15 जानेवारीला मतदान 29 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

होणार होणार म्हणत अखेर निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच केलेली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या पत्रकार परिषदेतन राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातल्या या महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आणि निकाल लागणार आहे.

महानगरपालिकांच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम कसा असणार आहे? सोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वेळापत्रक केव्हा जाहीर केलं जाऊ शकतं? एकूण किती महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत? समजून घेऊयात…

राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातल्या एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यानंतर 15 जानेवारीला महानगरपालिकांसाठी मतदान पार पडेल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी महानगरपालिकांचा निकाल जाहीर करण्यात येईल. राज्यामध्ये एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

कोण-कोणत्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार?

यामध्ये विदर्भातल्या चार महानगरपालिका, मराठवाड्यातल्या पाच, पश्चिम महाराष्ट्रातल्या सहा, उत्तर महाराष्ट्रातल्या पाच आणि मुंबई व मुंबई परिसरातील एकूण नऊ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यामध्ये नव्याने झालेल्या जालना आणि इचलकरंजी या महानगरपालिकांच्या सुद्धा पहिल्यांदाच निवडणुका होणार आहेत. आता ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये विदर्भातला नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चार महानगरपालिकांचा समावेश आहे. यापैकी नागपूरची निवडणूक ही महत्त्वाची ठरणार आहे.

कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच बाले किल्ल्यात घेण्यासाठी विदर्भातले काँग्रेसचे नेते इथे फिल्डिंग लावताना दिसू शकतात. आता जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर इथन एकूण पाच महानगरपालिका आहेत. छत्रपती संभाजीनगर हे नामांतर झाल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. एमआयएम च वाढत प्रस्थ शिवसेनेत पडलेली फूट आणि हिंदुत्वाच राजकारण यावरती इथली निवडणूक गाजणार आहे.

त्यासोबतच जालना, नांदेड, लातूर आणि परभणी या मराठवाड्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा येत्या 15 जानेवारीला पार पडतील. पश्चिम महाराष्ट्रातन एकूण सहा महापालिकांच्या निवडणुका होतात यामध्ये पुणे आहे पिंपरी चिंचवड आहे सोलापूर आहे कोल्हापूर इचलकरंजी आणि सांगली मिरज कुपवाड ही सुद्धा महानगरपालिका यामध्ये निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे ज्याप्रमाणे मुंबई परिसरात एकनाथ शिंदेना वघळून महानगरपालिका लढवण्याची रणनीती भाजप आखत होतं त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महानगरपालिकेत भाजप आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्र लढते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे इथल्या महानगरपालिकांमध्ये भाजप एक हाती लढत असेल तर अजित दादांना वगळून आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या दिशेन भाजपन हालचाली आखलेले आहेत असं आपल्याला म्हणता येतं.

आता सांगलीचा विचार केला तर महाविकास आघाडी एकत्र लढणार अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केली आहे. पण असं असलं तरी पश्चिम महाराष्ट्रात इतर ठिकाणी महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार गट नेमकी काय भूमिका घेणार आणि नक्की कोणाच्या सोबत जाणार लढणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातनं एकूण पाच महानगरपालिकांची निवडणूक होतीय ज्यामध्ये नाशिक आहे मालेगाव आहे धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर या महानगरपालिकांच्या सुद्धा निवडणुका येत्या जानेवारी महिन्यात होतयत नाशिकचा कुंभमेळा आणि झाडांची होणारी कत्तल हा विषय नाशिक महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये गाजू शकतो.

खरं तर अहिल्यानगर आणि आजूबाजूच्या परिसरात भाजपन आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार सुरू केलाय. त्यामुळे ही निवडणूक सुद्धा हिंदुत्वाकडे शिफ्ट होईल असं बोललं जातय. पण असं असलं तरी भाजपला इथे अजित पवार गटाची विशेषता संग्राम जगतापांची रसद लागेल. हिंदुत्वाकडे शिफ्ट होताना जगताप आणि अजित पवार यांच्यामध्ये किती टोकाचे मतभेद होतात आणि अजित पवार गट आपली पुरोगामित्वाची भूमिका किती टिकून ठेवतो या अहिल्यानगरच्या निवडणुकीतन समोर येताना दिसू शकतं.

विक्रमी संख्येत असलेल्या महानगरपालिका?

आता त्यानंतर विक्रमी संख्येत असलेल्या महानगरपालिका येतात त्यामध्ये मुंबई आणि एमएमआर रिजनच्या निवडणुका खरं तर इथल्या एकूण नऊ महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत ज्यामध्ये मुंबई महानगरपालिका आहे, नवी मुंबई, ठाणे उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, भिवंडी, पनवेल आणि मीराभईंदर या महानगरपालिकांचा समावेश असणार आहे आता इथला सगळा डाव रंगणार आहे तो अर्थात मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे खरच एकत्रित लढतील का यावरती सगळी समीकरण अवलंबून असतील कारण त्यावर अजून शिक्का मुर्तब झालेल नाहीये शिंदे आणि भाजपमध्ये बैठकांच सत्र सुरू झालं असलं.

जागा वाटपाबद्दल खल सुरू झाला असला तरी भाजप शिंदेच काय करणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे पण आतापर्यंतच्या चर्चेनुसार ठाकरे काँग्रेस एकत्र लढत असतील तर भाजप आणि शिंदे सुद्धा एकत्र लढताना दिसतील एक तर मुंबई ठाकरे जिंकले तरच ते राजकारणात रिलेवंट राहू शकतात त्यामुळे मुंबई ठाकरेंसाठी महत्त्वाचे ठरणार आहे शिवाय कल्याण, डोंबवली आणि ठाणे इथे शिंदे किती बळ लावतात त्यावरती आगामी लोकसभा आणि विधानसभेत शिंदेचा पत्ता कट करायचा की नाही हे सुद्धा ठरणार आहे.

कोणत्या 29 महानगरपालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली?

थोडक्यात भविष्यातल्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी या रिजन मधल्या निवडणुका सगळ्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या असतील. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, लातूर, परभणी, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली मिरज कुपवाड, नाशिक, मालेगाव, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई विरार, भिवंडी, पनवेल आणि मीराभंदर अशा एकूण 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा सध्या तरी झालेली आहे.

2029 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हेच लोकप्रतिनिधी कायम राहणार असल्यानं आणि तेव्हा मतदारसंघ पुनरचना होऊन शहरी मतदारांची संख्या वाढणार असल्यानं या महानगरपालिका निवडणुका सगळ्याच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार आहेत. आता यात भाजपला जास्तीत जास्त ठिकाणी एकहाती सत्ता मिळवण्याची अपेक्षा आहे तर शिंदे आणि अजित दादांना आपली बार्गेनिंग पॉवर टिकून ठेवण्यासाठी विजय महत्त्वाचा असणार आहे.

दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. तर राज ठाकरेंची भूमिका ही मुंबई आणि नाशिक या दोन महानगरपालिकांमध्ये निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे इथून पुढचे काही दिवस हे पक्षप्रवेशांचे दोस्तीत असणाऱ्या कुस्तीचे आणि प्रचाराच्या धुरण्यांचे असतील हे मात्र नक्की. बाकी महानगरपालिका निवडणुकांमध्ये नेमका कोणत्या पक्षाचा जोर राहणार राज्यामध्ये पुढच्या महिन्याभरात काय घडणार हे पाहण महत्वाच ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *