तयारीला लागा…राज्यात सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होणार आहे.

सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच पोलिस भरतीची मैदानी चाचणी सुरु होणार आहे. साधारणपणे १५ सप्टेंबरनंतरच पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे.

यंदा पोलिस भरतीमध्ये (Police Bharti 2025) एकूण १० हजार पदे भरली जाणार आहे. राज्यात गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच पोलिस भरती होणार आहे. ६ सप्टेंबरला गणपती विसर्जन होतील.त्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्याचे नियोजन गृह विभागाने केलं आहे.यंदा १० हजार पोलिस भरतीसाठी १२ ते १३ लाख अर्ज येऊ शकतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने सध्या पोलिस भरती घेतली जाऊ शकणार नाही. पावसामुळे मैदानी चाचणी घेता येणार नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्येच ही भरती घेण्यात येणार आहे.मागच्या वर्षी २०२४ मध्ये पोलिस भरतीच्या १७ हजार जागांसाठी १७ लाख अर्ज आले होत. दरम्यान, आताही काही लाखांमध्ये अर्ज येण्याची शक्यता आहे.

एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र :-

राज्यातील प्रत्येक उमेदवारास पोलिस भरतीतील एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे. त्याशिवाय जास्त भरलेले उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, एखाद्या जिल्ह्यात अर्ज केलेला उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यातील भरतीला नजरचुकीने हजर राहिला असेल व तो त्याठिकाणी मैदानी चाचणीत पात्र जरी ठरला, तरी त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल अपात्र ठरविण्यात येईल, असा भरतीचा महत्त्वाचा निकष असणार आहे.

पोलिस भरतीचे निकष:-

पोलिस भरतीमध्ये एका पदासाठी एकाच ठिकाणी अर्ज करायचे आहे. जर तुम्ही जास्त अर्ज भरले तर ते बाद करण्यात येईल. दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल उमेदवाराला बाद ठरवण्यात येईल. जर एखादा उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात उपस्थित राहिला तर त्याला दोन ठिकाणी अर्ज केल्याबद्दल चाचणी देता येणार नाही. या भरतीसाठी ४ महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची पोलिसांची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. पण, सध्याचा कडक उन्हाळा आणि जूनमध्ये सुरू होणारा पावसाळा, यामुळे पोलिस भरतीची मैदानी चाचणी गणेशोत्सवानंतरच म्हणजे साधारणतः १५ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. २०२४ आणि डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची एकूण १० हजार पदांची भरती यावेळी होईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी दहा हजार पोलिस भरतीसाठी राज्यभरातून अंदाजे १२ ते १३ लाख अर्ज अपेक्षितआहेत. सध्या तापमान खूप असल्याने आणि पुढे पावररामुळे मैदानी चाचणी घेता येत नसल्याने गणेश विसर्जनानंतर भरती सुरू केली जाणार आहे. सुरवातीला मैदानी आणि शेवटी लेखी परीक्षा होईल.

पोलिस भरती लांबण्याची शक्यता असू शकते?

उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे पोलीस भरती लांबण्याची शक्यता आहे राज्यातील 10000 पोलिसांची भरती 15 सप्टेंबर पासून होणार असल्याचं देखील कळतंय याशिवाय जर बघितलं तर ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय तर गृह विभागाने 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंतची रिक्त पद भरण्यास मान्यता दिली असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय मात्र सध्या उन्हाळा आणि जून मध्ये सुरू होणारा पावसाळा त्यामुळे भरती पुढे ढकलण्यात आली आहे.

ही माहिती राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील सूत्रांनी दिली असल्याचं बघायला मिळतंय एकंदरीत जर आपण बघितलं तर आता भरती संदर्भात ही मोठी माहिती आता समोर आलेली आहे 15 सप्टेंबर पासून भरती सुरू होणार आहे पोलीस भरती लांबली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळेल आणि आपण जर पाहिलं तर उन्हाळा आणि पावसाळ्यामुळे ही भरती लांबनार असल्याचं एकंदरीत बघायला मिळतंय अनेकांना खरंतर पोलीस भरती कधी होणार असा प्रश्न आहे आणि असं असताना ही भरती लांबली असल्याचं सध्या सांगितलं जातंय ही माहिती निश्चितच महत्वाची म्हणावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *