अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना २०२५..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

मित्रांनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कर्ज योजना 2025 ही मराठा समाजातील लोकांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी व्याजमुक्त कर्जपुरवठा करणारी योजना आहे. या योजनेत, १० लाख ते ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ५ वर्षांच्या परतफेडीच्या मुदतीसह दिले जाते, साधारण जेव्हा कोणी नवीन व्यवसाय करायचा विचार करतो तेव्हा त्यांच्या पुढची सगळ्यात मोठी अडचण असते ते म्हणजे भांडवल आपल्यापैकी बरेच जण सर्वसामान्य घरातून येत असल्यामुळे एक तर आपण नातेवाईकांकडे पैशांची मागणी करतो किंवा मग कुठल्यातरी बँकेचं काही कर्ज प्रकरण होते का? ते बघतो पण बँकवाले हुशार सहजासहजी त्यांचा फायदा आणि पैसे परत मिळण्याची गॅरंटी असल्याशिवाय ते तुम्हाला कर्ज मिळवून देत नाही त्यामुळे होतं काय तर अपुऱ्या भांडवला अभावी अनेकांच्या च्या बिझनेस आयडिया डोक्यातच मरून जातात आणि पदरी फक्त निराशा पडते, पण मंडळी आता निराश व्हायचे दिवस संपले कारण आता महाराष्ट्र सरकारने खास तुमच्यासारख्या उमद्या तरुण तरुणींची अडचण लक्षात घेऊन तुम्हाला बिझनेस करण्यासाठी 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळण्याची सोय केलेली आहे. म्हणजे जर खरंच तुमच्या बिझनेस आयडियामध्ये काही खास बात असेल आणि तुम्हाला ती पटवून देत असेल तर तुम्हाला पण कर्ज मिळू शकतं ते सुद्धा बिनव्याजी म्हणजे रक्कमेवर तुम्हाला कसलंही व्याज भरावं लागत नाही कारण तुमचं जे काही व्याज असेल ते अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे भरलं जातं आणि त्या बिनव्याजी योजनेचं नाव आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ योजना.

आता ऐकून छान वाटलं असेल पण काही प्रश्नही आता तुमच्या मनात घोळत असतील म्हणजे ते कर्ज मिळतं कसं त्यासाठी काय काय कागदपत्र लागतील त्याची नेमकी प्रोसेस काय आणि हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे जावं लागेल बँकेसारखे तुम्हाला तिथं पण उंबरटे झिजवावे लागतील का तर मंडळी थांबा अगदी घर बसल्या सुद्धा तुमच्या मोबाईल वरूनही तुम्ही त्या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरू शकता ते कसं हे सुद्धा आपण बघणार आहोत.

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आणि तरुणी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात त्यातील काही तरुणांना नोकरी लागते तर काही तरुण किंवा तरुणी हे व्यवसायाकडे करतात परंतु नवा व्यवसाय उभा करण्याकरता किंवा ज्या तरुणांकडे अगोदर पासून व्यवसाय आहे तो व्यवसाय वाढवण्याकरता त्यांच्याकडे पुरेस असं भांडवल उपलब्ध नसतं अशा वेळी त्यांना सुरुवातीच्या काळात कुठल्या बँकांकडून किंवा वेगवेगळ्या पतसंस्थांकडून कर्ज मिळणं कठीण असतं त्यामुळे बहुतांश तरुण हे हताश होऊन बसतात स्वतःकडे व्यवसाय करण्याचं कौशल्य असूनही त्यांना भांडवला अभावी व्यवसाय करणं शक्य होत नाही.

पण आता त्याच समस्येवरती मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 27 नोव्हेंबर 1998 रोजी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना केली होती त्या महामंडळातर्फे जे नवीन तरुण उद्योजक स्वतःचा उद्योग व्यवसाय चालू करणार आहेत अशा सर्व तरुणांना 15 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं त्याच्या माध्यमातून नवीन तरुण उद्योजक त्यांच्या उद्योगाला नव्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतात राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण किंवा जे तरुण अगोदर पासून व्यवसाय करत आहेत अशा तरुणांना त्या योजनेतून भक्कम आर्थिक पाठबळ मिळू शकतं.

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल:

त्या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही अत्यंत सोपी व साध्या पद्धतीची ठेवलेली आहे. जेणेकरून कोणालाही त्या योजनेसाठी अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही तुम्ही सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून ऑनलाईन फॉर्म भरायचा तुमचं कर्ज मंजूर झालं तर कर्जाची रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होते इतकी ही सोपी प्रोसेस आहे मंडळी त्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणकोणत्या पात्रता व निकषांच्या अटी आहेत त्या आता आपण पाहूया म्हणजे नक्की कोण कोण यासाठी पात्र असेल ते आपण बघूया.

अर्ज प्रक्रिया साठी पात्रतेच्या अटी:

  • सर्वप्रथम अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहवासी असणं अत्यावश्यक आहे.
  • दुसरं म्हणजे सदर कर्ज योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार पुरुषाचं वय हे जास्तीत जास्त 50 वर्ष असले पाहिजे.
  • महिलांचं जास्तीत जास्त वय 55 वर्ष असावं.
  • अर्जदाराला किमान 18 वर्ष पूर्ण असावी
  • तसेच उमेदवाराने त्या अगोदर अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कोणत्याही दुसऱ्या योजनेसाठी अर्ज केलेला नसावा.
  • अन्य दुसर्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला घेतलेला नसाव.
  • जर तुम्ही ऑलरेडी बिझनेस करत असाल, तर तुमच्याकडे उद्योग आधार किंवा शॉप ऍक्ट लायसन्स सारखी व्यवसायाबद्दलची सर्व आवश्यक कागदपत्र जवळ असणं गरजेचं आहे.
  • एका कुटुंबातील एका वेळी फक्त एकच सदस्य त्यायोजनेचा लाभ घेऊ शकतो शिवाय व्यावसायिक नागरिक जे गटागटाच्या माध्यमातून अर्ज करणार असतील अशा उमेदवारांचं शिक्षण हे किमान दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे.
  • योजनेला अर्ज करण्याच्या अगोदर तुमचं कोणत्याही बँकेमध्ये लोन काढलेलं नसावं.
  • जर लोन काढलेलं असेल तर ते व्यवस्थित रित्या भरलेलं म्हणजेच नील असावं .
  • जर तुमचं लोन चालू असेल तर तुम्हाला त्या योजनेला अर्ज करता येणार नाही.
  • शिवाय तुमचं वार्षिक उत्पन्न हे देखील आठ लाखांच्या वरती नसावं.
  • आता या झाल्या पात्रतेच्या अटी .

या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र असणे आवश्यक आहे ते आपण ते पुढील प्रमाणे बघूया :

आधार कार्ड पॅन कार्ड

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी दाखला
  • वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • जातीचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • राष्ट्रीयकृत बँकेमध्ये असणाऱ्या तुमच्या अकाउंटचे सर्व डिटेल्स
  • तुमचा ईमेल आयडी मोबाईल नंबर
  • तुम्ही जो बिझनेस करणार आहात त्याची सविस्तर माहिती असणारा अहवाल
  • ही सर्व कागदपत्र या योजनेचा फॉर्म भरताना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.

योजनेचा ऑनलाईन फॉर्म नेमका कसा भरायचा हे आपण थोडक्यात समजावून घेऊ :

  • सुरुवातीला तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या mahaswym वेबसाईटवर म्हणजेच udyog.swayam या अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर वरती जायचे आहे.
  • तेथे जाऊन नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल.
  • ते पेज उघडल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची सर्व वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे.
  • आणि वैयक्तिक माहिती भरून घेतल्यानंतर व्यवस्थित रित्या चेक करून घ्यायची आहे.
  • नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे.
  • सबमिट केल्यावर त्या ठिकाणी तुमचा युजर आयडी व पासवर्ड जनरेट होईल.
  • तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात किंवा सेव्ह करून ठेवावा लागेल.
  • कारण पुढं अनेक वेळा तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लागणार आहे.
  • युजर आयडी आणि पासवर्ड जनरेट झाल्यानंतर पुन्हा होम पेजवर येऊन तुम्हाला युजर आयडी व पासवर्डच्या मदतीने लॉगिन करायचं आहे.
  • खातं लॉगिन झाल्यानंतर समोर तीन कर्ज योजना तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुम्हाला त्या योजनेचा पर्याय निवडायचा आहे.
  • पर्याय निवडल्यावर नवीन पेज ओपन होईल.
  • नवीन पेज ओपन झाल्यावरती उमेदवाराला त्या ठिकाणी स्वतःची वैयक्तिक माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे.
  • नंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे.
  • माहिती सबमिट झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक ती कागदपत्रे स्कॅन करून त्याच्या पीडीएफ फाईल त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत.
  • दरम्यान सर्व कागदपत्र अपलोड प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सबमिट बटनावरती क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
  • आणि झाला तुमचा अर्ज महामंडळाला सादर.
  • तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता जर समजा तुम्हाला ही अर्ज प्रक्रिया खूपच अवघड किंवा अडचणीची वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा त्या योजनेसाठी अर्ज करू शकता. म्हणजे तो ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकारी तुमचे कागदपत्र चेक करतील आणि सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जर तुमचे सर्व कागदपत्र व्यवस्थित असतील आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार की नाही याबद्दल तुम्हाला कळवलं जातं.
  • जर तुम्ही पात्र असाल तर रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर जमा होईल विशेष म्हणजे त्या योजनेमुळे तुम्हाला मिळालेल्या कर्जावरती जे व्याज आकारलं जाईल ते व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून फेडलं जातं त्यामुळे तुम्हाला त्यावरती कोणत्याही प्रकारचं व्याज भरावं लागणार नाही दरम्यान योजनेत मिळालेल्या कर्जाची परतफेडीचा कार्यकाळ हा साधारणपणे पाच वर्षाचा असतो म्हणजे घेतलेलं कर्ज पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला परत करायचं असतं त्यामुळे तब्बल पाच वर्ष तुम्हाला बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात.
  • हा एक मोठा फायदा या अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या कर्ज योजनेचा आहे आणखी एक तुम्हाला 15 लाखांपैकी 15 लाखच मिळतील असं नाही तर तुमच्या बिझनेसच्या रिक्वायरमेंट नुसार तुमच्या मागील बँक खात्याच्या तपशीलानुसार महामंडळ तुम्हाला रक्कम प्रोव्हाइड करतं जी की अगदी दोन लाखापासून 15 लाखापर्यंत असू शकते म्हणजे बिझनेस मध्ये वाढ करण्यासाठी तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • हा पण एक गोष्ट ध्यानात ठेवा जर तुमच्या बिझनेस आयडियामध्ये खरंचपोटेन्शियल असेल आणि तुम्हाला ते महामंडळ किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांना योग्य रित्या पटवून देता येईल येत असेल तरच तुम्ही पुढच्या प्रोसेसला लागा.
  • आणि जर तुमची बिझनेस संबंधी फाईल कोरी असेल तर तुम्हाला या कर्ज योजनेचा लाभ घेताना अडचण येऊ शकते तर मग आता वाट कसली बघताय पटकन जावा आणि चटकन तुम्ही त्या योजनेसाठी पात्र आहात की नाही याची माहिती घ्या.

तर मित्रांनो ह्या योजनेसाठी कोणतीही अडचण आणि मदत हवी असेल तर संबंधित कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *