कापसाचा बाजार भाव : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही यंदाच्या हंगामात कापूस पिकाची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. खरं तर ज्या शेतकन्यांनी बंडा कापसाची लागवड केली आहे त्या तयांच्या माध्यमातून यदा कसा बाजार भाव कसे राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कापसाचा दर हा सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. शासकीय खरेदी उशिराने सुरू झाल्याने बाजारात कापसाला कमी दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कापसाला यंदा तरी चांगला भाव मिळणार का, हा प्रश्न उभा राहिला आहे.
सद्याच्या हंगामात कापसाची आवक बाजारात सुरू झाली असून, उत्तर भारत, गुजरात, दक्षिण भारतातील काही बाजारांमध्ये कापसाची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या हंगामात कापसाच्या उत्पादनाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. विशेषतः गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कापसाच्या पिकावर गंभीर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.उद्योगांचे मत होते की, पाऊस चांगला झाल्यामुळे उत्पादनाला फारसा फटका बसणार नाही, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती याच्या विपरीत आहे.हंगामाच्या सुरुवातीला कापसाच्या किंमती हमीभावापेक्षा कमी असायच्या, मात्र यंदा त्यात बदल झाला आहे. हमीभावाजवळच कापसाला भाव मिळत आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे देशांतर्गत कापसाच्या वापरात वाढ आणि पिकाच्या उत्पादनात घट.
कपाशी पीक आणि यंदाची स्थिती:
कपाशी हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आणि सततच्या पावसामुळे बोंडसड झाली आहे.
यावर्षी उत्पादन घटण्याची शक्यता आहे.वेचणीसाठी मजुरांची मोठी कमतरता भासत आहे.शासकीय खरेदीचे केंद्र आणि प्रक्रिया : केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळ (CCI) ने काही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू केली आहेत. मात्र, अनेक तालुक्यांमध्ये अजूनही केंद्र सुरू झालेली नाहीत.
कापूस विक्रीसाठी चांगल्या पर्यायांची गरज शेतकरी उत्पादक संघटनांनी (FPO) पुढाकार घ्यावा. शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावा. शासकीय खरेदी लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावी.
सरकीचे दर घसरले तर कापसाचे दर कमी होणार:
■ कापसाचे दर निश्चित करताना जागतिक बाजारात कापसाला मिळणाऱ्या दरावरही स्थानिक बाजारपेठेतील कापसाचे दर विसंबून असतात. यामध्ये सरकीचे दर कमी अधिक झाले तर त्याचा परिणामही कापसाच्या दरावर होतो. यावर्षी तीन हजार ते साडेतीन हजार रुपये क्विंटल दराने सरकी विकल्या जात आहे. यापासून ढेप तयार होते.
■ पशुखाद्य म्हणून याचा वापर होतो. सरकीच्या दरामध्ये घसरण झाली तर कापूस साडेसात हजारांच्या खाली येण्याचा धोका आहे. अशावेळी कापसाचे हमी केंद्र असेल तरच शेतकऱ्यांना त्याचा मोठा आधार होणार आहे. यासाठी कापूस बाजारपेठेत येण्यापूर्वी हमी केंद्र उघडण्याची नितांत आवश्यकता आहे.
जागतिक वापर :
कापूस आयतदार: कच्च्या आणि तयार उत्पादनांमध्ये मजबूत व्यापारासह कापूस ही जागतिक वस्तू आहे. जगातील बहुतेक कापूस अंतिम वापराच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडतो आणि कापसाच्या व्यापार आणि विपणनावर परिणाम करणारे घटक दूरगामी परिणाम करतात.
2001 मध्ये चीन जागतिक व्यापार संघटनेत (WTO) सामील झाल्यापासून, कापड उत्पादन हा त्याच्या आर्थिक विकासाचा मुख्य घटक आहे. माझ्या 2010 च्या सुरुवातीपासून, चीन सरकारने कापड उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी कापसाचे धोरणात्मक साठे तयार केले. यामुळे, इतर धोरणांबरोबरच, विदेशी कापसाची मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाली आणि चीन जगातील प्रमुख कापूस आयातदार बनला. तथापि, चीनने MAY 2014 मध्ये हे उपाय टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात केली आणि इतर देशांच्या बरोबरीने आयात पातळी आणून त्याचा साठा विकला. चीन व्यतिरिक्त, बांगलादेश आणि व्हिएतनाम या प्रमुख आयातदारांचा समावेश आहे, जेथे कापूस कापड आणि वस्त्र उत्पादनाचा विस्तार झाला आहे.
कापूस निर्यातदार देश : युनायटेड स्टेट्स देखील कापूस मालाच्या जागतिक व्यापारात एक प्रमुख खेळाडू आहे. युनायटेड स्टेट्स आपल्या कच्च्या कापूस फायबरचा बराचसा भाग निर्यात करत असताना, ते आपल्या कापड आणि पोशाख उत्पादनांची मोठ्या प्रमाणात आयात करते, चीन, भारत आणि बांग्लादेश हे यूएस कापूस उत्पादनाच्या 50 टक्क्यांहून अधिक आयात करतात. जरी खूपच कमी प्रमाणात असले तरी, यूएस कापूस उत्पादनांची निर्यात-प्रामुख्याने सूत आणि फॅब्रिक- देखील जागतिक व्यापारात भूमिका बजावतात.
कापसाचे भविष्य काय :
कापूस उद्योगाचे भवितव्य शाश्वततेशीही घट्ट जोडलेले आहे. आजकाल ग्राहक पर्यावरणाच्या प्रभावाबाबत जागरूक आहेत, म्हणूनच शाश्वत शेती पद्धती, पुनर्वापर, सेंद्रिय कापूस आणि बेटर कॉटन इनिशिएटिव्ह (BCI) सारखे उपक्रम लक्ष वेधून घेत आहेत.
यावर्षी कापसाला मिळणार किती हजार रुपये प्रतिक्विंटल भाव? जाणून घ्या :
शेतकऱ्यांना या हंगामात कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा अशी आशा दोन वर्षापूर्वी कापसाला दहा हजार रुपये भाव मिळाला त्यामुळे यंदाही कापसाला विक्रमी दर मिळावा अशी अपेक्षा सेतकन्यांना आहे. दरम्यान बाजार अभ्यासकांनी पंदा कापसाला किती भाता मिळणार या संदर्भात अंदाज वर्तवला यंदा कापसाचा हंगाम शेतक-यांसाठी चांगला राहणार आहे असा अंदाज तजांनी दिला आहे.
मात्र जागतिक परिस्थिती गुजरात व तेलंगाना मधील परिस्थिती व सर्व गोष्टीचा विचार केला तर यंदाही कापसाचे दर दहा हजारापर्यंत जाणार नसल्याचे समोर येत यंदा कापसाचे भाव साडेआठ हजार रुपयांच्या आसपास राहतील अशी शक्यता बाजार अभ्यासक यानी वर्तवली आहे.
त्यामुळे जर तुम्ही देखील कापसाची लागवड केली असेल तर गेल्या वर्षीच्या कापसाच्या दरापेक्षा यंदा कापसाला जास्त भाव मिळणार आहे. मात्र कापसाच्या मेननव्यात कापसाला किती भाव मिळतोय, कापसाची आवक वाढल्यानंतर कापसाचे बाजार भाव कसे राहतील हे पाहण्यासारखे राहणार आहे.