भारत सरकार ग्रामीण विकास विभाग
संदर्भ : महाबँक आरसेटी /बातमी/ २०२४-२५ दिनांक :- 08.07.2024
महाबँक आरसेटी मध्ये पुरूषांसाठी दुचाकी वाहने दुरुस्ती (Two Wheeler Mechanic) चे मोफत प्रशिक्षण –
National code-NARQ40014
छत्रपती संभाजीनगर:- महाबँक आरसेटी अर्थात महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 01.08.2024 ते 30.08.2024 दरम्यान पुरूषांसाठी दुचाकी वाहने दुरुस्ती (Two Wheeler Mechanic) या विषयांचे 30 दिवसांचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहेत. सदर प्रशिक्षणात छ.संभाजीनगर जिल्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार युवक /पुरुष, आत्महत्याग्रस्थ शेतकरी कुटूंबातील उमेदवार, कुटूंब दारिद्र्यरेषेखालील (BPL) उमेदवार, रोजगार हमी योजना कुटूंबातील सदस्य, तसेच बचत गटातील सदस्य असलेल्या महिलांची मुलं यांना प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणासाठी उमेदवार बेरोजगार, १८ ते ४५ वयोगटातील तसेच उमेदवार कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक वर्गात शिक्षण घेत नसावा किंवा शिक्षण पूर्ण झालेले असावे व उमेदवाराला स्वतः ला स्वयंरोजगाराची आवड असावी.
सदर प्रशिक्षणात व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, व्यावसायिक गुणवत्ता, आरोग्य, योगा तसेच विविध शासकीय योजनांची माहिती इत्यादींबद्दल सखोल व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येईल.
हे प्रशिक्षण निवासी स्वरूपाचे व मोफत असून, प्रशिक्षणादरम्यान राहणे, जेवणे, चहा व नाश्ता या सोयी विनामुल्य पुरविण्यात येईल.
इच्छुक उमेदवारांची निवड हि मुलाखती द्वारे केली जाईल.
सदरील प्रशिक्षणास तंत्र प्रशिक्षक म्हणून जिल्हा टू व्हीलर मेकॅनिक चे अध्यक्ष तसेच DST Certified Trainer माननीय सय्यद चांद सर हे राहणार आहेत.
या प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी १) आधार कार्ड २)पॅन कार्ड /मतदान कार्ड ३)रेशन कार्ड / BPL कार्ड /मनरेगा कार्ड /SHG नंबर (कोणतेही एक) ४)जातीचे प्रमाणपत्र(SC /ST) ५) बँक पासबूक ६) शाळा सोडल्याचा दाखला /गुणपत्रक ७) पासपोर्ट साईज 2 फोटो या कागतपत्रासहित दिनांक 20.07.2024 पर्यंत संस्थेच्या पत्यावर अर्ज करावे. उमेदवाराने ऑफीस ला येऊन स्वतः अर्ज करावा. असे संस्थेचे संचालक, मंगेश देशमुख व प्रशिक्षक, संदीप शेजवळ आणि रेखा वाघमारे हे कळवितात.
संस्थेचा पत्ता :- महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, पहिला मजला, बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग, विद्यापीठ शाखा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, छ.संभाजीनगर.
अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.
ऑफिस मो. 8999577430,
मंगेश देशमुख, संचालक मो. 8888910026, संदीप शेजवळ, प्रशिक्षक मो. 9623844970 रेखा वाघमारे मो.9370911309.
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,(महाबँक-आरसेटी) छ.संभाजीनगर.
पहिला मजला, बँक ऑफ महाराष्ट्र बिल्डिंग, विद्यापीठ शाखा,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर, छ.संभाजीनगर.
email :- mseti.aur@gmail.com फोन नं. 0240-2992501. मो.8999577430
प्रवर्तक
बँक ऑफ महाराष्ट्राचा मार्डेफ ट्रस्ट