अंतराळवीर शुभांशू शुक्ला शास्त्रीय प्रयोग करून पृथ्वीवर परतले..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८ दिवसांचा मुक्काम करून अत्यंत आनंदी मुद्रेने अंतराळवीर शुभांशू शुक्ला मंगळवारी पृथ्वीवर परतले. ही अंतराळ सफर भारताच्या गगनयान मोहिमेसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. आपले अंतराळवीर स्वतः तयार केलेल्या यानातून अंतरिक्षात पाठविण्याचे ध्येय भारताने गगनयानच्या रुपाने उराशी बाळगले असून, त्यासाठी शुक्ला यांचे अनुभव अतिशय मोलाचे ठरणार आहेत.

राकेश शर्मा यांच्या १९८४मधील सोव्हिएत रशियन मोहिमेनंतर अंतराळात गेलेले शुभांशू हे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. तसेच, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. ते पृथ्वीभोवती तब्बल २० दिवस कक्षेमध्ये राहिले, अशी कामगिरी करणारेही ते पहिले भारतीय अंतराळवीर आहेत. भारत, हंगेरी आणि पोलंड या तिन्ही देशांचे अंतराळवीर चार दशकांनंतर अंतराळ सफरीवर गेले होते. ‘ड्रॅगन ग्रेस’ हे यान २५ जून रोजी जून रोजी अंतराळ स्थानकाशी यशस्वीरीत्या ओढले गेले. शुक्ला, कमांडर पेगी व्हिटसन, पोलंडचे स्लावोस उझनान्स्की व्हिस्निव्हस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांनी १८ दिवसांत ६० प्रयोग पूर्ण केले.

चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन, अंतराळात प्रयोग करणारे शुभांशू पहिले भारतीय अंतराळवीर, ७ दिवस राहणार वैद्यकीय निरीक्षणाखाली, ‘गगनयान’ मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण टप्पा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १८ दिवस मुक्काम केल्यानंतर शुभांशू शुक्ला यांच्यासह ४ अंतराळवीर ड्रॅगन ग्रेस यानाच्या सहाय्याने मंगळवारी पृथ्वीवर सुखरूप दाखल झाले. वातावरणात दाखल झाल्यानंतर हे यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे सॅन दिएगो किनाऱ्याजवळच्या समुद्रात पॅराशूटच्या साहाय्याने उत्तरविण्यात आले. शुभांशू हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रयाण केलेले, तिथे शास्त्रीय प्रयोग करणारे पहिले भारतीय ठरले. त्यांच्या अनुभवांचा मोठा फायदा भारताच्या गगनयान मोहिमेला होईल. हे अंतराळवीर सोमवारी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:५० वाजता ड्रॅगन ग्रेस या यानातून पृथ्वीवर येण्यास निघाले होते.

२२ तास २५ मिनिटांचा असा होता प्रवास:

प्रतितास २८,००० किमी. वेगाने प्रवास करत डूंगन ग्रेस या यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि प्रखर उष्णतेचा सामना करत महासागरात पॅराशूटच्या सहाय्याने ते उतरले. त्यानंतर हे यान स्पेसएक्स या जहाजावर नेण्यात आले. तिथे शुभांशू शुक्ला व अन्य तीन अंतराळवीरांना बाहेर आणण्यात आले. २० दिवसांच्या भारशून्य अवस्थेनंतर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेताना या चारही अंतराळवीरांना जमिनीवर उभे राहण्यासाठी सहायक कर्मचारी मदत करत आहे.

दिवस पहिला । १४ जुलै

  • दु. २.५० : कॅप्सूलचा दरवाजा बंद केला
  • दु. ४.३५ : कैप्सूल आयएसएसपासून वेगळे झाले
  • दु. ४.३५ : पहिले वेग नियंत्रण
  • दु. ४.४० : दुसरे वेग नियंत्रण
  • सायं. ५.२८ : तिसरे वेग नियंत्रण
  • सायं. ६.१५ : चौथे वेग नियंत्रण

दिवस दुसरा । १५ जुलै

  • दु. २.०७ : पृथ्वीच्या दिशेने परतीसाठी कक्षेबाहेर जाण्यासाठी इंजिन चालू
  • दु. २.२६ : कॅप्सूलचा मागचा भाग (ट्रेक) वेगळा करण्यात आला
  • दु. २.३० : कॅप्सूलचे पुढचे कव्हर (नोजकोन) बंद करण्यात आले
  • दु. २.५७ : लहान पॅराशूट्स उघडले
  • दु. २.५८ : मुख्य पॅराशूट्स उघडले
  • दु. ३.०० : ड्रॅगन स्प्लेंशडाऊन

अंतराळात शुभांशू यांनी केले हे प्रयोग:

  • शुभांशू सातही मायक्रोग्रॅव्हिटी प्रयोग व इतर नियोजित कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. यात टार्डिग्रेड्स, मायोजेनेसिस, मेथी-मूग अंकुरण, सायनाबॅक्टेरिया, मायक्रोअल्गी, पीक बियाणे आणि ‘वॉयेजर डिस्प्ले’ प्रयोगांचा समावेश आहे.
  • ऑक्सिऑम-४ या मोहिमेसाठी इस्रोने ५५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. २०२७ मध्ये भारताच्या गगनयान मोहिमेद्वारे अंतराळयान प्रक्षेपित होणार आहे. त्याद्वारे भारतीय अंतराळवीरांना अंतरिक्षात नेण्यात येईल.

लखनौत जल्लोष :

शुभांशू यांच्या पृथ्वीवर यशस्वी पुनरागमनाचे लखनौमध्ये ‘भारतमाता की जय’च्या गगनभेदी घोषणा देत जल्लोषात स्वागत करण्यात आले. शुक्ला हे लखनौचे मूळ रहिवासी आहेत. ते शिकलेल्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये कुटुंबीय, शिक्षक, विद्यार्थी यांनी थेट प्रक्षेपण बघितले.

आईच्या हाती होता तिरंगा ध्वज:

शुभांशू यांची आई आशा देवी यांनी हातात तिरंगा ध्वज घेतला होता. शुक्ला यांची बहीण सूची मिश्रा म्हणाल्या की, गेल्या १८ दिवसांत आम्ही या अंतराळ प्रवासाबद्दल खूप चर्चा केली. शुभांशू आता या सफरीवरून पृथ्वीवर परतले आहेत. देशासाठी जे कार्य करायचे ठरविले होते ते त्यांनी यशस्वीपणे पार पाडले, याचे आम्हाला अतिशय समाधान वाटत आहे.

द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

शुभांशु यांचे मी हार्दिक स्वागत करते. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील मोहिमेत त्यांनी बजावलेली कामगिरी भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी तसेच विज्ञान व तंत्रज्ञानातील आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दृष्टीने एक नवे पर्व आहे.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

शुभांशू शुक्ला यांची समर्पण वृत्ती, धैर्य यामुळे अब्जावधी लोकांना प्रेरणा मिळाली आहे. शुभांशू हे अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय ठरले. ही कामगिरी भारताच्या ‘गगनयान’ या अंतराळ मोहिमेसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.

शुभांशू १७ ऑगस्टपर्यंत भारतात येणार :

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, शुभांशु शुक्ला १७ ऑगस्टपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. या मोहिमेनंतर शुभांशू काही गोष्टींमध्ये व्यग्र असणार आहेत. त्यांना सात दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येईल. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांची चर्चा होणार आहे.

‘ही अंतराळ यात्रा तर सर्व भारतीयांची’

भारताच्या ‘गगनयान’ मोहिमेचा प्रारंभ अजून व्हायचा आहे. त्याआधी शुभांशू शुक्ला यांचा सहभाग असलेल्या अंतराळ सफरीने भारताच्या अंतराळ संशोधनासाठी नवीन वाटा खुल्या झाल्या. शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून सर्वांना सांगितले होते की, माझ्या अंतराळ सफरीत सर्वांचा सहभाग हवा आहे, भारताच्या मानवासहित आयोजिल्या जाणाऱ्या अंतराळ मोहिमेत आपण सर्वांनी एकदिलाने सहभागी झाले पाहिजे, असे आवाहनही शुक्ला यांनी केले होते.

शुभांशू शुक्ला आम्हाला तुमचा अभिमान आहे…

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) १८ दिवस मुक्काम केल्यानंतर अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना घेऊन परतलेले ‘ड्रॅगन ग्रेस’ अंतराळयान पृथ्वीचर उत्तरले तेव्हा त्यात केवळ शास्त्रीय माहिती व बियाण्यांचे नमुने नव्हते, तर चिकाटी, स्वप्नांची पूर्तता आणि भारताच्या वाढत्या अंतराळ महत्वाकांक्षांची कहाणीही त्याने सोबत आणली. शुभांशू यांच्या या यशाने भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला.

३९ वर्षीय ग्रुप कैप्टन शुभांशू शुक्ला हे भारतीय हवाई दलातील अधिकारी आणि वैमानिक आहेत. अॅऑक्सिओम-४ या व्यावसायिक अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर म्हणून त्यांनी आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली. ही मोहीम इस्रो, नासा यांच्या सहकार्याने अॅक्सिओम स्पेसने पार पाडली. शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय तसेच १९८४ मध्ये राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक मोहिमेनंतर अंतराळात गेलेले ते दुसरे भारतीय ठरले आहेत.

शुभांशू यांचा जन्म…

१० ऑक्टोबर १९८५ रोजी लखनौमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात शुभांशू यांचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबाचा विमान किंवा अंतराळ संशोधन या विषयाशी काहीही संबंध नव्हता. मात्र, लहानपणी एका एअर शोला दिलेल्या भेटीत शुभांशू शुक्ला यांच्या मनात विमानाविषयी उत्सुकता जागी झाली. त्यांची बहीण सूची यांनी सांगितले की, लहानपणी एका एअर शोला गेले असताना, विमानांचा वेग आणि आवाज पाहून तो मंत्रमुग्ध झाला. त्याच वेळी त्याने उड्डाणाबाबत पहिल्यांदा विचारणा केली, मात्र त्यावेळी त्याचे स्वप्न इतक्या लवकर साकार होईल, असे कुणालाच वाटले नव्हते.

असे दाखल झाले ‘एनडीए’ मध्ये:

लखनौतील सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या शुभांशू यांची नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीसाठी निवड एका योगायोगाने झाली. एका वर्गमित्राने वयोमर्यादा ओलांडल्यामुळे शुभांशूला एनडीएचा फॉर्म भरायला दिला; यामुळे भविष्यच बदलले. २००६ मध्ये ते भारतीय हवाई दलात भरती झाले. त्यांनी एसयू-३० एमकेआय, मिग-२१, जग्धार, डॉनिअर-२८ यासारखी लढाऊ विमाने चालवत २,००० तासांहून अधिक उद्घाण केले.

आयआयएससी, बंगळुरूमधून एअरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये एमटेक पूर्ण केले. गेल्या वर्षी भारताच्या ‘गगनयान’ मानव अंतराळ मोहिमेसाठी निवडलेल्या चार अंतराळवीरांमध्ये शुक्ला यांचा समावेश होता. प्रशांत बालकृष्णन नायर, अंगद प्रताप व अजित कृष्णन हे त्यांचे सहकारी होते. सर्वांनी रशियाच्या गगारिन कोस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर व इस्रोच्या बंगळुरूतील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले.

ऐतिहासिक ठरली अंतराळ सफर

२०२४ च्या उत्तरार्धात अक्सिओम-४ मोहिमेची घोषणा.

चार अंतराळवीरांनी १८ दिवसांत केले ६० शास्त्रीय प्रयोग भारतात आखण्यात आलेले सूक्ष्म गुरुत्वाबाबतचे सात प्रयोग पूर्ण केले; शुभांशू यांच्या यशस्वी सफरीने भारताच्या गगनयान मोहिमेस चालना.

  • २५ जून २०२५ रोजी स्पेसएक्सव्या फाल्कन ९ रॉकेटच्या साहाय्याने ड्रॅगन अंतराळयानाचे यशस्वी प्रक्षेपण,
  • २६ जून २०२५ रोजी अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाशी जोडले गेले. शुक्ला व त्यांच्या सहकाऱ्यांचा १८ दिवसांचा मुक्काम सुरू झाला.

या काळात शुभांशु शुक्ला यांनी भारतात आखण्यात आलेले मूग व मेथीच्या बियांचे अंकुरण, स्टेम सेल संशोधन व मायक्रोअत्गीशी संबंधित सूक्ष्म गुरुत्वाबाबतचे सात प्रयोग पूर्ण केले.

शून्य गुरुत्यात पाण्याच्या बुडबुड्याचा प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता निर्माण केली. कॉम्प्युटर, मोबाइल, टीव्हीसारख्या सगिन असलेल्या गोष्टींच्या वापरामुळे मेंदूवर होणाऱ्या परिणामांचाही अभ्यास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शालेय विद्यार्थी व इस्रो शास्त्रज्ञांशी अॅमेच्युअर रेडिओ व व्हिडीओ लिंकद्वारे संवाद साधला.

  • १३ जुलै रोजी शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीरांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात निरोप समारंभ पार पडला.
  • १४ जुलै रोजी ड्रॅगन यान परत येण्यास निधाले. त्यात बसून अंतराळवीरांना पृथ्वीच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला.
  • १५ जुलै रोजी कॅलिफोनियाच्या समुद्रात पॅराशुटच्या सहाय्याने ड्रॅगन ग्रेस यान उतरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *