गोव्यातील क्लब मध्ये भीषण आग! 25 जणांचा होरपळून मृत्यू, मध्यरात्री नेमकं घडलं काय?

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

रविवारी मध्यरात्री साधारण बारा सव्वाबारा वाजण्याच्या आसपास गोव्यातल्या पोलीस कंट्रोल रूमला एक फोन आला फोन होता नॉर्थ गोव्यातल्या एका नाईट क्लब मध्ये आग लागल्याची माहिती देणारा माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दलाचे जवान अम्बुलन्स घेऊन घटनास्थळी पोहोचले पण क्लब मधल दृश्य अंगावर काटा आणणार होतं क्लब मधून धुराचे लोड बाहेर येत होते आणि आतमध्ये मृतदेहांचा खच पडला होता.

क्लबमध्ये आग लागून एक दोन नाही तर तब्बल 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं तात्काळ बचावकारय सुरू झालं पण तोवर वेळ निघून गेली होती. आग इतकी प्रचंड होती की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालं सुद्धा तसच लेटेस्ट अपडेट्स नुसार गोळ्याच्या क्लब मध्ये लागलेल्या या आगीत आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला असून जखमींचा आकडा सहाच्या वर पोहोचला आहे.

प्राथमिक तपासामध्ये ही आग सिलेंडरचा स्पोट झाल्यामुळे लागल्याची माहिती देण्यात येतीय. या घटनेनंतर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून दोषींवर कारवाई करणार असल्याचं म्हणलंय. पण गोव्याच्या क्लबमध्ये मध्यरात्री नेमकं घडलं काय आग कशी लागली बाहेर न पडणं बेसमेंटमध्ये जाणं 25 जणांच्या जीवावर कसं बेतलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या माहितीमधून…

मध्यरात्री नेमकं घडलं काय?

वर्क बाय रोमियो लेन नॉर्थ गोव्याच्या अरपोरा भागातला नाईट क्लब फेमस आणि गर्दी खेचणारा खास करून नॉर्थ गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच हक्काच ठिकाण शनिवारी रात्री 11 वाजता या क्लब मध्ये प्रचंड गर्दी होती सॅटरडे नाईट होती त्यातच या क्लब मध्ये परफॉर्म करण्यासा साठी एक डीजे आणि डान्सर सुद्धा येणार होते. त्यामुळे साहजिकच गर्दीचा आकडा मोठा होता. 12:00 वाजून गेले क्लबमध्ये म्युझिक सुरू होतं लोक आनंद घेत होती आणि अचानक मोठा आवाज झाला. क्लबच्या बाहेर थांबलेल्या सिक्युरिटी गार्डला सुरुवातीला वाटलं की टायर फुटल्याचा आवाज आहे पण पुढच्या काही क्षणात क्लब मधून ओरडण्याचे आवाज येऊ लागले.

सोबतच आगीचे मोठे लोट सुद्धा उसळले. प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या माहितीनुसार ही आग सिलेंडरचा स्पोट झाल्यामुळे लागली होती. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार हा स्पोट क्लबच्या किचनच्या भागात झाला त्यानंतर काही सेकंदांमध्ये आगीने सगळ्या किचनला व्यापलं आगीचा लोळ एवढा मोठा होता की काही क्षणात क्लबने पेट घेतला आणि त्यातही बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात धूर जमा झाला क्लबमध्ये लोकांची गर्दी होती तशीच गर्दी बेसमेंटमध्ये होती कारण बरेच कर्मचारी बेसमेंटमध्ये होते त्यात आगीचे लोळ जसे पसरले तशी क्लबच्या वरच्या भागात असलेल्या लोकांमध्ये भीतीची लाट तयार झाली.

घाबरलेल्या लोकांनी बाहेर पळायच्या ऐवजी बेसमेंटच्या दिशेने धाव घेतली साहजिकच आधीच बेसमेंटमध्ये कर्मचाऱ्यांची गर्दी असताना आणखी गर्दी वाढली धुराचे लोट पसरले होतेच त्यामुळे 22 जणांचा मृत्यू हा गुदमरून झाला तर जिन्याच्या जवळ मृतदेह सापडलेले तीन जण आगीत खुरपळले होते.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तातडीने घटनास्थळी पोहचले…

मध्यरात्री ही दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी जात क्लबची पाहणी केली आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. आजचा दिवस गोव्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खरच वेदनादायी आहे. राज्याच्या पर्यटन इतिहासातल्या सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक अशी ही घटना आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. मृतांच्या नातेवायकांप्रती कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. आग लागलेल्या ठिकाणची पाहणी केली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीत आगीच नेमकं कारण आणि फायर सेफ्टीचे नियम पाळले गेले होते की नाही याची तपासणी होईल. जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलय.

या सगळ्यात क्लब मधल्या आणखी प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय घडलं होतं याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यानुसार या क्लबमध्ये शनिवारी रात्री डान्स फ्लोरवर 100 च्या आसपास लोक होते. आग पहिल्या फ्लोरवर असलेल्या किचन एरियामध्ये स्पोट झाल्याने लागली. क्लबच्या आतल्या बाजूला झाडांची पानं आणि फांद्या वापरून सजावट केली होती. त्यामुळे आग प्रचंड वेगाने पसरली. अनेक लोकांना बाहेर पडता आलं नाही तेव्हा ते बेसमेंटमध्ये गेले. तिथे आधीच क्लबचे कर्मचारी होते. तिथली गर्दी वाढली आणि लोकांचा गुदमरून मृत्यू झाला.

