शिंदेना विचारा राज ठाकरेना पत्रकारांनी घेरलं मराठा आरक्षणाविषयी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली राज ठाकरे म्हणाले हे सगळं एकनाथ शिंदेना विचारा त्यानंतर मुंबईला वेठीला धरलं जातय असाही प्रश्न पत्रकारांनी विचारला या प्रश्नावरही राज ठाकरे म्हणाले तुम्हाला तेच सांगतोय एकनाथ शिंदे समोर आले की त्यांना विचारा मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर राज ठाकरेंच एकच उत्तर होतं एकनाथ शिंदेना विचारा ते मागच्या वेळी आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते त्यांनी वाशीला जाऊन मिटवल होतं मग परत जरांगे पाटील का आलेत शिंदेकडे सगळी उत्तर आहेत वास्तविक जरांगे पाटलांनी जे आंदोलन पुन्हा उभारल आहे यामागे कुठेतरी भाई विरुद्ध भाऊंचा अंतर्गत संघर्ष असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती.
जरांगेना पुढे करून भाईच आपलं मुख्यमंत्री पदाचे ऑपरेशन राबवत आहेत असंही बोललं जात होतं पण थेटपणे या चर्चा अजूनही होत नव्हत्या राज ठाकरेंनी मात्र शिंदेना विचारा असं स्टेटमेंट करून या चर्चांना हवा दिली. राज ठाकरेंनी स्टेटमेंट करून एकनाथ शिंदेना कातरीत पकडत फडणविसांना सेफ करण्याचा प्रयत्न केला आहे का की खरंच जरांगे पाटलांचा आंदोलन शिंदे प्रणित असल्याचं दिसतय नेमके हे आरोप का होतायत?
राज ठाकरेंच्या हेतूपासून कारण शिंदेना विचारा या स्टेटमेंट मधून त्या संपूर्ण आंदोलनामागे कुठेतरी शिंदे असल्याचं सांगू पाहतायत आता मूळ मुद्दा म्हणजे शिंदे आहेत असं सिद्ध करून किंवा तसं दाखवून राज ठाकरे काय साध्य करू पाहतायत तर इथे आपल्याला राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीकतेचा संदर्भ पाहावा लागतो लोकसभेच्या प्रचारात शिंदेच्यामुळे भाजपला मुंबईत बळ मिळेल असा अंदाज होता पण भाजपसाठी शेवटच्या टप्प्यात राज ठाकरे मैदानात उतरले तिथूनच शिवसेना फुटली तरीही मुंबई आणि मराठी मतदार या दोन्ही गोष्टी आपल्यासोबत घ्यायच्या असतील तर शिंदे पुरेसे नाहीत तर ठाकरे ब्रांड भाजपला सोबत ठेवावाच लागेल अशा चर्चा सुरू झाल्या मात्र हे दीर्घकाळ टिकलं नाही.
विधानसभेत राज यांनी स्वतंत्रपणे आपले उमेदवार उभे केले त्याचा सर्वात मोठा तोटा एकनाथ शिंदेना झाला एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरेंच्या मुलाच्या विरोधात आपल्या पक्षाच्या सदासरवणकरांना माघार घेऊ दिली नाही इथेच राज ठाकरे आणि शिंदे असा नवा सामना सुरू झाल्याचं बोललं जातं कारण त्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सामन्यात शिंदेनी राज ठाकरेंच्या घरी वारंवार भेटी देऊन स्वतःला ठाकरेचे व्ॅलिडेशन मिळवून घेण्याचे प्रयत्न केले होते पण विधानसभेनंतर या भेटीगाठी बंद झाल्या झाल्या.
फडणवीस राज अशी नवी युती दिसू लागली:
दुसरीकडे फडणवीस आणि शिंदे हा सुप्त संघर्ष देखील उफाळून येताना दिसला अशावेळी ठाकरेच्या व्ॅलिडेशनची गरज फडणविसांना भासू लागली आणि त्यातून फडणवीस राज अशी नवी युती दिसू लागली शिंदेचा प्रस्थ कमी करण्यासाठी उद्धव ठाक सोबतच वितुष्ट कमी करणं आणि राज ठाकरेसोबत जवळीक निर्माण करणं या दोन्ही पातळ्यांवर फडणविसांनी कार्यक्रम सुरू केले थोडक्यात सध्याच्या राजकारणात शिंदेच वरचड होणं हे फडणवीस आणि राज ठाकरे या दोन्ही राजकीय नेत्यांना नको आहे हे स्पष्टपणे अधोरेख होत.

तिसरीकडे उद्धव ठाकरेना शिंदे नको आहेत हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे अर्थात या पडद्यामागच्या राजकारणामुळेच राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याची स्क्रिप्ट फडणवीसच लिहीत असल्याचे आरोप होत गेले आता हे सगळं सांगण्याचं कारण इतकच जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे फडणवीस डॅमेज होत आहेत अशावेळी शिंदे नाव घेतल्यास आंदोलनामागे शिंदे आहेत असं परसेप्शन सुरू होतं.
आंदोलनाचा फायदा फडणविसांना कसा होईल?
फडणविसांना नेमका फायदा कसा होतो ते पाहू तर पहिलं म्हणजे आंदोलनाचा फोकस पूर्णपणे शिंदे कडे शिफ्ट होतो सध्या मराठा आंदोलन तीव्र आहे हेच आंदोलन जेव्हा एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात झालं होतं तेव्हा सगळे सोयरेचा जीआर काढून आंदोलन वाशीतच थांबवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी ठरले होते. आता मात्र सरकारकडून तसे कोणतेच प्रयत्न झाले नाहीत आणि मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरू झालं. मराठा आंदोलनकर्त्यांनी मुंबई जाम केल्याने आता आंदोलनाचे पडसाद फक्त मराठा मतदारांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तर मुंबईच्या सर्वसामान्य लोकांमध्ये देखील त्याचे पडसाद दिसू लागलेत.
अशावेळी कुठेतरी फडणवीस अयशस्वी ठरतायत असं परसेप्शन मोठं होऊ लागलय. कालपासून देखील बीएमसी कडून शौचालयांना कुलूप लावण्यात आलं जाणीवपूर्वक लाईट बंद करण्यात आली हॉटेल्स बंद ठेवण्यात आले असे मेसेज जाऊ लागले. पर्यायाने फडणवीस हे आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरू लागल्याची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे एकनाथ शिंदेनी हेच आंदोलन कशाप्रकारे हाताळलं होतं याचे दाखले देखील दिले जाऊ लागले. अर्थात या चर्चेत शिंदे प्लस मध्ये जात होते तर फडणवीस मायनस मध्ये मात्र राज ठाकरेंनी शिंदेकडे नेम धरल्याने शिंदेनी जाणीवपूर्वक आंदोलन घडवून आणला आहे असं परसेप्शन मोठं होताना दिसू शकतं. या परसेप्शनमुळे चर्चेचा संपूर्ण रोखच शिंदेकडे जातो. शिंदेनी जाणीवपूर्वकच हे आंदोलन घडवून आणला आहे. हे मत आपोआप फडणवीसांना सेफ करतं आणि शिंदेना टार्गेट करतं. एका अर्थाने फडणविसांना सेफ होण्यासाठी देखील राज ठाकरेचे स्टेटमेंट पूरक ठरताना दिसतं.
आंदोलन सामाजिक आहे कि राजकीय हा चर्चेचा विषय ठरला:
राज ठाकरेच्या स्टेटमेंटचा दुसरा परिणाम म्हणजे आंदोलनाचा पूर्ण फोकसच राजकीय होऊन जातो. जरांगे पाटलांचा आंदोलन हे सामाजिक आहे की राजकीय याबाबत चर्चा झडतायत. आंदोलनाला पाठिंबा असणारे लोक सातत्यान हे आंदोलन राजकारण विरहित असल्याचं सांगत आहेत. सर्वसामान्य मराठ्यांचे आजचे हाल आरक्षण नसल्यामुळे, आर्थिक संकट, शेती संकटामुळे आलेली परिस्थिती असे अनेक सामाजिक पदर समोर आणून मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे समजावून सांगितलं जात आहे. दुसरीकडे हे आंदोलन राजकीय असल्याचे आरोप सत्तादारी पक्षाकडून होत आहेत. आंदोलन राजकीय ठरवल्यास सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा आंदोलनातून निघून जातो.
आंदोलनाबाबत कठोर निर्णय घेणं सत्ताधारी पक्षांना सोप्पं होऊन जातं मात्र आंदोलनाचे स्वरूप सामाजिक राहिल्यास आंदोलनाबाबत कठोर निर्णय घेणं, मागण्या अमान्य करणं, आंदोलन हाताळणं या सर्वच गोष्टी सत्तादाऱ्यांसाठी अवघड होऊन बसतात राज ठाकरेंच्या स्टेटमेंट मुळे किमान या आंदोलनामागे शिंदे आहेत का अशा चर्चा तरी घडू लागल्यात ज्यामुळे आंदोलन राजकीय आहे अशा सत्तादाऱ्यांच्या आरोपांना बळ मिळतं ज्यामुळे आंदोलन हाताळणं सोप्पं जातं थोडक्यात राज ठाकरेंच्या आरोपामुळे आंदोलन कडे राजकीय म्हणून पाहिलं जाऊ लागेल त्याचा फायदा पुन्हा फडणविसांना आंदोलन हाताळताना मिळू शकतोच शिवाय दुसरीकडे शिंदे देखील डॅमेज होऊ शकतात.
