13 जानेवारीच्या संध्याकाळी राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आज 15 जानेवारीला मतदान होणार असून पुढच्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल जाहीर होईल या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे आहे देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेत कोणाची सत्ता येईल याची उत्सुकता सर्वांना आहे पण फक्त मुंबईच नाही तर पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबीवली, नाशिक, पिंपरी चिंचवड इथल्या लढती सुद्धा महत्त्वाच्या आहे काही ठिकाणी युती आणि आघाडी एकत्र आहेत तर काही ठिकाणी पक्ष स्वबळावरती लढलेत त्यातच अनेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे मोठा वादही पाहायला मिळाला.
या विरोधात मनसे सारखे पक्ष न्यायालयातही गेले आहेत राज्यातल्या सर्व 29 महानगरपालिकांमध्ये प्रचारादरम्यान काय घडलं कुठे कशी फाईट आहे प्रचार संपल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोण पुढे आणि कोण मागे आहे सगळ्या 29 महानगरपालिकांचा रिपोर्ट सांगणारी हि माहिती…
राजधानी मुंबईतील माहिती…
सुरुवात करूया राजधानी मुंबई पासून मुंबई महानगरपालिकेसाठी तब्बल नऊ वर्षांनी निवडणूक होतीय या निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू 20 वर्षांनी एकत्र आलेत त्यांच्यासमोर भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांच्या युतीचा आव्हान आहे मुंबई महापालिकेची निवडणूक गाजली ती मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंचा संपूर्ण प्रचार मराठीच्या अवतीभवती फिरणारा होता आम्ही दोघं मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलो आहोत हे त्यांनी वारंवार सांगितलं ठाकरेंनी या निवडणुकीत मोठमोठ्या प्रचार सभा घेण्याऐवजी जी शिवसेनेच्या शाखांना भेटी देण्यावरती भर दिला.
मुंबईत दोघांनी मिळून फक्त एकच सभा घेतली. रविवारी 11 जानेवारीला शिवतीर्थावरती ही सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी अदानींना दिल्या जात असलेल्या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित करून भाजपवरती टीका केली. यामुळे प्रचाराचा शेवटचा टप्पा हा अदानीच्या मुद्द्यावरून गाजला. दुसरीकडे भाजप आणि शिंदेची शिवसेना यांचा प्रचार. युती सरकारन मागच्या तीन वर्षात केलेल्या कामांच्या अवतीभवती फिरणारा होता.
कोस्टल रोडच्या कामाच श्रेय कुणाला हा मुद्दा या निवडणुकीत चर्चेत राहिला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच नाव घेऊन ध्रुवीकरणाचाही प्रयत्न केला. सोबतच मुंबईचा महापौर मराठी होणार की अ मराठी हा मुद्दाही चर्चेत होता. यावरून भाजपला मुंबईचा महापौर मराठीच होणार असं स्पष्टीकरण वारंवार द्यावं लागलं. या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेत. शहराच्या काही भागात त्यांची ताकद आहे. एमआयएम सुद्धा काही ठिकाणी खेळ करू शकतो मात्र मुख्य लढत ही ठाकरे बंधू विरुद्ध भाजप शिंदे अशीच आहे.
ठाणे आणि आसपासच्या महापालिका:
यानंतर पाहूया ठाणे आणि आसपासच्या महापालिका. ठाणे जिल्ह्यात एकूण सहा महापालिका आहेत तर पालघर जिल्ह्यात एक महापालिका आहे ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबेवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर आणि मीरा भंदर या महापालिका ठाणे जिल्ह्यात येतात तर वसई विरार ही महापालिका पालघर जिल्ह्यात येते ठाणे महानगरपालिकेचा विचार केला तर तिथे भाजप आणि शिंदेची युती आहे तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढती आहे दुसरीकडे ठाकरे बंधूंची युती आहे त्यांच्यासोबत शरद पवार यांची राष्ट्रवादी आहे तर काँग्रेस पक्ष स्वबळावरती लढतोय डोंबीवलीत सुद्धा शिंदे आणि भाजपची युती आहे पण नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मध्ये हे पक्ष वेगवेगळे लढले वसई विरार मध्ये शिंदे भाजप एकत्र आहेत पण तिथे ठाकरे बंधू वेगवेगळे लढलेत.
संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर इथे पाण्याचा प्रश्न हा सर्वात मोठा आहे प्रत्येक महानगरपालिकेत सध्या पाण्याची कमतरता आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षान आपल्या जाहीरनाम्यात पाण्याचा प्रश्न सोडवणार 24 तास पाणी देणार असं म्हटलय. दुसरा मोठा मुद्दा होता तो ट्र्राफिकचा ठाणे नवी मुंबई मीराभंदर वरसोबा अशा ठिकाणी दररोज प्रचंड ट्राफिक जाम होतं या भागांना ट्राफिक मुक्त करू असं प्रत्येक राजकीय पक्षाने म्हटलय यासोबतच ठाणे जिल्ह्यात आणखी एक मुद्दा चर्चेत राहिला तो म्हणजे एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक या वादाचा या दोन नेत्यांनी त्यांच्या समर्थकांनी एकमेकांवरती केलेली टीका हा मुद्दा ही या निवडणुकीत गाजला.
मराठवाडा:
मुंबईतून जाऊया मराठवाड्यात. मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी आणि जालना या पाच महानगरपालिका आहेत. या निवडणुकीत या पाचही ठिकाणी कुठेच युती किंवा आघाडी झाली नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळेच पक्ष स्वबळावरती लढले.
छत्रपती संभाजीनगर मध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत आहे. सोबतच शहरात असुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमची ही ताकद आहे. इथे एमआयएमच्या इमतियाज जलील यांच्यावरती झालेल्या हल्ल्यामुळे शेवटच्या टप्यात वातावरण तापलं होतं. हा मुद्दा या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिला. लातूरचा विचार केला तर ही निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यामुळे गाजली.
पश्चिम महाराष्ट्रा:
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा इथे काही मजबूत उमेदवार दिलेत. त्यामुळे ही लढत इंटरेस्टिंग झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या विभागात एकूण सहा महानगरपालिका येतात. पुणे पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली, मिरज, कुपवाड यापैकी पुणे आणि पिंपरी चिंचवडची फाईट सर्वात प्रतिष्ठेची आहे. पुणे महानगरपालिकेत सत्तारूड महायुतीतले तिन्ही पक्ष वेगवेगळे लढता आहेत.
भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यात युतीची बोलणी शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होती पण ही युती होऊ शकली नाही. दुसरीकडे पवार काका पुतणे यांची राष्ट्रवादी मात्र एकत्र आली आहे. तर एकेकाळी पुणे महानगरपालिकेवर सत्ता गाजवलेला काँग्रेस पक्ष या निवडणुकीत स्वबळावर लढतोय पण मुख्य लढत आहे ती राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच. पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना आहे.
विदर्भ:
विदर्भात एकूण चार महानगरपालिका आहेत. नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला विदर्भाच राजकारण बघितलं तर इथे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांचे वर्चस्व असल्यास दिसून येतं. शिंदेच्या शिवसेनेची इथं फारशी ताकद नाही. तीच अवस्था शिवसेनाठाकरे गटाचीही झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सुद्धा कुठेही फाईट मध्ये नाहीत.
त्यामुळे खरी लढत काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच होमग्राऊंड असलेल्या नागपूर शहरात विजयाची हॅट्रिक मारण्याचा भाजपचा प्लॅन आहे. इथे भाजप समोर काँग्रेसच मुख्य आव्हान आहे. नागपूर महापालिकेत भाजपन 151 जागा लढवूनही अनेक माजी नगरसेवकांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. अनेक ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना प्रयत्न करूनही बंडखोरी रोखण्यात यश आलं नाही.
उत्तर महाराष्ट्रा:
उत्तर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर इथे नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि मालेगाव या पाच महानगरपालिका आहेत. नाशिकमध्ये भाजपन स्वबळाचा नारा दिलाय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक मधली सत्ता भाजपसाठी महत्त्वाची असणार आहे. इथे भाजप विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचा आव्हान आहे. तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी युती केली आहे. ठाकरे बंधूंनी मुंबई आणि ठाण्याबाहेर फक्त नाशिकमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरेंनी तपोवनातल्या वृक्षतोडीवरून केलेली टीका हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला.
सोबतच भाजप मधला अंतर्गत नाराजी नाट्य सुद्धा प्रचारात गाजलं. मालेगाव बद्दल बोलायचं झालं तर इथे सुरुवातीपासून स्थानिक नेते अपक्ष गट आणि सामाजिक संघटनांचा प्रभाव राहिला आहे. अल्पसंख्याक बहुल शहर असल्याने इथे मुस्लिम नेतृत्वाचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. गेल्या काही वर्षात शहराच्या राजकारणात एमआयएम न आपलं ठोस स्थान निर्माण केलं या उलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव हळूहळू कमी झाला.
आता 15 जानेवारीला मतदान झाल्यानंतर लगेच 16 जानेवारीला निकाल हाती येईल यानंतर कोणत्या पक्षाची सत्ता कुठल्या महापालिकेत येते हे पाहणं महत्त्वाचं असेल.