घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नाय नाट |
पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट ||
सुखी संसाराची सोडूनिया गाठ |
पाऊले चालती पंढरीची वाट माऊली राम कृष्ण हरी ||
सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. खरं तर एकटा महाराष्ट्रच नाही तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठलराया दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीला या ठिकाणी वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो सगळे वैष्णव पंथ वारकरी भक्तिसागरात तल्लीन होतात, आषाढी वारीला माडाच्या पालख्या या पंढरपुरात येतात या मंदिरामुळे पंढरपूरला दक्षिण काशी म्हटलं जातं मागच्या शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून श्री विठ्ठलाची पूजा केली जाते. वेगवेगळ्या भक्तांकडून विठ्ठलांच्या वेगवेगळ्या कथा आख्यायिका सांगितल्या जातात.
आषाढी एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येतो तो पांढरा सदरा घातलेला धोतर किंवा पायजामा घातलेला डोक्यावर पांढरी टोपी हातात टाळ मृदुंग आणि कपाळावर टिळा लावलेला आणि ओठांवर विठ्ठलाचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेला वारकरी आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला अनन्य साधारण अस महत्व आहे. तसं पाहिलं तर वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी असतात आणि अधिक मास असेल तर 26 एका महिन्यामध्ये दर 15 दिवसाला एक अशी एकादशी येते. या 24 एकादशीपैकी दोन एकादशींचे महत्त्व धार्मिक आणि पारंपरिक दृष्ट्या अधिक आहे. तर त्या कोणत्या तर आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी कारण आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते. चातुर्मास म्हणजे चार महिने आणि चातुर्मासाचा शेवट कार्तिक एकादशीला होतो चातुर्मास हा सात्विक वृत्ती वाढवणारा काळ आहे. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. कारण या एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने निदृस्त होतात म्हणून या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात देव निद्रावस्थेत असल्यामुळे या चातुर्मासाच्या काळात बरेच जण मांसाहार वर्ज करतात तसेच कांदा लसूण वर्जित अन्न भोजन करतात ज्यामुळे आपल्यातील सात सात्विक वृत्ती वाढून दांभिक वाईट गोष्टींपासून आपलं रक्षण व्हावं यासाठी या प्रकारच भोजन घेतलं जातं. हिंदू धर्मात आषाढी एकादशीला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटली ही पंढरीची वारी पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करीत आषाड एकादशीला पंढरपुरी पायी चालत जातात.
वारीची परंपरा केव्हापासून सुरू झाली:
पंढरीचा पांडुरंग हा विष्णूचाच एक अवतार आहे विठ्ठलाचे भक्त म्हणजे वारकरी दरवर्षी नित्यनियमाने न चुकता पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी नित्यनियम म्हणजे वारी जो नियमित वारी करतो तो वारकरी ही वारी करताना पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे ही एकच इच्छा वारकऱ्याची असते. ही आषाढी वारीची परंपरा आश वर्षांपेक्षाही अधिक काळांपासून सुरू आहे. विठ्ठलाचा नामघोष करत वारकरी या ठिकाणी अगदी भक्तीभावाने येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी आळंदीतून ज्ञानेश्वर माऊली देहतून तुकाराम महाराज, पैठणून एकनाथ महाराज तर उत्तर भारतातून कबीर यांची पालखी तर शेगावातून गजानन महाराज अशा अनेक संत महात्म्यांच्या पालख्या पंढरीत दाखल होतात. इतकेच नव्हे तर देशविदेशातून अनेक विठ्ठल भक्त पंढरीची वारी करतात.
राज्यातील वारकऱ्यांचे वैष्णव संप्रदायांचे महाराष्ट्राचेच नव्हे तर कर्नाटक आंध्र तमिळनाडू उत्तर प्रदेश मध्यप्रदेश इतर प्रांतातील अनेक भक्तांचे पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहेत अनेक संतांनी श्री विठ्ठल भक्तीचा महिमा गायलेला आहे आणि पंढरपूरची वारी तर जगभरात प्रसिद्ध आहे वारी म्हणजे आसुसलेल्या भक्तांनी श्री पांडुरंगांच्या भेटीला पंढरपुराला पायी जायचं वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात वारीत अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात कथा करीत पंढरपूरला पायी जातात त्यांच्या समूहाला दिंडे असं म्हणतात वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनास येतात वारीची ही प्रथा फार जुनी आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते असं सांगितलं जातं.
एका वर्षात मुख्य चार वारे असतात ज्यात चैत्री यात्रा असते तेव्हा पंढरपुरात चैत्रशुद्ध एकादशीस म्हणजेच कामदाय एकादशीस यात्रा भरते दुसरी आषाढ यात्रा जी पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस यात्रा भरते त्या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह महाराष्ट्रातील असंख्य दिंड्या पंढरीकडे श्री विठ्ठल दर्शनासाठी येतात त्यावेळी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल आणि श्री जय जय राम कृष्ण हरी या नामघोषाने सारं वातावरण भारावून जातं तिसरी असते कार्तिकी यात्रा जी कार्तिकी महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते शयनी एकादशीला झोपी केलेले भगवंत या दिवशी उठतात असं म्हटलं जातं तर चौथी असते मागे यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशी भरते त्या एकादशी जय एकादशी म्हणतात असो जरा पंढरपूरच्या प्राचीन मंदिराबाबत बोलायचं
आषाढी एकादशीचे महत्व:

अशा या सर्वांच्या ध्यानी मणी असलेल्या आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे तर आता आपण ते पुढे पाहूयात. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते अशी मान्यता आहे म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. 2025 यावर्षी आषाडी एकादशी 6 जुलै रविवार रोजी आहे या आषाडी एकादशीला बरेच लोक व्रत उपवास करतात. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करतात.
व्रताची कथा:
आता या आषाढी एकादशीच्या व्रतामागे ही एक पौराणिक कथाही आहे ती मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते एकदा कुंभ राक्षसाचा पुत्र मृदमान्य याने शंकर भगवानांना प्रसन्न करण्यासाठी भरपूर कठीण तपश्चर्या केली त्याच्या भक्तीला प्रसन्न होऊन शंकर भगवानांनी त्याला अमृत्वाचे वरदान दिले. पण त्याचबरोबर त्याला कोणत्याही देवाकडून मरण न येता एका स्त्रीकडून मरण येईल असाही वर दिला होता या वरामुळे हा राक्षस खूपच उन्मत्त झाला त्याने इंद्र व इतर देवांवर स्वारी केली त्याच्या भीतीने सर्व देव व इंद्र भगवान शंकरांकडे मदत मागण्यासाठी गेले पण वर दिल्यामुळे भगवान शंकर ही हदबल झाले होते त्यामुळे सर्व देव आणि इंद्र त्रिकूट पर्वतावर आवळा झाडाच्या खाली गुहेत लपून बसले तो दिवस आषाढी एकादशीचा होता.
देवांनी त्या दिवशी दिवसभर काहीही खाल्ले नाही आणि त्यामुळेच त्यांना आपोआप उपवास घडला आणि पावसाच्या अचानक आगमनाने त्यांना स्नान सुद्धा घडले त्यावेळी अचानक सर्व देवांच्या एकवटलेल्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली या शक्तीने मृदुमान्याचा वध केला त्याचा नायनाट केला ही शक्ती देवी म्हणजेच एकादशी देवी यामुळेच या आषाढी एकादशीला एकादशीचे व्रत आणि उपवास करण्याचा प्रघात पडला.
एकादशी व्रत कसे करावे:
आता हे व्रत कसे करावे हे आपण जाणून घेऊयात. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी एक भुक्त म्हणजे एक वेळ अन्न घ्यावे दुसऱ्या दिवशी एकादशीला लवकर उठून स्नान करून तुळस वाहून विष्णु पूजन करावे संपूर्ण दिवस उपवास करावा रात्री हरिभजन करत जागरण करावे आषाड शुद्ध द्वादशीला विष्णूची पूजा करून उपवास सोडावा. या दोन्ही दिवशी विष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावला जातो. शैव असो किंवा वैष्णव असो या दोन्हीचे उपासक एकादशीचे व्रत करतात. विठ्ठलासंबंधी सुद्धा अनेक कथा पुराणात आहेत. विठोबा हा भक्त पुंडलिकाच्या भेटीला आला होता. विठोबा हा वारकरी संतांचा कैवारी समजला जातो. विठ्ठलाचा अवतार गयासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी झाला होता. द्वापर युगात गयासूर नावाचा अधर्म संस्थापक भ्रष्ट राक्षस होऊन गेला.
जगत्पिता ब्रह्माच्या आज्ञेने श्रीहरीने बौद्ध नामे अवतार घेऊन या गयासुराला अग्निकुंडात जाळून भस्म केले होते नंतर त्यांचा परम भक्त पुंडलिक यास भेटून त्याला स्वतःचे स्वरूप दाखवले होते आणि मातापित्याची सेवा केल्याने फळ म्हणून पुंडलिकाला मोक्ष दिला होता अशी ही विठ्ठल अवतारीची कथा जिथे घडली ते ठिकाण म्हणजे दिंडीरवण जे पंढरपूर जवळील भीमातटी वसलेले आहे आणि भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर भगवान विष्णू विठ्ठला च्या स्वरूपात या पंढरपूर ठिकाणी स्थापित झाले असे म्हणतात जीवनात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी. शेवटी एवढेच म्हणेन,
पाऊले चालती पंढरीची वाट |
मन आतुरले घेण्या माऊलीची भेट ||