श्रावण महिना, सणांचा थाट आनंदाचा बहर, जाणून घ्या महत्व..!
यंदा शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होतोय. या श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी येते सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी देव शयनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची जबाबदारी महादेव वर असते…