रील स्क्रॉल करत असताना, फेसबुक बघत असताना किंवा अगदी बातम्या बघताना सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ दिसला असेल मुंबईच्या लोकल मधला व्हिडिओ यामध्ये एक पुरुष लोकलच्या डब्यात दारापाशी निवांत थांबलेला दिसत होता पण डब्यात सगळीकडे महिलाच होत्या हा लेडीज डबा होता पण हा व्हिडिओ मध्येच कट झाला आणि त्यानंतर पुढचं दृश्य दिसायला लागलं काही महिला आणि पुरुष या लेडीज डब्यात शिरलेल्या पुरुषाला मारत होते अगदी लाता घालत होते शिव्या देत होते पण या पुरुषाने केलं काय होतं तर त्याने याच चालत्या त्या लोकल मधून एका तरुणीला बाहेर ढकलून दिलं होतं का तर तो लेडीज डब्यात चढला म्हणून या तरुणीने त्याला हटकलेलं या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली अनेक प्रश्नही पडले पण नेमकं घडलं काय या तरुणीला ढकलणारा शेख अख्तर नवाज आहे कोण आणि या तरुणी सोबत पुढे काय घडलं पाहूयात…
प्रकरण केव्हा आणि कस घडलं?
श्वेता महाडीक पनवेलच्या उसरली मध्ये राहणारी 18 वर्षांची तरुणी खारगर नगरच्या कॉलेजमध्ये श्वेता शिकायला आहे. कॉलेजला जाण्यासाठी 16 डिसेंबरच्या सकाळी ती घरातून बाहेर पडली. त्यानंतर 7:59 च्या पनवेल सीएसएमटी लोकल मध्ये ती पनवेल स्टेशन वरून चढली. लेडीज डब्यात श्वेता आणि तिची मैत्रीण चढली पण त्याच वेळी या लेडीज डब्यात साधारण 50 वर्षांचा शेख अख्तर नवाज सुद्धा चढला. हा लेडीज डबा आहे इथून खाली उतरा दुसऱ्या डब्यात चढा अशा लेडीज डब्यातल्या महिला नवाजला सांगायला लागल्या पण नवाजने त्यांचं काहीही ऐकलं नाही अशातच लोकल सुटली तरीही नवाज उतरलेला नाही हे बघून संतापलेल्या महिलांनी त्याला हटकलं वादाला सुरुवात झाली श्वेताने सुद्धा नवाजला लेडीज डब्यात चढण्याबद्दल आणि सांगून सुद्धा खाली न उतरण्याबद्दल हटकलं.
तेव्हा श्वेता लोकलच्या दरवाजाजवळ असलेल्या पोलपाशी थांबली होती वाद वाढला आणि आक्रमक झालेल्या नवाजने श्वेताला पाठीमागून धक्का देत चालत्या लोकल मधून खाली ढकलून दिलं त्यानंतर लोकल मधल्या महिलांनी नवाजला घेरलं त्याला मारहाण करायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला डब्यातल्या काही महिलांनी हेल्पलाईनला फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली त्यामुळे लागलीच यंत्रणा ऍक्टिव्ह झाल्या.
काही वेळातच खानदेश्वर स्टेशन आलं तिथे जीआरपी अर्थात गव्हर्मेंट रेल्वे पोलिसांचे अधिकारी पोहोचले त्यांनी शेख अखतर नवाजला अटक केली तेव्हा लोकांची बरीच गर्दी जमा झाली होती. जमलेल्या महिलांनी नवाजवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या सगळ्यात एक प्रश्न होता तो म्हणजे श्वेताच काय झालं पनवेल जीआरपी च सीनियर इन्सपेक्टर विजय तायडे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार श्वेता महाडीक पनवेल स्टेशन पासून दीड किलोमीटर अंतरावर पडली होती.
त्यामुळे जीआरपी ची टीम त्या स्पॉटवर पोहोचण्यासाठी रेल्वे ट्रॅक जवळून चालत गेली. पण ही टीम स्पॉटवर पोहोचली तरी त्यांना श्वेता दिसून आली नाही. त्यामुळे या टीमने प्रवाशांकडे श्वेता कुठे गेली याबद्दल विचारणा केली. तेव्हा टीमला समजलं की श्वेताला काही प्रवाशांच्या आणि स्थानिकांच्या मदतीने प्रायव्हेट हॉस्पिटलला नेण्यात आले.
नवाजच्या चौकशीत नेमकं काय समोर आलय?
त्यानंतर जीआरपी टीम मधले एक अधिकारी हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे त्यांना श्वेता महाडीक उपचार घेताना दिसली. महिलांच्या डब्यात का चढलात एवढ्याच गोष्टीवरून हटकल्यावर चालत्या ट्रेन मधून तरुणीला ढकलून देणारा शेख अख्तर नवाजच्या चौकशीत नेमकं काय समोर आलय तर तो मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे. खानदेश्वर स्टेशन वरून नवाजला ताब्यात घेतल्यानंतर श्वेताला खाली ढकलून देत तिचा जीव धोक्यात घातल्यामुळे बीएनएस च कलम 109 कुणाचा प्रयत्न करणे या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इंडियन रेल्वेज ऍक्ट अंतर्गत योग्य तिकीट नसताना प्रवास करणं महिलांसाठी आरक्षित असलेल्या डब्यात चढणं या कलमांची डिशन करण्यात आली आहे. पोलिसांनी जेव्हा शेख अखतर नवाजला ताब्यात घेतलं तेव्हा तो मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचं त्यांना आढळलं त्यामुळे त्याला तपासणीसाठी जे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की नवाज हा मनोरुग्ण आहे.
नवाजने पोलिसांच्या चौकशीत दावा केलाय की तो बेघर असून खार बंद्रा रोड परिसरात तो रस्त्यावरच राहतो. हा दावा खरा आहे का? त्याचे कोणी नातेवाईक किंवा ओळखीचे या परिसरात राहतात का आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळते का? हे पाहण्यासाठी पोलिसांची एक टीम त्याचा फोटो घेऊन चौकशी करतीय. शुक्रवारी सकाळी नवाजला कोर्टात हजर करण्यात आलं तेव्हा कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
आता मनोरुग्ण असल्याने श्वेताला चालत्या ट्रेन मधून खाली ढकळणारा नवाज सुटणार का? तर असं नाही त्यासाठी कोर्टात त्याला आपण मनोरुग्ण असल्याचं सिद्ध कराव लागेल. तीन पातळ्यांवर टेस्ट होतील. या तिन्ही टेस्ट मधून तो मनोरुग्ण असल्याचं स्पष्ट झालं तर कोर्ट त्याचा मनोरुग्ण म्हणून विचार करेल.
महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्वेता महाडीकच पुढे काय झालं?
या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे श्वेता महाडीकच पुढे काय झालं तर माध्यमांमधल्या बातम्या आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लोकल मधून श्वेता थेट रुळांवर पडली.
त्या अवस्थेत तिने आपल्या वडिलांना फोन केला आणि आपल्यासोबत काय घडलं आहे हे सांगितलं श्वेताला रेल्वे रोळांवर पडलेल बघून आजूबाजूचे प्रवासी धावले आणि त्यांनी तिला एमजीएम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिथे लागलीच तिच्यावर उपचार सुरू झाले. तिला कोणत्याही एक्सटर्नल इंजुरी झाल्या नव्हत्या त्यामुळे डॉक्टरांनी तिच सिटी स्कॅन केलं एक्सरे काढून तिला इंटर्नल इंजुरी आहे का हे सुद्धा चेक केलं चालत्या लोकल मधून पडल्याने श्वेताच्या पोटाला पायाला आणि डोक्याला दुखापत झाली होती पण सुदैवाने ती गंभीर स्वरूपाची नव्हती त्यामुळे गुरुवारी रात्री श्वेताचे पालक तिला घरी घेऊन गेले
शुक्रवारी सकाळी पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली तेव्हा श्वेताची प्रकृती स्थिर होती पण तिला थोडा तापही होता पण सध्या तरी तिची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचं सांगण्यात येतय पण फक्त लेडीज डब्यात का चढला म्हणून हटकल्याने थेट 18 वर्षांच्या मुलीला चालत्या लोकल मधून बाहेर फेकण्यात आल्यानं लोकल मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या आणि एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आलाय त्यातही जर थेट लोकल मधून बाहेर ढकळण्यापर्यंत जात असेल तर जीव मुठीत धरून कसा प्रवास करायचा हा प्रश्न विचारला जातोय पण आता नवाजवर काय कारवाई होणार त्याला कुठली शिक्षा सुनावली जाणार की पळवड बघून तो कायद्याच्या कचाट्यातून सुटणार या प्रश्नांची उत्तर मिळणं महत्त्वाच आहे.
