HSRP Number Plate: जुन्या गाडीची नंबर प्लेट बदलली नाही तर दंड, HSRP बाबतचे नियम काय ?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

गेल्या काही वर्षांपासून इनफॅक्ट 2019 पासून गाडी घेतल्यानंतर शोरूम मधूनच आपल्याला त्या गाडीला नंबर प्लेट लावून मिळते ही नंबर प्लेट आधीच्या नंबर प्लेट पेक्षा वेगळी आहे बघा म्हणजे त्याच्यावरती एम्बॉसिंग केलेला आपल्याला दिसून येतं वेगवेगळे फिचर सुद्धा त्या नंबर प्लेट मध्ये आहेतच याच्या अगोदर काय होत होतं तर नंबर मिळाला की जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने त्या गाडीला नंबर प्लेट बसवायचा कोणी मराठी मधून नंबर टाकायचं कोणी फॅन्सी पद्धतीने ते नंबर टाकत होतं मग अशा वेळेस होत काय होतं तर गुन्हा जर का घडला.

उदाहरण जर का द्यायचं झालं जर का गाडीची चोरी झाली तर अशा वेळेस ती गाडी शोधणं अवघड होत होतं किंवा त्या गाडीचा वापर एखादा गुन्हा करण्यासाठी झालेला असेल तर अशा वेळेस सुद्धा तपास कार्यामध्ये अडथळे निर्माण व्हायचे आणि त्याच्यामुळे या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वच नव्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लागू करण्यात आलेली आहे पण जुन्या वाहनांना सुद्धा आता हे एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट याची सक्ती केली जाणार आहे.

ज्यांच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट म्हणजेच एचएसआरपी नंबर प्लेट नसेल त्यांना 31 डिसेंबर नंतर दंडात्मक कारवाईला सामोर जावं लागणार आहे आणि तसं पत्रकच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने अर्थात आरटीओ न काढलेला आहे आज आपण माहिती घेऊयात ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी आहे काय जर का ती नसेल तुमच्या गाडीला तर नेमक्या कोणत्या कारवाईला सामोर जावं लागेल आणि जर का तुम्हाला तुमच्या गाडीला ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवायची असेल तर नेमकी काय प्रोसिजर?

एचएसआरपी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी आहे काय?

सर्वप्रथम आपण हे एच एस आरपी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी आहे काय ते जाणून घेऊयात आता ही एक वेहीकलची लायसन्स प्लेट आहे ज्याच्यामध्ये छेडछाड करता येत नाही कोणताही बदल करता येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं डुप्लिकेट सुद्धा करता येत नाही आता या एचएसआरपीमध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो.

एक होलोग्राम असतो आणि रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा असतो ह्याच्यावरती 3d हॉलोग्राम स्टिकर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल नंबर प्लेटच्या डाव्या बाजूला तुम्हाला तो थ्रीडी हॉलोग्राम स्टिकर दिसेल त्याच्यावरती तुमच्या वाहनाचा इंजिन क्रमांक तुमच्या वाहनाचा चासीन क्रमांक हे सर्व काही दिलेलं असतं मगाशी जसं म्हटलं तसं या प्लेटमध्ये बदल करता येत नाही त्याचा आकार सुद्धा बदलता येत नाही याच्यावरती बारकोड असतो आरटीओ किंवा इतर कोणत्याही वाहतूक पोलिसांनी जर का स्कॅन केलं तर अशा वेळेस त्या वाहनाची संपूर्ण माहिती मिळत असते आणि त्याच्यामुळे ही जी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आहे ही फार महत्त्वाची आहे.

नंबर प्लेटची वैशिष्ट्य काय आहेत?

आता या नंबर प्लेटची वैशिष्ट्य काय आहेत तर ही एक ॲल्युमिनियम प्लेट आहे अत्युच्च दर्जाच्या ॲल्युमिनियम प्लेट पासून हे बनवलेला आहे ज्याच्यामुळे त्या अधिक टिकाऊ आहेत आणि सुरक्षित सुद्धा आहेत त्याच्यावरती युनिक सिरीयल नंबर आहे युनिक कोड आहे हॉलोग्राम सुद्धा दिलेला आहे ज्याच्यामुळे डुप्लिकेट करणं हे अवघड आहे हॉलोग्राम स्टिकर प्लेट वरती अशोक स्तंभ असलेला होलोग्राम सुद्धा आहे. जो क्रोमियम वरती आधारित आहे बनावट त्याची करणं हे अशक्य आहे.

याच्यावरती आर एफ आयडी म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी डिकोडरचा सुद्धा टॅग बसवलेला आहे ज्याच्यामुळे त्या वाहनाची ओळख रिमोट द्वारे करणं सुद्धा शक्य होतं निळ्या रंगामध्ये इंग्रजी भाषेमध्ये आयएनडी दिलेला आहे मगाशी जसं म्हणलं अशोक चक्राचा हॉलोग्राम आहे आणि एम्बॉसिंग करून ही नंबर प्लेट बनवलेली आहे लेझर कोडिंग सुद्धा केलेलं आहे युनिक लेझर कोड या ठिकाणी दिलेला आहे आणि डुप्लिकेट याचं कोणत्याही पद्धतीने होऊ शकत नाही आणि ज्याच्यामुळे चोरी आणि इतर गैरप्रकार जे आहेत हे टाळता येऊ शकतात

कोणत्या वाहनांना HSRP आवश्यक आहे?

2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना HSRP बसवणे आवश्यक आहे.

जुन्या नंबर प्लेट मान्य नाहीत.

HSRP बसविल्याशिवाय वाहन चालवले तर कारवाई होणार.

अंतिम मुदत काय आहे?

सरकारने नव्याने अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025 केली आहे.

ही पाचवी आणि अंतिम मुदतवाढ असल्याचे राज्य परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

31 डिसेंबर 2025 नंतर काय होणार?

या तारखेनंतर आणखी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.

वायुवेग पथकाकडून थेट कारवाई केली जाईल.

वाहन थांबवून जागेवरच दंड आकारला जाईल.

HSRP नंबर प्लेट नसेल तर किती दंड?

अर्ज केलेला आहे पण प्लेट बसवलेली नाही रुपये दंड 1,000

अर्जही केलेला नाही आणि HSRP प्लेटही नाही दंड 10,000 रुपये

वाहनधारकांनी काय करावे?

अधिकृत वेबसाईटवर किंवा RTO अधिकृत विक्रेत्याकडे त्वरित HSRP साठी अर्ज करा.

दिलेल्या तारखेला वाहनावर प्लेट बसवून घ्या.

शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका अन्यथा मोठा दंड टाळता येणार नाही.

31 डिसेंबर 2025 पूर्वी HSRP बसवणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत प्रक्रिया पूर्ण केल्यास दंड आणि कारवाईपासून वाचू शकता.

नंबर प्लेट का महत्त्वाची आहे?

आता ही नंबर प्लेट का महत्त्वाची आहे याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे वाहन चोरी जी आहे ती रोखता येऊ शकते आर एफआयडी टॅग असल्यामुळे त्या वाहनांची ओळख पटवणं हे सोपं जातं त्याचं ट्रॅकिंग सुद्धा करता येतं आता वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आपण खूप साऱ्या मूवीज मध्ये बघितलेलं असेल की नंबर प्लेट बदलली जायची नंबर प्लेट दुसरी बसवली जायची किंवा काहीतरी त्याच्यामध्ये छेडछाड केली जायची आता हे असे प्रकार येणाऱ्या काळामध्ये गुन्हेगारांना करता येणार नाहीयेत आणि त्याच्यामुळे गुन्हेगारीला आळा सुद्धा बसू शकतो कायदेशीर दृष्ट्या सुद्धा ही बंधनकारक केलेली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *