अनेक नागरिकांच्या दैनंदिन जीवनात रेशन कार्ड हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. पारंपरिक कागदी स्वरूपातील रेशन कार्ड कालांतराने फाटतं किंवा पुसट होतं आणि बऱ्याच वेळा ते हरवत सुद्धा आणि ही एक मोठी समस्या आजही आहे विशेष करून पावसाळ्यात त्याची हाताळणी आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी व्यवस्था त्या व्यवस्थेचा अभाव यामुळे आपल्या या शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड खराब होत असतं अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना शासकीय दुकानात किंवा कार्यालयात अडचणींचा सामना करावा लागतो.
मात्र आता आजकालच्या या मोबाईलच्या युगात आधुनिक युगामध्ये एक सोपा उपाय उपलब्ध करून दिलेला आहे तो म्हणजे डिजिटल रेशन कार्ड किंवा पीव्हीसी रेशन कार्ड किंवा इरेशन कार्ड आता हे इरेशन कार्ड काढायचं कसं त्याची प्रक्रिया काय आहे अत्यंत सोपी प्रक्रिया आहे ते आज आपण या ठिकाणी बघूयात…
केंद्र सरकार कडून मेरा रेशन या सुरू करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांना आपले रेशन कार्ड डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे या ॲप मुळे शिधापत्रिका धारकांना केवळ माहितीच नव्हे तर संपूर्ण रेशन कार्ड हे मोबाईलवरती नियंत्रित करण्याची विशेष सुविधा मिळते आणि या डिजिटल रेशन कार्डचा वापर करून नागरिक पीव्हीसी म्हणजेच प्लास्टिक कार्ड तयार करू शकतात आणि एटीएम जसं असतं त्या एटीएम कार्ड सारखं टिकाऊ आणि मजबूत असलेल पीव्हीसी रेशन कार्ड वापरण्यासाठी अधिक सोयीच ठरतं.
इरेशन कार्ड काढायचं कसं?
आता हे इरेशन कार्ड काढायचं कसं. तर आपल्या मोबाईलमध्ये स्मार्टफोनमध्ये सर्वप्रथम आपल्याला मेरा रेशन हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे आणि हे ॲप इन्स्टॉल करून ओपन केल्यानंतर उघडल्यानंतर तर बेनिफिशरी म्हणजेच लाभार्थी हा पर्याय निवडायचा त्यानंतर रेशन कार्डशी संलग्न असलेला आधार क्रमांक भरून कॅप्चा टाकायचा आहे यानंतर ओटीपी च्या मदतीने आपण लॉगिन प्रक्रिया ही पूर्ण होते ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून काही मिनिटात आपण ही पूर्ण करू शकतो लॉगिन झाल्यानंतर ॲपच्या मुख्य पानावरच डिजिटल किंवा इरेशन कार्ड उपलब्ध होते या कार्डवर कुटुंब प्रमुखाचे नाव रेशन कार्ड क्रमांक तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची सविस्तर माहिती आपल्याला दिसते.
याच स्क्रीनवर ई रेशन कार्ड डाऊनलोड करण्याचाही पर्याय उपलब्ध असतो. या पर्यायावरती आपण क्लिक केल्यानंतर आपण आपल्या मोबाईलवरती किंवा कॉम्प्युटरवरती पीडीएफ स्वरूपात हे रेशन कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकतो. ही पीडीएफ ची प्रत जी आहे ती शासकीय कामांसाठी सुद्धा ग्रहीत धरली जाते हे प्रामुख्याने आपण लक्षात ठेवायच आहे डाऊनलोड केलेल्या रेशन कार्डच पीव्हीसी कार्ड तयार करायच असल्यास आपल्या परिसरात प्रिंटिंग वाले बरेच जण असतात तर प्रिंटिंगच्या ठिकाणी आपण ही पीडीएफ घेऊन गेलो तर ते आपल्याला ते एटीएम कार्ड सारखं कार्ड तयार करून देऊ शकतात.
सध्या तरी सरकारी ॲपवर थेट पीव्हीसी कार्ड मागवण्याची सुविधा नसली तरी जी पीडीएफ त्यांनी तयार करून दिलेली आहे त्या पीडीएफ च्या मदतीने आपण प्लास्टिक कार्ड सहज तयार करू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी अत्यंत नाममात्र दरात ही सेवा आपल्याला दिली जाते आणि काही मिनिटात हे एटीएम सारखं दिसणार पीव्हीसी रेशन कार्ड तयार होतं.
पीव्हीसी रेशन कार्डचा सर्वात मोठा फायदा?
आता पीव्हीसी रेशन कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते टिकाऊ असतं वॉटरपूफ असतं सहज आपण हाताळू शकतो खिशात ठेवू शकतो कागद ही रेशन कार्ड प्रमाणे ते फाटण्याची किंवा खराब होण्याची भीती राहत नाही आणि तसेच वारंवार सारखंच रेशन दुकानात जाताना कार्ड नीट सांभाळून न्यायचा जो त्रास आहे त्यापासून सुद्धा आपली मुक्ती होऊ शकते तर असे हे अतिशय सोप्या पद्धत असलेल रेशन कार्ड आपण सुद्धा काढून घ्या आणि आपला जो काही रेशन कार्ड सांभाळण्याचा जो त्रास आहे तो कमी करा.