अग्निशमन दलाच्या गाड्यांना क्लबपर्यंत जाण्यात अडथळे का आले?

क्लबच्या बाहेर पडल्यावर काही क्षणात दिसलं की सगळा क्लब आगीने घेरला गेला आहे. अगदी हवेत उंचावर आगीचे लोळ पसरले होते. आग लागल्यावर या घटनेची माहिती लगेचच पोलिसांना दिली गेली. अग्निशमन दलाला सुद्धा पाचारण करण्यात आलं पण बचाव कार्यात मोठे अडथळे आले. झालं असं की घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुढच्या काही मिनिटात अग्निशमन दलाच्या गाड्या तिथे पोहोचल्या पण त्यांना क्लबपर्यंत जाण्यात अडथळे आले.

प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार बर्क बाय रोमियो लेन हा नाईट क्लब अरपोरा नदीच्या बॅक वॉटर जवळ आहे आणि याचे एंट्री आणि एक्झिटचे पॉईंट प्रचंड छोटे आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या क्लब पर्यंत थेट पोहोचूच शकल्या नाहीत आणि त्यांना 400 मीटर लांब आपले पाण्याचे टँकर उभे करावे लागले. रस्ता प्रचंड छोटा असल्याने बचाव कार्यात अडथळे आलेच आणि सोबतच आगेवर नियंत्रण मिळवण्यातही प्रचंड वेळ गेला.

सरपंच रोशन रेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार…

अरपोरा नागोवा पंचायतीचे सरपंच रोशन रेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नाईट क्लब सौरव लुथरा चालवत होता. लुथराचे त्याच्या पार्टनर सोबत वाद होते. या वादातून या दोघांनी एकमेकांच्या विरोधात पंचायतीकडे तक्रारी सुद्धा दिल्या होत्या. त्यानंतर पंचायतीने जेव्हा या जागेची तपासणी केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या क्लबच्या मालकांकडे क्लब उभा राहायची परवानगीच नव्हती.

त्यामुळे क्लबच पाडकाम करण्याची नोटीस पंचायतीकडून देण्यात आली होती पण अधिकाऱ्यांनी या तोडकामाला स्थगिती दिली. सोबतच हा क्लब ज्या जागेवर बांधण्यात आला आहे ती जागा आधी मिठाघराची होती. त्यामुळे गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीनेही क्लब पाडण्याची नोटीस बजावली होती. पण त्यानंतर क्लबने या विरोधात अपील केलं आणि बांधकाम पाडण्याच्या नोटीसला स्थगिती मिळवली आणि क्लब सुरूच राहिला. जर वेळीच क्लबवर कारवाई झाली असती तर ही दुर्घटना घडली नसती आणि 25 लोकांचा जीवही वाचला असता अशी चर्चा आता गोव्यात सुरू आहे

भाजपचे स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलय गोवा हे कायम एक सेफ टुरिस्ट ठिकाण मानल गेलय पण अशा घटना अतिशय चिंताजनक आहेत भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या दुर्घटना टाळण्यासाठी राज्यातल्या सर्व क्लब आणि रेस्टॉरंटच कंपलसरी सेफ्टी ऑडिट केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्याशी फोनवरून घटनेबाबत चर्चा केली.

मॅनेजरला पोलिसांनी अटक केले तसेच मालकाविरुद्ध अटक वॉरंट..

पीएमओने मृतांच्या नातेवायकांना दोन लाखांची आणि जखमींना 50 हजारांची मदतही जाहीर केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणात आता कारवाईला सुरुवात झाली आहे. नाईट क्लबच्या मॅनेजरला पोलिसांनी अटक केली असून क्लबच्या मालकाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्याची घटना दुर्दैवी आहेच पण आता आम्ही त्या प्रत्येक क्लबला हॉटेलला नोटीस पाठवणार आहोत.

जे नियमांचे उल्लंघन करत आहेत आपल्याला आता जास्त काळजी घ्यावी लागेल तर मायकल लोबो यांनी सांगितलं की लोकल पंचायती आता सगळ्या नाईट क्लबच सेफ्टी ऑडिट करतील जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाहीत कलंगूट पंचायत सोमवारीच सगळ्या नाईट क्लबला नोटिसेस पाठवतील ज्यामध्ये त्यांना फायर परमिशन घेण्याचे निर्देश दिले जातील अपरोरामध्ये घडलेल्या घटनेची पूर्ण चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई सुद्धा केली जाईल मुळात डिसेंबर महिना हा गोव्याच्या पर्यटनाचा पीक सीजन असतो या महिन्यात गोव्यात प्रचंड प्रचंड गर्दी असते पण या महिन्याच्या सुरुवातीलाच घडलेल्या आगेची घटना त्यात 25 जणांचा जीव जाणं याचा धक्का सगळ्या गोव्याला बसला आहे आणि परवानगी न घेता केलेल बांधकाम बेकायदेशीर बांधकाम यांचा प्रश्न सुद्धा ऐराणीवर आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *