भारतात ई पासपोर्ट लॉंच जाणून घ्या सविस्तर..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

भारतात आता ईपासपोर्ट लॉन्च झालेला आहे. हा ई पासपोर्ट म्हणजे नेमकं काय? तो कुठून काढायचा? त्याचे फायदे व वैशिष्ट्य नेमकी काय आहेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेणार आहोत.
त्याचबरोबर ज्यांच्याकडे जुना पासपोर्ट आहे त्यांनी नेमकं काय करायचं त्यांना हा पासपोर्ट काढणं बंधनकारक आहेच का आणि जर ई पासपोर्ट नवीन नाही काढला तर काय होईल याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेणार आहोत भारतात ईपासपोर्ट लॉन्च झालेला आहे. आता यापुढे आपण या ईपासपोर्टची वैशिष्ट्ये त्याचे फायदे तो कसा आहे हे पाहणारच आहोत. तत्पूर्वी या ई पासपोर्ट जो लॉन्च झालेला आहे त्याची सर्विस भारतामध्ये सध्या काही शहरांमध्येच उपलब्ध आहे.
नागपूर, भुवनेश्वर, जम्मू, गोवा, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, चेन्नई, हैदराबाद, सुरत आणि रांची या शहरांमध्ये सध्या ई पासपोर्ट तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे आणि भविष्यात आणखी भरपूर शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. आता आपण पाहूया की हा ईपासपोर्ट नेमका कसा दिसतो तर या ई पासपोर्टच एक वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये एक आरएफ आयडी चिप या कव्हरवर आहे म्हणजेच ई पासपोर्ट मध्ये एक विशेष आरएफ आयडी चिप आणि अँटेना असतो तो कव्हर खाली असलेल्या सोनेरी चिन्हाद्वारे ओळखता येतो.
ई पासपोर्ट सामान्य पासपोर्ट पेक्षा वेगळा दिसतो आणि त्यात प्रगत सुरक्षा तंत्रज्ञानाचाही सुद्धा समावेश केलेला आहे आणि याच आरएफआयडी चिपमुळे अँटीनामुळे आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे हा ईपासपोर्ट आता अधिक सुरक्षित आणि सिक्युअर झालेला आहे.

ई पासपोर्ट म्हणजे काय?

प्रवास करायचा असेल तर आपल्याला लागतो पासपोर्ट एखाद्या देशाचे आपण नागरिक असल्याची ही ओळख असते भारतामध्ये आता पासपोर्ट सेवा प्रोग्राम 2.o या मोहिमेंतर्गत ई पासपोर्ट द्यायला सुरुवात झाली आहे पण ई पासपोर्ट म्हणजे नेमकं काय तो नेहमीच्या म्हणजे या पासपोर्ट पेक्षा वेगळा असतो का? या प्रकरणातील सोपी गोष्ट मध्ये सगळ्यात आधी ई पासपोर्ट म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक पासवर्ड कागदी पासपोर्ट आणि इलेक्ट्रॉनिक पासपोर्ट याचा हे कॉम्बिनेशन आहे. या पासपोर्ट मध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन म्हणजेच आर एफ आय डी ही चीफ असेल आणि पासपोर्टच्याआत बसवण्यात आलेला एम्बेड अँटिना असेल पासपोर्ट धारकाचे वैयक्तिक तपशील म्हणजेच नाव जन्मतारीख पासपोर्ट नंबर बायोमेट्रिक माहिती म्हणजे फेस रेकग्नेशन साठीचा डेटा बोटांचे ठसे म्हणजेच फिंगरप्रिंट्स ही सगळी माहिती या चीप मध्ये असेल आता असणारे कागदी पासपोर्ट आणि ई पासपोर्ट यामध्ये दिसायला फरक असेल ई पासपोर्टच्या पुढच्या कव्हरच्या खालच्या बाजूला एक सोनेरी रंगाचा चिन्ह असेल शिवाय विविध देशांचे विजा स्थान करण्यासाठी या ई पासपोर्ट मध्ये पाने असतील.

जुना पासपोर्ट असेल तर त्याचे काय ?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांच्याकडे जुना पासपोर्ट आहे त्यांनी हा ईपासपोर्ट काढणं गरजेचं आहे का आणि जर नाही काढला तर काय होईल? तर जरी आपल्याकडे ई पासपोर्ट सुरू झाला असला तरी प्रत्येकाने नवीन पासपोर्ट बनवणे आवश्यक नाही. ज्यांच्याकडे जुने पासपोर्ट आहेत त्यांच्यासाठी ते त्यांच्या मुदतीपर्यंत पूर्ण वैद राहतील. म्हणजेच तुम्ही जर जुना पासपोर्ट काढलेला असेल तर त्याच्यावर त्याच्या एक्सपायरी डेट आहे तर त्या डेट पर्यंत तो वैध राहील आणि त्यानंतर तुम्हाला मात्र ई पासपोर्ट काढावा लागेल.

