तुमच्या आधार कार्डवर या महत्त्वपुर्ण गोष्टी आहेत का ? वाचा संपूर्ण माहिती…!
Aadhar Card Update : देशात आधार कार्ड ही व्यक्तीची कायदेशिर ओळख आहे. प्रत्येक कामात याला कायदेशिर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात असते. अलिकडे आधार पीव्हीसी कार्डची सुविधा दिला जाऊ लागली आहे. खिशात न दुमडणे आणि पाण्यात भिजल्याने खराब न होणे यापुरते या कार्डचे महत्त्व मर्यादित नाही. घोटाळेबाजांना नकल करता येऊ नये अशी अनेक फीचर्स यात देण्यात आलेली आहेत. यामुळेच भल्याभल्यांना तुमच्या कार्डाची नकल करून त्याचा दुरुपयोग करणे शक्य होत नाही. यात असलेल्या माहितीशी छेडछाड करणे शक्य होत नाही.
• क्यूआर कोड :
कार्डामध्ये डिजिटल साईन क्यू आर कोड दिलेला असतो. यामध्ये कार्डधारकाचा फोटो आणि इतर लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्राफिक) माहिती दिलेली असते. कार्डधारकाच्या माहितीच्या पडताळणीसाठी याचाच वापर केला जात असतो. बँकिंगच्या कामांसह अनेक ऑनलाइन व्यवहारांमध्ये या सुविधेचा वापर केला जातो. बँकेत अकाऊंट ओपन करण्यापासून आयटीआर फाईल करण्यापर्यंतची कामे यातील माहितीच्या आधारे करता येत असतात.
• घोस्ट इमेज :
आधार पीव्हीसी कार्डावर कार्डधाकरकाची घोस्ट इमेज दिलेली असते. म्हणजेच इथे त्या व्यक्त्तीचा धूसर फोटो दिलेला असतो. विशिष्ट प्रकारचा उजेड टाकल्यानंतरच ही प्रतिमा दिसते. याची नकल करता येत नाही.
• मायक्रो टेक्स्ट :
कार्डावर अतिशय बारीक अक्षरांमध्ये कार्डधारकाम माहिती लिहिलेली असते. ही माहिती वाचण्यासाठी भिंगाची गरज असते, इतक्या लहान अक्षरांची हुबेहूब नकल करता येत नाही.
• होलोग्राम :
आधार पीव्हीसी कार्डामध्ये एक होलोग्राम दिलेला असतो. हे एक प्रकारचे सिक्युरिटी फीचर असते. यामुळे घोटाळेबाजांना यातील माहिती चोरणे शक्य होत नाही.
• लोगो :
आधार पीव्हीसी कार्डावरील आधारचा लोगो थोडा वर आलेला असतो. कुणालाही याची कॉपी करता येऊ नये अशा पद्धतीने याची रचना केलेली असते. घोटाळेबाजांना याची नकल करता येत नाही.
• इश्यू व प्रिंट डेट :
कार्डावर ते वितरित केल्याची तारीख तसेच छापल्याची तारीख दिलेली असते. सत्यता तपासणीवेळी या दोन्ही तारखा महत्त्वाच्या असतात.
अतिशय उपयुक्त माहिती आहे.