देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती सन २०२४-२५
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती/नवबौद्ध विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी अटी व शर्ती :
• महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/नवबौध्द प्रवर्गातील असावा.
• महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ६.०० लाखापेक्षा कमी असावे.
• पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची कमाल वयोमर्यादा २५ वर्षे व पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्ष इतकी असेल.
• अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे. तथापि त्यापुढील वर्षांचे विद्यार्थी अर्ज करू शकतील परंतु त्यांचा विचार प्रथम वर्षांचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास करण्यात येईल.
• विद्यार्थी इ. १० व १२ वी ची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. पदवी अभ्यासक्रमासाठी इ. १२ वीच्या परीक्षेमध्ये किमान ५५% गुण मिळविणे आवश्यक राहील व डायरेक्ट द्वितीय वर्षासाठी प्रवेशीत विद्याथ्यर्थ्यांना डिप्लोमामध्ये ५५% गुण आवश्यक.
• पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेमध्ये किमान ५५% गुण असावेत.
• सदहं शिष्यवृत्ती देश पातळीवरील मान्यताप्राप्त संस्थामधील अभ्यासक्रमासाठी लागू राहिल. संस्थांची यादी संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरातीमधील परिशिष्ठ ‘ब’ नुसार पाहावयास मिळेल.
• वेळोवेळी या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या इतर अटी व शर्ती विद्यार्थ्यांना बंधनकारक असतील.
• या योजनेंअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनास राहील.
• निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.
लाभाचे स्वरूप :
• शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पुर्ण शैक्षणिक शुल्क, परिक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्क, डेव्हलपमेंट फी, इ. देण्यात येईल.
• शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा त्यांच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल.
• शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले वसतिगृह व भोजन शुल्क देण्यात येईल.
• वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेप्रमाणे निर्वाहभत्ता देण्यात येईल.
• प्रवेशीत अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी रु. ५,०००/- व शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण रु. ५,०००/- असे एकूण रु. १०,०००/- प्रत्येक वर्षी देण्यात येईल.
वेबसाइट वरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या कागदपत्रांसह दि. २६/०८/२०२४ पर्यंत सायं. ६.१५ वाजेपर्यंत पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करण्यात यावेत. अर्जाच्या लखोट्यावर देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना अर्ज असा ठळक उल्लेख करण्यात यावा. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या घडामोडी मधील या लिंकवर जाऊन भेट द्यावी.
सदर योजनेची माहिती आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेयर करा.