प्रगत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध गुगल कंपनीने भारतातील शेती क्षेत्रासाठी ओपन सोर्स एआय आधारित एपीआय (अॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस) प्रकल्प सुरु केला आहे. या एपीआयचे ‘अॅग्रिकल्चरल मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन’ असे नाव असून भारतीय शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी त्याचा वापर करण्यात येईल, असे गुगलने जाहीर केले आहे. या प्रकल्पाच्या मदतीने भारतीय शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मॉडेलचा वापर करण्यात येणार असल्याचे गुगलने सांगितले आहे. मग या तंत्रज्ञानाचा शेतीला कसा फायदा होणार? याचीच माहिती पुढील प्रमाणे बघू या.
नमस्कार, शेतकरी मित्रांनो पाच वर्षांपूर्वी तुम्हाला जर एखादा माणूस येऊन म्हणाला असता की आता तुमच्या शेतामध्ये पुढच्या काही काळात एक रोबो येणार आहे आणि तो गवत काढणी काढणार आहे तर तुम्ही त्याला काय म्हणाला असतात की तू काय आम्हाला येडा समजतोय का? आम्ही धोतरावरती शेती करणारी माणसं तुला दिसलोय. अशी दोन प्रश्न तरी तुम्ही नक्कीच उपस्थित केले असते पण आता जर तुम्हाला कोणी असं म्हणालं की तुमच्या शेतामध्ये येऊन एआय आहे म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित एक यंत्रमानव येणार आहे आणि तुमच्या शेतीतील सगळी काम करून जाणार आहे.
तर कदाचित आता त्याच्यावर तुमचा विश्वास सहजपणे बसेल कारण कृत्रिम बुद्धिमत्ता एक एक क्षेत्र हळूहळू पादाक्रांत करत चालली आहे मग या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रामध्ये आता विविध कंपन्यांसोबतच गुगल या प्रगत तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीने सुद्धा प्रवेश केलाय मग या गुगल च्या प्रवेशान भारतीय शेतीच जे काही चित्र आहे ते बदलू शकतं का? त्यासोबतच भारतीय शेतीसाठी Google कडून काय नवीन घोषणा करण्यात आलेली आहे या सगळ्या विषयांची माहिती बघणार आहोत
गुगल कडून 10 जुलै रोजी एक घोषणा करण्यात आली ही घोषणा काय होती तर गुगल न ओपन सोर्स एआय आधारित एपीआय म्हणजे ज्याला अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असं म्हणतात. तो प्रकल्प सुरू केलाय या एपीआय च नाव काय ठेवण्यात आलं तर ग्रीकल्चर मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिस्ट्रिक्शन असं नाव आहे. आता या तंत्रज्ञानाचा वापर भारताच्या शेती क्षेत्रामध्ये केला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होतील असा दावाही गुगल कडून केला जातोय आता गुगल न असं सुद्धा जाहीर केलंय की या प्रकल्पाच्या मदतीने भारतीय शेती क्षेत्राला बळकटी तर देण्यात येणारच पण त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवामान बदलाच संकटही परतवून लावता येऊ शकतं, असाही दावा गुगल कडून करण्यात आलेला आहे याबद्दल गुगल डीप माइंडचे ग्रीकल्चर अँड सस्टेनेबिलिटी रिसर्च लीड आलोक तळेकर म्हणाले या तंत्रज्ञानाचा वापर भारतातील शेतकऱ्यांना फायदा करून देणं इतपुरता मर्यादित नाही तर वाढत्या हवामान धोक्यापासून देशाला बळकटी देण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल त्यासाठी गुगल कडून व्यापक माहितीचे रूपांतर अत्यंत सुस्पष्ट आणि रियल टाईम डेटामध्ये करणं सुरू आहे असाही दावा तळेकर यांनी बोलतांनी केलाय.
खरं तर या तंत्रज्ञानाची म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या एआय तंत्रज्ञानाची चुणूक आपण ऊस शेतीमध्ये सध्या बघतोय. त्यासोबतच इतर शेतीमध्येही या एआय तंत्रज्ञानाची चुणूक आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळू शकते. जगभरात विविध क्षेत्रामध्ये या एआयन तुफान केलेला आहे आणि त्यामुळे शेती क्षेत्रातही या एआयकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलेलं याच पार्श्वभूमीवरती गुगलन शुक्रवारी म्हणजेच 10 जुलै रोजी भारतीय शेतीसाठी हा प्रोग्राम लॉन्च केलाय आता यामध्ये तुमचा मूळ प्रश्न असा असेल की

एपीआय म्हणजे नेमकं काय? आणि ते काम कसे करेल :
समजा एक शेतकरी आहे तो त्याच्या मोबाईलमध्ये एका ॲपच्या माध्यमातून त्याच्या शेतातील पाऊस तापमानाची माहिती ही चेक करतोय मातीचा ओलावा सुद्धा तपासतोय तर अशावेळी त्याला जी काही माहिती त्या ॲप्सच्या माध्यमातून दिली जाते त्यासाठी ॲप्स निर्मिती करणारी कंपनी जी असते ती कंपनी ही सगळी माहिती थेट हवामान विभागाकडून घेत नाही म्हणजेच त्याच्या भागातील पाऊस किती, आहे त्याचं तापमान किती आहे, हवेमध्ये आद्रता किती आहे, याची माहिती हवामान विभागा कडून थेटपणे या कंपन्यांकडून घेतली जात नाही तर हवामान विभागाचा एपीआय वापरून या कंपन्या ही माहिती शेतकऱ्यांना पुरवत असतात याच पद्धतीचा एपीआय आता पुढच्या काळात गुगल शेतकऱ्यांसाठी घेऊन येणार आहे. पण हा ओपन सोर्स एपीआय असणार आहे आणि त्यामुळे यापुढे खाजगी क्षेत्रातील ज्या काही कंपन्या आहेत त्यांना एआयच्या क्षेत्रामध्ये शेतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असंही सांगितलं जात आहे हा एआय आधारित एपीआय काय करणार तर अचूक पद्धतीची आकडेवारी शेतकऱ्यांना पुरवणार म्हणजेच खाजगी कंपन्यांना पुरवणार आणि कंपन्या हा डेटा सगळा शेतकऱ्यांना त्यांच्या ॲपच्यामाध्यमातून पोहोचवणार.
