28 जून 2025 ठिकाण वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव सकाळी 10हा वाजेच्या सुमारास गावातील मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे पूजा करण्यासाठी आले मंदिर परिसरातच हरिभक्त पारायण संगीताताई महाराज यांच मोहटा देवी आश्रम होतं त्यांनी बाहेरून संगीताताई महाराज यांना आवाज दिला पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही जवळपास तीन ते चार वेळा आवाज देऊनही संगीताताई महाराज यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे पुजारी चौधरी हे मंदिराच्या च्या शेडमध्ये गेले आणि दुसऱ्याच क्षणी गोंधळ करत बाहेर आले. त्यांचा गोंधळ ऐकून आसपासचे लोक सुद्धा जमा झाले तेव्हा समोर आलं की संगीताबाई महाराज यांची कुणीतरी दगडाने ठेचून हत्या केली आहे. पण एका महिला कीर्तनकाराची हत्या कोणी का करेल? हत्येमागे कारण काय असू शकतं या चोरीचा आणि जमिनीच्या वादाचा संशय काय आहे?
छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर आणि वैजापूर या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या हायवेवर चिंचड म्हणून एक छोटस खेड आहे. गावात अण्णासाहेब पवारांच वारकरी संप्रदायाची मनोभावे सेवा करणार एक कुटुंब त्याच कुटुंबातील संगीताताई अण्णासाहेब पवार ह्या एक होत्या घरात वारकरी परंपरा असल्यामुळे लहानपणापासूनच संगीता ताईंना सुद्धा अध्यात्माची गोडी लागली. पुढे त्यांनी आपलं सगळं जीवन अध्यात्मासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला. संगीता ताई या अवघ्या 20 वर्षांच्या असल्यापासून कीर्तनकार म्हणून काम करत होत्या. 2009 मध्ये भागवत कथेची तयारी करण्यासाठी त्या वृंदावनात सुद्धा गेल्या होत्या तिथे दोन वर्ष काढल्यानंतर त्या 2010 च्या शेवटी पुन्हा गावात परतल्या आणि आपल्या कीर्तनाचा कार्यक्रम त्यांनी पुन्हा सुरू केला.
त्यावेळी त्यांना वाटायचं की आपल्या गावात सुद्धा एक आश्रम असलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी गावातल्या मोहटा देवी परिसरात काही जागा विकत घेतली होती. पण त्यांना आश्रम सुरू करण्याचा योग काही येत नव्हता पण दुसऱ्या बाजूला त्या एक कीर्तनकार म्हणून चांगल्या नावारूपाला येत होत्या अगदी काही वर्षातच वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकारांमध्ये त्यांच नाव घेतल जाऊ लागलं होतं जवळपास 20 वर्ष कीर्तन केल्यानंतर त्या नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गेल्या नर्मदा परिक्रमा केल्यानंतर व्यक्ती घर त्याग करतो त्यामुळे संगीताताई महाराज यांनी सुद्धा कधीही घरी न परतण्याचा निर्णय घेतला होता. 2025 च्या मार्च महिन्यात त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली.
त्यानंतर त्या आपल्या गावात परतल्या खऱ्या पण घरी काही गेल्या नाही काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार संगीताताई महाराज यांनी मोहटा देवी मंदिर परिसरात आश्रमासाठी घेतलेल्या जागेवर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण यावरून त्यांच्यात आणि मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी यांच्या मुलांमध्ये वाद झाला. स्थानिकांच्या मते पुजाऱ्यांच्या मुलांचा या आश्रमाला विरोध होता. पुढे त्यांच्यातले वाद इतके विकोपाला गेले होते की संगीताताई महाराज यांनी पुजारी शिवाजी चौधरी यांची मुलं सुशील दीपक आणि गोकुळ यांच्या विरोधात वीरगाव पोलीस स्थानकात तक्रार सुद्धा दिली होती. मी एकटी राहते आणि कुणीही रात्रीतून येऊन मला मारून टाकेल असं संगीताताई महाराज यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं दरम्यान वैजापूर तालुक्यातल्या सरलाबेठ संस्थानाच्या मदतीने त्यांनी मंदिराच्या परिसरात नारायणगिरी महाराज कन्या आश्रम सुद्धा सुरू केलं 5 जून रोजी रामगिरी महाराजांच्या उपस्थितीत आश्रमाचे उद्घाटन सुद्धा झालं होतं आश्रम सुरू झाल्यानंतर संगीताताई महाराज या एकट्याच तिथे राहायच्या
संगीताताई पवार या सद्गुरु नारायणगिरी महाराज कन्या आश्रमात वास्तव्याला होत्या. त्यांच्यावर मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडान हल्ला केला. दरम्यान ही हत्या का केली कोणी केली याचा पोलीस आता शोध घेत आहेत संगीताई पवार महाराज या थांबतात आणि पूजा अर्चना वगैरे करतात त्या प्रवचन वगैरे पण करतात रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्या केल्याच दिसत आहे.
हत्या केव्हा झाली आणि कशी?
आता हत्तेच्या दिवसावर येऊ 27 जून 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारच्या रात्री कुणीतरी त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची ची हत्या केली. दरम्यान सकाळी 10 वाजेच्या सुमारास मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे मंदिरात पूजा करण्यासाठी आले पण त्यांना संगीताताई महाराज कुठेही न दिसल्यामुळे त्यांनी आश्रमाच्या बाहेरून त्यांना आवाज दिला. पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही चार ते पाच वेळा आवाज देऊनही संगीता ताईंनी उत्तर न दिल्यामुळे ते आत गेले तेव्हा त्यांना संगीताई या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या त्यानंतर त्यांनी आरडाओरड सुरू केली आणि आसपासचे लोक जमा झाले.
पुढे पुजारी चौधरी यांनी संगीताताई महाराज यांच्या भावाला फोन करून तात्काळ बोलावून घेतलं तसेच पोलिसांना सुद्धा फोन करण्यात आला. विरगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी श्वण पदकासह घटनास्थळी धाव घेतली. तसच उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे हे सुद्धा पोहोचले. ही बातमी अगदी वाऱ्यासारखी सर्वत्र पोहोचली. स्थानिक आमदार बोरनारे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रतिक्रिया दिली की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. सर्व पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झाले. लवकरात लवकर आरोपीला अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सुरुवातीला ही घटना अगदी चोरीच्या अनुषंगाने केल्याचं बोलल्या गेलं होतं.
तीन वेळा जीवे मारण्याची धमकी:
संगीताताई महाराजांना एप्रिलमध्येच जिवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळते. याबाबत त्यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. आपण एकटे राहतो आपल्याला मारून टाकतील अशी धमकी मिळाल्याची तक्रार त्यांनी दिलेली होती. तर संगीता ताईंना तीन वेळा जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली त्याच्या वडिलांनी अशी माहिती दिली आहे. तर महिलांसाठी त्यांना काम करायचं होतं अशी भावना त्यांच्या भावांनी व्यक्त केली. खोली बांधायची होती. शेजारच्या मोहटा देवी मंदिरात जो पूजा करतो त्यांच्या घरचे लोक सगळे आले ते म्हणे इथं बांधायचं नाही पोलीस स्टेशनला दुसरे जाऊन अर्ज दिला.
मग त्यांनी पोलीसला बोलावून घेतलं पोलीसांनी त्याची समज घातली, मग नंतर त्यांच्या वडिलांनी बांधकाम चालू केलं तर ते पाठीमागं दम देत होते लोका जवळ त्यांच्या वडिलांना मारण्याची धमकी देत होते, त्यांना तीन वेळा दम दिला होता काय? तुला जीवे मारू तुझे हात पाय तोडू अस करू असा दम देत होते. सकाळी घरून फोन त्यांच्या भावाला करण्यात अला तर त्यांचे असे मत होते की तेव्हा मी शेतामध्ये होतो. तर मी इथं धावत आलो इथं बघितलं तर अवस्था बघून खूप वाईट वाटल एवढच बघितलं जास्त त्या स्वतः राहत होत्या आणि पुढे त्याच महिलांसाठी शिक्षणासाठी ज्या मुली आहेत वारकरी संतामध्ये कीर्तन करण्यासाठी प्रभावी त्यांची संख्या वाढावी त्यासाठी ताईचा प्रयत्न करत होत्या आणि मुलींना शिक्षणासाठी ठेवायचा असा त्यांचा विचार होता.
संशय कोणावर आहे?
जसं पुजारी शिवाजी चौधरी यांच्या कुटुंबामध्ये आणि संगीताताई महाराज यांच्यामधील वादाची माहिती मिळाली तेव्हा दुसऱ्या बाजूने तपास सुरू झाला. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता मंदिराची कुलूप त्यांना तुटलेल्या अवस्थेत दिसली. पण याबाबत आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की पुजाऱ्यांनी दानपेठी चोरीला गेल्याचा दावा केलाय पण त्याची अजून खात्री नाहीये. त्यांच्या दाव्याची पडताळणी केली जातीय तसेच या घटनेचा प्रत्येक अंगलने तपास केला जाणार असही वाघमोडे म्हणालेत.
पोलिसांकडून तपास सुरू झालाय का या संदर्भातले अधिकचे काय अपडेट्स मिळतायत अत्यंत निर्गुणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे दगडाने ठेचून हत्या केली आहे हत्येच कारण अजून समजू शकलेलं नाही पोलिसांच्या डीवायएसपी आणि इतर अधिकारी या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत पोलीस घटनास्थळी आहेत स्थानिक आमदार देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणात शवान पथक देखील दाखल झालं आहे आणि का नेमकी एवढ्या निर्गुणपणे हत्या करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही मात्र अ त्या सगळ्या प्रकरणाचा या ठिकाणी पोलीस शोध घेत आहेत
शिवाय आणखी एक माहिती अशी सुद्धा हाती आली आहे की पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतलय. पण याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाहीये. त्यामुळे याला कोणताही खात्रीलायक दुजोरा नाही. पण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर दोन महिन्यांपूर्वी संगीताताई महाराज यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. जर तेव्हाच त्यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं असतं तर कदाचित आज त्यांचा तर कदाचित आज त्या जिवंत असल्या.