोड करत असतानी तुम्हाला 100 केबी पेक्षा कमी साईज असलेली फाईल या ठिकाणी अपलोड होईल. त्यापेक्षा जास्त साईज असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते तर या ठिकाणी आपण आता बँक पासबुकची पीडीएफ बनवून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी लँड रेकॉर्ड्स मध्ये आठ अ चा उतारा आणि सातबारा उतारा कम्बाईन करून पीडीएफ फाईल आपण बनवून घेतलेली आहे. शोविंग सर्टिफिकेट म्हणजेच पीक पेरा स्वय घोषणापत्र याची सुद्धा आपण पीडीएफ फाईल या ठिकाणी बनवून घेतलेली आहे.
- पासबुक वरती या रकाण्यामध्ये क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर कॉम्प्रेस केलेली जी फाईल आहे पीडीएफ ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे.
- आणि त्यानंतर अपलोड या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- अशाच प्रकारे आता या ठिकाणी आपण लँड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी आपण अपलोड करूयात.
- त्यानंतर या ठिकाणी आपण शोविंग सर्टिफिकेट म्हणजेच या ठिकाणी आपण पीक पेरा स्वय घोषणापत्र सुद्धा या ठिकाणी अपलोड करूयात.
- तर या ठिकाणी आपल्या तीनही फाईल अपलोड झालेल्या आहे या पेजला आता आपण वरच्या बाजूला स्क्रॉल करूयात स्क्रॉल केल्यानंतर तीनही फाईल अपलोड झालेल्या तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील.
- त्यानंतर या ठिकाणी या बटन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर अशाप्रकारे तुम्ही जी संपूर्ण माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला परत व्हेरिफाय करण्याकरता तुम्हाला याठिकाणी दाखविण्यात येईल.
- त्यानंतर खाली सबमिट हा पर्याय याठिकाणी दिलेला आहे या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी पेमेंट करण्याबाबतचा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर या ठिकाणी मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायच आहे. तसेच शेतकऱ्याला किती पैसे भरायचे आहेत ती अमाऊंट सुद्धा त्याच्या शेतीच्या क्षेत्रानुसार ती अमाऊंट ती किंमत या ठिकाणी तुम्हाला दाखविण्यात येईल.
- तर या ठिकाणी मेक पेमेंट या पर्यावरती आता आपण पेमेंट करण्याकरता क्लिक करूया.
- या ठिकाणी आता सीएससीचा पासवर्ड टाकून व्ॅलिडेट करायचे आहे.
- त्यानंतर या ठिकाणी वॉलेट पिन टाकायचा आहे.
- त्यानंतर या ठिकाणी आता वॉलेट पिन टाकून आपण या ठिकाणी पेमेंट करूयात.
- त्यानंतर खाली प्रिंट रिसिप्ट म्हणून ऑप्शन दिल तर यावरती क्लिक करायचा आहे.
- पीक विमा भरलेला आहे त्याची रिसिप्ट तुम्ही या ठिकाणी डाऊनलोड करू शकता तसेच या ठिकाणी प्रिंट रिसिप्ट वरती क्लिक करून तुम्ही प्रिंट सुद्धा काढू शकता