थोडक्यात राज ठाकरेंच्या स्टेटमेंट मुळे एकाच वेळी फडणवीस सेफ होताना दिसतायत तर शिंदे टार्गेट होताना दिसतायत त्यातही सत्तेसाठी काहीही करण्याचा एकनाथ शिंदेचा इतिहास या आरोपांना बळकट करताना दिसू शकतो पण याचा अर्थ भाईंनी ट्रॅप लावलाच नाहीये असं म्हणणं देखील धाडसाच ठरेल राज ठाकरेंच्या स्टेटमेंटचा हेतू आपण समजून घेतला.
शिंदे या आंदोलनामागे नाहीतच असेही म्हणता येत नाही कारण?
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिंदे या आंदोलनामागे नाहीतच असेही म्हणता येत नाही त्यासाठी देखील काही पूरक कारणं समोर आणली जातायत ती देखील पाहू पहिलं कारण म्हणजे, जरांगे आणि शिंदेची युती जरांगे पाटलांची पहिली चर्चा झाली ती अंतरवादी सराटीत झालेल्या लाठी हल्ल्यानंतर तेव्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेकडे कारभार होता तर गृहमंत्री फडणवीस होते या लाठी हल्ल्याचे संपूर्ण आरोप फडणविसांकडे शिफ्ट झाले होते त्यातूनच शिंदेनी जरांगींना बळ दिल्याचं बोललं गेलं मराठवाडा आणि मराठा मतदार फोकस ठेवून शिंदेनी अगदी सफाईदारपणे जरांगेना बळ दिल्याचं सांगण्यात येतं अर्थात जरांगे पाटलांनी देखील कधी शिंदेना टोकाचा विरोध केलेला नाहीये शिंदे आणि जरांगे पाटलांची छुपी युती असल्याच्या चर्चा पूर्वीपासून आहेत एकमेकांच्या पूरक भूमिका घेतल्याने हे आरोप घट्ट होत गेले आहेत ज्यामुळे आताही शिंदे आंदोलनाला बळ देतायत असे आरोप होतायत.
दुसरं कारण म्हणजे फडणवीस शिंदे संघर्ष शिंदेनी मुख्यमंत्री पदासाठी हट्ट धरला तो पूर्ण झाला नाही त्यानंतर शिंदे सत्तेबाहेर राहणार अशाही बातम्या आल्या पण शिंदेना उप मुख्यमंत्री व्हावं लागलं शिंदेना मुख्यच व्हायचं आहे या चर्चा अगदी सत्ता स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून आहेत. त्यातूनच शिंदे फडणवीस सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं बोललं जातय. दुसरीकडे शिंदेनी देखील अमित शहांकडे आपली हॉटलाईन कायम ठेवली आहे. फडणवीस हे केंद्रातले लॉंग टर्मचे नेते आहेत याचा विचार करून फडणविसांना महाराष्ट्रापुरत मर्यादित ठेवण्याचे प्रयत्न केंद्रातून होत असल्याचे देखील आरोप होतात. अर्थात केंद्रातून मिळणाऱ्या छुप्या पाठिंब्यामुळेच शिंदे महाराष्ट्रात दोन हात करू शकतात असं सांगण्यात येतय.
त्यामुळे फडणविसांच नेतृत्व मान्य न करताएकनाथ शिंदेनी बंडाची यंत्रणा सुरू केल्याचं बोललं जातय आणि गेल्या काही दिवसात झालेले दिल्ली दौरे कॅबिनेटमधील निर्णय अशा अनेक गोष्टी फडणवीस, शिंदे सुप्त संघर्ष धुमसत असल्याचं सांगण्यासाठी पुरेश आहेत अर्थात या संघर्षात शिंदे आपल्या डावपेच आखणारच आणि त्यातलाच हा एक डाव असल्याचं बोललं जातय म्हणजेच जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शिंदे आहेत या चर्चा पहिल्यापासूनच आहेत आताही ते आहेत पण जाहीरपणे स्टेटमेंट करून राज ठाकरे यांनी या चर्चांना हवा देण्याचं काम केलंय इतकंच मागे असणं आणि चर्चा होणं याचा फायदा शिंदेना झालाही असता पण जाहीरपणे चर्चा झडू लागल्यास मात्र शिंदेना या स्टेटमेंटचा तोटा जास्त होऊ शकतो हे मात्र नक्की.