हल्ली तुकाराम मुंडे हे नाव जरी वाचलं किंवा ऐकलं तरी त्यापुढे एक सजग शिस्तप्रिय अधिकारी म्हणून व्यक्ती समोर येते. ते जिथे कुठे जाता तिथल्या सगळ्या कर्मचारी वर्गात आपोआप एक शिस्त लागते असं बोललं जातं आता ते सर्वसामान्यांचे हिरो आणि सिस्टीमच्या विरोधात वागणाऱ्यांचे कर्दन काळ अशी त्यांची ओळख आहे.
मात्र याच तुकाराम मुंडेंची वारंवार होणारी बदली देखील चर्चेचा विषय ठरतो. कारण तुकाराम मुंडे जिथे कुठे जातात तिथे त्यांची काही महिन्यात बदली ही ठरलेलीच असते आणि याचं कारण म्हणजे त्यांची कामाची पद्धत अगदी शिस्त प्रामाणिकपणा आणि व्यवस्थेला न झुकणारा बाना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून पुरस्कार प्राप्त असलेल्या या तुकाराम मुंडेंची आता सुद्धा बदली करण्यात आलेली आहे.
असंघटित कामगार विभागाच्या आयुक्त पदावरून त्यांची आता मुंबईतल्या दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आलेली आणि त्यांच्या बाबत अशी चर्चा असते की मुंडे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना हे झेपतच नाहीत म्हणजे एकीकडे नियमानुसार तीन वर्षांनी बदलीची अपेक्षा असते पण तुकाराम मुंडेंच्या बाबतीत मात्र हे हस होतच नाही वर्षभरातच त्यांच्या बदलीचे आदेश निघतात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे हे ओळखले जातात आणि त्यामुळेच म्हणजे त्या सिस्टीमच्या विरोधातले अनेक जण तुकाराम मुंडेना टरकून असतात. अनेकदा अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याशीही हे तुकाराम मुंडेंचे खटके वाजलेले आहेत. बहुदा त्यामुळेच तुकाराम मुंडेंची सातत्याने ही बदली होत असते आणि यातच पुन्हा एकदा मुंडेंची बदली झालेली आहे.
मुंडेंची आता बदली होण्याच कारण काय मुंडेंनी आता कुणाचा बाजार उठवलाय सगळं सविस्तर जाणून घेऊयात या धडाडीचे आणि कणखर बाण्याचे आयएस अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तुकाराम मुंडेंची 20 वर्षात सलग 23साव्या वेळेस बदली झालेली आहे आणि यामुळे त्यांच्या नावासोबत बद बदलीचा ठसा हा अधुरेखित होत चाललेला आहे
सध्या या मुंबईतील दिव्यांग कल्याण विभागात सचिव म्हणून त्यांची नव्याने बदली करण्यात आलेली त्यामुळे ते पुन्हा एकदामुंबईत या खात्याचा कारभार पाहणार आहेत आणि त्यामुळे ते इथं कसं काम करतात याकडे सगळ्यांच लक्ष लागले आणि एरवी म्हणजे त्या नियमानुसार तीन वर्षांनी बदलीचा आदेश असतो मात्र तुकाराम मुंडे याला अपवाद मानले जातात अगदी त्यांच्याबाबत वर्षभरातच या बदलीची ऑर्डर येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही त्यांची पोस्टिंग होते मात्र हे झालं अगत्या मुंडेंच्या नवे बदली कुठे होती. कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या आजवर एकूण 22 बदल्या झाल्यात असून ही 23सावी बदली आहे.
यापूर्वीच्या त्यांच्या सगळ्या बदल्या कुठे कुठे झाल्या आणि त्या का झाल्या याचाही थोडक्यात आपण आढावा घेऊयात:
साधारण 2005 ते 2025 या 20 वर्षाच्या एकूण काळात तुकाराम मुंडेची तब्बल 23 वेळा बदली झाली त्यांच्या या एकूण प्रवासात त्यांनी महाराष्ट्रातल्या मंडळी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आणि खात्यांमध्ये काम केले.
- ऑगस्ट 2005 मध्ये ते सोलापूर येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले.
- नंतर सप्टेंबर 2007 मध्ये देगलूर उपविभागाचे ते उपजिल्हाधिकारी झाले.
- जानेवारी 2008 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम सुरू केलं.
- मार्च 2009 मध्ये त्यांनी आदिवासी त्या विभागात आयुक्त म्हणून बदली झाली.
- जुलै 2009 मध्ये परत ते वाशिमचे सीईओ झाले.
- जून 2010 मध्ये कल्याण येथे सीईओ म्हणून काम पाहिलं.
- जून 2011 मध्ये त्यांची जिल्हाधिकारी म्हणून जालना येथे बदली झाली.
- सप्टेंबर 2012 मध्ये मुंबईत विक्रीकर विभागात सह आयुक्त म्हणून रुजू झाले.
- नोव्हेंबर 2014 मध्ये पुन्हा सोलापूरचे जिल्हाधिकारी झाले.
- मे 2016 मध्ये ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त झाले.
- मार्च 2017 मध्ये पुण्याच्या पीएमपीएल चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं होत
- फेब्रुवारी 2018 मध्ये नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी सुद्धा मंडळी त्यांची नेमणूक झाली
- नोव्हेंबर 2018 मध्ये नियोजन विभागात सहसचिव म्हणून बदली झाली.
- डिसेंबर 2018 मध्ये एड्स नियंत्रण प्रकल्पाचे अधिकारी म्हणून मुंबईत आले.
- जानेवारी 2020 मध्ये नागपूर महापालिकेचे आयुक्त झाले
- ऑगस्ट 2020 मध्ये परत मुंबईमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव झाले.
- जानेवारी 2021 मध्ये त्यांची बदली दिल्लीतील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगात झाली.
- सप्टेंबर 2022 मध्ये ते आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियान एनएचएम चे संचालक झाले.
- नोव्हेंबर 2022 मध्ये केवळ दोन महिन्यात त्यांची अचानक बदली झाली आणि त्यांना प्रतीक्षा यादीत टाकण्यात आलं.
- एप्रिल 2023 मध्ये त्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात सचिव म्हणून नेमण्यात आलं
- जून 2023 रोजी मराठी भाषा विभागात सचिव झाले.
- जुलै 2023 मध्ये कृषी व पशुसंवर्धन च्या एकूण विभागात सचिव म्हणून त्यांची बदली झाली
- अगदी म्हणजे अलीकडेच ऑगस्ट 2025 मध्ये त्यांची 23वी बदली झाली असून त्यांना दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.
आता ह्या वरच्या सगळ्या बदल्यांचे जर आदेश मंडळी पाहिले तर बहुतेक बदल्या ह्या वर्षभराच्या आत त्यांच्या झालेल्या आपल्याला दिसत आता म्हणजे त्यामुळे मुंडे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना झेपत नाहीत असं बोललं जातं तुकाराम मुंडे यांचे अनेक किस्से आहेत ज्यामुळे त्यांच्या कामाची शैली सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरते आधी औरंगाबाद इथे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 2005 मध्ये केंद्रीय सेवा परीक्षेत देशात विसावा क्रमांक पटकवला होता.
सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली त्यानंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली होती आणि पुढे ते नांदेडला मंडळी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. यानंतर 2008 नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर लगेच त्यांची त्यांनी काही शाळांना भेट दिली होती तिथं आणि त्यावेळी अनेक शिक्षक गैरहजर असल्याचं त्यांना लक्षात आलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व गैरहजर शिक्षकांना निलंबित केलं होतं.
आता त्यानंतर शिक्षकांची गैरहजरी 10 ते 12 टक्क्यावरून थेट एक ते दोन टक्क्यावर आली आणि वैद्यकीय विभागातील अनियमितता पाहून त्यांनी डॉक्टरंनाही निलंबित केलं होतं या अशापकारे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या शिस्तीचा अधिकारी सरकारी यंत्रणेत दिसून आला होता. पुढे 2009 त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासीआयुक्त म्हणून करण्यात आली आणि हे पद खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं होतं हे विशेष आहे मात्र वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली खादी व या ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुंबईला झाली जालना जिल्हाधिकारी असताना त्यांनी जायकवाडीवरून पाणी आणण्याचं सहा वर्षापासून रखडलेल काम केवळ तीन महिन्यात पूर्ण केलं होतं अगदी म्हणजे सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून काम करताना जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी 282 गावांमध्ये केवळ 100 कोटी रुपयात काम केली होती आणि मंडळी यामध्ये म्हणजे लोकसहभाग 50 ते 60 कोटी रुपयांचा होता. याआधी टँकरवर अवलंबून असलेल्या सोलापुरात टँकरची गरज 30 ते 40 टक्क पर्यंत कमी झाली आणि त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरवण्यात आलं होतं अगदी म्हणजे सोलापूरच्या पंढरपूर वारीची जबाबदारी असताना त्यांनी मुख्यमंत्री वगळता सर्व व्हीआयपीना दर्शन बंद केलं आणि त्यामुळे काही लोक नाराज सुद्धा झाले आणि सप्टेंबर 2012 मध्ये त्यांची बदली परत मुंबईला सह आयुक्त विक्रीकरच्या विभागास झाली आता त्यांच्या काळात महसूल 143 कोटीवरून थेट 500 कोटीवर गेला अगदी म्हणजे नवी मुंबई महा महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी अनेक काम सुकार कर्मचाऱ्यांना सेवेतून दूर केलं अगदी वाहतूक सुधारण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई सुद्धा त्यांनी केली होती.
परिणामी नवी मुंबईकर सुकावले पण राजकीय दबावही वाढला होता. अगदी एवढंच नाही तर म्हणजे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली पुण्यात पीएमपीएम एल चे व्यवस्थापक असताना दर महिन्याला सहा लाख प्रवासी असलेली बस सेवान लाखांवर गेली होती. कार्यक्षमता 40% वरून थेट 100% वर गेली आणि केवळ तीन महिन्यात म्हणजे 2018 मध्ये नाशिक महापालिकेत देखील त्यांनी चांगलं काम केलं पण सत्ताधाऱ्यांशी संघर्ष निर्माण झाला.
नागरिकांनी त्यांना पाठिंबा दिला तरी त्यांची बदली झालीच आणि अशा प्रकारे गेल्या 19 वर्षात तुकाराम मुंडेंची 23 वेळा बदली झाली. या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मुंडे जी पावलं उचलतात अगदी तीच त्यांच्या बदल्यांची कारण ठरतात असं बोललं जातं आणि सामान्य लोकांना त्यांच्या कार्यशैलीच कौतुक वाटतच पण म्हणजे सगळ्यासत्ताधाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना ती अडचणीत आणणारी सुद्धा वाटते त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक कधी कधी त्यांच्या विरुद्ध एकत्र येतात आणि परिणामी त्यांची मंडळी बदली होत असते. मात्र यानंतर ही प्रत्येक ठिकाणी अगदी तिथे रुजू झाल्यानंतर तुकाराम मुंडेनी आपल्या धडाकेबाज आणि एकूणच कार्यशालीत कधीच बदल केलेला नाही हे विशेष आहे आता ते दिव्यांग कल्याण विभागात सचिव पदाची जबाबदारी पार पडत आहेत आणि त्यांनी या विभागातही व्यवस्थेला कसे टाळ्यावर आणले जाते हे त्यांच्याकडून पाहणं उत्सुक्याच असणार आहे बाकी तुम्हाला या आपल्या तुकाराम मुंडेंच्या या प्रवासाबद्दल तसेच त्यांच्या कार्यपद्धतीवर काय वाटतं .