18 नोव्हेंबर भाजपने एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यासह, कल्याण, डोंबेवलीत ऑपरेशन लोटस राबवलं भाजपन शिंदे सेनेचे अनेक नगरसेवक आणि कार्यकर्ते फोडत त्यांना पक्षात प्रवेश दिला. या घटनेचे तीव्र पडसाद मुंबईसह राजधानी दिल्ली पर्यंत उमटले. शिंदेच्या मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला तर स्वतः शिंदे तातडीने दिल्लीला जाऊन आले तिथे त्यांनी गृहमंत्री अमित शहां समोर तक्रारींचा पाढा वाचल्याची बातमी आली.
दिल्लीत एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या जवळपास एक तास चर्चा झाली. या चर्चे दरम्यान शहांनी शिंदेची समजूत काढल्याचं सांगितलं गेलं. शिंदेच्या या दौऱ्यानंतर महायुतीतली धुसभूस काहीशी कमी झाली पण शिंदे शहा भेटीन राजकारणात उलटसुलट चर्चांनाही सुरुवात झाली आहे. याआधी जेव्हा जेव्हा शिंदे सेना आणि भाजपमध्ये तणाव निर्माण झाला तेव्हा एकनाथ शिंदे शहांच्या भेटीला गेले आहेत.
प्रत्येक वेळी त्यांनी शहांपुढे भाजप नेट्यांच्या तक्रारी वाचून दाखवल्या. त्यानंतर दोन पक्षातला तणाव कमी व्हायचा यामुळे चर्चा नेहमी होते ती म्हणजे अमित शहा हे एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करतायत. शिंदे आणि फडणवीस यांच्यात तणाव आहे मात्र शहांमुळे युती टिकून आहे असं बोललं जातं पण असं का? अमित शहा हे एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट का करतायत ते शिंदेना सोबत घेऊनच का चालतात यात अमित शहांचा काय फायदा आहे सगळं राजकारण जाणून घेऊया या माहिती मधून…
अमित शहा हे शिंदेना प्रोटेक्ट करतायत यामागचं पहिलं कारण?
अमित शहा हे एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करतायत यामागचं पहिलं कारण म्हणजे पक्षाबाहेर व्यक्तिगत अलायन्स निर्माण करणं सध्या इंडियेचा विचार केला तर भाजप सोबत एकनाथ शिंदे एनएच शिवाय चंद्रबाबू नायडू नितीश कुमार, चिराग पासवान असे साथीदार आहेत. शिंदे सोडले तर या सर्व नेत्यांचे पंतप्रधान मोदींसोबत व्यक्तिगत संबंध आहेत. नितीश कुमार आणि मोदी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र राजकारण करतायत.
नितीश कुमारांना सुशासन बाबू ही उपमा मोदींनीच दिली होती. मधल्या काळात त्यांच्या तणाव निर्माण झाला होता पण आता तो निवडलाय. नितीश कुमारांना परत एनडीए मध्ये आणण्यात मोदींचा रोल मोठा होता. मोदी आणि नितीश कुमार यांच्या ट्युनिंग चांगला असल्यामुळेच आज जेडीयू भाजप सोबत आहे. हीच परिस्थिती चंद्रबाबू नायडू आणि चिराग पासवान यांची आहे. चंद्रबाबू सुद्धा मधल्या काळात एनडीएच्या बाहेर गेले होते. मात्र मोदींच्या प्रयत्नाने ते पुन्हा परत आले. हे सर्व नेते मोदींसोबत चांगले संबंध असल्यामुळे एनडीए मध्ये आहेत. त्यांच्यामुळेच गेल्या निवडणुकीत भाजपला एखादी बहुमत मिळालेलं नसता नाही मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. आता मोदींनी ज्या प्रकारे पक्षाबाहेर आपले व्यक्तिगत साथीदार निर्माण केलेत. तसंच काहीस अमित शहा नाही करायचे.
अमित शहा मोदींनंतर पक्षात स्वतःला दावेदार म्हणून समर आणतायत. मोदींनंतर कोण या प्रश्नाचे उत्तर आपण असू याची काळजी शहा घेत आहेत. अशावेळी त्यांना सुद्धा व्यक्तिगत पातळीवर आपला अंकुश असलेल अलायन्स पार्टनर हवे आहेत. शहांची ही गरज एकनाथ शिंदे भरून काढू शकतात. मोदींनी ज्या प्रकारे नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू यांना सोबत घेऊन पक्षातली आपली ताकद मजबूत केली तसच अमित शहा हे एकनाथ शिंदेना सोबत घेऊन करण्याचा प्रयत्न करतायत.
दुसरीकडे शिंद्यांसाठी सुद्धा आता मोदींपेक्षा अमित शहा अधिक महत्त्वाचे आहेत. शिंदेकडे मोदींचा नाही तर शहांचा नेता म्हणून पाहिलं जातं आता अमित शहांनी शिंदेना प्रोटेक्ट केलं तर भविष्यात जेव्हा शहांना अलायन्सची गरज लागेल तेव्हा शिंदे नक्कीच त्यांच्या सोबत येऊ शकतात. त्यामुळे आपलं भविष्यातल राजकारण सेट करण्यासाठी अमित शहा एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करत असल्याचं दिसतं.
शहांनी शिंदेना सांभाळून घेण्यामागचं दुसरं कारण?
अमित शहांनी शिंदेना सांभाळून घेण्यामागचं दुसरं कारण म्हणजे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांवर अंकुश ठेवणं. फडणवीस राजकारणात लंबी रेसचा घोडा मांडले जातात. ते सध्या राज्याच्या राजकारणात असले तरी त्यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा लपलेली नाही. मध्यंतरी त्यांच नाव भाजपच्या अध्यक्ष पदासाठी चर्चेत आलं होतं. मोदींनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यती फडणविसांच नाव कायमच घेतलं जातं.
फडणवीस यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे त्यांच्या पाठीशी संघाची ताकद आहे. त्यामुळे संघ परिवाराकडून मोदीनंतर फडणवीस यांना समोर केल जाऊ शकतं अशा परिस्थितीत अमित शहांची अडचण होऊ शकते. त्यामुळे आता शहा फडणविसांच्या राजकीय विरोधकांना बळ देत असल्याचं दिसते. अमित शहानी फडणविसांचे विरोधक राहिलेल्या विनोद तावडेंना पुन्हा बळ देऊन त्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठं केलं आता शिंदेचा वापर ते राज्याच्या राजकारणात करू शकतात असं बोललं जातय.
सध्या महाराष्ट्र भाजपवर फडणविसांचा एखाती अंकुश आहे. राज्यात भाजपमध्ये त्यांना कुणाकडूनही चॅलेंज नाही. मात्र एकनाथ शिंदे फडणविसांना चॅलेंज नक्कीच करू शकतात. त्यामुळे शिंदेना बळ मिळालं तर फडणविसांना राज्याच्या राजकारणातच गुंतून राहावं लागतं. अशा परिस्थितीत राष्ट्रीय पातळीवर शहांचा मार्ग मोकळा होतो. पंतप्रधान बनण्याआधी मोदी हे 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या काळात मोदींकडे गुजरातचा एखादी कारभार होता. त्यांना त्याकाळी राज्यात पक्षांतर्गत कोणीही विरोधक नव्हतं त्यामुळे त्यांची खुर्ची सेफ होती. यामुळेच मोदी राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान पदासाठी दावा करू शकले.
आता फडणविसांची वाटचाल ही त्याच दिशेने सुरू आहे. त्यांनी सुद्धा आपल्या पक्षांतर्गत विरोधक संपवल्यात. त्यामुळे भविष्यात फडणविसांना रोखण्याची वेळ आली तर अशा वेळी शिंदे अमित शहांच्या कामाला येऊ शकतात. शिंदेच्या माध्यमातून शहा हे फडणविसांना सत्तेतून चेकमेट करू शकतात. त्यामुळेही शहा एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करत असल्याचं दिसते.
शहांनी शिंदेना प्रोटेक्शन देण्यामागच तिसरं कारण?
अमित शहांनी शिंदेना प्रोटेक्शन देण्यामागच तिसरं कारण म्हणजे त्यांची स्वतःची चाणक्य ही इमेज इस्टब्लिश करणं 2022 मध्ये एकनाथ शिंदेनी शिवसेनेत बंड केलं या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप शिंदेची युती सत्तेत आली. शिंदेच्या या बंडाचे मास्टरमाइंड म्हणून अमित शहा यांच्याकडेच पाहिलं जातं. शहांच्या नेतृत्वाखालीच भाजपन राज्यात ऑपरेशन लोटस राबवलं आणि पुन्हा सत्ता मिळवली. महाराष्ट्रसारखं महत्त्वाचं राज्य भाजपकडे आणण्यात अमित शहांचा रोल मोठा होता हे कोणीही नाकारत नाही. बरं फक्त शिंदेच नाही तर शहांनी मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य सिंधिया, आसाममध्ये हेमंत बिस्का शर्मा आणि बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासोबतही हेच केलं.
सिंधिया काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. त्यामुळे मध्यप्रदेशात काँग्रेसच सरकार पडलं आणि भाजपची सत्ता आली. आसाममध्ये हेमंत बिसवा सर्बा काँग्रेससोडून भाजपमध्ये आले त्यामुळे तिथेही भाजपची सत्ता आली. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी एकेकाळी ममता बॅनर्जींच्या अत्यंत जवळचे होते. त्यांना भाजपमध्ये घेऊन बंगालमध्ये सत्तेत येण्याच्या भाजपचा प्लॅन आहे.
या सगळ्यांमागे अमित शहांची भूमिका मोठी राहिली आहे. यामुळे शहांच वजन पक्षात वाढलं आणि त्यांची राजकारणातली चाणक्य ही इमेज इस्टॅब्लिश झाली. मात्र आता शिंदे भाजपवर नाराज होऊन युतीतून बाहेर पडले आणि यामुळे राज्यातल युती सरकार संकटात आलं तर याचा परिणाम शहांच्या या इमेजवर होऊ शकतो. शिंदे पलटले तर शहांची चाणक्य नीती फेल झाली असा मेसेज देशभरात जाऊ शकतो.
हे घडू नये यासाठी शिंदे युतीत कायम राहणं अमित शहांसाठी गरजेच आहे. त्यामुळेच अमित शहा हे एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करतायेत असं दिसतय. एकूणच काय तर एकनाथ शिंदेना प्रोटेक्ट करणं हे अमित शहांसाठी राजकीय दृष्ट्या गरजेचं बनलय. शहांना त्यांचा लॉंग टर्म राजकारण सेट करायच असेल तर त्यासाठी शिंदे सोबत असणं गरजेच आहे. त्यामुळेच ते शिंदेना प्रोटेक्ट करतायत असं म्हटलं जातं.