मग तुमच्याकडे आता असणाऱ्या पासपोर्टचं काय होईल तो इन्व्हॉलेट म्हणजे बाद झालाय का? तर अजिबात नाही तुमच्याकडे आता असणारा साधा पासपोर्ट अजूनही वळते तो लगेचच बदलण्याची गरजही नाहीये. प्रत्येक पासपोर्टवर तो कोणत्या तारखेपर्यंत वाईट आहे याची तारीख म्हणजेच व्हॅलिडीटी एक्सपायरी डेट असते यानंतर तुम्हाला पासपोर्ट रिन्यू करायला लागतो त्यामुळे तुमच्याकडे आता असणारा पासपोर्ट तुमच्या पासपोर्टवरच्या या तारखेपर्यंत म्हणजे जेव्हा तुम्ही पासपोर्ट रिन्यू करायला जाल तोपर्यंत तुमचा पासपोर्ट केंद्र पासपोर्ट सेवा द्यायला लागलेलं असेल तुम्हालाही ई पासपोर्ट मिळेल यासाठी कोणतीही वेगळी प्रक्रिया करावी लागणार नाहीये पासपोर्ट सेवा वेबसाईट द्वारे तुम्हाला यासाठी अर्ज करता येईल

पासपोर्टचे नेमके फायदे व वैशिष्टे काय आहेत:

आता या ई पासपोर्टचे नेमके फायदे काय आहेत तर मजबूत सुरक्षा म्हणजेच पीकेआय तंत्रज्ञान वापरलेला आहे आरएफ आयडी आणि अँटीना ह्याच्यामध्ये असल्यामुळे ्याची सुरक्षा मजबूत आहे बनावट पासपोर्ट तयार करण्याची शक्यता खूप कमी इथे होऊन जाते म्हणजेच या प्रगत तंत्रज्ञानामुळे कोणीही इथे बनावट पासपोर्ट तयार करू शकत नाही. आणि आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार याचा आता डिझाईन केलेला आहे. अशापकारे हा नवीन लॉन्च झालेला ई पासपोर्ट आहे त्याचे वैशिष्ट्य त्याचे फायदे तो नेमका कसा आहे याची माहिती आपण घेतली त्याचबरोबर जुना पासपोर्ट आहे त्यांनी काय केलं पाहिजे याचीही माहिती आपण घेतली. आता एक पाहूया की या ईपासपोर्टचा नेमकं वैशिष्ट्य काय आहे? तर ईपासपोर्ट मध्ये पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच पीकेआय तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या तंत्रज्ञानामुळे पासपोर्ट धारकाची वैयक्तिक आणि बायोमेट्रिक माहिती पूर्णपणे सुरक्षित राहते.

इंटरनॅशनल सिविल एव्हिएशन ऑर्गनायझेशन म्हणजेच आयसीएओ ठरवलेल्या नियमानुसार भारतात असे हे नवे ई पासपोर्ट असतील या पासपोर्ट मध्ये सिक्युरिटी फीचर्स काय असतील तर बेसिक ॲक्सेस कंट्रोल म्हणजेच ठराविक उपकरण वापरूनच पासपोर्ट चिप्स स्कॅन करता येईल इतर कोणत्याही गॅजेट्सने या चिप्स स्कॅन होणार नाहीयेत पैसे म्हणजे साठवलेली माहिती ही तपासलेली असेल आणि या माहिती सोबत छेडछाड बदल करता येणार नाहीत हाताच्या बोटांचे ठसे माहिती असल्यानं त्यासाठी अधिकची सुरक्षा म्हणजेच एडल्ट सेक्युरिटी लेयर असेल मग या ई पासपोर्टमुळे फायदा काय होईल तर यात आताच्या पासपोर्ट पेक्षा सेक्युरिटी फीचर्स अधिक असतील म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं नाव ओळख दुसऱ्या कोणी चोरण्याची शक्यता कमी होईल कारण फिंगरप्रिंट्स स्पेशल जुळल्याशिवाय पासपोर्टचा वापर करता येणार नाही बोगस पासपोर्ट तयार करता येणार नाही शिवाय आंतरराष्ट्रीय मानकरानुसार हा पासपोर्ट तयार करण्यात आल्यानं जगभरातल्या सगळ्या विमानतळावर तो आरामात वापरता येईल आताच्या घडीला इमिग्रेशनच्या तपासणीला वेळ लागतो पण ई पासपोर्टमुळे हे व्हेरिफिकेशन पटापट होय त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लागणारा इमिग्रेशन साठीचा वेळ आणि रांगा कमी होतील आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आता अनेक देश वेरिफिकेशन साठी बायोमेट्रिक प्रणालीची मदत घेतात त्यामुळेच ई पासपोर्ट असणाऱ्या भारतीय प्रवाशांनाही याचा फायदा होईल

ई पासपोर्ट केव्हापासून सुरू करण्यात आला.

ई पासपोर्टचा पायलेट प्रोजेक्ट म्हणजे चाचणी सुरू झाली एप्रिल 2024 मध्ये भुवनेश्वर आणि नागपूर या दोन शहरांमध्ये 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुमारे 80 हजार पासपोर्ट देण्यात आल्यात आता नागपूर आणि भुवनेश्वर या शहरांसोबतच जम्मू गोवा सिमला रायपूर अमृतसर जयपुर चेन्नई हैदराबाद सुरत आणि रांची या शहरांमधली पासपोर्ट ऑफिसर सुद्धा ई पासपोर्ट देतात जगभरात सगळीकडे विस्तार केला जाणारे नाशिक मधल्या सिक्युरिटी प्रेस मध्ये या ई पासपोर्टची निर्मिती केली जाते माहिती सुरक्षित राहणं आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *