जमिनीवर सगळीकडे रक्त पसरलेलं रक्ताच्या थारोळ्यात एक महिला निपचित पडली होती आणि तिच्या समोर होते दोन पुरुष एकाच्या हातात लोखंडी खलबत्ता होता आणि दुसऱ्याच्या हातात होता फोन हातात फोन असलेला पुरुष एक नंबर डायल करून फोन कानाला लावायचा प्रयत्न करत होता पण पुढच्या क्षणी तो सुद्धा जमिनीवर कोसळला त्यानंतर हातात खलबत्ता असलेल्या पुरुषाच्या हातात दोर आला काही सेकंद गेली मग त्या रूम मधून ना कुणाच्या ओरडण्याचा आवाज आला आणि ना कोणा कुणाच्या रडण्याचा जमिनीवर निपश्चित पडलेले मृतदेह काही वेळान गायब झाले.
गायब करणारा अर्थातच हातात खलबत्ता घेतलेला पुरुष होता. तो पुरुष आपल्या आई-वडिलांचा खून करणारा मृतदेहाचे करवतीने तुकडे करणारा अंबेश कुमार एक लग्न एक भांडण दोन खून आणि कित्येक तुकडे अंबेश कुमारन नेमकं काय केलं या आई वडिलांना का संपवलं आणि परफेक्ट प्लन असून सुद्धा अंबेश कुमार सापडला कसा सगळा थरार जाणून घेऊयात…
शनिवारी 13 डिसेंबरला जौनपूरच्या जाफराबाद पोलीस स्टेशन मध्ये वंदना देवी नावाच्या एका महिलेन यान तक्रार दिली. माझे आई-वडील 8 डिसेंबर पासून बेपत्ता आहेत. माझा भाऊ अंबेश कुमार त्यांना शोधत होता पण 12 डिसेंबर पासून तो सुद्धा गायब आहे. पोलीस सुरुवातीला मोबाईल लोकेशन सीसीटीव्ही तपासतात. खबरांच नेटवर्क ऍक्टिव्ह करतात आणि तपासाला सुरुवात करतात. 15 डिसेंबरला पोलीस या प्रकरणातल्या आरोपीपर्यंत पोहोचतात आणि एक धक्कादायक प्रकरण उलगडत.
घटना कुठे घडली?
जौनपूर जिल्ह्यातलं अहमदपूर गाव. इथं श्याम बहादूर आणि बबीता कुमार हे जोडप राहायचं. श्याम बहादूर लोकोपायलट म्हणून काम करायचे तर बबीता गृहिणी तीन मुलींची लग्न लावून दोघेही निवांत होते पण त्यांचा मुलगा आंबेश कुमार आणि त्यांच्यात मात्र बिनसलेलं कारण होतं आंबेशच आंतरधर्मीय लग्न बीटेक ची डिग्री मिळवलेला आंबेश कोलकात्यामध्ये क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करायचा तिथेच राहायचा तिथे असताना त्याची एका मुस्लिम मुलीशी ओळख झाली.
पाच वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं आंबेसचा जॉब सुरू होता. बायको सुद्धा ब्युटी पार्लर चालवत होती. दोघांना दोन मुलं सुद्धा झाली पण म्हणून सगळं काही नीट नव्हतं आंबेशच्या आई-वडिलांना आपल्या मुलान केलेल आंतरधर्मीय लवह मॅरेज अजिबात पटलं नाही. त्यांचं एकच म्हणणं होतं तिला घटस्पोट दे लग्न मोड आंबेशचा या गोष्टीला विरोध होता त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी त्याच्याशी बोलणं सोडून दिलं अशातच अंबेश आणि त्याच्या बायकोची आपापसात भांडण सुरू झाली.
अंबेशच्या घरातले घटस्पोट घे याच गोष्टीवर ठांब होते मग अंबेशने हीच गोष्ट आपल्या बायकोला सांगितली. बायको म्हणाली घटस्पोट देते पण पोटगी दे. इथं पडली आणखी एक ठिणगी अंबेश कडे पोटगी द्यायला पैसे नव्हते. बायको म्हणली घटस्पोट पाहिजे तर पोटगी पाहिजे. सगळ्याला वैतागून तीन महिन्या आधी अंबेश जौनपूरमध्ये आई वडिलांकडे राहायला आला. इकडे आल्यानंतर लवह मॅरेज वरून होणारे वाद घटस्पोटासाठी दबाव बायकोची पैशांची मागणी यामुळे आंबेशवाद सुरूच होते त्यात त्याने वडिलांकडे पोटगी म्हणून बायकोला देण्यासाठी पैसे मागितले पण वडिलांनी नकार दिला. वाद वाढत गेला.
प्रकरण कसं आणि केव्हा घडलं?
8 डिसेंबरला रात्री साधारण सात आठ ची वेळ अंबेश घरीच होता नेमका त्याच्या आणि त्याच्या आई मध्ये वाद झाला वाद बघता बघता वाढला अंबेशने रागाच्या भरात पुढचा मागचा कसलाच विचार केला नाही आणि घरात असलेला लोखंडी खलबत्ता आपल्या आईच्याच डोक्यात घातला वार जिवारी लागला आई रक्ताच्या थारोळ्यात पडली आपल्या बायकोच्या ओरडण्याचा आवाज ऐकून श्याम बहादूर खोलीत आले त्यांना समोरच दृश्य बघून धक्का बसला त्यांनी आपल्या मुलाच्या हातात रक्ताळलेला खलबत्ता बघितल्यावर त्यांची भीती अजूनच वाढली.
त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांना फोन करायचा प्रयत्न केला पण अंबेशने त्यांच्याही डोक्यात वार केला ते जमिनीवर पडल्यावर मोठ्याने ओरडले तेव्हा त्यान नॉयलॉनच्या दोरीने त्यांचा गळा आवडला. काही मिनिटात अंबेशने आपल्या आई-वडिलांना संपवलं फक्त काही मिनिटात त्यानंतर मात्र अंबेशला पश्चाताप झाला राग ओसरला पण वेळ निघून गेलेली त्याच्यापुढे दुसरा प्रश्न होता या मृतदेहांच काय करायचं यातून वाचायचं कसं आंबेश थोडा वेळ शांत बसला मग त्यान घरातली करवत घेतली घराजवळ सुरू असलेल्या बांधकामाच्या साईट जवळून सहा पोती आणली मग आई वडिलांच्या मृतदेहाच्या शेजारी बसला आणि एक एक करत दोघांचेही तुकडे केले करवतीने अगदी थंडपणे आपल्या जन्मदात्यांचे अवयव कापताना त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता यातून वाचायचं कसं त्याचा सुटकेचा परफेक्ट प्लॅन ऍक्टिव्ह झाला होता.
सुटका करण्यासाठी अंबेशने प्लॅन बनवला;
आई-वडिलांचे तुकडे त्याने या सहा पिशव्यांमध्ये भरले घरात पडलेल रक्त साफ केलं आई-वडिलांचे फोन त्यांचे कपडे हे सगळं लपून ठेवलं आणि सकाळ होईपर्यंत वाट बघितली. पहाटेचे साधारण चार ते पाच वाजले असतील. बाहेर लोकांची गर्दी नसेल कोणी आपल्याला पाहणार नाही याचा अंदाज घेऊन तो घरातून बाहेर पडला. त्याच्याच वडिलांनी त्याला गिफ्ट दिलेल्या गाडीत त्याने पिशव्या भरल्या गाडी बेलाव पुलाजवळ नेली आणि उजाडायच्या आधी पिशव्या गोमती नदीत फेकून दिल्या पण तिथून तो पुन्हा घरी आला कारण एक पुरावा नष्ट करायचा राहिला होता पिशवीमध्ये जागा कमी पडली म्हणून अंबेशने आईचा कापलेला पाय घरी तसाच ठेवला होता त्यामुळे तो घरी आला आणि तो पाय सोबत घेतला मग जलालपूर मधल्या पुलावरून नदीत फेकून दिला त्यानंतर आपल्या गाडीत सांडलेल रक्त मांसाचे तुकडे हे सगळे त्यान डिटर्जंट टाकून पूर्ण स्वच्छ केलं.
बनारसच्या घाटावर जाऊन आंघोळ सुद्धा केली या सगळ्यात आपण कुठल्याच सीसीटीव्ही मध्ये दिसणार नाही लोकेशन ट्रॅक होणार नाही याची काळजी आंबेशने घेतली होती पण अचानक त्याच्या बहिणीचा वंदना देवीचा त्याला फोन आला तिने आपण आई वडिलांना फोन ट्राय करतोय पण फोन लागत नाहीये अशी तक्रार केली इथं अंबेश अडकायचा पूर्ण चान्स होता पण इथेच त्यांन आपला मेन प्लन ऍक्टिव्ह केला एक नाटक आपणच आई वडिलांना शोधतोय हे नाटक त्यान आपल्या बहिणीला सांगितल की आई वडील बेपत्ता आहेत मी सुद्धा त्यांना शोधतोय तू काळजी नको करू सापडतील त्याची बहिण त्याला रोज फोन करायची तो रोज दिलासा द्यायचा.
पण 12 तारखेपासून आंबेसने स्वतःचा फोन बंद केला तो बेपत्ता झाला आणि त्याच्या बहिणीने आई वडील भाऊ तिघही बेपत्ता असल्याची तक्रार केली पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली फोन लास्ट लोकेशन सगळं चेक केलं पण अंबेश आणि त्याच्या आई वडिलांचा शोध लागत नव्हता पण पोलिसांना खबऱ्यांकडून टीप मिळाली. 15 तारखेला अंबेश जौनपूरला येणार आहे.
पोलिसांनी अंबेशची चौकशी सुरु केली:
पोलिसांनी आपली टीम ऍक्टिव्ह केली आणि अंबेशला ट्रॅप केलं सुरुवातीला त्यान पोलिसांना सुद्धा आई-वडील बेपत्ता आहेत. मीच त्यांना शोधतोय ही कॅसेट ऐकवली पण बोलता बोलता तो अडखळला पोलिसांनी उलट तपासणी घेतली तेव्हा त्यांना तफावत आढळली. तीन दिवस तुझा फोन का बंद होता? तू कुठे गायब झाला होता? या प्रश्नावर तो गोंधळला.
पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आपला खाक्या दाखवला आणि कबूलीत आंबेशने सगळं सांगितलं लग्न वात पोटगी पैसे भांडण खून आणि करवतीने केलेले तुकडे या सगळ्या प्रकरणावर एएसपी आयुष श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा आरोपीने गुन््याची कबूली दिली तेव्हा त्याच्याकडून केलेला गुन्हा पुन्हा रिग्रेट करण्यात आला शिवाय गुन्हा करताना वापरलेला खलबत्ता करवत आणि त्याच्या पालकांचे लपवलेले मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत यात आणखी कोणता अंगल आहे का आंबेशला ला कोणी साथ दिली का याचा तपास पोलीस करतायत पण आंबेशच्या घरातली शांतता आता भीषण झाली आहे आपण परफेक्ट प्लॅन केलाय आपण सुटू असा अंदाज असलेला आंबेश स्वतः गायब होण्यामुळे आणि चौकशीत अडखळल्यामुळे पोलीस कोठडीत आहे आई वडिलांना गमावलेल्या तीन मुली रडतायत पण सगळ्यात मोठा आक्रोश गुमतोय तो मुलाच्या हातान मेलेल्या आईबापाचा तो आक्रोश ऐकू न येणारा…
