विरोध पर करोगे मात, डरने की नही बात; तुम्हारे पीछे है एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मालवणच्या प्रचार सभेत निलेश राणेना उद्देशून केलेलं हे वक्तव्य आता मालवणमध्ये निलेश राणेच्या विरोधात कोण होतं तर भाजप शिंदे मालवण मध्ये गेले सभा घेतली पूर्ण ताकद लावली निलेश राणेनी मालवण नगरपरिषद एक हाती जिंकली फक्त मालवण मध्येच नाही तर सटाणा, सांगोला, पालघर, ढहाणू इथे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला शह दिला तर महाडमध्ये थेट तटकरेंना पराभवाचा धक्का दिला.
शिंदेनी एकट्याने 135 च्या आसपास नगराध्यक्ष पदाच्या जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या 54 च्या आसपास जागांवर बाजी मारत आपला स्ट्राईक रेट तगडा ठेवलाय पण शिंदेनी दोन नंबरचा पक्ष होणं कसं जमवलं शिंदेनी भाजपाला मात कशी दिली? शिंदेनी कोकण कसं मारलं? शिंदे बॉस कसे ठरले?
शिंदे बॉस ठरण्याच पहिलं कारण;
शिंदे बॉस ठरण्याच पहिलं कारण भाजपचा विरोध म्हणून जास्त जागा लढवणं भाजपने आपल्या ताकदीच्या जोरावर ठीक ठिकाणी एकट्याने लढण्यासाठी फिल्डिंग लावली होती. जिथे शिंदेची ताकद आहे तिथेही भाजप स्वबळावरच ठांब होती पण जिथे भाजपच्या तुलनेत शिंदेच्या शिवसेनेची ताकद जास्त आहे तिथे मात्र भाजपने शिंदेच्या शिवसेनेशी जुळवून घेतलं रत्नागिरीमध्ये सामंत बंधूंमुळे शिंदेची शिवसेना स्ट्रॉंग आहे. तिथे भाजप आणि सेना एकत्र लढली पण तळ कोकणात राण्यांचा आणि भाजपचा जोर बघता शिंदेच्या शिवसेनेची युतीची तयारी असूनही भाजप स्वबळावर ठांब राहिली.
काही ठिकाणी शिंदेच्या प्रस्थापित नेत्यांना भाजपने घेरायला सुरुवात केली. साहजिकच भाजपचा शिंदेच्या शिवसेनेला असलेला हा विरोध शिंदेना कॉर्नर करणारा होता पण शिंदे मागे सरकले नाहीत. आपल्या नेत्यांना ताकद देत राहिले. भाजप वरच ठरेल. शिवसेनेला प्लेसच मिळणार नाही अशी शक्यता असताना शिंदेनी 135 जागांवर उमेदवार उभे केले आणि भाजपचा विरोध पहिल्याच फटक्यात मोडून काढला भाजपच्या विरोधात तर विरोधात पण शिंदे लढले त्यांनी चांगला स्ट्राईक रेट टिकवला भाजपने सेंचुरी मारली तर शिंदेनी हाफ सेंचुरी क्रॉस केली अर्थात काही ठिकाणी शिंदे आणि भाजप एकत्र लढले पण निकाल समोर आल्यानंतर काही लोकांना वाटतं शिवसेना फक्त ठाणे आणि मुंबई पुरतीच मर्यादित आहे पण शिवसेना महाराष्ट्रभर पोहोचली आहे याची जाण या निवडणुकीने करून दिली आहे. असं म्हणत शिंदेनी सूचक मेसेज सुद्धा दिला.
शिंदे बॉस ठरण्याच दुसरं कारण:
शिंदे बॉस ठरण्याच दुसरं कारण त्यांनी नेत्यांना दिलेलं बळ कोकणात राणे, प्लस रवींद्र चव्हाण हे समीकरण भक्कम झालं होतं त्यामुळे शिंदेना स्पेस किती मिळेल हा मोठा प्रश्न होता पण शिंदेनी इथं निलेश राणेच्या मागे सगळी ताकद उभी केली. निलेश राणेना इतकं स्वातंत्र्य दिलं की दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपच्या विरोधात लढल्या. सांगोल्यात शहाजी बापूंचा झालेला पराभव त्यांच्या ऑफिसवर इलेक्शनच्या तोंडावर पडलेली धाड आणि महत्त्वाचं म्हणजे जयकुमार गोरे यांनी शहाजी बापूंच्या विरोधकांना भाजपमध्ये घेत दिलेली ताकद यामुळे शहाजी बापू पूर्णपणे घेरले गेले होते शिंदेच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले असले तरी इतर 17 जागांसाठी फाईट होती पण शहाजी बापूंच्या मागे एकनाथ शिंदे उभे राहिले 17 पैकी 17 जागा शिंदेच्या शिवसेनेच्या निवडून आल्या भाजपच्या विरोधात आपले नेते लढत असले तरी डरने की नाही बात, तुम्हारे पीछे है एकनाथ; शिंदेनी शब्दशहा खरं करून दाखवलं.
निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण आणि शहाजी बापू पाटील विरुद्ध जयकुमार गोरे अशा लढती सुरू असल्याने शिंदेचे नेते फडणविसांच्या खास नेत्यांशी लढत होते पण तरी शिंदेनी आपल्या नेत्यांची रसत थांबवली नाही ते स्वतः या नेत्यांना बळ द्यायला मैदानात उतरले आणि निकालात बॉस ठरले.
शिंदे बॉस ठरण्याच तिसरं कारण;
शिंदे बॉस ठरण्याच तिसरं कारण स्वतः ग्राउंडवर उतरणं नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे निकाल हाती लागल्यावर आकड्यांमधून थेड दिसून येणार चित्र म्हणजे महाविकास आघाडी मधल्या तिन्ही पक्षांना मिळून जेवढ्या जागा मिळाल्या आहेत त्यापेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने मिळवल्या आहेत त्या निवडणुकांच्या प्रचारात मवियाचे नेते कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता पण एकनाथ शिंदेच्या बाबतीत हाच प्रश्न शिंदे कुठे कुठे आहेत असा विचारला गेला कारण एकनाथ शिंदेंनी 22 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 10 दिवसांच्या काळात 53 सभा घेतल्या राज्यभर झालेल्या त्यांच्या या सभांमध्ये त्यांनी एक वेगळाच पॅटर्न चर्चेत आणला फोन करण्याचा बर वर सभेत लोकांच्या समस्या ऐकून त्यांनी थेट संबंधित मंत्री किंवा नेत्यांना फोन केले.
त्यांच्याशी होत असलेलं बोलणं थेट लोकांना ऐकवलं याची स्थानिक पातळीवर बरीच चर्चा झाली. त्यात भाजप स्ट्रॉंग असलेल्या ठिकाणी सुद्धा शिंदे गेले. त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्या त्या भागातल्या मोठ्या नेत्यांसोबत दिसले आणि सूचक मेसेज जाईल याची काळजी घेतली. थोडक्यात शिंदे महाराष्ट्रभर फिरले. त्यातही ग्रामीण भागांमध्ये शिंदेचा प्रेझेन्स तिथे लाडकी बहिणी योजनेवर दिलेला भर आणि प्रचाराची सगळी लाईन ठाकरे मविया किंवा महायुतीतल्या समोर असलेल्या पक्षांवर न ठेवता स्वतःच्या ताकदीवर ठेवणं शिंदेच्या पत्त्यावर पडताना दिसून आलय.
मालवण, सांगोला, सटाणा, पालघर, ढहाणू अशा भाजपची थेट लढाई असणाऱ्या जागांवर शिंदे गेले तिथे सभा घेतल्या वन मॅन शो म्हणत शिंदेनी आतापर्यंत शिवसेनेने कधीच लढवल्या नव्हत्या इतक्या जागा लढवल्या आणि 54 जागा जिंकून आणण्यासाठी स्वतः दुराळा उडवला गुलाल खांद्यावर पडेपर्यंत.
शिंदे बॉस ठरण्याच चौथं कारण;
शिंदे बॉस ठरण्याच चौथं कारण बालेकिल्ला राखत विरोधी नेत्यांना दिलेला मेसेज लोकसभेच्या जागा वाटपाच्या तिढ्यात शिंदेकडून रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जागा निसटल्या तेव्हा शिंदेनी कोकणातून धनुष्यबाण घालवल्याची चर्चा झाली त्यानंतर विधानसभेला त्यांना यश मिळालं पण भाजपन फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती त्यात आत्ताच्या निवडणुकांमध्ये भाजपने राष्ट्रवादी सोबत हात मिळवला पण शिंदेपासून अंतर राखलं कोकणात भाजपची कमा मान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हातात आहे. चव्हाण आणि शिंदे यांच्यातला सर्वश्रुत संघर्ष या निमित्ताने पुन्हा उफाळून आला पण शिंदेनी कोकणात सत्ता मिळवली.
कणकवली आणि मालवणमध्ये शिंदे वरसट ठरले. खेड, चिपळून, रत्नागिरी, लांजा, गुहागर इथे शिंदेनी बाजे मारले. तर रायगड जिल्ह्यात महाडमध्ये शिंदेच नाणं खणखणीत वाजलं परत गोगावलेंनी सुनील तटकर यांच्या एक हाती वर्चस्वाला धक्का देत नगराध्यक्ष पद शिंदेंच्या शिवसेनेकडे खेचलं तर श्रीवर्धन मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्षपदी निवडून आले पण निकालानंतर लगेचच ते भरत गोगावले यांच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
