ऑनलाइन करा अर्ज : एप्रिलपासून सरसकट पाच हजार रुपयांचे मानधन
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेंतर्गत कलाकार व साहित्यिक याचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येत आहे. ही प्रत्यक्ष लाभाची योजना असल्यामुळे, प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) प्रणालीद्वारेच मानधन अदा करण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे.
• काय आहे योजना?
• कलाकार : जे कलाकार १५ वर्षांपेक्षा जास्त काळ कलेच्या क्षेत्रात सादरी- करण करणारे आहेत. ते कलाकार या योजनेसाठी पात्र असतील.
• साहित्यिक – जै साहित्यिक १५ वर्षांपेक्षा जास्त काळ साहित्य क्षेत्रात लेखन करणारे आहेत. केवळ कलाक्षेत्राशी निगडित लेखन / समीक्षा करणारे साहित्यिक या योजनेसाठी पात्र असतील.
• असे असेल मानधन ?
या योजनेंतर्गत कलाकार व साहित्यिक यांचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये एवढे मानधन देण्यात येणार आहेत. त्याचा लाभ कलावंत आणि साहित्यिक यांना मिळणार आहे.
• काय आहे पात्रता ?
* वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षांनी शिथिल असेल. ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे.
* साहित्य व कलाक्षेत्रात दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. कलाकाराचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे, कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी बंधनकारक आहे.
यासंबंधी अधिक माहितीसाठी आपल्या पंचायत समिती कार्यालयात संपर्क साधावा.