कोलन कर्करोग ( मोठ्या आतड्याचा कर्करोग ) लक्षणे आणि उपचार..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

कोलॉन म्हणजे आपलं आतडं सो जठर म्हणजे स्टमक संपल्यानंतर आपलं छोटं आतडं सुरू होतं ज्याला स्मॉल इंटेस्टाईन म्हणतात तर स्मॉल इंटेस्टाईनचे तीन भाग असतात ड्युओनम जेजुनम आणि आयलियम आणि हे आयलियम संपल्यानंतर आपलं मोठं आतडं सुरू होतं ज्याला आपण बेसिकली कोलॉन म्हणतो. कोलॉन हे आपलं उजव्या बाजूने सुरू होऊन असेंडिंग कोलॉन मग ट्रान्सवर्स कोलॉन आणि मग खालती डिसेंडिंग कोलॉन असतं आणि हे संपल्यानंतर आपलं संडासची जागा सुरू होते ज्याला आपण रेक्टम म्हणतो सो मोठ्या आतड्यामध्ये कुठलाही कॅन्सर जेव्हा होतो त्याला आपण कोलॉन कॅन्सर म्हणतो.

समजा उजव्या बाजूचा झालेला असेल तर आपण त्याला राईट साईड कोलॉन म्हणजे असेंडिंग कोलॉन किंवा हेपॅटिक फ्लेक्स कोलॉनचा कॅन्सर म्हणतो आडव्या बाजूच्या आतड्यामध्ये मोठा झालेला असेल तर त्याला ट्रान्सवर्स कोलॉनचा कॅन्सर म्हणतो आणि जर डाव्या बाजूच्या कोलॉनचा जर झालेला असेल तर आपण त्याला डिसेंडिंग कोलॉन किंवा सिग्मॉइड कोलॉन किंवा रेक्टमचा कॅन्सर असं म्हणतो. डिपेंडिंग या आपल्या मोठ्या आतड्याच्या कुठल्या भागामध्ये कॅन्सर आहे त्याच्याप्रमाणे आपण त्याला कुठला कॅन्सर हे म्हणतो कोलॉन कॅन्सर हा बऱ्यापैकी असा कॅन्सर आहे ज्याच्याशी रिलेटेड कारण जी आहेत ती फॅमिली हिस्ट्री म्हणजे जेनेटिक हिस्ट्री पण आहे काही फॅमिली मध्ये कोलॉनचा कॅन्सर म्हणजे सिंड्रोम म्हणतो काही पर्टिक्युलर सिंड्रोम आहेत ज्याला आम्ही लिन सिंड्रोम म्हणतो किंवा सिंड्रोम म्हणतो या सिंड्रोम म्हणजे काही विशिष्ट आजार असतात दोन-तीन आजार किंवा पॉलिप्स असतात तर पूर्ण मोठ्या आतड्यामध्ये 100 किंवा बऱ्याच वेळा 200 500 हजार असे पॉलिप्स सुद्धा असू शकतात. असे जेव्हा सिंड्रोम असतात फॅमिलीमध्ये तेव्हा या लोकांना कोलॉन कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. हे झालं फॅमिली जेनेटिक हिस्ट्रीचा खूप मोठा रोल आहे.

प्रत्येक वेळी मोठा आतडाचा कॅन्सर झाला म्हणजे फॅमिली हिस्ट्रीच आहे किंवा एकाला झाला म्हणून पुढे होईलच असं काही नाहीये पण फॅमिली हिस्ट्रीचा रोल जसं ब्रेस्ट कॅन्सर मध्ये आहे ओव्हरीच्या कॅन्सर मध्ये आहे तसं एक कोलॉन कॅन्सर आहे म्हणजे मोठा त्याच्यामध्ये सुद्धा आहे याच्यानंतर ज्या गोष्टी आपल्या हातात असतात किंवा माणसाच्या डेली रुटीनच्या मुळे ज्या होतात त्या म्हणजे डायट, ज्यांचा डायट हा लो फायबर डायट आहे म्हणजे हिरव्या पालेभाज्या किंवा फळ कमी खातात आणि खूप जास्त प्रमाणात मीठ म्हणजे रेडमेड बेसिकली नॉनव्हेज रेडमेड प्रमाण ज्यांचं खूप जास्त आहे.

अल्कोहोल आणि स्मोकिंग यांचा कोलन कर्करोगाशी की संबंध:

त्या लोकांना किंवा अल्कोहोल इंटेक खूप जास्त आहे किंवा कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल किंवा कुठल्या प्रकारचं स्मोकिंग जास्त आहे या लोकांना हा कोलॉनचा कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. मोठ्या आतडाचा कॅन्सर हा आपल्या कुठल्या मोठ्या आतड्याच्या भागामध्ये होतो याच्यामध्ये याच्यावरती खूप जास्त डिपेंड आहे कारण की उजव्या बाजूचा आपलं जे आतड आहे जे मी सांगितलं असेंडिंग कोलॉन आहे त्याचं कॅन्सरची लक्षणं आणि डाव्या बाजूचा म्हणजे डिसेंडिंग कोलॉन किंवा सिग्माइड कोलॉन यांची लक्षणं ही वेगळी असतात. उजव्या बाजूच्या आतड्यांचा कॅन्सर जेव्हा होतो मोठा आतळ त्यांच्यामध्ये आपल्याला ब्लीडिंग होणं म्हणजे रक्तस्त्राव आतड्यातून होणं आणि याच्यामुळे अनेमिया म्हणजे रक्तातलं हिमोग्लोबिन कमी जाणं होणं म्हणजे पेशंट सांगत राहील की मला संडासच्या जागेतून खालतून रक्त जातंय किंवा काळी संडास होते काळी संडासाचा अर्थ रक्त मिक्स असलेली संडास होत आहे आणि पेशंटला रक्त चढवायला लागणं आणि कारण माहीत न होणं की पेशंटचं हिमोग्लोबिन सारखं सारखं का पडतंय पाच हिमोग्लोबिन सहा हिमोग्लोबिन आहे उजव्या बाजूच्या पोटामध्ये दुखणं ही मुख्य लक्षणं आहेत.

ही आपल्या उजव्या बाजूचा आतड जे असतं त्याला असेंडिंग म्हणतो किंवा हेपॅटिक फ्लेक्स म्हणतो याची असतात डाव्या बाजूचं जे असतं याच्यामध्ये संडासला त्रास होणं म्हणजे संडास न होणं ऑबस्ट्रक्शन होणं किंवा कधी कधी स्पुरियस डायरिया म्हणजे रक्त मिक्स असलेलं पातळ संडास सारखे होणं किंवा अल्टर बॉयल मोमेंट ज्याला म्हणतो म्हणजे चार-पाच दिवस कॉन्स्टिपेशन होणं संडास काही होतच नाही किंवा परत चार-पाच दिवस संडास होणं आणि डाव्या बाजूला दुखणं किंवा संडास करताना दुखायला लागणं अशी लक्षणं जेव्हा असतात तर मुख्य हे डाव्याबाजूच्या आपल्या आतड्याची लक्षणं असतात आणि डेफिनेटली रेक्टम आणि रेक्टमच्या नंतर आपला जे खालचा भाग असतो.

अनस म्हणजे काय:

अनस म्हणजे संडासची भाग किंवा संडास तोंड अगदी संडासच्या तोंडापाशी जर कॅन्सर असेल तर डेफिनेटली संडास होताना दुखायला लागतं पेशंटला स्वतःला संडास धुताना लक्षात येते की गाठ बाहेर आलेली आहे आणि हात लावल्यानंतर सुद्धा तिथून ब्लीडिंग होतात बेसिकली हे आतड्याची काही कारणं आहेत आणि डिपेंडिंग ऑन स्टेज म्हणजे जी मी कारणं सांगितली किंवा जी मी लक्षणं सांगितली ही अर्ली स्टेजची आहेत हा जर कॅन्सर मोठ्या प्रमाणात किंवा पुढच्या स्टेजमध्ये झालेला असेल तर भूक न लागणं वजन कमी होणं पोटामध्ये पाणी जमा होणं पोट फुलणं उलट्या होणं आतड एकमेकांना फसलेलं असेल तर संडास पास न होणं ही लक्षणं सुद्धा दिसू शकतात. डायग्नोसिस साठी बेसिकली कुठल्याही पेशंटला याच्यातली कुठलीही लक्षणं असतील म्हणजे भूक न लागणं वजन कमी होणं संडास मधून फ्रेश म्हणजे फ्रेश रक्त जाणं किंवा संडास काळी होणं सतत संडास करताना पोटामध्ये दुखणं उजव्या बाजूच्या पोटात दुखणं किंवा डाव्या बाजूच्या पोटात दुखणं अशी कुठलेही सिम्पटम्स असतील किंवा अबनॉर्मल असेल तर लगेच अशा लोकांनी डॉक्टरला येऊन दाखवणं गरजेचं आहे आम्हाला दाखवल्यानंतर आम्ही पोट तपासून बघतो आम्हाला ते गाठ लागत आहे का बऱ्याच वेळा हे पेशंट इतके गाठ मोठी झाल्यानंतर येतात की आम्हाला पोटाला वरतून सुद्धा हात लावल्यानंतर लक्षात येत असतं आणि गाठ असते. आधी डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे आम्ही तपासल्यानंतर जर आम्ही संडासार जागेतून बोट घालून तपास करतो समजा ही गाठ साधारणपणे एक 8 ते 10 cm पर्यंत असेल तर आम्हाला बोटाला गाठ सुद्धा लागते जर बोटाला गाठ लागत नसेल तर आपण मग पुढचे डायग्नोसिस पुढच्या ज्या हे आपल्या इन्वेस्टीगेशन आहेत ते करतो त्याच्यामध्ये जे असतं ते आपण स्टूल फॉर ऑकल्ट ब्लड म्हणजे संडास मध्ये रक्त आहे की नाही हे तपास करतो.

आपण प्रीलिमिनर स्टार्टिंगला करताना सोनोग्राफी करतो पोटामध्ये जर सोनोग्राफी मध्ये काही वाटलं की कुठेतरी गाठ आहे किंवा काही वाटते तर मग आपण पुढचे डायग्नोसिस इन्वेस्टीगेशन करतो ह्याच्यामध्ये सिटी स्कॅन आहे जे आपल्याला अचूकपणे सांगते की कॅन्सर कुठल्या आतड्यामध्ये आहे कॅन्सरचा किती लांबी आहे आतड्याच्या बाहेर कॅन्सर आलेला आहे का नाही आलेला आहे आजूबाजूच्या घंडामळ्यांमध्ये पसरलेला आहे आहे की नाही आणि मग आपण बायोप्सी करता कारण की म्हणजे आतड्याचा कॅन्सर जोपर्यंत आपल्याला बायोप्सीने आपल्याला म्हणजे तुकडा काढून 100% माहीत नसतं की हो हा कॅन्सरच आहे.

कोलोनोस्कोपी म्हणजे काय :

कोलोनोस्कोपी म्हणजे संडासा जागेतून दुर्बीण घालून आपण पूर्ण मोठा आतडा ऑलमोस्ट बघतो आणि त्याच्यातून गाठ कुठे आहे नेमकं ते बघतो आणि त्याच्यातून तुकडा काढतो सोलोनोस्कोपी आणि बायोप्सी करून आपण डायग्नोसिस घेतो एकदा बायोप्सी आल्यानंतर जेव्हा हे प्रूव होतं की कॅन्सर आहे त्या म्हणजे आतड्याचा कॅन्सर आहे मग त्याच्यानंतर आपण फायनली पेट स्कॅन करतो बघण्याकरता की हा कॅन्सर अजून कुठे पसरला आहे का सो आतड्या मोठ्या आतड्यांचा कॅन्सर हा आजूबाजूच्या आतड्याला आणि लिव्हर मध्ये पसरवण्याचा मुख्य रिस्क असते.

या अवयवांना बघण्याकरता आपण पेट स्कॅन करणे गरजेचे आहे एकदा आपलं डायग्नोसिस झालं निदान झाल्यानंतर आपलं ट्रीटमेंटचा प्लॅन सुरू होतो की हा कॅन्सर कुठे पसरलेला आहे.

मी दोन गोष्टी सांगू इच्छिते समजा हा कॅन्सर फक्त मोठ्या आतड्यामध्ये पसर म्हणजे मोठ्या आतड्यामध्येच असेल अजून कुठेही पसरलेला नसेल तर याची मेन ट्रीटमेंट आहे ती सर्जरी आहे. ही सगळी सर्जरी लॅप्रोस्कोपी मध्ये दुर्बिणीतून करतो समजा उजव्या बाजूला असेल तर हे एक सोप्या भाषेत सांगायचं असा स्क्वेअर सारखं आपलं आतड असतं सो सरळ आतड आडवं आतड आणि मग उभं आतड समजा उजव्या बाजूचा असेल तर आपल्याला पूर्ण उजव्या बाजूचा आतड आणि डाव्या बाजूचं म्हणजे मधलं आतड जे असतं ते अर्ध सो राईट ज्याला आम्ही म्हणतो तेवढं हे मोठं आतड आपण काढतो समजा डाव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूला जेवढा भाग आहे तिथपासून डाव्या बाजूपासून इथपर्यंत लेफ्ट हेमिकोलेक्टमी आपण म्हणतो समजा संडासच्या जागेचं किंवा सिग्माला आतड्याचं जे आहे त्याच्यामध्ये हा कॅन्सर असेल तर आपण अँटेरियर रिसेक्शन किंवा लोअर अँटेरियर रिसेक्शन आपण म्हणतो जे पण आतड्यामध्येहा कॅन्सर आहे ते आतड आपण काढून काढतो आणि उरलेला आतड एकमेकांना जोडतो ही मेन ट्रीटमेंट असते हे ऑपरेशन करताना आपण त्यांच्या आजूबाजूला ज्या गंडमाळ्या आहेत ते सुद्धा काढतो हे सर्जरी करतो जेव्हा हा कॅन्सर फक्त आणि फक्त आतड्यांशी रिलेटेड आहे समजा हाच पेशंट आपल्याला ऑपरेशन झाल्यानंतर आपल्याला जेव्हा याचं स्टेजिंग कळतं की नक्की काय स्टेजिंग होतं टी वन एन झिरो किंवा टी टू एन झिरो त्याच्याप्रमाणे त्याला पुढे किमोथेरपी लागणार आहे की नाही हे डिसाईड होतं सो जर किमोथेरपीचा रोल असेल किंवा जसं मी सांगितलं हाय फॅमिली हिस्ट्री असेल तेव्हा आपण लो रिस्क असेल तरी आपण अशा पेशंटना किमोथेरपी देतो ऑपरेशन किमोथेरपी आणि म्हणजे आपलं संडासच्या जागेचा खालचा भाग जर असेल तर आपल्याला रेडिएशन सुद्धा द्यायला लागतं सो ही ट्रीटमेंट असते जेव्हा कॅन्सर हा फक्त आणि फक्त आतड्याशी रिलेटेड असतो समजा हाच कॅन्सर ऍडव्हान्स स्टेजमध्ये आला किंवा आतडी चिकटलेली आहेत किंवा लिव्हर मध्ये कॅन्सर पसरलेला आहे किंवा फुफ्फुसांमध्ये कॅन्सर पसरलेला आहे कधीतरी असा कॅन्सर मेंदूमध्ये पण पसरू शकतो जर असं आलं तर आपण याला आधी किमोथेरपी द्यायला लागते आपल्याला डिपेंडिंग किती अवयवांमध्ये आणि किती प्रकारची मोठ्या पसरलेले आहेत आपण क्युरेटिव्ह किंवा किमोथेरपी अशा पेशंटला देतो.

जर क्युरेटिव्ह असेल तर आपण त्यांनाआधी किमोथेरपी देतो म्हणजे ऑपरेशनच्या न्यूज किमोथेरपी म्हणतो आपण आधी तीन सायकल सहा सायकल देतो परत एकदा स्कॅन करून बघतो ही गाठ छोटी झाली आहे का नाही झाली जर छोटी झालेली असेल तर मग आपण ऑपरेशन करतो बऱ्याच वेळा सध्याच्या नवीन प्रोटोकॉल प्रमाणे आपण रेडिएशन आणि किमोथेरपी दोन्ही ऑपरेशनच्या आधी देतो जी गाठ मोठी असते ती थोडी छोटी होते आणि ऑपरेशन करायला आपल्याला सोपं जातं सो डिपेंडिंग ऑन स्टेज काय आहे आपली ट्रीटमेंट लागते तयार होते पण मेनली ट्रीटमेंट जी आहे ती सर्जरी फॉलो बाय किमो रेडिएशन किंवा किमो रेडिएशन आधी आणि मग सर्जरी ही असते.

बेसिकली ज्या लोकांमध्ये मी जे सिम्टम सांगितले म्हणजे संडास मधून रक्त जाणं काळी संडास होणं पोटात दुखणं अन्न न पचणं वजन कमी होणं हिमोग्लोबिन कमी होणंहे सिम्टम्स सुद्धा पहिल्यांदा डॉक्टरला जाऊन दाखवावं डेफिनेटली कुठल्या डॉक्टरला दाखवल्यानंतर ते ऍटलिस्ट मिनिमम बेअर मिनिमम इन्वेस्टीगेशन जे असतात ते करतील सो सोनोग्राफी सिटी स्कॅन जे आहेत याच्यामध्ये निदान होईल ज्या लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे त्या लोकांनी डेफिनेटली पाच ते दहा वर्ष आधीपासूनच सतर्क राहणं गरजेचं आहे

अशा लोकांना ऍटलिस्ट 50 नंतर सांगतो की ऍटलिस्ट तीन ते पाच वर्षातून एकदा तरी कोलोनोस्कोपी म्हणजे संडास जागेतून दुर्बीण घालून तपास करणं की कुठे पॉलिप्स आहेत का आणि कुठे अल्सर आहेत का कुठे कॅन्सर आहे का हे बघणं गरजेचे आहे तीन ते पाच वर्षांमध्ये टाळू शकणाऱ्या गोष्टी आपल्या आहारात आहेत सो हाय फायबर डायट घेणं सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या घेणं सगळ्या प्रकारची फळ खाणं विटामिन सी इंटेक घेणं कॅल्शियम इनटेक घेणं अल्कोहोल टाळणं स्मोकिंग टाळणं आणि लिमिटेड नॉनव्हेज खाणं नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे.

असं मी म्हणत नाही पण लिमिटेड खाणं त्याच्यात सुद्धा बेसिकली रेड मीठ जे असतं तो रेड मीठ जे प्रादुर्भाव आहे तो कमी किंवा स्मोक हल्ली मीठ जे खातात म्हणजे अर्धवट पकलं जे मीठ असतं किंवा बार्बेकी करून सारखं स्मोक मीठ जे खातात सारखं नेहमी एनीथिंग इन एक्सेस इज अ पॉइझन असं नाहीये की मी महिन्यातून एकदा खाल्लं आठवड्यातून एकदा खाल्लं तर होईल म्हणून एनीथिंग इन एक्सेस पॉइझन जर तुम्ही दररोज तेवढंच खात असाल पालेभाज्या खातच नसाल तर डेफिनेटली किंवा दररोज अल्कोहोल कोणी घेत असेल तर आणि इट इज असोसिएटेड हे सगळे प्रूवन रिस्क फॅक्टर्स आहेत आतड्याच्या कॅन्सर करता या गोष्टी टाळता यायला पाहिजे आणि ज्या आपल्या हातात नसतात पण आपण बघू शकतो त्या म्हणजे फॅमिली आपल्याला फॅमिली हिस्ट्री असेल तर आपण अजून सतर्क राहून योग्य वेळीत योग्य तपासण्या किंवा योग्य मार्गदर्शन मार्गदर्शना करता डॉक्टर कडे जाणं हे गरजेचे आहे. या एवढ्याच गोष्टी आपल्या हातात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *