प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना :
महाराष्ट्रातील नागरिकांनो,
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत बिजली योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी देशातील लाखो घरांना सौर ऊर्जा पुरवठा करून मोफत वीज उपलब्ध करून देण्याचा उद्देश बाळगते. ही योजना महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये विशेषतः महत्त्वाची आहे कारण राज्य सरकार देखील सौर ऊर्जेच्या विकासास प्रोत्साहन देत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सूर्य घरः मुफ्त बिजली योजनाची घोषणा केली. ही रूफटॉप सोलर योजना आहे. ज्यामध्ये ७५,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे.
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सरकार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल. त्यांना सवलतीच्या दरात बँक कर्जही दिले जाईल. यासाठी एक राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा एकत्रित केल्या जातील, एक प्रकारे हे पोर्टल इंटरफेससारखे कार्य करेल. यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ घेता येईल. या योजनेचा तळागाळात प्रचार करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या भागात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. याशिवाय उत्पन्न वाढवणे, वीज बिल कमी करणे आणि लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
प्रतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना ही भारत सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. रुफटॉप सोलरद्वारे देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली होती.
योजने चा उद्देश :
- सौर ऊर्जेचा प्रसार: महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवून पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देणे.
- वीज बिलात बचत: लाभार्थ्यांना दरमहा निश्चित प्रमाणात मोफत वीज मिळाल्याने त्यांच्या वीज बिलात मोठी बचत होईल.
- ऊर्जा स्वावलंबन: महाराष्ट्राला ऊर्जा स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने पाऊल उचलणे.
- ग्रामीण विकास: ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छ आणि सस्ती वीज उपलब्ध करून देणे.
महाराष्ट्रात या योजनेचे फायदे:
महाराष्ट्रात या योजनेचे फायदे :
- सौर पॅनल्सवरील मोठी सबसिडी: राज्य सरकार केंद्र सरकारच्या सबसिडीसोबत अतिरिक्त सबसिडी देऊ शकते.
- विशिष्ट योजना: महाराष्ट्र सरकारने या योजनेला पूरक अशा स्वतःच्या योजना सुरू केल्या असतील.
- सूर्यप्रकाश: महाराष्ट्रात वर्षभर पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौर ऊर्जा उत्पादन अधिक प्रभावी होईल.
योजनेसाठी काय आहे पात्रता :
योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे. तुमच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉप सिस्टम बसवण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. तुम्हाला योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे आणि आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय असला पाहिजे
- सराकरी कर्मचाऱ्यांना या योनजेचा लाभ घेता येणार नाही.
- वार्षिक उत्पन्न १ लाख ५० हजारांपेक्षा जास्त असू नये.
- योजनेच्या लाभासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करता आली पाहिजे.
अनुदान किती?
या योजनेंतर्गत १ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ३० हजारांचे अनुदान मिळणार आहे. तर २ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी ६० हजार आणि ३ किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टिमसाठी लावणाऱ्या कुटुंबांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
महत्त्वाची कागदपत्रे
- रेशन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- आधार कार्ड
- वीज बील
- रहिवाशी दाखला
- बँक खात्याचा तपशील (पासबुक)
- मोबाईल क्रमांक
- पासपोर्ट आकारचे फोटो
योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा? :
योजनेसाठी अर्ज कसा व कुठे करायचा?
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? आणि कुठे करायचा? योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एजंटकडे जाण्याची गरज नाही. घरबसल्या ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता. पुढील पध्दतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम पंतप्रधान सूर्य घर योजनेच्या https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- त्यानंतर होमपेजवर Apply for Rooftop Solar या टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर आता तुमच्या समोर नवे पेज ओपन होईल. ज्यावर राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनी आणि वीज ग्राहक क्रमांक टाकून Next बटणावर क्लिक करा.
- आता तुमच्या पुढे आलेल्या नव्या पेजवर नोंदणी अर्जाचा नुमना येईल. त्यावर आवश्यक ती सर्व माहिती भरून आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
- शेवटी Submit बटणावर क्लिक केल्यावर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अर्ज सबमिट झाल्यानंतरची पडताळणी :
- अर्ज सबमिट करा: आपला अर्ज सबमिट करा आणि अर्ज क्रमांक नोट करा.
- दस्तऐवजांची पडताळणी: अधिकारी तुमचे दस्तऐवज तपासतील.
- स्थान निरीक्षण: तुमच्या घराची पाहणी करून सौर पॅनल्स बसवण्यासाठी योग्य जागा निश्चित केली जाईल.
- सौर पॅनल्सची स्थापना: निश्चित केलेल्या जागेवर सौर पॅनल्स बसवले जातील.
- कनेक्शन: तुमच्या घराचे वीज ग्रिडशी कनेक्शन केले जाईल.
नोटः योजनांची तपशीलवार माहिती आणि पात्रता निकष वेळोवेळी बदलु शकतात. अद्ययावत माहितीसाठी, कृपया संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
सौर ऊर्जा आपल्या भविष्यासाठी एक उज्वल पर्याय आहे. या योजनेचा लाभ घेऊन आपण स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जाचा आनंद घेऊ शकता.अशा प्रकारे तुम्ही पंतप्रधान सूर्य घर योजनेसाठी अर्ज करू शकता. ही माहिती तुमच्यासाठी आवश्यक नसल्यास गरजूंपर्यंत पोहचवा.