मोबाईल मोबाईल मोबाईल… आज जर आपण आपल्या अवतीभोवती बघितलं तर आपल्याला अगदी लहान मुलापासून ते वृध्द मानवाकडे मोबाईल दिसत आहे . ह्या मोबईलच्या अतिवापरामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. खरंच खूप आवश्यक आहे का मोबाईल ? आणि खरंच आपण त्याचा योग्य वापर करतो का? तर हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
तरुण पिढी सोशल मीडियाच्या आहारी का जातात :
सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे लहान मुलं प्रसिद्ध व्यक्तींमुळे प्रभावित होतात आणि सोशल मीडियावरील त्यांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो करतात. तसेच मुलांना आपले इतर मित्र काय करतात हेही जाणून घ्यायचं असतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट रहायचं असतं.
अनेकदा गेम खेळण्यासाठीही मुलांकडून स्मार्ट फोनचा वापर केला जात आहे. मुलांना गेम खेळण्याचे व्यसन लागल्यामुळे ते तासनतास फोनवर घालवत असल्याची अनेक प्रकरणं पाहायला मिळत आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थित असताना हे प्रकार अधिक घडत आहेत.
मोबाईलचा अतिवापर हा आजच्या काळात एक मोठी समस्या बनली आहे. याचा आपल्या शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
शारीरिक आरोग्यवरील दुष्परिणाम:
- डोळ्यांची समस्या: मोबाईलच्या स्क्रीनवरून निघणारे निळे प्रकाश डोळ्यांना नुकसान पोहोचवू शकतो. यामुळे डोळे लाल होणे, डोळ्यात पाणी येणे, डोळे सुजणे आणि दृष्टी कमजोर होण्याचा धोका वाढतो.
- मान आणि पाठ दुखी: मोबाईल वापरताना आपण एकच आसन घेत असतो, ज्यामुळे मान आणि पाठ दुखायला लागते .
- निद्रादोष : मोबाईलच्या स्क्रीनवरून निघणारा प्रकाश आपल्या शरीरातील निद्रा चक्र बिघडवतो, ज्यामुळे निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते.
- तान तनाव आणि चिंता: सोशल मीडियाच्या तुलना आणि अपेक्षा आपल्याला तणावात आणि चिंतेत टाकू शकतात.
- हातांच्या समस्या: मोबाईलचा जास्त वापर केल्याने हातात आणि मनगटात त्रास होतो .
- शारीरिक हालचाल कमी होणे : मोबाईल गेम खेळणे किंवा व्हिडिओ पाहण्यात वेळ घालवल्यामुळे मुले शारीरिक हालचाली कमी करतात यामुळे मेंदूचा विकास मंदावतो.
मानसिक आरोग्यवरील दुष्परिणाम :
- एकाग्रता कमी होणे: मोबाईलच्या निरंतर सूचना आणि विचलनामुळे एकाग्रता कमी होते.
- महत्वाच्या गोष्टींकडून लक्ष हटवणे: मोबाईलच्या व्यसनामुळे आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि महत्त्वाच्या गोष्टींकडून लक्ष हटवू लागतो.
- डिप्रेशन: सोशल मीडियावरील अपूर्णता आणि एकाकीपणा यामुळे डिप्रेशनची समस्या उद्भवू शकते.
- आत्मविश्वास कमी होणे: इतरांच्या आयुष्याची तुलना करून आपला आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
- चिंता आणि तणाव : सोशल मीडियावरील तुलना आणि इतर मानसिक ताणामुळे मुलांमध्ये चिंता आणि तणाव वाढू शकतो.
- एकाकीपणा आणि सामाजिक कौशल्यांचा अभाव : मोबाइल मध्ये खूप वेळ घालवल्यामुळे मुले इतर मुलांशी खेळण्यात कमी वेळ घालवतात, ज्यामुळे त्यांच्यात एकाकीपणा वाढतो आणि सामाजिक कौशल्य विकासित होण्यास अडचण येते .
शैक्षणिक विकासावर परिणाम
- लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होणे :मोबाईल वापरल्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते यामुळे मुलांना अभ्यासात अडचण येऊ शकते.
- लेखन कौशल्य आणि वाचनाची सवय कमी होणे : मोबाईल वर गेम खेळणे किंवा व्हिडीयो पाहणे जास्त आवडते , तसेच पुस्तके वाचने आणि लेखन करन्याचा कंटाळा येऊ लागतो .
- मोबाईल हा आजच्या काळात आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्याचे अनेक फायदे आहेत:
- संपर्क साधण्याचे सोपे माध्यमः मोबाईलमुळे आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी सहज संपर्क साधू शकतो.
- माहितीचा खजिनाः इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला कोणत्याही विषयाची माहिती मिळवता येते.
- मनोरंजनः मोबाईलमध्ये आपण संगीत ऐकू शकतो, चित्रपट पाहू शकतो, खेळ खेळू शकतो आणि अनेक प्रकारचे मनोरंजन करू शकतो.
- कामकाजः मोबाईलमुळे आपण ईमेल पाठवू शकतो, ऑनलाइन बैठका घेऊ शकतो, दस्तऐवज सामायिक करू शकतो आणि अनेक प्रकारचे कामकाज करू शकतो.
- शिक्षणः मोबाईलमध्ये अनेक शैक्षणिक ॲप्स उपलब्ध आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण स्वतःला शिकवू शकतो.
- बैंकिंग: मोबाईल बँकिंगच्या साहाय्याने आपण घरबसल्या बँकेचे सर्व प्रकारचे व्यवहार करू शकतो.
- खरेदी: ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून आपण घरबसल्या कोणतीही वस्तू खरेदी करू शकतो.
- नकाशा आणि दिशाः मोबाईलमध्ये उपलब्ध GPS च्या साहाय्याने आपण कोणत्याही ठिकाणी सहज पोहोचू शकतो.परंतु, मोबाईलचे अतिवापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो. त्यामुळे त्याचा वापर नियंत्रित करणे आवश्यक आहे.
मोबईलचे रेडियशन कसे तपासावे :
वैज्ञानिक संशोधनानुसार, मोबाईल फोनवर बोलत असताना रेडिओ किरण बाहेर पडतात, जे व्यक्तीच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. हे सतत ऐकल्याने कान कमजोर होतात. मेंदूमध्ये चिडचिडेपणा येतो. मोबाईल फोन रात्री उशीजवळ ठेवून झोपू नये, त्यामुळे कर्करोगासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात.
“तुमच्या फोनचे रेडिएशन तपासण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनच्या डायल पॅडवर *#07# टाइप करणे आवश्यक आहे” :
- फोनचा डायल पॅड उघडा.
- *#07# टाइप करा.
- फोनचे SAR मूल्य दर्शविणारा एक पॉप-अप स्क्रीनवर दिसेल.
SAR चे पूर्ण रूप आहे – विशिष्ट शोषण दर. हे मूल्य फोनमधून उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनचे मोजमाप करते. भारतात फोनची रेडिएशन पातळी 1.6 वॅट्स प्रति किलोग्रामपेक्षा जास्त नसावी. जर तुमच्या फोनची किंमत यापेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ तुमचा फोन तुमच्या आरोग्यासाठी चांगला नाही.फोनच्या बॉक्सवर फोनची SAR व्हॅल्यूही लिहिलेली असते.
मोबाईलच्या व्यसनाचे काही लक्षणेः
- मोबाईलशिवाय एक क्षणही रहाणे कठीण वाटणे.
- मोबाईलवर इतका वेळ घालवणे की इतर महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होणे.
- मोबाईल वापरताना अपराधी वाटणे.
- मोबाईलमुळे तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होणे.
- मोबाईलमुळे झोप येण्यात अडचण येणे.
- मोबाईलमुळे तणाव आणि चिंता वाढणे.
मूलं शांत होण्यासाठी मोबाईलवर विडियो दाखवताय थांबा :
मोबाईलवर व्हिडिओ दाखवून मूलं शांत करणे ही चांगली सवय नाही. याचे काही गंभीर परिणाम होऊ शकतात:
- डोळ्यांचे स्वास्थ्य: लहान मुलांचे डोळे अजून पूर्णपणे विकसित झालेले नसतात. मोबाईलची निळी प्रकाशाची किरणे डोळ्यांना नुकसान करू शकतात.
- महिन्यांची वाढ: मोबाईलच्या स्क्रीनकडे बघण्याऐवजी मुलांनी खेळायला, शिकायला आणि इतर शारीरिक क्रिया करायला हव्यात. यामुळे त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ होऊ शकते .
- वर्तन: मोबाईलची व्यसन बनण्याची शक्यता असते. मुलं मोबाईलवरच अवलंबून राहू शकतात आणि इतर गोष्टींमध्ये रस घेणे बंद करू शकतात.
- शिकण्याची क्षमता: मोबाईलवर व्हिडिओ पाहण्यामुळे मुलांची शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
- निद्रा: मोबाईलची निळी प्रकाशाची किरणे मुलांच्या निद्रा चक्रावर परिणाम करू शकतात.
- सामाजिक कौशल्य: मोबाईलवरच वेळ घालवण्यामुळे मुलांना इतर मुलांसोबत खेळायला आणि सामाजिक कौशल्य विकसित करायला कमी वेळ मिळतो.
मुलांना मोबाइल पासून दूर करण्यासाठी इतर काही पर्याय:
- मुलांना कथा वाचून ऐकवणे.
- मुलांसोबत वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणे.
- मुलांना रंगकाम किंवा चित्र काढायला द्या.
- मुलांसोबत गाणे गाणे.
- मुलांना बाहेर खेळायला नेणे.
लक्षात ठेवा: मुलांच्या वाढीसाठी त्यांना आपल्या प्रेमाची आणि लक्ष देण्याची गरज असते. मोबाईलऐवजी आपल्या वेळ देणे हेच मुलांसाठी सर्वात चांगले आहे.
मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी काही उपाय :
- मोबाईल वापरण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करा:
- मोबाईल वापरताना ब्रेक घ्या:
- मोबाईलला शांत ठिकाणी ठेवा:
- सोशल मीडियाचा वापर कमी करा:
- अधिक शारीरिक हालचाल करा:
- मित्रांसोबत वेळ घालवा:
- नवे शौक विकसित करा:
मोबाईल हा एक उपयुक्त साधन आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा वापर नियंत्रित करणे आवश्यक आहे.