अमित शहा, देवेंद्र फडणवीस भेटीनंतर, फडणवीसांचा ट्रॅप, अडचण एकनाथ शिंदे यांची होणार?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

पिक्चर अभी बाकी आहे हे कॅप्शन आहे फडणविसांनी पोस्ट केलेल्या अमित शहा सोबतच्या फोटोच हा फोटो का महत्त्वाचा आहे हे कॅप्शन का महत्त्वाचा आहे तर या फोटोच्या मागे असणारी पार्श्वभूमी राज्यात मराठा आंदोलन सुरू आहे जरांगे पाटलांनी मुंबईत तळ ठोकलाय यामागे एकनाथ शिंदे असल्याच्या चर्चा सुरू आहेत फडणविसांना अडचणीत आणण्यासाठी शिंदेनी डाव टाकल्याचं बोललं जातय पण शिंदे भाजपच्या विरोधात इतकं मोठं धाडस करतील का तर दिल्लीचा पाठिंबा असल्याशिवाय शिंदे हे धाडस करणार नाहीत म्हणूनच शिंदेना शहांचा पाठिंबा आहे कारण नंबर दोनच्या राजकारणात शहांना भविष्यात फडणवीस नको आहेत याच राजकारणातून शहा शिंदे युती झाली आहे आणि शहांच्या पाठिंब्यावर शिंदेनी ट्रॅप लावला आहे अर्थात या झाल्या चर्चा पण या चर्चांनी वेग पकडल्यानंतर फडणविसांकडून फोटो येतो आणि लिहिलं जातं पिक्चर अभी बाकी आहे.

नेमकं काय घडतंय फडणविसांच्या बाजूने कसा ट्रॅप लावला गेलाय जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे फडणवीस एकटे पडलेत का अजित पवार एकनाथ शिंदे हे आज फडणविसांसोबत दिसत नाहीत पण पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील फडणविसांना एकट पाडलय का हा ट्रॅप भेदण्याची फडणविसांनी तयारी कशी सुरू केली आहे नेमका कुठला पिक्चर आंदोलन संपताना आपल्याला दिसू शकतो पाहूयात…

फडणवीस जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे टार्गेट कसे झाले या मूळ मुद्द्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जरांगे पाटलांचे आंदोलन हाताळलं होतं हे आंदोलन हाताळत असताना सगे सोयरेचा जीआर काढणं आंदोलकांना वाशीतच थांबवणं स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित राहणं अशा गोष्टी करून एकनाथ शिंदे मराठा आंदोलनकर्त्यांसमोर हिरो झाले होते आता याच गोष्टींची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होत आहे.

फडणवीस शिंदे प्रमाणे मराठा आंदोलनकर्त्यांना वागवणूक देऊ शकत नाहीत:

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरचा राजकीय फोकस वेगळा असल्याने फडणवीस शिंदे प्रमाणे मराठा आंदोलनकर्त्यांना वागवणूक देऊ शकत नाहीत आणि तशी वागवणूक त्यांनी दिली तर त्यांच्यासाठी हा राजकीय आत्मघातच ठरू शकतो. नेमकं कसं तर एकनाथ शिंदे हे जातीने मराठा. शिवसेनेची मुंबई बाहेरची वोट बँक पहिल्यांदा वाढली ती मराठवाड्यातून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा पुकारा देऊन तेव्हाच्या औरंगाबाद मध्ये आणि आजच्या संभाजीनगरमध्ये पहिली शाखा सुरू केली. पण मराठवाड्यात सेना वाढण्याच मूळ नामांतराच्या चळवळीत होतं नामांतरात विरोधी भूमिका घेतल्याने मोठ्या प्रमाणात बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे मराठा मतदार आकर्षित झाला. या मराठा मतदारांना पुढे हिंदुत्वाकडे बाळासाहेबांनी शिफ्ट केलं.

एकनाथ शिंदेच्या मार्फत सेनेत फूट झाल्यानंतर हा मराठा अधिक हिंदुत्वाकडे शिफ्ट झालेला मतदार कायम ठेवणं शिंदे समोरच प्रमुख आव्हान होतं मराठा आंदोलनात मराठा आंदोलनकर्त्यांची थेट बाजू घेऊन एकनाथ शिंदेनी हे आव्हान पेललं लोकसभेत महायुतीच पानिपत होत असताना छत्रपती संभाजीनगर मधून मराठा असणाऱ्या भुमरें मार्फत महायुतीची एकमेव जागा आल्याचं दिसलं हे शिंदेच्या याच मराठा प्रो राजकारणामुळे इथे ओबीसी वजा झाल्यामुळे सेनेला विशेष फरक पडणार नव्हता.

भाजपच्या युतीमुळे ओबीसी मतदान मिळेल हा शिंदेचा अंदाज देखील बरोबर ठरला मात्र भाजपच तसं नाही काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकारणात महाराष्ट्राच राजकारण मराठा केंद्रीय राहिलं तिथे भाजपने माधव पॅटर्न आणून ओबीसी पूरक राजकारण केलं ओबीसी ही भाजपची मूळ वोट बँक राहिली त्यामुळे देवेंद्र फडणवीस आंदोलनकर्त्यांची जरांगे पाटलांची पूरक भूमिका घेऊ शकत नाहीत. शिंदेनप्रमाणे त्यांनी जरांगे पाटलांना पूरक भूमिका घेतली तर मोठ्या प्रमाणात ओबीसी काँग्रेसकडे शिफ्ट होऊ शकतो. पर्यायाने शिंदेनी जसं आंदोलन हाताळलं तसं फडणवीसच काय भाजपचा कोणताही मुख्यमंत्री असता कोणत्याही जातीचा मुख्यमंत्री असता तरी तो शिंदे प्रमाणे आंदोलन हाताळू शकला नसता ही वस्तुस्थिती आहे.

देवेंद्र फडणविस आंदोलनात कसे अडकवले गेले?

आता हा फरक समजून घेतल्यानंतर पाहूया ते म्हणजे हीच गोष्ट देवेंद्र फडणविसांना आंदोलनातून ट्रॅप करण्यासाठी कशी पूरक ठरते. मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्याच काम फडणविसांनी यापूर्वी केलेल आहे. मात्र कायद्याच्या पातळीवर हे आरक्षण किती दिवस टिकेल असा प्रश्न मराठ्यांसमोर आहे. अर्थातच कुणबीप्रमाणपत्र मिळवून ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळवण्याचा पर्याय जरांगे पाटलांच्या आंदोलनातून समोर आला. यामुळे ओबीसी प्रवर्गात असलेल्यांना ओबीसी प्रवर्ग अंतर्गत स्पर्धा वाढण्याची भीती आहे. पर्यायाने ओबीसींचा या मागणीला ठांब विरोध राहिलेला आहे.

थोडक्यात फडणविसांसमोर एका बाजूला मराठ्यांना न्याय देणारी भूमिका घेणं पण जरांगेच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करणं या पातळ्यांवर लढाई करणं महत्त्वाचं ठरतय. आपण ही पार्श्वभूमी समजून घेतली कारण फडणविसांच्या समोर कसा ट्रॅप लावला आहे हे यातून समजून घेता येतय. आता फडणविसांसमोर कोणताच पर्याय नाही. म्हणजे एक तर जरांगे पाटलांच्या मागण्या फडणविसांनी मान्य केल्या तर ओबीसी दुरावण्याची भीती आहे. दुसरीकडे जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्याच नाहीत, तर मराठा आंदोलनकर्त्यांच्या रोषाचा सामना फडणविसांना करावा लागू शकतो. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था फडणविसांची आहे. मग फडणवीस नेमका काय निर्णय घेतील किंवा हे आंदोलन कस हँडल करतील?

फडणवीस तीन चार पातळ्यांवर काम करताना दिसतायत:

नेमकं कसं तर पहिल्या पातळीवर ओबीसी आरक्षणातून जरांगेची मागणी आणि मराठा आरक्षण या दोन भिन्न गोष्टी असल्याचं सातत्याने ठसवतायत आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे जरांगेची मागणी ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची आहे. त्यासाठी कुणबी प्रमाणपत्र मिळणं गरजेच आहे तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण फडणविसांच्या प्रयत्नांमुळे यापूर्वीच मिळालेल आहे आता हे आरक्षण आपण कसं दिलं हे फडणविसांच्या टीम कडून सातत्याने सांगितलं जाऊ लागलय विशेष म्हणजे सारथी अण्णासाहेब पाटील महामंडळ अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर फडणविसांनी केलेले प्रयत्न अधोरेखित केले जाऊ लागलेत. हे मराठा समाजाच्या मतदारांपर्यंत पोहोचवले जाऊ लागलेत. दुसरीकडे ओबीसीतून आरक्षण हे राजकीय आरक्षणाच्या लाभासाठी आणलेली मागणी आहे हे सांगण्यात येतय. अर्थात या दोन मागण्या भिन्न असून शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी स्वतंत्र मराठा आरक्षण पुरेस आहे आणि ते फडणविसांच्या प्रयत्नातून मिळालं हे सांगून संपूर्ण मराठा समाजाचा रोष अंगावर येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं.

दुसऱ्या पातळीवर फडणवीसांनी ट्रॅक दूर करायला सुरुवात केली आहे ती आंदोलन राजकीय असल्याचं आकलन समोर आणून विक्टिम मोडला जाणं. काल राज ठाकरेनी शिंदेना विचारा असा प्रश्न माध्यमांना केला आणि आजपर्यंत दबक्या आवाजात असणारी शिंदेच्या पाठबळाची चर्चा जाहीरपणे झडू लागली. आंदोलनामागे राजकीय डावपेच आहेत हे आकलन फडणविसांना सर्वसामान्य आणि तटस्थ लोकांच्या पाठिंब्यासाठी आवश्यक ठरतं एकदा का आंदोलन राजकीय पुरस्कृत आहे हे परसेप्शन पक्क झालं तर बळाचा वापर करूनही आंदोलन संपुष्टात आणता येतं जरांगे पाटलांनी एकट्या फडणविसांना सातत्याने टार्गेट करणं देखील आंदोलन राजकीय पुरस्कृत असल्याच आकलन तयार करण्यासाठी पूरक ठरताना दिसतय असेही आपल्याला म्हणता येतं म्हणजेच फडणविसांना जितका राजकीय विरोध होईल तितका फडणविसांना फायदाच होईल असं म्हणता येतं शिंदेच्या नावाची चर्चा झाल्यास सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी शिंदेनी मुंबईचे हाल केले हे नरेटिव्ह समोर येतं दुसरीकडे जरांगे पाटील कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलन करत आहेत हे नरेटिव्ह समोर येतं ज्यामुळे जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे दोन्ही लोक यातून डॅमेज होतात. तर फडणवीस विक्टिम कार्ड समोर आणून आपोआप सेफ होताना दिसतात.

तिसऱ्या पातळीवर फडणविसांनी ट्रॅप दूर करायला केलेली सुरुवात म्हणजे आंदोलन हाताळण्यास केलेली सुरुवात काल जरंगे पाटलांची भेट घेण्यासाठी शिंदे समितीचे शिंदे गेले सहा महिन्याचा अवधी जरांगना मागण्यात आला. दुसरीकडे विखे पाटलांच्या नेतृत्वात उपसमितीची बैठक पार पडली. आंदोलनाच्या पहिल्या रात्री टॉयलेटला कुलूप लावण्यात आले आहेत. हॉटेल बंद आहेत. लाईट मुद्दामून घालवण्यात आली आहे अशा बातम्या आल्या दुसऱ्या दिवशी मात्र बीएमसी कडून उभारलेल्या टॉयलेटचे फोटो पोस्ट करण्यात आले. चिखल झालेला तिथे खडे टाकण्यात आली. जरांगे पाटलांना आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर एक दिवसाचीच मुदत देण्यात आली होती. पण आता ते एक एक दिवस वाढवण्यात येतीय थोडक्यात सरकारी पातळीवर काहीच हालचाल होत नाही उलट कोंडीत पकडण्याचा डाव टाकला जात आहे हे आकलन बोलणी करू इथपर्यंत आलेला आहे.

वेळ देऊन धाक कमी करण्याचा प्रयत्न इथे सरकारकडून केला जात असल्याचं दिसतय. पुढच्या दोन चार दिवसात चर्चा केल्यास अजून काही दिवस जाऊन दिल्यास जरांगे पाटलांना देखील तडजोड करावी लागू शकते तसं झाल्यास एक प्रकारे फडणविसांनी खेळी जिंकल्याच आकलन पुढे येताना दिसू शकतं थोडक्यात फडणवीस स्ट्रॅटजी आखून खेळत असल्याचं दिसू लागले विशेष म्हणजे कालच्या शहांच्या भेटीनंतर आज सकाळपासून काय घडलंय तर एकनाथ शिंदेनी दरेगाव गाटलय तर शिंदेचे एकनिष्ठ समजले जाणारे उदय सामंत आणि दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदेनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या कामांचा पाढावा वाचण्यास सुरुवात केली आहे. कालपर्यंत फडणवीस एकटे आहेत असं बोललं जात होतं पण आज मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते फडणविसांच्या बाजूने मैदानात उतरल्याचं दिसू लागलंय. दुसरीकडे अजित पवार जे कालपर्यंत अलिप्त राहत होते आज ते देखील मैदानात आल्याचं बोललं जाऊ लागलय. साहजिकच शहांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच फडणवीस ऍक्टिव्ह झाल्याचं सांगण्यात येतय.

दुसरीकडे मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील केंद्रबिंदूवर आल्यानंतर मराठा मुख्यमंत्री हा नाराज समोर येईल असा अंदाज शिंदेचा असला तरी तो संपुष्टात येताना दिसतोय या उलट अशा परिस्थितीत मराठा देखील नको आणि ओबीसी देखील नको या जाणीवेतून फडणविसांसाठी जातीय फॅक्टर महत्त्वाचा ठरताना दिसतोय थोडक्यात शिंदेची बाजी पलटवण्यास फडणविसांनी सुरुवात केली आहे आणि शहांकडून ती हमी घेतली आहे कदाचित फडणविसांनाच ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांनी सूचकपणे पिक्चर अभी बाकी म्हणल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतंय? चहांच्या भेटीनंतर फडणवीस सेफ आणि शिंदे अनसेफ झालेत का? फडणविसांची स्ट्रॅटजी कामी येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *