महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्रात माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी घेते. परीक्षा झाल्यानंतर, बोर्ड महाराष्ट्र दहावीचा निकाल जाहीर करते.
आज १० वी चा निकाल या वेबसाईट वर पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज 13 मे म्हणजेच दहावीचा निकाल जो आहे तो दुपारी एक वाजता लागणार आहे आणि हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईल मधून पाहू शकता आता कोणकोणत्या वेबसाईटवरून तुम्ही पाहू शकता ते या माहिती च्या आधारे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्याकडून इथे प्रकटन काढण्यात आलेला आहे.
ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता त्यामुळे दहावीचा आज निकाल असणार आहे. ऑनलाईन आपल्याला हा निकाल पाहता येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. परीक्षा झाल्यानंतर निकाल केव्हा लागणार या तारखांकडे खरंतर विद्यार्थ्यांच लक्ष असतं आणि त्यामुळे आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत ही महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे निकालाची तारीख ठरली आहे आणि आज म्हणजेच 13 मेला दहावीचा निकाल लागणार आहे. राज्यामध्ये जे दहावीचे विद्यार्थी आहे त्यांच लक्ष लागलेला आहे, निकालाचे दिवसाकडे तेव्हा निकालाचे दिवस आज आलेला आहे आणि दुपारी एक वाजता हा दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
यामध्ये मंगळवार दिनांक 13 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे आणि कोणकोणत्या वेबसाईटवरती आहे ते सुद्धा इथे सांगितल आहे. तर या नऊ वेबसाईट आहेत या नऊ वेबसाईट तुम्ही पाहू शकता. त्या नऊ वेबसाइट पुढीलप्रमाणे:
- Results.digilocker.gov.in
- Sscresult.mahasscboard.in
- Sscresult.mkcl.org
- Result.targetpublication.org
- Result.navneet.com
- www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
- Education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-result
- www.indiatoday.in/education-today/results
- www.ajtak.in/education/board-exam/results
महाराष्ट्र दहावीचा निकाल तपासण्यासाठी, तुम्ही खालील चरणांचे अनुसरण करू शकता:
१. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
२. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर “निकाल” किंवा “एसएससी निकाल” विभाग पहा.
३. दहावीच्या निकालासाठी संबंधित लिंकवर क्लिक करा.
४. तुम्हाला एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल जिथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील प्रविष्ट करावे लागतील.
५. आवश्यक तपशील प्रविष्ट केल्यानंतर, “सबमिट करा” किंवा “निकाल मिळवा” बटणावर क्लिक करा.
६. महाराष्ट्र दहावीचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
७. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या किंवा निकाल डाउनलोड करा