मान्सूनने यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर पदार्पणाचा एक नवा आयाम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रभाव मंदावल्याने मान्सूनची पुढील चाल अळखडणार आहे. पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद, भवानी पटना, पुरी आणि बालूरघाट भागात होती. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. मात्र मान्सून पुढील दोन दिवसात पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या काही भागात प्रगती करेल असा अंदाज हवामान विभागाने दिलय. 6 ते 12 जून पर्यंत देशाच्या बहुतांश भागात पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय.
महाराष्ट्राचा विचार करता 31 मे ते 5 जून या कालावधीत कोकण विदर्भात सरासरी पेक्षा अधिक मध्य महाराष्ट्रात सरासरी इतका तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 6 ते 12 जून या कालावधीत देशाच्या बहुतांश भागात पावसात खंड पडणार असून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसात तूट पडणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.
यंदा अंदमान, निकोबार बेटांसह केरळ आणि महाराष्ट्रात मानसूनने अतिशय वेगाने प्रगती केली. साधारणतः जून मध्ये पोहोचणाऱ्या मान्सूनने यंदा मे महिन्यातच महाराष्ट्रासह देशाच्या बऱ्याच भागात मजल मारली आहे. मान्सूनने दक्षिण भारतासह महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिसा, पूर्वोत्तर राज्य आणि सिक्कीम, पश्चिम बंगालच्या काही भागापर्यंत धडक दिली आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट पाहावी लागण्याची चिन्ह आहेत.
मे महिन्यात पूर्वमोसमी पावसाने तडाका दिला अरबी समुद्रा आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे उत्तर भारतातील पश्चिम चक्रावतांचा मध्य भारतापर्यंत दिसून आलेला प्रभाव यातच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून झालेला बाष्पाचा पुरवठा यामुळे मे महिन्यात महाराष्ट्रसह देशात प्रथमच विक्रमी पाऊस कोसळला.
पेरणीची घाई करू नका शेतकाऱ्यांसाठी सल्ला:
महाराष्ट्रमध्ये 10 जून पर्यंत पावसाचा आता ब्रेक असणार आहे. केवळ पश्चिम किनारपट्टीमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरण बदलामुळे तापमान आता वाढण्याची शक्यता आहे पेरन्याची त्यामुळे घाई करू नका कृषी विभागान हा शेतकरी बांधवांसाठी सल्ला दिलेला आहे. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती आता कमी होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 10 जून पर्यंत महाराष्ट्रमध्ये पावसाचा हा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे.
खरतर गेले काही दिवसांमध्ये राज्यात अनेक जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पावसान झोडपलं होतं, मात्र आता पाऊस काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याच कत आहे आणि केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातल्या काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदललेल्या या वातावरणामुळे राज्यातलं कमाल तापमान वाढणार आहे आणि या कोरड्या हवामानाचा वाईट परिणाम हा पेरणी आणि लागवडीवर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये अस आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेला आहे.
अर्थातच या बदललेल्या वातावरणाचा आरोग्यावर सुद्धा काही परिणाम होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा प्रत्येकाने सावधानता बाळगावी असं सुद्धा प्रशासनाने सांगितलय. मे महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली होती आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अक्षरशः मुंबईसह लगतच्या भागात आणि महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना अक्षरशः पावसाने झोडपून काढलेलं होतं त्यामुळे शेतीला पूरक असं वातावरण जे आहे ते मे महिन्यामध्ये तयार झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत होतं आणि हीच परिस्थिती कायम राहील असा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येत होता आणि त्यामुळे पेरणीसाठी आणि लागवडीसाठी शेतकऱ्यांने
सुद्धा तयारीला सुरुवात केली केलेली होती. मात्र आता हवामान विभागाने जो अंदाज व्यक्त केलेला आहे त्यानुसार 10 जून पर्यंत पावसाच्या प्रवासाची गती जी आहे ती कमी होऊ शकते आणि कमाल तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे लागवड आणि पेरणी करण्याआधी शेतकऱ्यांनी थोडी माहिती घेतली पाहिजे आणि काही घाई न करता आता शेतकऱ्यांने काही दिवस प्रतीक्षा केली पाहिजे कारण पावसामध्ये आता सातत्य जे आहे ते पाहायला मिळत मिळणार नाही आणि शेतीला जी पूरक वातावरणाची गरज असते जेवढा पावसाची गरज असते तेवढा पाऊस कुठे होणार
नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आणि लागवडीसाठी घाई करू नये.
जून मध्ये मान्सून दडी मारण्याचे कारण?
जूनमध्ये मान्सून दडी मारण्याची काय कारण आहेत ते पाहूया. वायव्यकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्याचा मान्सूनला फटका बसलाय. वायव्य भागातील वादळी वाऱ्यामुळे मान्सूनचा वेग मंदावणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने फटका बसलाय. मान्सून वेळेपूर्वी दाखल झाल्यान शेतकऱ्यांनी पेरणीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र आता पावसान ओड दिल्याने शेतकरी हवालदील झालाय तर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये अस आवाहन कृषी विभागाने केलय.
यंदा मान्सून वेळ्या आधीच दाखल झाला आणि सगळ्याच यंत्रणांची दाणादान उडाली मात्र वेळेआधीच धडकलेला मान्सून जूनच्या पंधरवड्यात दडी मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य कोकणामध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे तिथे मुसळधार काही ठिकाणी म्हणजे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या आणि परवासाठी येल्लो अलर्ट हा विदर्भासाठी दिला गेलेला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारची वॉर्निंग येणारे पाच दिवस तरी आता दिली गेलेली नाही.