झिरो परसेंट इंटरेस्ट रोज फक्त 29 रुपये भरा सगळ्यात कमी ईएमआय किंवा बाय नाऊ पे लेटर या अशा स्कीम ज्या आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या असतील या अशा सगळ्या स्कीम ज्या आहेत हा आपल्यासाठी टाकलेला आकडा असतो ज्याच्यामध्ये बहुतेक जण नकळत अडकतात सध्याच्या भारतीय समाजामध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्रतिष्ठा आणि स्टेटस याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेल आहे.
स्वप्नांच्या मागे धावताना शहरातील असू द्या किंवा ग्रामीण भागातील असू द्या येथील जनता एका नव्या प्रकारच्या जाळ्यामध्ये अडकू लागलेली आहे आणि ते जाळ आहे क्रेडिट कार्डचं आणि या क्रेडिट कार्डच्या कर्जाचं आज हे सांगण्याचं कारण आहे 2025 मध्ये भारतामध्ये क्रेडिट कार्ड द्वारे झालेल्या व्यवहारांचा आकडा हा 20 लाख कोटीवरती पोहोचलेला आहे आणि ज्या गतीने हे व्यवहार वाढलेले आहेत त्याच गतीने नॉन परफॉर्मिंग सेट्स म्हणजेच बुडीत कर्जाच प्रमाण सुद्धा वाढत चाललेला आहे एकेकाळी फक्त उच्च उत्पन्न गटासाठी मर्यादित असणाऱ्या सुविधा आता प्रत्येकासाठी ईएमआय किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होत चाललेल्या आहेत. फक्त एका क्लिकवरती बँका आणि इतर लोन देणाऱ्या कंपन्या इन्स्टंट क्रेडिट देऊ लागलेले आहेत. पण हा एक प्रकारचा सापळा आहे हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो. आपण ज्याच्याकडे सल्ला घ्यायला जावं तर तो सांगतो की फक्त मिनिमम ड्यू भरत राहा आणि मग व्याजाच्या किंवा चक्रवाढ व्याजाच्या दुष्ट चक्रामध्ये नकळतपणे तो क्रेडिट कार्ड वापरणारा अडकत जातो.
सध्या तरुण वर्ग त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय कुटुंब जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ईएमआय किंवा क्रेडिट कार्ड वरती अवलंबून आहेत ती एका पद्धतीने आता मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या तणावाखाली येताना दिसतायेत असा एक अहवाल सांगतोय. विषय वैयक्तिक आहे म्हणून सोडून देण्यासारखा सुद्धा नाही कारण की हाच सध्या संपूर्ण समाजाचा विषय होत चाललेला आहे आणि याचा एकूणच आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धक्का निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. लोकांची खर्च करण्याची क्षमता जेव्हा वाढलेली आहे असं सांगितलं जातं त्यावेळेस ही खर्च करण्याची क्षमता कर्जाच्याजोरावरती वाढलेली आहे याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.
भारतातील क्रेडिट कार्ड क्रायसिसची याचे परिणाम काय होता आहेत आणि एकूण आकडेवारी काय सांगते :
सुरुवातीच्या टप्प्यामध्येच या संदर्भातला काही डेटा सांगतो. डिसेंबर 2024 पर्यंत क्रेडिट कार्ड एनपीए 6742 कोटीवरती पोहोचलं होतं. डिसेंबर 2020 पासून एनपीए मध्ये तब्बल 500 टक्क्यांची वाढ झालेली आहे आणि 2021 मध्ये आपले इथं सहा कोटीच्या आसपास क्रेडिट कार्ड होते जे 2025 पर्यंत आता 10 कोटींचा टप्पा ओलांडून पुढे गेलेले आहेत.
मे 2025 मध्ये आपल्या इथं जवळपास साडे लाखाहून अधिक क्रेडिट कार्ड जे आहे ते जारी करण्यात आलेले आहेत आणि देशभरातील कार्डांची एकूण संख्या आता 11 कोटींच्या पलीकडे गेलेली आहे. क्युबर ग्रुपचा डेटा असं सांगतो की 50,000 पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांमध्ये 93% लोक खर्चासाठी क्रेडिट कार्ड वापरत आहेत आणि ही आकडेवारी भयावह आहे.
क्रेडिट कार्डच्या मुद्द्याला क्रायसिस का म्हणावं लागतय यामागची कारणं आपण समजून घेऊयात :
या कारणामधलं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे बाय नाऊ पे लेटर या संस्कृतीचं वाढतं आकर्षण. आता ही जी कारण आहेत या कारणांमध्ये काही कारण आर्थिक आहेत काही मानसिक आहेत काही सामाजिक आहेत आणि काही टेक्नॉलॉजीशी संबंधित सुद्धा आहेत आता हे बाय नाऊ आणि पे लेटर जे आहे हे रस्त्याने येता जाता आपल्याला खूप साऱ्या शोरूमच्या बाहेर खूप साऱ्या दुकानांच्या बाहेर अगदी सहजपणे दिसत. सध्या मध्यमवर्गीय लोक आणि तरुण वर्ग जो आहे हा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे ताबडतोब समाधान शोधताना दिसतोय प्रत्येक प्रश्नावरती आणि प्रत्येक गरजेवरती ईएमआय मिनिमम पेमेंट बाय नाऊ पे लेटर यांसारख सुविधांमुळे खर्च करण्याच स्वातंत्र्य मिळतय अशी भावना तयार होते तसच खर्च करण्या अगोदर जी काही थोडीफार भीती वाटते किंवा जे दडपण येतं ते कुठेतरी सुटत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ही वस्तू आपल्याला परवडणार आहे का याच्या ऐवजी ही वस्तू मला ईएमआय वरती मिळेल का हाच विचार जास्त प्रॉमिनंटली होताना दिसतोय एक अहवाल असं सांगतो.
की नवतरुणाईची आर्थिक शिस्त कमी आहे जेंजी घ्या किंवा मिलेनियल घ्या हे सर्व सेविंग पेक्षा लाईफ स्टाईल किंवा सोशल मीडियावरती दिखाऊपणा करण्यामध्ये जास्त व्यस्त आहेत त्याला त्याचा सोर्स जास्त आहे इंस्टा लाईफच्या नादामध्ये खर्च किती करतोय याच भान राहत नाही ब्राँडचा फार मोठा प्रभाव या जनरेशन वरती आहे. आणि फिअर ऑफ मिसिंग आऊटची संस्कृती वाढत चाललेली आहे आणि हेच थोड्याफार प्रमाणात का होई ना जे तिशी मध्ये आहेत 40 मध्ये आहेत किंवा 50 मध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होते एकट्या जेझीला दोष देऊन चालणार नाही अजून एक मुद्दा तुम्ही ऑब्झर्व केला असेल तो असा की अगदी ज्याला 1520 रुपये पगार आहे ती व्यक्ती सुद्धा महागडी टू व्हीलर किंवा महागडा फोन घेताना आपल्याला दिसते.
यामागच महत्त्वाचं कारण समोर आलेल आहे ते म्हणजे आता बँका 1520 पगार असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला जास्तीच क्रेडिट लिमिट देतायत अगदी एक लाख रुपया पेक्षा जास्तीच लिमिट त्यांना देतायत मग ह्याच सुविधेचा फायदा घेऊन आपण उंची आयुष्य जगत आहोत असा भास निर्माण करता येतो पण नोकरी कायमस्वरूपी आहे काय किंवा आपलं उत्पन्न शाश्वत आहे काय करत असलेल्या नोकरीमुळे आपण जो काही खर्च करतोय उद्या आपण करू शकणार आहे, का आपण हा पेलू शकणार आहे का याचा विचार केला जात नाही आणि मग परत फेड करताना नाके नऊ येतात प्रसंगी सुरुवातीला गोड बोलून कर्ज देणाऱ्या कंपन्या नंतर तितक्याच कडवटपणे गाड्या सुद्धा उचलून नेताना खूप साऱ्या जणांनी पाहिलेल असेल याही पलीकडे जाऊन कुठल्याही शोरूममध्ये जावा बाहेर बोर्ड लावलेला असतो 5% कॅशबॅक 3% कॅशबॅक बोनस पॉईंट्स असे सगळे बोर्ड्स लावलेले असतात ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर काहीतरी वेग वेगळ अजून गिफ्ट वाउचर मिळेल असं सुद्धा सांगितलं असतं. म्हणजे स्कीम्स खूप साऱ्या असतात या सगळ्यामुळे होतं काय तर अनावश्यक खरेदी होते आणि खर्च नकळत वाढत जातो.
विशेष म्हणजे उत्पन्न तितकच राहिलेला आहे पण खर्च जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं तो म्हणजे असा की बऱ्याच लोकांना अजूनही क्रेडिट कार्ड कसं वापरायचं हे माहितीच नाहीये. मोबाईल वरती मेसेज येतो तुम्हाला बँकेतडून फ्री क्रेडिट कार्ड मिळते आणि मग क्रेडिट कार्ड फ्री मध्ये आहे म्हणून घेतलं जातं.
खूप साऱ्या जणांना वाटतं फ्री मधलं क्रेडिट कार्ड म्हणजेच क्रेडिट कार्ड वरचे पैसे फ्री आहेत. खूप साऱ्या जणांना क्रेडिट कार्डच व्याज, लेट पेमेंटचे चार्जेस त्याच चक्रवाढ व्याज याची माहिती नसते. त्याच्यामुळे होतं काय तर मिनिमम पेमेंट ते भरत राहतात आणि मग कर्जाची रक्कम जी आहे चक्रवाढ व्याजाने वाढत राहते. मोबाईलमध्ये एका क्लिक वरती आलेलं यूपीआय हे तसं बघायला गेलं तर एका दृष्टीने वरदान आहे पण यालाच जर का कोणी क्रेडिट कार्ड जोडलं तर मात्र सगळं खर्चावरचा ताबा सुटतो असा बहुतेकांचा अनुभव असणार आहे.
बिग बिलियन डे शॉपिंग फेस्टिवल किंवा अगदी फ्लॅश सेल असं काही असलं की मग बिंधास्तपणे कोणताही विचार न करता खर्च केला जातो खरेदी केली जाते. याच विषयाची अजून एक बाजू अशी आहे की कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर खूप साऱ्या जणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या कोणताही पर्याय समोर नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोकांनी कर्ज घेतलं कोणी क्रेडिट कार्ड घेतलं आणि तेव्हा घेतलेलं कर्ज फेडणं अजूनही कठीण जात ही वास्तविकता आहे उलट एक कर्ज फेडण्यासाठी नव्याने अजून एक कर्ज घेतलं जातं आणि हे दुष्टचक्र अशाच पद्धतीने सुरू राहतं.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मित्रमंडळींमध्ये आपल्याला कमी वाटायला नको म्हणून भरपूर वेळा ब्रांडेड कपडे घेतले जातात महागडे फोन घेतले जातात. ट्रॅव्लिंग वरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो पण हे सर्व करण्यासाठी अल्टिमेटली क्रेडिट कार्डचाच वापर केला जातो. महागाईमुळे जगणं महाग झाले का तर निश्चितपणे महाग झालेला आहे यासोबतच महागाई प्रचंड वाढलेली आहे त्या प्रमाणात लोकांचा पगार वाढलेला नाही आणि याच्यामुळे होतय काय तर जगण्याचा ताळमेळ घालताना कुठेतरी कर्ज घ्याव लागते किंवा क्रेडिट कार्ड वापराव लागते बँकांकडून कर्ज घ्यावं म्हटलं तर जामीन व्हायला कोणी तयार नाही जामीन मिळत नाहीये बँका कर्ज देत नाहीयेत आणि लिस्टमध्ये नाव असल्याशिवाय कुणालाही कर्ज मिळत नाहीये याकडे कोणाचही लक्ष नाही धर्म ,अर्थ, काम आणि मोक्ष याच्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण याच्यातील फक्त धर्म, काम आणि मोक्ष याची चर्चा होते पण अर्थ याची चर्चा होत नाही म्हणजेच काय तर आपल्या इथं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे त्याचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे इमर्जन्सी फंड किंवा बजेटिंग हे केलेलं नसत आणि मग अचानक जर का कोणता खर्च उभा राहिला तर अशा वेळेस क्रेडिट कार्ड शिवाय पर्याय त्या व्यक्तीसमोर नसतो या सर्व गोष्टींकडे जर का वेळीच लक्ष दिलं गेलं नाही तर भारता भारतामध्ये पुढील चार ते पाच वर्षांमध्ये मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं कारण की नॉन परफॉर्मिंग सेट ज्या आहे त्या वाढत चाललेले आहेत. डेटा काय सांगतो तर भारतातील एकूण कार्ड व्यवहाराचे मूल्य 2025 च्या सुरुवातीलाच 20 लाख कोटीवरती पोहोचलेल आहे.
2020 मध्ये हीच आकडेवारी ६ लाख कोटीच्या आसपास होती म्हणजेच बघा चार वर्षांमध्ये याच्यामध्ये १५० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. मगाशी मी सांगितलं तसं 2023 च्या सुरुवातीला नऊ कोटीच्या आसपास क्रेडिट कार्ड सर्कुलेशन मध्ये होते आणि 2025 मध्ये पहिल्या क्वार्टर मध्येच ही संख्या ११.५० कोटीवरती गेलेली आहे आणि याच्यामध्ये 18 ते 35 वयोगटातील युवक युवती हे सगळ्यात मोठे ग्राहक आहेत आता हा सर्व विषय आपण ज्याच्यासाठी मांडत आहोत कारण की 2024 मध्ये क्रेडिट कार्डवरील नॉन परफॉर्मिंग ऍसेटचा रेट हा 1.8% होता जो 2025 च्या मध्यापर्यंत 2.4 चार टक्क्यापर्यंत पोहोचलेला आहे आपल्या येथील या संदर्भात अभ्यास करणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत त्यांनी ही आकडेवारी वॉर्निंग साईन म्हणून मांडलेली आहे आपले इथे सरासरी क्रेडिट कार्डचा बॅलन्स हा 25 ते 35 हजाराच्या आसपास आहे बहुतेक लोक मिनिमम ड्यूज भरतात मग कंपाउंड इंटरेस्ट लागू होतो आणि मग फेडत राहायचं प्रत्येकाने ते या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष याच्याकडे होतय की क्रेडिट कार्डचा व्याज दर हा आपल्या इथं 30 ते 42 42% प्रतिवर्ष आहे जो जगातील सर्वाधिक व्याजदरांपैकी एक आहे.
आता या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे की आपल्या इथं अगोदर बचतीकडे कुटुंबांचा कल होता तीच बचत आता कमी होताना दिसते. 2020 मध्ये भारतातील कुटुंबीयाचा दर बचतीचा हा 19% होता जो 2025 मध्ये 14%पर्यंत आलेला आहे. म्हणजेच काय तर क्रेडिट कार्ड वरती अवलंबून राहण्याचे परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. खूप साऱ्या जणांना मोबाईलमध्ये ॲप्स असलेले माहिती असतील की जे कार्ड नसलं तरी सुद्धा क्रेडिट देतात आणि त्याची वसुली कशी होते ते सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असेल.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढलेली आहे का तर निश्चितपणे वेगाने वाढलेली आहे वेगाने वाढती आहे पण क्रेडिट कार्डच्या पायावरती ती उभी आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जर या प्रश्नाचे उत्तर हो असं असेल. तर अशा पद्धतीने वाढणारी अर्थव्यवस्था कितपत टिकेल याच्याविषयी फार मोठी शंका आहे. एकूणच विषयासाठी उपाय काय आहेत लॉंग टर्म उपाय काय आहेत शॉर्ट टर्म उपाय काय आहेत याच्यामध्ये जाणार नाही पण अनावश्यक खर्च जर का टाळला आणि स्वतःला अपडेट करून जर का उत्पन्न आणि उत्पन्नाच साधन जर का वाढवलं तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना सापडू शकेल वेळ आलेली आहे बाय नाऊ पे लेटर याच्या ऐवजी सेव नाऊ आणि लिव्ह बेटर असं म्हणण्याची. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद…!