नितीन गडकरींनी गोड बोलून जनतेला कसे फसवले? आणि मुलांना कसा फायदा करून दिला?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

तुम्ही जे 120 रुपयांचे पेट्रोल घेताय त्याचा भाव आम्ही 15 रुपये लिटर करू जेवढा ॲव्हरेज तुम्हाला 120 रुपयांच्या पेट्रोल मधून मिळतय तेवढा ॲव्हरेज 15 रुपयांच्या इथेनॉल मधून मिळेल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच दोन वर्षांपूर्वीच हे वक्तव्य पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढला तर त्याचा फायदा सर्वसामान्यांना कसा होईल हे सांगताना गडकरी यांनी उदाहरण दिलं होतं त्यांच्या या वक्तव्याला आता दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला सध्या देशात सगळीकडे E20 पेट्रोल विकलं जातय म्हणजेच 80% साध पेट्रोल आणि त्यात 20 टक्के इथेनॉलच मिश्रण.

केंद्र सरकारनच अशाप्रकारे पेट्रोलमध्ये इथेनॉलची मात्रा वाढवण्याची पॉलिसी आणली याद्वारे पेट्रोलची बचत होईल आणि याचा गाडीलालाही फायदा होईल असं सरकारच म्हणण आहे पण प्रत्यक्षात घडतय ते उलटच पेट्रोल मुळे गाडीचा मायलेज कमी होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येतात सोबतच पेट्रोलमध्ये इथेनॉलची मात्रा वाढवली तरी यामुळे पेट्रोलचे दर कमी झालेले नाहीत मग या सगळ्याचा नेमका फायदा कोणाला होतोय असे प्रश्न आता विचारले जातात केंद्र सरकारच्या या पॉलिसीच थेट कनेक्शन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दोन मुलांशी असल्याचे या पॉलिसीमुळे गडकरींच्या मुलांना प्रचंड फायदा होत असल्याचे आरोप होत आहेत.

गडकरी E20 पेट्रोलच्या वापरावर भर देतात कारण यामुळे त्यांच्या मुलांना फायदा होत असल्याच्या चर्चाही या आरोपांमुळे सुरू झाल्यात काय आहेत या चर्चा E20 पेट्रोलच्या पॉलिसीचा गडकरींच्या मुलांशी संबंध आहे का? यामुळे त्यांना फायदा होत असल्याचे आरोप का होतायत सगळी माहिती जाणून घेऊया…

E20 मुळे सर्वसामान्यांच कस नुकसान होतय?

पेट्रोल म्हणजे नॉर्मल पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिक्स सरकारने E20 चा प्रचार करताना याचे अनेक फायदे सांगितलेत E20 पेट्रोल मुळे प्रदूषण कमी होईल यामुळे भारताच विदेशातून कच्च तेल आयात करण्याचे प्रमाण कमी होईल तसच गाडी स्मूथली चालेल असं सरकारच म्हणण आहे पण प्रत्यक्षात जेव्हा लोकांनी हे पेट्रोल वापरलं तेव्हा यामुळे गाडीच नुकसान होत असल्याची अनेक उदाहरण समोर आलेत मुळात इथेनॉलची कॅलरी व्हॅल्यू म्हणजेच ऊर्जा तयार करण्याची क्षमता पेट्रोल पेक्षा 30 ते 35 टक्केने कमी असते समजा आपण 100 लिटर E20 पेट्रोल घेतलं तर याचा अर्थ आपण त्यात 20 लिटर इथेनॉलचा वापर केला.

आता 20 लिटर इथेनॉल मध्ये पेट्रोल पेक्षा 30% ऊर्जा कमी होती. याचा अर्थ जवळपास सहा ते सात लिटर पेट्रोलच नुकसान झालं म्हणजेच जेव्हा आपण 100 लिटर पेट्रोल घेऊ तेव्हा त्यापैकी फक्त 94 लिटर पेट्रोलच वापरल जाईल. E20 मुळे सर्वसामान्यांच नुकसान होतय ते अशाप्रकारे. मात्र यामुळे फायदा हा नितीन गडकरी यांच्या मुलांना होत असल्याचे आरोप होत आहेत.

नितीन गडकरीच्या मुलांना कसा फायदा होतोय:

नितीन गडकरी यांना दोन मुले आहेत. निखिल गडकरी आणि सारंग गडकरी हे दोन्ही मुलं इथेनॉल प्रोडक्शनच्या बिझनेसमध्ये आहेत. सारंग गडकरी हे मानस ग्रो इंडस्ट्रीज नावाची कंपनी चालवतात. ही कंपनी इथेनॉलच्या उत्पादनासोबतच साखर उत्पादन, बायोफर्टिलायझर्स आणि विजनिर्मितीच्या क्षेत्रात काम करते. सारंग गडकरी हे या कंपनीचे पूर्ण वेळ संचालक म्हणून काम करतात.

नितीन गडकरी यांचे मोठे चिरंजीव निखिल गडकरी हे सीआय एन ऍग्रो इंडस्ट्रीजशी संबंधित आहेत. ते या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ही कंपनी सुद्धा इथेनॉलच प्रोडक्शन करते. महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी सुरुवातीपासून या बिझनेसमध्ये नव्हती. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या कंपनीने इथेनॉलच्या क्षेत्रात प्रवेश केला तेव्हापासून या कंपनीला प्रचंड फायदा झालाय.

मुख्य म्हणजे तेव्हापासूनच सरकारन देशात इथेनॉलच्या वापरावर भर दिलाय. त्यामुळे याचा संबंध गडकरी यांच्या निर्णयाशी आहे का? असे प्रश्न आता विचारले जातात. हे प्रश्न विचारण्याच कारण ठरतय. सरकारन पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वापरावर भर दिल्यापासून गडकरी यांच्या मुलांच्या कंपन्यांची झालेली ग्रोथ. निखिल गडकरी यांच्या सियान ॲग्रो इंडस्ट्रीजची गेल्या पाच वर्षात 22 पट्टींनी वाढ झाली.

या कंपनीन जून 2024 मध्ये फक्त 18 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला होता. पण जून 2025 मध्ये या कंपनीन तब्बल 510 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट केला. मुख्य म्हणजे ही कंपनी गेल्या वर्षी अचानक इथेनॉल प्रोडक्शनच्या बिझनेसमध्ये उतरली तेव्हापासून तिची प्रचंड ग्रोथ झाली कंपनीच्या 2025 च्या आकडेवारीनुसार तिचा निव्वळ नफा 41 कोटी आणि महसूल 1054 कोटीचा आहे. जुलै 2024 मध्ये सियान ग्रोइंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 42 रुपये होती पण अवघ्या एका वर्षात ही किंमत 800 रुपयांच्या पार गेले 3 सप्टेंबरला सियान ग्रो इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत तब्बल 852 रुपये एवढी होती. गेल्या महिन्यात 7 ऑगस्टला या शेअरची किंमत 398 रुपये होती म्हणजे फक्त महिनाभराच्या आत कंपनीचे शेअर्स दुपटीपेक्षा जास्त वाढलेत.

फक्त निखिल गडकरीच नाही तर नितीन गडकरी यांचे दुसरे चिरंजीव सारंग गडकरी यांच्या कंपनीला सुद्धा इथेनॉलच्या बिझनेस मधून मोठा फायदा झाला असल्याचं बोललं जातं सारंग गडकरी हे मानस ऍग्रो नावाची इथेनॉल प्रोडक्शनची कंपनी चालवतात. एका दाव्यानुसार 2021 मध्ये या कंपनीचा रेवेन्यू 5990 कोटी रुपये इतका होता. 2024 मध्ये तो जवळपास दुप्पट होऊन 9591 कोटी रुपये इतका झाला. या कंपनीकडे 120 के एलपीडी क्षमतेचा इथेनॉल डिस्टिलरी प्लांट आहे जो पेट्रोल कंपन्यांना पुरवठा करतो.

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत काही दावे केलेत. दमानिया यांनी नुकतच सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की सियान ऍग्रो या निखिल गडकरी यांच्या इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कंपनीचे एक कोटी 87 लाख 16821 शेअर्स हे चैतन्य कन्स्रक्शन्स अँड बिल्डर्स नावाच्या कंपनीने मे 2025 ला 20.50 रुपयांना विकत घेतले होते. 28 ऑगस्टला त्याची किंमत 701 रुपये इतकी झाली ही कंपनी सारंग गडकरी यांची आहे असं अंजली दमानी यांनी म्हटलं होतं त्यामुळेच पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याच्या पॉलिसीचा गडकरी कुटुंबीयांना मोठा फायदा झाल्याचे आरोप आता होत आहेत.

काँग्रेस पक्षानेही यावरून सरकारवरती गंभीर आरोप केलेत काँग्रेस नेते पवन खेरा यांनी 4 सप्टेंबरला एक पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवरती गंभीर आरोप केले एकीकडे सरकारमध्ये बसलेले नितीन गडकरी धोरण बनवतात तर दुसरीकडे त्यांची मुलं पैसे कमवतायत. गेल्या 11 वर्षात कोणतीही योजना वेळेवर पूर्ण झाली नाही पण देशान 2025 च्या अंतिम मुदती आधीच 20% इथेनॉलच टार्गेट अचीव्ह केलं असं काँग्रेस पक्षाने म्हटलंय. एक कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असल्याचा आरोपही अनेकांकडून केला जातोय. आता जर आपण या सगळ्याची क्रोनोलॉजी पाहिली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार इथेनॉल मिक्स पेट्रोलचा महत्त्व देशाला पटवून दिल.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने भारताची कच्च्या तेलाची आयात कमी होईल आणि इथेनॉल उसापासून बनत असल्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं गडकरी म्हणतात. मुळात गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आहेत तर पेट्रोलियम मंत्रालय हरदीप सिंग पुरी यांच्याकडे त्यामुळे टेक्निकली E20 पेट्रोलचा विषय हरदीप सिंग पुरी यांच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो मात्र गडकरी यांनी या विषयावर वारंवार आपलं मत व्यक्त करत देशाला E20 पेट्रोलच महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला याची दुसरी बाजू म्हणजे गडकरी यांचं स्वतःच कुटुंबच इथेनॉलच्या व्यवसायात गुंतलेल आहे.

देशात 20% इथेनॉलची पॉलिसी लागू झाल्यापासून त्यांच्या मुलांच्या कंपन्यांना याचा प्रचंड फायदा झाला असल्याचं बोललं जातय. त्यामुळे या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध असल्याचे आरोप होत आहेत. सध्या तरी देशभरात हा विषय चांगलाच चर्चेत आलाय. केंद्र सरकारने आणलेली E20 पेट्रोलची पॉलिसी या पॉलिसीचा नितीन गडकरींनी केलेला प्रचार आणि त्यांच्या मुलांच्या इथेनॉल प्रोडक्शन कंपन्यांची होत असलेली प्रचंड ग्रोथ या सगळ्यांच कनेक्शन एकमेकांशी असल्याचं आता बोललं जातय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *