डमी शाळा का वाढताहेत? समिती करणार अभ्यास..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

डमी शाळा का वाढताहेत ? समिती करणार अभ्यास केंद्र सरकारचे पाऊल; कोचिंग क्लासेसकडे का वळताहेत विद्यार्थी, प्रवेश परीक्षांची पारदर्शकता यांचाही अभ्यास, शिक्षणप्रणालीतील त्रुटी शोधणार…

देशातील विद्यार्थ्यांचा कोचिंग क्लासेसकडे वाढलेला कल, ‘डमी शाळा’ निर्माण करण्यासाठी चाललेले प्रयत्न आणि त्यामुळे प्रवेश परीक्षांबाबत निर्माण होणारे प्रश्न या गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नऊ सदस्यांच्या समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणासाठी कोचिंग सेंटर्सवरील अवलंबून राहणे कमी करण्यासाठी उपाय सुचविणार आहे.

देशातील कोचिंग संस्था गेल्या काही काळात अनेक वादग्रस्त घटनांमुळे चर्चेत आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, आगीच्या घटना, अपुरी सुविधा आणि शिकविण्याच्या शंकास्पद पद्धती याविषयी अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने ही समिती स्थापन केली. शिक्षण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या शालेय शिक्षण प्रणालीतील चिकित्सक विचार, विश्लेषण करण्याची पद्धती, नावीन्याचा शोध घेण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, घोकंपट्टी करून अभ्यास करण्याची लागलेली सवय या गोष्टी बळावल्या. शिक्षणप्रणालीत जाणवत असलेल्या त्रुटींचा अभ्यास करून ही समिती उपाययोजना सुचविणार आहे.

डमी शाळा म्हणजे नेमक काय?

डमी शाळा ह्या अशा शाळात आहेत की ज्यांचे कॉन्टॅक्ट हे कोचिंग सेंटर सोबत झालेले असतात. आणि त्यामुळे शाळेत जाण्याची काही चिंताच नसते, आणि हजेरी पण लावण्याची गरज नसते आणि आपण शाळेत न जाता जेई आणि नेटची तयारी करू शकतो आणि त्या कोचिंग मध्ये जाऊन आपण अभ्यास करू शकतो आणि शिकू शकतो. याचाच अर्थ असा होतो की आपण शाळेत फक्त याच्यासाठी जात आहे की शाळेचे ज्या चाचण्या आहेत आणि पेपर आहेत ते देण्यासाठी आणि आपलं जो पण वेळ आहे तो आपण सर्व परीक्षेच्या तयारीसाठी घालवणार आहोत.

जे शिक्षण मिनिस्ट्री आहे त्यांचा असं मानणे आहे की जेवढे पण देशातील विद्यार्थी आहेत, ते इंजीनियरिंग मेडिकल आणि दुसरे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ची तयारी करीत आहे आणि ते फक्त कोचिंगवर अवलंबून नाही राहू शकत त्यांना शाळेत जावे लागेल आणि शाळेत जाऊन त्यांनी चांगली चांगला अभ्यास करावा. आताच्या दिवसाचा जर विचार केला तर सीबीएसई या पॅटर्न देशभरामध्ये शाळांनाचि मान्यता रद्द केली आहे.

देशात डमी शाळांचा सुळसुळाट कशामुळे?

इंजिनिअरिंग व वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी तयारी करणारे असंख्य विद्यार्थी ‘डमी शाळा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये प्रवेश घेतात, जेणेकरून त्यांना फक्त स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करता येईल. हे विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गाना उपस्थित राहत नाहीत आणि फक्त बोर्डाच्या परीक्षेला बसतात. अशा डमी शाळांचा सुळसुळाट झाला असून, त्याला आवर घालणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे.

काही राज्यांमध्ये स्थानिक कोट्यांतर्गत वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र ठरण्याकरिता काही विद्यार्थी डमी शाळा निवडतात. उदाहरणार्थ, दिल्लीत बारावीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्यांना वैद्यकीय महाविद्यालयांत दिल्लीसाठी राखीव जागांचा लाभ मिळतो. त्यामुळे काही विद्यार्थी दिल्लीत अशा डमी शाळांमध्ये प्रवेश घेतात. अशा शाळा शिक्षणाची हानी करतात.

स्पर्धा परीक्षांचाही आढावा:

केंद्र सरकारने नेमलेली नऊ सदस्यांची समिती शालेय शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा, तसेच त्यातील पारदर्शकतेचा आढावा घेणार आहे. या परीक्षा कोचिंग क्लासेसच्या सुळसुळाटाकरिता किती जबाबदार आहेत हेही तपासले जाणार आहे. शालेय आणि उच्च शिक्षण पातळीवरील मूल्यांकनाच्या पद्धतींचा अभ्यास. नामांकित शिक्षण संस्थांमधील मर्यादित प्रवेश क्षमतेमुळे विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थांकडे वळावे लागते का, याबाबतही अभ्यास केला जाणार आहे.

समितीचे सदस्य कोण?

समितीच्या अध्यक्षपदी उच्च शिक्षण सचिव विनीत जोशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अध्यक्ष शालेय आणि उच्च शिक्षण विभागाचे संयुक्त सचिव आयआयटी मद्रास, एनआयटी त्रिची, आयआयटी कानपूर आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीइआरटी) या संस्थांचे प्रतिनिधी केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि एका खासगी शाळेचे प्राचार्य

डमी शाळाचे तोटे:

बनावट शाळा एकाकी असू शकतात, त्यात अभ्यासक्रमेतर उपक्रम आणि सामाजिक कार्यक्रमांचा अभाव असू शकतो . विद्यार्थ्यांना सामाजिक एकटेपणा आणि समवयस्कांशी संपर्क साधण्यात अडचण येऊ शकते. कोचिंग अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित केल्याने अनेकदा मूलभूत NCERT संकल्पना दुर्लक्षित होतात, ज्यामुळे बोर्ड परीक्षेतील गुण कमी होण्याची शक्यता असते.

डमी शाळा कशी शोधावी?
आता प्रश्न येतो की तुमच्या जवळील डमी शाळा कशी शोधावी. डमी शाळेबद्दल जाणून घेण्याचे मार्ग येथे आहेत. कोचिंग संस्थांना विचारा: जेईई किंवा एनईईटी सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग सेंटर्स बहुतेकदा डमी शाळांशी सहयोग करतात. ते तुमच्या स्थानावर आधारित शिफारसी देऊ शकतात.

डमी शाळा करत आहे करियर नष्ट:

आजकाल डमी शाळा मोठ्या चर्चेत आहेत. तयार होत आहेत आणि अधिकाधिक विद्यार्थी  यासाठी ते या डमी शाळांची मदत घेत आहेत. मग डमी शाळा आणि ही मुले म्हणजे काय? याचा करिअरवर कसा परिणाम होत आहे ह्या ज्या डमी शाळा चालू आहे, त्या सर्व बनावट आहे. यामध्ये नियमित वर्ग घेतले जात नाहीत शाळांना गैर-उपस्थित शाळा असेही म्हणतात. या शाळांमध्ये प्रवेश सहज मिळतो. नियमित शाळांप्रमाणेच सर्व गोष्टी पुरवल्या जातात पण विद्यार्थ्यांना नियमितपणे वर्गात उपस्थित राहावे लागत नाही. जिथे सामान्य शाळांमध्ये उपस्थिती अनिरवार्य आहे.

मूल ७ तास वेगवेगळ्या वर्गात उपस्थित राहते. या बनावट शाळांमध्ये मुले हेच करतात. तो फक्त दोनच वर्गात जातो आणि बस्स. जिथे ७५% मुले सामान्य शाळांमध्ये उपस्थिती अनिवार्य आहे, तर यामध्ये शाळांमध्ये मुले फक्त अंतिम परीक्षा देतात.त्यामुळे विध्यार्थी हे शाळेतील ज्ञानपासून वंचित राहतात. आणि त्यांना पाहिजे तस शिक्षण मिळत नसल्यामुळे त्याचा परिणाम हा त्यांच्या करियर वर होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *