“उद्धव ठाकरे” देवेंद्र फडणवीसांची पक्षप्रवेशाची ऑफर स्वीकारेल का? जाणून घ्या सविस्तर..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

“तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करता येईल,” अशी ऑफर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेतच दिल्याने माध्यमांना बातम्यांचा एक विषय मिळाला. फडणवीस यांनी ही ऑफर दिली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे झाले होते, तर नजीकच्या भविष्यात आणखी काही धक्कादायक घडणार की काय, अशी चर्चा आमदारांमध्ये रंगली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने त्यांना बुधवारी सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी ग्रुप फोटोसेशनसाठी उद्धव ठाकरे आले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे खेळीमेळीच्या वातावरणात स्वागत केले. या क्षणाची त्यानंतर माध्यमांमध्ये खमंग चर्चा दिवसभर रंगली होती. यावेळी झालेली भाषणे ही एकमेकांची टोप्या उडविणारी आणि सध्याच्या राजकीय गरमागरमीत वातावरण हलकेफुलके करणारी ठरली.फडणवीस म्हणाले, दानवे यांचा कार्यकाळ संपत असला तरी ते पुन्हा सभागृहात आल्यावर त्यांनी याच पदावर काम करावे, असे काही नाही. असे म्हटल्यावर उद्धवजी म्हणतील, आम्ही पळवापळवी करतो. त्यावर उद्धव ठाकरे यांनी समोरच्या बाकावरून टिप्पणी करताच २०२९ पर्यंत तरी आम्ही विरोधकांच्या बाजूला येण्याचा काहीच स्कोप नाही, असेही फडणवीस म्हणाले.

तुम्ही बहुमत सिद्ध केले नाही, आम्ही केले..

फडणवीस यांनी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी दानवे यांनी केलेल्या आंदोलनाचा उल्लेख केला. उद्धवजी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी पत्र पाठविले. त्यानंतरही कॅबिनेट घेऊन त्याला तुम्ही मंजुरी दिली. राज्यपालांनी पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येत नाही, त्यामुळे ती अधिकृत नव्हती. पण, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. याला उशिरा आलेले शहाणपण म्हणतात. तुम्ही बहुमत सिद्ध केलेले नाही. पण, आम्ही ते सिद्ध केले. छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करून तो प्रस्ताव केंद्राकडून मंजूर करून घेतला, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

‘त्याच पक्षातून पुन्हा येईन असे म्हणा…’

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपच्या मुशीत घडलेला हा कार्यकर्ता दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. आपल्या कारकिर्दीची पहिली टर्म दानवे पूर्ण करत आहेत. त्यामुळे पुन्हा येईन, असे तुम्हीही जोरात म्हणा. या घोषणेला खूप महत्त्व आहे. पण, त्याच पक्षातून पुन्हा येईन, असे म्हणा. दानवेंचे कौतुक ऐकून बरे वाटले. कारण, उमेदवारी जाहीर केली तेव्हा आज कौतुक करणारे वेगळाच चेहरा करून बसले होते. मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले. पण, ते मला धन्यवाद देतील की नाही, माहीत नाही. कारण, त्यांनीही माझ्याकडून काही लोक घेतले आहेत, असा चिमटा काढला.

अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत पण भरलेल्या ताटाची प्रताळणा पण केली नाहीत ज्यांनी ताट वाढून दिले त्या पक्षाची प्रताळणा पण केली नाहीतर त्या ताटामध्ये जे आहे ते माझंच आहे पण आणखीन मिळाव म्हणून आणखीन दुसऱ्या रेस्टॉरंट मध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही त्याच्याबद्दल खास तुम्हाला सगळी जनता ही धन्यवाद देत असेल तुमची कल्पकता ज्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केला हा माणूस एक कल्पक आहे महणजे साधा शिवसैनिक असल्यापासून मी त्यांच्याकडे बघतो आहे.

 काही ना काहीतरी काही ना काहीतरी करत असतात आणि अभिनव पद आणि मला आज आठवण येते ती शिवसेना प्रमुखांची कारण त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्याच्यात एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगितली की उद्धव मुख्यमंत्री पद महत्त्वाचं असतंच पण विरोधी पक्ष नेता हे पद तेवढ्याच तोलामोलाचं किंवा काकणभर जास्त जबाबदारीच असतं आणि विरोधी पक्ष नेता हा आक्रमक असला पाहिजे पण आक्रस्ताळ असता कामाने आपल्याकडे अनेकदा ती जी एक सीमा सीमारेषा असते आक्रमकपणा आणि आक्रस्ताळेपणा ही पुसली जाते आणि आपण जे काय करतोय त्याला आपण आक्रमकपणा म्हणतो जो प्रत्यक्षात आक्रस्ताळपणा असतो.

2029 पर्यंत तुम्हाला कोणताही स्कोप नाही..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोपाच्या भाषणावेळी थेट उद्धव ठाकरे यांना महायुतीत भाजप सोबत येण्याची खुली ऑफर दिलेली आहे सभागृहात ही ऑफर दिलेली आहे. 2029 पर्यंत तुम्हाला कोणताही स्कोप नाही तुम्हाला विरोधातच बसाव लागेल त्यामुळे तुम्ही या आमच्याकडे या आमच्या सोबत कशा पद्धतीने घ्यायचं याबाबत आपण वेगळं बोलू असं देखील फडणवीस यांनी आजच्या या निरोप समारंभाच्या वेळी भाषण केलेल आहे.

नेमके देवेंद्र फडणवीस काय बोललेले आहेत या टर्म त्यांच आता हा निरोप समारंभ आहे आपल्या शुभेच्छा त्यांनी पुन्हा या सभागृहात याव आल्यानंतर त्याच पदावर असाव असं काही नाही मी असं म्हटल्याबरोबर हेमंत पळवापळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. उद्धव ठाकरे यांना थेटपणे ऑफर दिलेले आहे उद्धव ठाकरे आज पाहिलं तर सभागृहात जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली होती त्यानंतर जेव्हा निरोप समारंभाच्या वेळी भाषणासाठी देवेंद्र फडणवीस जेव्हा भाषण करत होते यावेळी उद्धव ठाकरे यांना विरोधातच तुम्हाला 2029 पर्यंत बसाव लागेल कोणताही स्कोप नाही तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल. 

सूषमा ताई.. याला काही फार याला गांभीर्याने घ्यायची गरज अस मला नाही वाटत सभाग्रहामध्ये बऱ्याच वेळेला संभाषणामध्ये एकमेकांना अशा कोपरखळ्या जुगलबंदी शेरेबाजी होत राहते नरम विनोदी शैलीमध्ये आपलं म्हणणं अधिक फाशीव आणि खास शैलीमध्ये मांडण्याचा प्रत्येक सदस्याचा प्रयत्न असतो फडणविसांनी त्याच संदर्भाने आपलं म्हणणं मांडण्याचा जर प्रयत्न केला असेल तर त्याला काही फारच लगेच ते मनावर घेण्याची गरज नाही आणि मनावर जरी घ्यायचं म्हटलं तरी त्याचा अजून एक अर्थ होऊ शकतो की फडणविसांच्या लेखी कदाचित एकनाथ शिंदेची किंमत आता फार कमी झालेली आहे किंबहुना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच उपयोगीचा मूल्य हे फडणवीसांच्या लेखी आज संपलेला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’ चर्चा

आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप आहे, वेगळा विचार करता येईल,’ या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऑफर दिली आणि गुरुवारी दोघांमध्ये २० मिनिटे वन टू वन बंदद्वार चर्चा झाली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या दालनात गुरुवारी दुपारी हे नेते भेटले. एरवी या दोघांमधील कटूता, एकमेकांवर सातत्याने टीका सर्वविदित असताना गुरुवारची भेट ही बुधवारच्या ऑफरचा टप्पा दोन होती का? अशी चर्चा विधानभवनात रंगली. कालच परिषदेत फडणवीस यांनी ठाकरे यांना दिलेली ऑफर चर्चेचा विषय ठरली.

पुस्तक दिले भेट:

या भेटीनंतर सभापती राम शिंदे, आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, सचिन अहिर यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी ‘हिंदीची सक्ती कशाला?’ हे पुस्तक मुख्यमंत्री फडणवीस यांना भेट म्हणून दिले. मराठीचा आग्रह धरतानाच हिंदीची कोणतीही सक्ती करण्याची गरज का नाही, याबाबतचे तपशीलवार विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे.

ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले

विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना बुधवारी निरोप देण्यात आला. यावेळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन ठेवले होते. यादरम्यान उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय वैर पुन्हा एकदा प्रकर्षाने पाहायला मिळाले. निरोप समारंभ फोटोसेशनसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम – गोन्हे असे सगळे खुर्त्यांवर बसले होते.

उद्धव ठाकरे पलीकडच्या खुर्चीवर:

उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आसनांवरून उठून सन्मान केला. यावेळी एकनाथ शिंदेही आसनावरून उठल्याचे दिसले. मात्र, समोरासमोर येऊनही ठाकरे-शिंदे यांनी एकमेकांकडे बघणे टाळले. नीलम गोन्हे या शिंदे यांच्या शेजारच्या खुर्चीवर होत्या. प्रोटोकॉलनुसार बसण्याची व्यवस्था होती. तरीही ठाकरे आल्यानंतर गोन्हे यांनी उठून शिंदेंच्या बाजूच्या खुर्चीवर बसण्याची विनंती त्यांना केली. मात्र, गोन्हे यांची ही विनंती नाकारत ठाकरे पलीकडच्या खुर्चीवर जाऊन बसले.

फडणवीसांशी संवाद:

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला. पण, एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे तसेच त्यांच्या शेजारीही बसणे टाळले.

आजही मित्रपक्ष; पण..

दानवे मूळचे भाजपातले आहेत. काही कारणांमुळे पक्षाने त्यांना सोडले. त्यामुळे ते त्यावेळचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत गेले. खरे तर शिवसेना आजही आमचा मित्र पक्ष आहे. मात्र, आता त्यात थोडे बदल झाले आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय अध्यक्षच घेतील:

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आल्याने अनिल परब पुढील तयारी करा. विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभेत अध्यक्ष आणि विधान परिषदेत सभापती निर्णय घेतात. विरोधी पक्ष ठरवेल ते आम्हाला मान्य असणार आहे. पण सभापती आणि अध्यक्षांना मान्य असेल तरच त्याचा अंतिम निर्णय होईल. ते सर्वोच्च स्थानी आहेत. मुख्यमंत्री कितीही मोठा असला तरी अध्यक्ष व सभापती यांनी सांगितले तरी त्यांनाही ऐकावेच लागते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरोपाच्या भाषणात स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *