भारतासाठी गोल्ड मेडल पण कौतुकासाठी स्टेडियम मध्ये कोणीच नाही..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

ती डोळ्यात स्वप्न घेऊन मैदानात उतरली. समोर अडथळ्यांची रांग होती पण तिची पाऊल मात्र थांबायला तयार नव्हती. काही क्षण मागे पडलेली ज्योती जीवाच्या आकताने पडू लागली आणि अखेर जिंकली. ज्योतीच्या जिद्दीमुळे भारतान सुवर्ण पदक मिळवलं पण त्या भल्या मोठ्या स्टेडियममध्ये ज्योतीसाठी ना टाळ्यांचा आवाज होता ना जल्लोष होता.

तिचं कौतुक करण्यासाठी तिथं कोणीच नव्हतं संपूर्ण मैदानात फक्त शांतता होती. अशा शांततेत जेव्हा तिरंगा झडकला तेव्हा ज्योतीच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. हा हृदयस्पर्शी क्षण कॅमेरात कैद झाला आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. तिच्या डोळ्यातले अश्रू केवळ विजयाचे नव्हते ते होते एका संपूर्ण प्रवासाचे संघर्षाचे आणि त्यागाचे कारण ज्योतीसाठी हा विजय एका शर्यतीपुरता मर्यादित नव्हता. तिन परिस्थितींवर मात करत हा विजय मिळवला होता. म्हणूनच ही हर्डल क्वीन ज्योती नेमकी कोण आहे काय आहे तिच्या यशामागचा संघर्ष आणि त्या व्हायरल व्हिडिओ मध्ये नेमकं काय आहे सगळं जाणून घेऊयात…

ज्योतीच बालपण:

ज्योती याराजी हिचा जन्म 28 ऑक्टोबर 1999 रोजी आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम इथे झाला. तिचे वडील सूर्यनारायण हे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. तर आई रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते. ज्योतीच्या कुटुंबाच महिन्याच उत्पन्न 18 हजार पेक्षा कमी होतं त्यातच त्यांना घर खर्च आणि मुलांच शिक्षण कराव लागत होतं. ज्योती लहानपणापासून जिद्दी मुलगी होती. हायस्कूलमध्ये शिकत असताना तिच्या पिठीच्या शिक्षिकेला वाटलं की तिची उंची अडथळा धावपट्टू होण्यासाठी चांगली आहे म्हणून त्यांनी तिला मार्गदर्शन केलं आणि तेव्हाच ज्योतीने तिच ध्येय निश्चित केलं आणि तिचा प्रवास सुरू झाला.

2015 मध्ये आंध्रप्रदेश आंतर जिल्हा स्पर्धेत ज्योतीन सुवर्ण पदक जिंकलं. त्यानंतर ती द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक एन रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबादला गेली. ज्योतीने जुनियर आणि सीनियर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने पदके जिंकली. हैदराबाद मध्ये दोन वर्ष काम केल्या नंतर तिला गुंटूर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये सामील होण्याची संधी मिळाली. पण तेव्हाच ही सुविधा अचानक बंद करण्यात आली. मग 2019 मध्ये ज्योती भुवनेश्वर मधील ओडिशा रिलायन्स ऍथलेटिक्स हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये गेली जिथे ती ब्रिटिश प्रशिक्षक जेम्स हिलियरच्या मार्गदर्शनाखाली प्रगती करू लागली.

ज्योतीने जिंकलेले सुवर्ण पदक विक्रमाची नोंद का नाही झाली?

जानेवारी 2020 मध्ये तिन कर्नाटकातील मुडाबिद्री इथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ऍथलेटिक्स स्पर्धेत 13.6 सेकंद वेळ नोंदून सुवर्ण पदक जिंकलं पण तिच्या या विक्रमाची कोणत्याच पुस्तकात नोंद होऊ शकली नाही कारण राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेने म्हणजेच एनएडीएने चॅम्पियनशिप पूर्वी तिची चाचणी घेतली नव्हती आणि या स्पर्धेत भारतीय थलेटिक्स फेडरेशन म्हणजेच एएफआय कडून कोणताही तांत्रिक प्रतिनिधी नव्हता. अधिकृत वेळेची नोंद करण्यासाठी या दोन्ही पूर्ववट होत्या ज्या पूर्ण न झाल्यामुळे तिच्या या विक्रमाची नोंद झाली नाही.

त्यानंतर तिने फेब्रुवारी 2020 मध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स मध्ये आणखीन एक सुवर्ण पदक जिंकलं. वर्षाच्या अखेरीस ज्योती दक्षिण आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार होती. पण कोविड-9 च्या साथीमुळे त्यावेळी तिला खेळायला संधी भेटली नाही. 2020 मध्ये इंडोर एशियाड आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स यांसारख्या इतर स्पर्धा रद्द झाल्यामुळे ज्योतीला तिच्या आंतरराष्ट्रीय पदकासाठी वाट पाहावी लागली.

त्यानंतर 2022 मध्ये ती पुन्हा मैदानात उतरली आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करू लागली. कोजीकोट इथल्या फेडरेशन कपमध्ये ज्योतीने 13.9 सेकंदांचा आणखीन एक राष्ट्रीय विक्रम नोंदवला. परंतु ती वाऱ्याच्या मदतीने धावल्याने तिला पुन्हा एकदा अधिकृत मानांकन नाकारण्यात आलं. तिच्या शर्यती दरम्यान वाऱ्याचा वेग प्लस 2.1 m/ सेकंद होता.

राष्ट्रीय विक्रमासाठी आवश्यक असलेला वेग प्लस 2 m/ सेकंद असतो. या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे त्यावेळी देखील तिच्या या कामगिरीला अधिकृत मान्यता मिळाली नाही. एकदा नाही तर दोनदा तिच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे रेकॉर्ड नाकारण्यात आलं. कोजेकोटमध्ये बॉर्डरवर वाऱ्याचे वाचन सुरू होताच ज्योतीला रडायला यायचं कधीतरी तिच्या या कामगिरीला योग्यदर्जा मिळेल अशी आशा मनात घेऊन ती पुन्हा मैदानात उतरायची.

आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत ज्योतीचे यश;

10 मे 2022 रोजी सीमासोल इथे झालेल्या सायप्रस आंतरराष्ट्रीय अथलेटिक्स स्पर्धेत ज्योतीने अखेर 13.23 सेकंदांच्या वेळेसह महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला आणि 2002 मध्ये अनुराधा विसवालने नोंदवलेल्या 13.68 चा विक्रम मोडला यानंतर तिने आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये बँकॉक इथे पार पडलेल्या स्पर्धेत 100 मीटर हर्डल्स मध्ये सुवर्ण पदक तर 200 मीटर शर्यती 23.13 सेकंदांचा वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत रौप्य पदक आपल्या नावावर केलं.

त्यानंतर एफआयएसय वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2023 चेंगदू येथे झालेल्या स्पर्धेत तिने 100 मीटर हर्डल्स मध्ये कास्य पदक पटकावलं आशियाई इंडोर थलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 नूर सुलतान येथे आयोजित स्पर्धेत ज्योतीने 60 मीटर हर्डल्स मध्ये रौप्य पदक जिंकलं तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत 2024 भारत सरकारकडून तिला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार प्रदान करण आला अलीकडेच रिपब्लिक ऑफ कोरिया येथील गुमी शहरात 27 ते 31 मे 2025 दरम्यान पार पडलेल्या आशियाई अथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने मोठ्या ताकदीने सहभाग नोंदवत जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेत भारताने एकूण 24 पदकांची कमाई करत दुसर स्थान पटकावलं.

ज्योतीने नवा चॅम्पियनशिप रेकॉर्ड केला तेव्हा स्टेडियममध्ये कोणीच नव्हत:

भारतीय संघाच्या खात्यात आठ सुवर्ण 10 रोप्य आणि सहा कास्य पदक जमा झाली या चॅम्पियनशिप मधील भारताची स्टार थलीट ज्योतीने 100 मीटर अडथळा शर्यतीत केवळ 12.96 सेकंदात शरियत पूर्ण करत नवा चॅम्पियनशिप रेकॉर्ड केला आणि आता जेव्हा ती सुवर्ण पदक स्वीकारत होती तेव्हाचा स्टेडियम मधला व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालाय त्या व्हिडिओमध्ये स्टेडियम मध्ये तिचा खेळ पाहण्यासाठी कोणच नसल्याचं दिसतय ती देशासाठी धावली देशाला सुवर्ण पदक मिळून दिलं पण तिथे ना टाळ्यांचा आवाज होता ना जल्लोष होता तिचा कौतुक करणारं तिथं कोणीच नव्हतं जेव्हा भारताचा झेंडा स्टेडियममध्ये झडकला त्यावेळी ती स्टेडियममध्ये पाहत होती.

दूरवर कोणीच दिसत नव्हतं पण तिच्या डोळ्यांमध्ये मात्र अश्रू दिसत होते. आता जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय तेव्हा मात्र या व्हिडिओला अनेक लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. लोक हा व्हिडिओ बघून तिच्यासाठी दुःख व्यक्त करतायत. खऱ्या अर्थान आता ज्योतीला प्रसिद्धी मिळते तिच्या या कामगिरीची लोक दखल घेतायत आणि तिच्यावरती प्राऊड फील करतायत. पण एक गोष्ट अशी आहे ज्याच्यावर आपण विचार करणं गरजेच आहे. ते म्हणजे भारतामध्ये खेळ म्हटलं की आजही आपल्याला फक्त क्रिकेटच आठवतो. क्रिकेट पट्टूंना प्रसिद्धी, पैसा, जाहिराती आणि चहात्यांना अफाट पाठिंबा मिळतो.

पण ज्योती सारख्या खेळाडूंना किंवा त्या खेळत असलेल्या खेळाला तितक प्रसिद्धी मिळत नाही पण त्यांचे योगदान मात्र तितकच महत्त्वाचं आणि अनमोल आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी फुटबॉल पट्टू मेसी भारतात आला होता. त्याच भव्य स्वागत झालं लाखो लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं पण आपल्याच भारतातला फुटबॉल पट्टू सुनील शेत्री ज्याचं नाव टॉप फुटबॉल पट्टू मध्ये घेतलं जातं त्याला आजही तितकी ओळख किंवा सन्मान मिळत नाही. आज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की प्रत्येक वेळी खरे हिरो नेहमी झगमगाटत नसतात. तर काही वेळा ते रिकाम्या स्टेडियम मध्ये डोळ्यात अश्रू घेऊन भारताची शान वाढवत असतात. ज्योतीने तिच्या या कामगिरीने तिच्या आई-वडिलांच आणि भारताचं नाव मोठं केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *