राष्ट्रवादीच्या नेत्याच्या सुनेने पुण्यामध्ये आत्महत्या केलेली हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेला छळ असह्य झाल्याने वैष्णवी हगवणेन आत्महत्या केली वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात नक्की काय समोर आलं आणि या प्रकरणामध्ये आतापर्यंत नक्की काय काय घडलय पाहूयात आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे काळजाला पीळ पाडणारा हा आक्रोश आहे वैष्णवीच्या आईचा डोळ्यात हजारो स्वप्न घेऊन जगणाऱ्या वैष्णवीन आयुष्य संपवलं आणि त्याला कारण ठरलाय हुंडा नावाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष असलेला राजेंद्र हगवणेचा मुलगा
शशांक सोबत 2023 मध्ये वैष्णवीच लव्ह मॅरेज झालं मात्र लग्न झालं आणि प्रेम संपलं आणि सुरू झाला हुंड्यासाठीचा छळ कधी आई वडिलांकडे तर कधी आपल्या सहा महिन्यांच्या बाळाकडे पहात जगत हा छळ सहन करणाऱ्या वैष्णवीच्या यातनांचा अंत अखेर मृत्यून केला. वैष्णवीचा जाज मृत्यूपूर्वी मैत्रिणी सोबतच्या संवादातून समोर आलाय. मण तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की तू कसली घाणरडी एखाद्याच्या घराच वाटवळ करते माझ्या म्हणजे शशांक सोबत पण कधी लॉयल नव्हतीस तू असं तसं म्हणे तू फालतू आहे तू घाणरडी आहे माझा नवरा मला एवढं छळतोय एवढ आश्चर्य वाटतय की माझा नवराच माझा कधी नाही झाला, या गोष्टीच जास्त वाईट वाटतय धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या मृत्यूनंतर आम्हीच तिला मारून टाकल्याची कबूली राजेंद्र हगवणेन तिच्या वडिलांसमोरच दिल्याचं एफआयआर मधून समोर आलय. एप्रिल 2023 मध्ये हगवणे कुटुंबाला हुंडा म्हणून 51 तोळे सोन देण्यात आलं फॉर्चुनर गाडी आणि सात किलो चांदीची भांडी दिली.
ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवीने गरोदर असल्याचं सांगताच बाळ माझं नाही दुसरंच कोणाचं असेल असं शशांकन वक्तव्य केल आणि घरातून चालती हो म्हणत वैष्णवीला मारहाण केली. नोव्हेंबर 2023 मध्ये सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीन आत्महत्येचा प्रयत्न केला. 15 दिवसांनी शशांक हगवणेन जमीन घेण्यासाठी दोन कोटींची मागणी केली. पैसे न दिल्याने वैष्णवीचा छळ सुरू झाला.
किरकोळ कारणांवरन पती, सासू ननंद आणि सासऱ्याकडन वारंवार वैष्णवीला मारहाण. 16 मे 2025 रोजी शशांक हगवणेन फोन करून वैष्णवीन फाशी घेतल्याचं सांगितलं वैष्णवीच्या मृत्यूबाबत शशांक आणि राजेंद्र हगावणीकडे विचारणा करण्यात आली. तर तू पैसे दिले नाही मग फुकट नांदवायची का म्हणून मारून टाकल्याची कबूली दिली आहे. हगवणे हे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मोठं कुटुंब असल्यान तिच्या लग्नाला होकार दिला.
काय आहे वैष्णवीच्या आई वाडीलांचे मत :
सासरच्यानी 50 तोळ सोन फॉर्चुनर गाडी मागितली मृत वैष्णवी हगवणेच्या वडिलांची ही माहिती लग्नाच्या सहा महिन्यातच वैष्णवीच्या सासून चांदीची भांडी मागितली असं तिच्या वडिलांकडून सांगण्यात येत. दिवसभर टॉर्चर करून मुलीचा जीव घेतला असंही तिच्या वडिलांनी म्हटल. मुलीला बाळासह दिवसभर उन्हात उभं केलं होतं मृत्यूच्या तीन दिवस आधीपासून मुलीच्या सासरी वाद सुरू होता असंही वडिलांकडून कळतय. वैष्णवी नवरा शशांक सासू सासरे नंदेकडून होणारा जाच सहन करत राहिली.अगदी गरोदर असताना सुद्धा पण जेव्हा तिची सहनशक्ती संपली, तेव्हा तिन स्वतःलाही संपवण्याच पाऊल उचललं आपल्या आठ महिन्यांच्या मुलाला सोडून गेली.
कोण कोण आहेत अटक:
या प्रकरणात आता तिघे अटकेत आहेत. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा दुसरा मुलगा सुशील अजूनही फरार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैष्णवीच्या पोस्टमॉटम अहवालात तिचा मृत्यू गळा दाबून झाल्याचं निष्पन्न झालय.तिच्या शरीरावरती मारहाणीचे अनेक डाळ ढाळलेत. विषात झाली का याचा तपास देखील सुरू आहे आणि याच पोस्टमॉर्टम अहवालामुळे आमच्या मुलीन आत्महत्या नाही केली तिची हत्या केली आहे असं कसपटे कुटुंबीयांच म्हणण आहे. या प्रकरणी आता बावधान पोलीस अधिकचा तपास करतायत. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने देखील गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिलेत. आयोगाचे अध्यक्ष विजय राहाडकर यांनी पोलीस महासंचालकांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याची देखील मागणी केली आहे. आता या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येतायत आणि राजेंद्र हगवणे आणि यासोबतच सुशील हगवण यांना अटक होती का हे पाहणं देखील तितकच महत्त्वाचं ठरेल.
मात्र आता पश्चाताप होत असल्याचं नातेवाईकांनी म्हटलेल आहे. एवढंच नाही तर तिच्या सहा महिन्यांच्या बाळाचाही ठाव ठिकाणा लागत नसल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलंय. तर हा हुंडाबळीचा प्रकार असल्याने वैष्णवीच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी वैष्णवीच्या मामान केलेली आहे. विवाहित महिला होती तिचा बळी गेलाय आणि या प्रकरणातील दोषींवर अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केली आहे.
मोठ्या सूणे सोबत काय घडले:
या प्रकरणात जस जशा काही गोष्टी समोर येतायत तस तशा पोलीस तपासावरही प्रश्न उपस्थित होतायत. कारण ज्याप्रमाणे वैष्णवीचा अमानुष छळ झाला तसाच छळ त्यांच्या मोठ्या सुनेचाही झाला होता. मयुरी हगवणे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा सुशील याची पत्नी मयुरीन 6 नोव्हेंबर 2024 मध्ये पौड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती.
ज्यात तिने सासू लता हगवणे ननंद करिश्मा हगवणे आणि आत्महत्या केलेल्या वैष्णवीचा नवरा शशांक याच्या विरोधात मारहाण छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. आणि यासोबतच सासरे राजेंद्र हगवणे यांच्यावरती विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये मयुरीने सांगितलं होतं की 5 नोव्हेंबर 2025 ला संध्याकाळी सासू लता या फोनवरती मोठमोठ्याने बोलत होत्या. मयुरीचा नवरा सुशील हा वॉशिंग सेंटरवरती होता जो त्यांच्याच मालकीचा आहे. वॉशिंग सेंटरच्या पैशावरून लता बोलत असल्याचा अंदाज मयुरीला आला. फोन ठेवल्यावरती लता मयुरीच्या रूमकडे येऊन म्हणाल्या की वाटोळ केल आमच्या घराच या पोरीन असं म्हणत शिवीगाळ करत तिला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर तिची ननंद करिश्मा सुद्धा तिथे आली आणि तिला घाणरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करत मारायला सुरुवात केली.
यानंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दिल शशांत यांनी देखील मयुरीला शिवीगाळ करत तिचे केस ओढून मारहाण करायला सुरुवात केली. किळसना प्रकार म्हणजे मयुरीचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी मयुरीच्या अप्पर बॉडीला हात लावत तिचे कपडे फाडून मनाला लज्जा येईल असं कृत्य केलं तिला या सगळ्यांनी काळीनिळी पडेपर्यंत मारहाण केली. यादरम्यान शशांकन तिचा मोबाईल फेकून दिला त्यानंतर जेव्हा मयुरी आपल्या खोलीत गेली तेव्हा तिच्या रूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं होतं तिचे दागिने पडत नव्हते एवढेच नाही तर ठेवलेले पैसे देखील नव्हते. तेव्हा मयुरीला सासूता आणि
करिश्मान हे पैसे आणि दागिने घेतल्याचा संशय आला. त्यानंतर तिन तक्रार दाखल केली. या घटनेवरून हगवण्याच्या घरात दुसऱ्यांच्या लेकी बाईला किती घाणरडी वागणूक दिली जात होती याचा प्रत्यय येतो. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरती माहिती देताना म्हटलं की हगवण यांच्या घरात सतत मारहाणीची प्रकरण समोर येत होती.
वैष्णवीन या प्रकरणी कधी तक्रार दाखल केली नाही पण मयुरी जी त्यांची मोठी सून होती यांनी याआधी बऱ्याचदा तक्रार दाखल केली. पण नंतर जेव्हा पोलीस संगणमताचा प्रयत्न करतात तेव्हा मयुरी माघार घेत होती. प्रकरण भांडण तिथेच मिटत होती. मात्र 7 नोव्हेंबरला जेव्हा तक्रार दाखल केली तेव्हा तिची तक्रारची दखल घेतली गेली होती. पण राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते त्यामुळे पोलिसांवरती राजकीय दबाव हा होताच त्यामुळे पुढे याचा तपास काही झाला नाही.यानंतर मयुरीन तर हगवण्यांच घर सोडून निघून गेली पण वैष्णवी सगळं सहन करत राहिली.