गुगल एआय (एपीआय) देणार शेतीची अचूक माहिती :
आता गुगल च्या एपीआय मुळे कोणतं पीक आहे शेतीच क्षेत्रफळ किती आहे त्यासोबतच पिकाची पेरणी किती झालेली आहे कधी झालेली आहे आणि कधी त्याची काढणी होणार आहे याची माहिती सॅटेलाईट आणि मशीन लर्निंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच मिळणार आहे आणि तेही त्यांच्या मोबाईलवर आणि हे सगळं शक्य कशामुळे होणार आहे तर गुगल च्या ओपन सोर्स एपीआय मुळे आता तुमच्या मनात असाही प्रश्न आला असेल की या प्रकारची माहिती यापूर्वी शेतकऱ्यांना तर विविध मोबाईल ॲपच्या माध्यमातून दिली जातच होती की आता त्यामध्ये नवीन काय पण आता खाजगी कंपन्यांची जी गुंतवणूक आहे ती या एपीआय मुळे सोपी होणार आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांना आधी ज्या काही वेळखाऊ पद्धतीने माहिती मिळत होती ती आता अचूक आणि अत्यंत सुस्पष्ट अशी मिळणार आहे तीही रियल टाईम मध्ये आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो असंही बोललं जातय.
तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर मानिष गुप्त काय म्हणाले बघूया :
आता दुसरा मूळ मुद्दा असाही तुमच्या मनात आला असेल की या सगळ्यांचा फायदा खाजगी कंपन्यांनाच होईल पण तसं नाहीये खाजगी कंपन्यांना या क्षेत्रासाठी प्रोत्साहन देण्यासाठी गुगल कडून हा इनिशिएटिव्ह घेतला जातोय. भारतीय शेतीसाठी एआयचा वापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याबद्दलही गुगल डीप माइंड चे भारत आणि आशिया पॅसिफिक वरिष्ठ संचालक डॉक्टर मनीष गुप्ता म्हणाले भारतातील नवीन तंत्रज्ञान क्षमताच्या वापरासाठी उत्तम समाधान हे गुगल कडून विकसित केल गेल आहे त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील एआय गुंतवणूक यापुढे अनेक पटीने परतावाळ देणारे ठरेल असंही मनीष गुप्ता यांनी सांगितल आहे. खरं तर गुगल च्या या प्रकल्पामुळे खाजगी कंपन्या ज्या एआय शेतीसाठी गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांना एक संधी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी खाजगी गुंतवणूक वाढीस अनुकूल स्थिती सुद्धा या एपीआयच्या निर्मितीमुळे निर्माण होईल असंही बोललं जातय. या एपीआयचा वापर करून एआय आधारित शेती उपयोगी मोबाईल ॲप्स तयार केली जाणार आहेत. त्यासोबतच या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना माती असेल, पाणी असेल, हवामान, पीक या उत्पादनाचा अचूक अंदाज सुद्धा मिळेल असाही दावा केला जातोय. त्यामध्ये अचूकता येण्यासाठी विशेष करून सॅटेलाईट प्रतिमा आणि मशीन लर्निंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आणि पिकांच्या लागवडीचे आणि काढणीचे हे अचूक अंदाज यामुळे म्हणजे या तंत्रज्ञानामुळे मिळू शकतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कामाचे नियोजन करणं सुद्धा सोपं होऊ शकतं.
त्यासोबतच ग्रामीण भागातील कर्जपुरवठा जमिनीच्या नोंदी आणि हवामान बदल्याचे पूर्वानुमान या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती मिळणार आहेत. शेतीमधील जोखीम ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं एआय हे या सगळ्या जोखमींवरती काही प्रमाणात उत्तर शोधण्यासाठी यशस्वी ठरू शकतं असं जाणकारांचं मत आहे.
तर या पद्धतीचा गुगल चा एपीआय आता पुढच्या काळात शेती क्षेत्रामध्ये येणार आहे. मग या एपीआय बद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद…