छत्रपती संभाजीनगर; देशातील पहिली “इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी..!”

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगर शहरा विषयी आपली मते मांडली तर जाणून घेऊया ते काय काय म्हटले तर डीएमआयसी कॉरिडॉरमुळे येथील विकासाला गती मिळाली संभाजीनगरला एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीच मॅग्नेट तयार करू शकतो. आणि म्हणूनच त्या काळामध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेतले. विशेषतः जेव्हा समृद्धी महामार्ग आपण केला. त्यावेळी त्या महामार्गाची सुरुवात देखील झाली नव्हती. तेव्हा आपल्या लक्षात असेल की याच संभाजीनगर मध्ये मी सांगितलं होतं की आतापर्यंत महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे पुणे होतं.

पण याच्या पुढचं मॅन्युफॅक्चरिंग मॅग्नेट हे संभाजीनगर आणि जालना होणार आहे. आणि आज आपण ते होताना बघतो आहोत. देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचेही मी आभार मानतो की त्यांनी डीएमआयसीला पुश दिला. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे. डीएमआयसीचे कॉरिडोर देशातल्या अनेक राज्यात चालले आहेत. कारण दिल्ली पासून मुंबईपर्यंत जेवढे राज्य या प्रत्येक राज्यामध्ये डीएमआयसीचा कॉरिडोर हा त्या ठिकाणी तयार होतोय.

संभाजीनगर हि पहिली इंटग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी तयार झाली:

सगळ्यात पहिला कॉरिडोर सगळ्यात पहिली इंटग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी ही आपण संभाजीनगरला तयार करू शकलो. आणि प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन केलं. त्याचा परिणाम काय झाला? तर इथली अस्तित्वात असलेली इकोसिस्टीम, इथला हुमन रिसोर्स, इथली एंटरप्रायजिंग अशा प्रकारची एक व्यवस्था, एंसिलरीजचं जेनेटवर्क या ठिकाणी तयार झालेले आहे ते नेटवर्क. ऑटो क्लस्टर सारखे आपले जे काही प्रयत्न आहे. ते प्रयत्न या सगळ्या गोष्टींमुळे एक ज्याला आपण पूल म्हणतो तो पूल या ठिकाणी तयार झाला. आणि साधारणपणे मागच्या काळात मुख्यमंत्री म्हणून किंवा आजही किंवा मी मध्ये उपमुख्यमंत्री होतो तेव्हाही इंडस्ट्रीशी मग खूप जास्त इंटरक्ट करायचो. या प्रत्येक वेळी माझा प्रयत्न असायचा की इंडस्ट्री या मागास भागात जास्त गेल्या पाहिजे.

आणि म्हणून आपलं संभाजीनगर असेल, जालना असेल, तिकडे नागपूर असेल, इकडे गडचिरोली असेल, साधारणपणे इंडस्ट्री आल्यानंतर त्यांना पुणे, रायगड हा सगळा भाग दाखवत असताना त्यांना संभाजीनगर दाखवलंच पाहिजे त्यांना नागपूर दाखवलच पाहिजे अशा प्रकारचा मुख्यमंत्रीचा आग्रह होता. आणि ते म्हणाले मी तुम्हाला सांगतो जो संभाजीनगरला आला तो इथनं परत जातच नाही. सिईंग इज बिलिविंग. त्यामुळे इथे आणणं एवढंच महत्त्वाचं असतं. एकदा आला की त्याच्यानंतर त्यांना हे लक्षात येत की इथलं पोटेंशियल काय? म्हणजे आपल्याला कल्पना आहे की टोयोटाच्या वेळी तर आपल्याला सगळ्यांना किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न कारण अनेक फोर्सेस काम करत होते. आणि ज्यावेळेस कर्नाटकच्या सरकारला लक्षात आलं की आता हे मन बनवतायत. त्यावेळी त्यांनी आपल्यापेक्षा देखील चांगल्या गोष्टी ऑफर करण्याचा प्रयत्न केला.

आपल्या देशाचं इव्ही कॅपिटल हे आपण संभाजीनगरला झाल:

पण मला असं वाटत की जी इकोसिस्टीम, व्यवस्था जे इन्फ्रास्ट्रक्चर, जे इन्सेंटिव्ह आपण ऑफर केले होते ते विश्वसनीय होते. ते पाहिल्यानंतर त्यांना लक्षात आलं की हे करण्यासारखं आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी देखील येण्याचं मान्य केलं. आज मला या गोष्टीचा आनंद आहे की इव्हीच्या क्षेत्रामध्ये आता एक प्रकारे आपल्या देशाचं इव्ही कॅपिटल हे आपण संभाजीनगरला या ठिकाणी करू शकलेलो आहोत.

इतकी मोठी इव्ही ची इकोसिस्टीम ही तयार झालेली आपल्याला पाहिला मिळते आहे. आणि आता मला असं वाटत की हा प्रवास थांबणार नाहीये. हा प्रवास आपल्याला पुढे न्यायचाच आहे. आणि म्हणूनच मी ही जी घोषणा केली. कारण आताची परिस्थिती अशी आहे की जागा मागणारे जास्त आहेत. आणि जागा उरलेली नाही. ही आनंदाची गोष्ट आहे नाहीतर आम्ही फाईव् स्टार इंडस्ट्रियल इस्टेट तयार करायचो. आणि त्या फाईव् स्टार इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये नुसते रिकामे प्लॉट आम्हाला पाहायला मिळायचे.

आज या ठिकाणी जागा उरलेली नाही. त्यामुळे नव्याने ८,००० एकर जागा ही या ठिकाणी आपण आता अक्वायर करणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगतो आता डावोसला गेलो. त्याही ठिकाणी आपल्याकडे येण्याकरता लोकांचा एक ओढा दिसला. आणि पुढच्या काळामध्ये हा ओढा थांबणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे आपण जेवढी जमीन देऊ शकू तेवढ्या इंडस्ट्री या ठिकाणी येतील. हा विश्वास मला आज निश्चितपणे आहे. आणि हे सगळं करत असताना दोन-तीन महत्त्वाचे मुद्दे तुम्ही याला पुढे नेण्याच्या दृष्टीने मांडलेले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे:

पहिला मुद्दा तुमचा जो काही इंडस्ट्रियल रिंग रोडचा मुद्दा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आहे. खरं म्हणजे शेंद्रा आणि बिडकीन याला कनेक्टिंग रोडचं व्यवस्था आपण मागेच केली होती. आणि मी या समजात होतो की तो झाला असेल आजच मला समजल की तो झालेला नाही. म्हणून मी अतुलजींना विचारलं की अतुलजी आपण तर २०१९ साली त्याचं प्लॅनिंग केलं होतं. पण ते म्हणाले की काय कारण आहे पण ते झालं नाही. त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करतो की हा जो इंडस्ट्रियल रिंगरोड आपण म्हटलेला आहे, हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करू. ही कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आपण तयार करू.

आणि एक आपण इंडस्ट्रियल एक्झिबिशन सेंटर जी ५० एकर जागा आपण मागे ठेवली होती. खरं म्हणजे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केला तर आपण या एक्झिबिशन सेंटरमध्ये ज्यांना अशा प्रकारचे एक्झिबिशन सेंटर चालवण्याचा अनुभव आहे. अशा कोणालातरी आणलं पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या दिवशीपासनं काही त्याच कमर्शियल प्रपोझिशन वायबल होणार नाही.

माझी तयारी अशी आहे की जर आपण योग्य प्रकारे कॅल्क्युलेट केलं तर जी काही व्यबिलिटी गॅप आहे त्या व्यबिलिटी गॅप फंडिंग महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही करू. जेणेकरून एक केवळ दोन हॉल नाही तर एक चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं एक्झिबिशन कम कन्वेंशन सेंटर हे जर आपल्याला या ठिकाणी तयार करता आलं. आणि व्यबिलिटी गॅप फंडिंग जर आपण केली तर मला वाटत नाही की आज काही अडचण आहे.

कारण आता इतक्या मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचा उपयोग हा त्या ठिकाणी होतो.त्यामुळे आपण पहिला प्रयत्न हा केला पाहिजे की एक चांगलं एक्झिबिशन कम कन्वेंशन सेंटर करूया. त्यात जे लोकं एक्सपर्ट आहेत त्यांना बोलवूया. आणि आपल्यालाही लक्षात येतं की याला ब्रेकवेल येण्याकरता किती वर्ष लागतील, त्याचा रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट काय असेल, त्याच्यावर आधारित एक आपण व्हीजीएफ च एक प्रपोजल तयार करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *