वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! वीजदरात होणार कपात..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

गुरुवार सकाळपासून राज्यभरातल्या वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी असल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. लवकरच वीज ग्राहकांची महागड्या वीज बिलांपासून सुटका होणार आहे. राज्यातल्या विजेचे दर कमी होणार असून त्यामुळे आता ग्राहकांना लाईट बिलाच्या किमतीत मोठा दिलासा मिळणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी याबाबत पोस्ट करत माहिती दिली. राज्यातील वीज वितरक कंपनी महावितरण कडून वीज दरात कपातीचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला सादर करण्यात आला होता. त्यावर आयोगान पुढच्या पाच वर्षात विजेचे दर टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे आदेश दिलेत.

विशेष म्हणजे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा पद्धतीने घरगुती, औद्योगिक व व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश देत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिलासा दिला आहे. या निकालानुसार राज्यात पहिल्या वर्षी १० टक्के तर पुढे टप्प्याटप्प्याने पाच वर्षात २६ टक्क्यांपर्यंत वीजदर कमी होणार आहेत. टप्प्याटप्प्याने ती वाढत जाऊन 2030 पर्यंत 26 टक्के कपात होणार असल्याचं जाहीर करण्यात आलय. राज्यात १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण हे ७० टक्के आहे. त्यांच्यासाठी जुलैपासून १० टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील.

यामध्ये सर्वाधिक फायदा हा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे. राज्यात 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरणाऱ्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी जुलै पासन 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील तर 100 पासून 500 युनिट पर्यंतची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना एक जुलै पासन वाढीव दराने विजेचे बिल भराव लागणार आहे. 

कोणत्या ग्राहकांना होणार जास्त फायदा:

आता राज्यातले विजेचे दर सरसकट कमी होणार असले तरी काही ग्राहकांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. हे ग्राहक कोणते आहेत ते बघूया. वीज दर कपातीचा सर्वाधिक फायदा अशा ग्राहकांना होणार आहे जे ग्राहक महिन्याला 100 युनिट पेक्षा कमी वीज वापरतात. अशा ग्राहकांच्या विजेचे दर पहिल्या वर्षी 10 टक्क्यांनी कमी होणार आहेत. राज्यभरातल्या एकूण ग्राहकांपैकी 70% ग्राहक या कॅटेगरीत येतात अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली.

दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकाला पुरवला जाणाऱ्या विजेचा प्रति युनिटचा दर सध्या 1.74 रुपये एवढा होता. तो आता 1.48 रुपये एवढा होणार आहे. हा दर पुढच्या पाच वर्षासाठी कायम असणार आहे. याशिवाय स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसावीज वापरासाठी 10% अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांनाही प्रोत्साहन मिळणार आहे. विजेचे हे नवे दर येत्या 1 जुलै पासून लागू होणार आहेत. पण 100 युनिट पेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मात्र पहिल्या वर्षी थोडा फटका बसणार आहे. अशा ग्राहकांसाठी विजेचे दर पहिल्या वर्षी थोडे वाढतील. 

सौरउर्जासाठी प्रोत्साहन:

राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदरात कपातीचा प्रस्ताव सादर केला होता. स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना दिवसा वीजवापरासाठी १० टक्के अतिरिक्त टीओडी सवलत आणि सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या घरगुती ग्राहकांना प्रोत्साहन, अशी आयोगाच्या आदेशाची वैशिष्ट्ये आहेत.

आयोगाने महावितरणच्या याचिकेवर वीज ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय दिल्याबद्दल आभारी आहोत. या आदेशाचा लाभघरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तीनही वर्गवारीत होणार आहे. बळीराजाला दिवसा व खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चे काम सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कर्मी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वीजदर कपातीमुळे घरगुती ग्राहकांना दिलासा तर उद्योग व्यवसायांना चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनाचे पालन झाले आहे. लोकेश चंद्र,महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक

असा होईल दरात बदल:

पण पुढे पाच वर्षाच्या काळात ते टप्प्याटप्प्यान कमी होणार आहेत. आता सगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी पुढील पाच वर्षात विजेचे दर काय असतील ते बघूया. शून्य ते 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचा दर 6.32 रुपये इतका आहे. 1 जुलै पासून हा दर 5.74 रुपये इतका होणार आहे. त्यानंतर 2026-27 वर्षासाठी हा दर 5.56 2027-28 साठी 5.43 2028-29 साठी 4.59 59 आणि 2029-30 साठी 4.34 रुपयापर्यंत कमी होत जाणार आहे म्हणजेच शून्य ते 100 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचा विजेचा दर येत्या पाच वर्षात 6.32 वरून 4.34 पर्यंत कमी होणार आहे.

101 ते 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पहिल्या वर्षी दरात थोडी वाढ होणार आहे. सध्या हा दर 12.23 रुपये एवढा आहे 1 जुलै पासून तो 12.57 57 रुपये होणार असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली त्यानंतर 2026-27 वर्षासाठी हा दर 12.40 2027-28 साठी 12.28 2028-29 साठी 12.13 आणि 2029-30 साठी 12.15 रुपये एवढा असेल म्हणजेच या ग्राहकांचा विजेचा दर येत्या पाच वर्षात 12.23 वरून 12.15 15 रुपयापर्यंत कमी होणार आहे.

301 ते 500 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या वीज दर कपाती बाबत बोलायचं झालं तर सध्या हा दर 16.77 रुपये एवढा आहे 1 जुलै पासून हा दर 16.85 रुपये होईल. त्यानंतर 2026-27 वर्षासाठी हा दर कमी होऊन 16.64 2027-28 साठी 16.44 2028-29 साठी 12.29 आणि 2029-30 साठी पुन्हा वाढून 14.61 61 रुपये एवढा असेल म्हणजेच या ग्राहकांचा विजेचा दर येत्या पाच वर्षात 16.77 वरून 14.61 रुपयापर्यंत कमी होणार आहे.

आता 500 युनिट पेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सध्याचा विजेचा दर 18.93 रुपये आहे 1 जुलै पासून यात वाढ होऊन तो 19.15 रुपयांवर पोहोचणार आहे पण नंतर त्यात हळूहळू कपात होणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे 202627 वर्षासाठी हा दर 19.13 13 एवढा असेल 202728 साठी 19.1 202829 साठी 18.37 आणि 202930 साठी 18.20 रुपये एवढा होईल. म्हणजेच या ग्राहकांचा विजेचा दर येत्या पाच वर्षात 18.93 वरून 18.20 रुपयापर्यंत कमी होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, वाळूज, शेंद्रामध्ये टाटा पॉवरकडून वीज वितरण ?

राज्य वीज नियामक आयोगाकडे समांतर वीज वितरणासाठी अर्ज; पुढील टप्यात जनसुनावणी राज्यात महावितरण, टोरंट पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटीनंतर आता टाटा पॉवरनेही वीज वितरणात उडी घेतली आहे. टाटा पॉवरने छत्रपती संभाजीनगर, जालना, बदनापूर, वाळूज या भागांत समांतर वीज वितरणासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाकडे परवान्यासाठी अर्ज केला आहे.

टाटा पॉवरच्या या पावलानंतर मराठवाड्यासारख्या भागातही खासगी वीज वितरण कंपन्यांची स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे. टाटा पॉवरने मंगळवारी याबाबत जाहिरात प्रसिद्ध करून नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविल्या. आयोग आता या सूचना व हरकतींचा विचार करून पुढील टप्प्यात जनसुनावणी घेईल. या आधी आयोगाने टोरंट पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपन्यांच्या नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई या भागांतील अर्जाना प्राधान्य देत, २२ जुलैला सुनावणी निश्चित केली आहे. सध्या महावितरण मुंबई वगळता संपूर्ण राज्यात वीज वितरणाचे काम पाहते.

पाच वर्षांत ३९ हजार ग्राहकांना सेवा देणार:

टाटा पॉवरच्या मते त्यांना वीज वितरणाचा परवाना मिळाल्यास पुढील पाच वर्षात ते ३९ हजारांहून अधिक ग्राहकांना सेवा देतील.औद्योगिक आणि नागरी क्षेत्रांना दर्जेदार व सतत वीजपुरवठा करणे, हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. या प्रक्रियेमुळे मराठवाडा विभागात वीज वितरणात स्पर्धा निर्माण होणार असून, याचा लाभ थेट ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे.आता महावितरणसमोर खासगी क्षेत्रातील स्पर्धक उभे राहत असल्याने, दर, सेवा आणि गुणवत्तेवर परिणाम होणार आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

औद्योगिक क्षेत्रावर टाटांचा भर:

टाटा पॉवरने मागणी केलेल्या परवान्यात त्यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्र, चिकलठाणा एमआयडीसी, शेंद्रा एमआयडीसी, वाळूज एमआयडीसी, ऑरिक, जालना महापालिका क्षेत्र, बदनापूर नगरपंचायत, जालना एमआयडीसी, अतिरिक्त जालना एमआयडीसी, तसेच जालना सीड पार्क एमआयडीसी या १० भागांचा समावेश केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *