अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण अन् दोन मिनिटांमध्येच कोसळले विमान..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

अहमदाबाद येथून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले. बोइंग ७८७ ड्रीमलाइनर प्रकारातील या विमानात ११ लहान मुलांसह २४२ जण होते. त्यापैकी केवळ एकच प्रवासी बचावला आहे. मृतांत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात घडली. यात शिकाऊ डॉक्टरांसह २४ जणदेखील मृत्युमुखी पडले, तर अनेक जण जखमी झाले. अनेक इमारती, वाहनांना आग लागली.

अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सांगितले, सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर या विमानातील वैमानिकाने ‘मेडे’ असा संदेश पाठविला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानंतर किंवा काही संकटात सापडले असेल, तर हा संदेश दिला जातो. हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे एका स्थानिक नागरिकाने चित्रित केलेल्या व्हिडीओत दिसून येते. या विमानातील २४२ जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही समावेश होता

विद्यार्थी जेवण करीत होते अन् अंगावर पडले विमान:

हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानीनगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वॉर्टर्सजवळ कोसळले. या दुर्घटनेत किमान पाच एमबीबीएस विद्यार्थी, एक पीजी निवासी डॉक्टर आणि एका सुपरस्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी मृत्युमुखी पडली असून, ६० हुन अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती आहे.

दुपारचे जेवण सुरू असल्याने विद्यार्थी आणि निवासी 3 डॉक्टर हॉस्टेलमध्येच होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिली आहे. विमान कोसळल्यानंतर लागलेली आग इतकी मोठी होती की, त्यामुळे एक पाच मजली इमारतही खाक झाली.

विमान थोडे पुढे गेले असते, तर साबरमती नदीत उतरवले असते…

एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन एआय-१७१ विमानाचा झालेला अपघात हा पक्षी धडकल्याचा प्रकार वाटत नाही. वैमानिकाने विमान ज्या पद्धतीने खाली आणले, ते पाहता विमान अखेरपर्यंत सुरक्षित ठिकाणी नेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न अनुभवी वैमानिकच करू शकतो, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. परंतु, ब्लॅक बॉक्समधून प्राप्त होणाऱ्या रेकॉर्डिंगच्या आधारे संपूर्ण सत्य समोर येईल.

या घटनेनंतर काहींना १५ जानेवारी २००९ रोजीच्या यूएस एअरवेजच्या विमानाच्या अपघाताची आठवण झाली. यूएस एअरवेजच्या या ए३२० विमानाला पक्षी धडकल्यानंतर, वैमानिकाने ते हडसन नदीत उतरवले होते. या घटनेत कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झाला नव्हता. एअर इंडियाचे विमान-१७१ पुढे जाऊ शकले असते, तर ते साबरमती नदीत उतरवण्याचा प्रयत्न करता आला असता आणि प्रवाशांचे जीव वाचण्याची शक्यता वाढली असती. आपत्कालीन परिस्थितीत, जर विमान योग्यरीत्या उतरले तर ते काही काळ पाण्यात तरंगू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

कोण कोण प्रवास करत होते?

अहमदाबाद मध्ये एअर इंडिया चे विमान कोसळलं 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमानाचा अपघात झाला. प्रवासी विमान अहमदाबाद वरून लंडन कडे जात होतं या विमानात एकूण 242 प्रवासी होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाने या विमानात होते या विमानात 169 भारतीय 53 ब्रिटिश नागरिक सात पोर्तुगीज नागरिक होते एक कॅनडियन नागरिकही या विमानातून प्रवास करत होता या विमानात 11 लहान मुलं आणि दोन बाळही होती एअर इंडिया १७१ दुर्घटना झालेले या विमानाचं नाव आहे. एअर इंडिया १७१ विमानाचे सुमित सबरवाल हे कॅप्टन होते. कॅप्टन सुमित सबरवाल्यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव असल्याचं डीजीसीए कडून सांगण्यात आलं. अहमदाबाद रनवे नंबर 23 वरून १ वाजून ३८ मिनिटांनी विमानाने टेक ऑफ केल्याची माहिती डीजीसीएने दिली तर १ वाजून 39 मिनिटांनी विमानाने अपत्कालीन संदेश पाठवल्याचं डीजीसीए कडून सांगण्यात आलंय एक वाजून ३९ मिनिटांनंतर एटीएस कडून विमानासोबत संपर्क झाला नसल्याची माहिती नगर या रहिवासी भागात हे विमान कोसळलं या विमानात 230 प्रवासी आणि दोन पायलट सह द कृ मेंबर होते असं डीजीसीए कडून सांगण्यात आलं तर तपशिलाची पडताळणी करत आहोत, असं एअर इंडियाकडून सांगण्यात आलेला आहे.

अपघातग्रस्त विमानाने 14 डिसेंबर २०१३ ला पहिलं उडान केलं होतं बारा वर्षापासून विमान एअर इंडियाच्या ताफ्यात होतं अहमदाबादच्या विमानतळावरील सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या पंतप्रधान मोदी आणि शहरांमध्ये चर्चा झाली आणि शहा अहमदाबाद साठी रवाना झाले नागरी उडान मंत्री राममोहन नायडू अहमदाबादच्या दिशेने रवाना झालेले आहेत युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याच्या आदेश दिल्याचे मुख्यमंत्री पटेल यांनी म्हटलं अमित शहांशी चर्चा झाली केंद्राची सर्व मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री पटेल यांनी दिली एअर इंडिया चा विमान मुलांच्या वस्तीग्रहावर कोसळलं बीजे मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वस्तीगृहावर विमान कोसळलं 20 पेक्षा जास्त मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू मृत्यूची भीतीही वर्तवण्यात येते.

अपघात होण्याआधीचा विमानातला एक व्हिडिओ:

अपघात होण्याआधीचा विमानातला एक व्हिडिओ प्रवाशाकडनं ट्विट करण्यात आलेला आहे. आकाश वातसा या प्रवासाकडून अपघाताच्या आधीचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे या प्रवाशाला कल्पनाही नसेल की विमानांमधील एसी आणि टच स्क्रीन टीव्ही जो आहे तो बंद असल्याची तक्रार त्यांने त्यामध्ये केली होती हेच विमान नंतर अहमदाबाद वरून लंडनसाठी उडान घेत होतं असा दावा करण्यात आलाय. सर्वात मोठी दुर्घटना ही झालेली आहे.

खासदार तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नीचा मृत्यू:

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी अपर्णा यांचा मृत्यू झाला. त्या विमानात सिनिअर कु-मैंबर म्हणून काम करीत होत्या. या घटनेची माहिती कळताच राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे मुंबईतील गोरेगाव येथील महाडिक यांच्या घरी पोहोचल्या. खासदार तटकरे यांच्या मोठ्या भगिनीच्या अपर्णा या सूनबाई होत्या. त्यांचे पतीसुद्धा एअर इंडियामध्ये कार्यरत आहेत. महाडिक कुटुंब मुंबईतील गोरेगाव येथे वास्तव्यास आहे.

एक दिवस आधीच आई-वडिलांना भेटून गेली होती मैथिली:

अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात एअर होस्टेस म्हणून काम करत असलेल्या पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील (२२) हिचाही समावेश आहे. विमान अपघाताची खबर मिळताच कुटुंबीय गुरुवारी दुपारीच अहमदाबादकडे रवाना झाले असल्याची माहिती निकटवर्तीय जितेंद्र म्हात्रे यांनी दिली.

मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेस म्हणून काम करत होती. गुरुवारी अहमदाबादहून लंडनकडे रवाना होणाऱ्या विमानात मैथिलीची ड्युटी होती. त्यामुळे विमान दुर्घटनेच्या आदल्या दिवशी बुधवारी मैथिलीने आपल्या आई-वडील व कुटुंबीयांसोबत पूर्ण दिवसभराचा वेळ व्यतित केला. त्यानंतर गुरुवारी सकाळीच मुंबईमार्गे मैथिली मुंबईहून अहमदाबाद येथील एअरपोर्टला रवाना झाली होती. त्यानंतर एअर इंडियाचे हे विमान १२ क्रू सदस्यांसह २४२ प्रवाशांना घेऊन अहमदाबादवरून लंडनला जात असतानाच रहिवासी भागात दुर्घटनाग्रस्त झाले. मैथिलीचे वडील, आई, मामा तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले.

लंडनमधील मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या माता-पित्याचा मृत्यु:

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी दुपारी उड्डाणानंतर कोसळले. या दुर्घटनेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील हातीद गावातील महादेव तुकाराम पवार (वय ६८) व आशाबेन महादेव पवार (वय ६०) या दाम्पत्याचा समावेश आहे. १८५ व १८६ नंबरच्या आसनावर महादेव व आशाबेन बसले होते. या दोघांना दोन मुले आहेत. एक मुलगा लंडनमध्ये असून, दुसरा मुलगा गुजरातमध्ये चालक म्हणून काम करतो. गुरुवारी दुपारी महेश पवार हे विमानतळावर महादेव व आशाबेन यांना सोडायला गेले होते. सोडून बाहेर आल्यावर विमान अपघाताची माहिती कळाली अन् त्याने कुटुंबीयांना माहिती दिली.

कापड मिलमध्ये होते नोकरीला पवार कुटुंबीय हे नडीयाद (जि. खेडा, राज्य गुजरात) येथे राहण्यास आहेत. नडीयाद (गुजरात) येथील कापड मिल येथे काम करत होते. सध्या निवृत्त झाले होते. गुरुवारी ते दोघे लंडनमध्ये राहणाऱ्या मुलाकडे एअर इंडियाच्या विमानाने जात होते. दोघेही अपघातात मरण पावले. ही माहिती महेश पवार यांनी हातीदच्या नातेवाइकांना कळविली. हातीद येथे शोककळा पसरली आहे.

क्रू मेंबर रोशनीचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न राहिले अधुरे:

डोंबिवली पूर्वेतील रहिवासी रोशनी सोनघरे (२७, रा. उमिया बिल्डिंग) हिचे निधन झाले. ती दोन वर्षापासून एअर इंडियात क्रू मेंबर म्हणून कामाला होती. तिला एअर होस्टेस व्हायचे होते. ते तिचे स्वप्न अधुरे राहिल्याची खंत कुटुंबीयांनी व्यक्त केली.

तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. भाऊ विघ्नेश हा शिपिंग कंपनीत कामाला आहे. वडील राजेंद्र सोनघरे टेक्निशियन म्हणून काम करतात. रोशनी या आधी स्पाइस जेट या विमान कंपनीत कामाला होती. लहानपणापासूनच तिचे एअर होस्टेस होण्याचे स्वप्न होते. आई राजश्री हिच्याशी ती अपघातापूर्वी सकाळी फोनवर बोलली होती, तेच तिचे घरच्यांशी शेवटचे संभाषण झाल्याचे सांगण्यात आले. घटना कळताच तिचे वडील, भाऊ अहमदाबाद येथे रवाना झाले. आई घरीच असून, आईचा भाऊ रोशनीचा मामा प्रवीण सुखदरे यांनी ही माहिती दिली. डोंबिवलीतआधी ते ग्रॅटरोड येथे वास्तव्याला होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *